* संगीता सेठी (प्रशासकीय अधिकारी, भारतीय जीवन विमा निगम)
विणकाम अनेक वर्षांपासून स्त्रियांचं लोकप्रिय शगल राहिलंय. थोडं मोठं होताना आईला लोकर सुयांच्या मदतीने फंद्यातून वेगवेगळे डिझाईन करताना पाहिलं. तिनेच या गोष्टी शिकवल्या.
हळूहळू काळ सरकताच हे सगळं आता आऊटडेटेड झालं आहे आणि तरुणींच्या हातामध्ये टीव्ही रिमोट, स्कूटर, कार आणि मोबाईल आले आहेत. परंतु विणकाम करणाऱ्यांना विचारा की या विणकामांमुळे त्यांना किती समाधान मिळत होतं. परंतु न जाणे का आणि केव्हा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये माझं विणकाम करणं मात्र सुरूच राहिलं. वेगवेगळया देशांचा प्रवास करतेवेळी मला आढळलं की विणकाम फक्त भारतातील शगल नाही तर परदेशातदेखील डॉक्टर उच्च रक्तदाब आणि नैराश्यतासारख्या आजारांच्या उपचारावर विणकामची थेरेपी करतात. अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या प्रवासाच्या दरम्यान ऑकलँडमध्ये राहावं लागलं होतं. लेक मेरिटजवळ लेक मेरिटजवळच्या एका छोटयाशा सुंदरश्या लायब्ररीत जाणं झालं. लायब्ररीयनने मला एक कागद देत सांगितलं की हे घे हे आहेत आमचे साप्ताहिक इव्हेंट.
मला आश्चर्य वाटलं
मला आश्चर्य वाटलं. त्यामध्ये प्रत्येक गुरुवारी विणकामाचं इव्हेंट होतं. मी चकीत होत लायब्ररींयनना पुन्हा भेटली. मी विणकामाच्या इव्हेंटवरती बोट ठेवत म्हटलं, ‘‘हे काय आहे?’’
मला समजून घ्यायचं होतं की हे कोणतं विणकाम आहे? तेव्हा तिने सांगितलं की आम्ही तुम्हाला सुया आणि लोकर देऊ. तुम्ही त्यावर डिझाईन शिकू शकता आणि इतर देखील लोक येतील. तुम्ही एकमेकांना तुमची डिझाईन दाखवू शकता. मला खूप आनंद झाला आणि खात्री पटली की हे माझ्या विणकामाबद्दलच बोलत आहेत.
त्या दिवशी मंगळवार होता आणि मी गुरुवारची वाट पाहत होती. गुरुवारी दुपारी ठीक साडेतीनची वेळ होती. मी लायब्ररीमध्ये प्रवेश केला तेव्हा आढळलं की पाच सहा लोक अगोदरपासूनच बसली होती. एक ८० वर्षाची आजी तिच्या १० वर्षाच्या नातवासोबत आली होती. एक ४५ वर्षाची स्पॅनिश महिला तिच्या टूल बॉक्ससोबत होती. एक ३० वर्षीय अमेरिकन तरुणी तिच्या सुयांसोबत होती. एक ५० वर्षीय आफ्रिकन पुरुष काही विणकामाच्या चित्रांसोबत होता आणि अनेक लोक होती.
मग तिने मी बनवलेल्या डिझाईन बघितल्या आणि शिकू लागली. मी त्या आफ्रिकन पुरुषाला विचारलं तेव्हा तो म्हणाला की, ‘‘मी एका मुलांच्या शाळेत प्रिन्सिपल आहे आणि विणकामाची खूप आवड आहे.’’
मला इतर लोकांनी सांगितलं की ते त्याच्याकडूनच नवनवीन डिझाईन शिकतात.
लायब्ररीयनने आमच्यासमोर एक मोठी टोपली ठेवली होती. त्यामध्ये अनेक रंगीबेरंगी लोकर, वेगवेगळ्या सुया, क्रोशे, बटन, बुक्स आणि अजून काय काय टूल्स होते, जे मी भारतातदेखील पाहिले नव्हते. १ तास कसा गेला तेच समजलं नाही. मी परतली तेव्हा अमेरिकन लायब्ररीमधून हा विचार करत आले की विणकाम भारतीय महिलांचेच नाही तर जगभरातील स्त्रियांचं आवडतं काम आहे.
हाताने बनवलेल्या वस्तूंचं समाधान
मी थोडं संकोचत त्या स्त्रिया आणि पुरुषांशी बोलले तेव्हा आढळलं की हे त्या सर्वांचे छंद आहेत आणि छंद माणसाला रिलॅक्स करतं आणि स्वत:च्या हातांनी बनवलेल्या वस्तूंमुळे जे समाधान मिळतं ते आत्मिक शांतीचा मार्ग आहे.
नंतर भारतात येऊन मी माझं विणकाम उत्साहाने करू लागली. आता मी निश्चित होऊन मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये व मेट्रोमध्ये, मरीन लाईन्सच्या किनारी व सोसायटीच्या पार्कात विणकाम करू लागली. स्वत:मध्ये मग्न झालेल्या मला किती लोकांनी पाहिलं होतं.
मरीन लाईनच्या किनारी एके दिवशी एका बाईने संकोचत विचारलं, ‘‘तुम्ही काय बनवत आहात?’’ आणि मग पुढचा प्रश्न होता, ‘‘मला पण शिकवाल का?’’
समोर समुद्र्राचा विस्तार होता आणि आम्ही विणकामाच्या दिवान्या आपापल्या सुयासोबत होतो. त्यांना दररोज विणकामाच्या टीप्स देत होते आणि त्याच एक महिन्यांमध्ये बेबी स्वेटर बनलं, तेव्हा त्या खूपच आनंदी झाल्या होत्या.
माझे चाहते
माझं विणकाम लोकल ट्रेन आणि मेट्रोमध्येदेखील सुरूचं होतं. काही लोकांना शिकायचं होतं. परंतु दररोज त्याच ट्रेन आणि त्याच डब्यामध्ये ट्रॅव्हल होईल कां नाही हा विचार करून त्यांना खूप वाईट वाटत होतं. इकडे माझ्या आजूबाजूलादेखील लोकल ट्रेनमध्ये विणकाम करणारे सह प्रवासी विचारत असत. ते लंच अवरमध्ये माझ्याजवळ येत, ‘‘मला देखील शिकायचं आहे.’’
मी नेहमीच हसत असे. एके दिवशी माझ्या बॉसने मास्कला क्रोशियाची लेस पाहून विचारलं, ‘‘तुला क्रोशिया येतं?’’ तेव्हा मी हसत म्हटलं की निटिंगदेखील येतं. ती म्हणाली, ‘‘मला शिकवशील का?’’
मी त्यावेळीदेखील शांत हसली होती.
इथे ही उदाहरणं देण्याचा माझा उद्देश हाच आहे की आपण सर्वजण हाताने बनवलेल्या वस्तूंचे किती दिवाने आहोत आणि ते आपल्याला शिकायचंदेखील असतं. परंतु कोणी प्रेरणा देणारे मिळत नाहीत.
मला आनंद आहे की मी कोणाची तरी प्रेरणास्त्रोत बनत आहे. माझ्या अमेरिकेतून भारतापर्यंतचा विणकामाचा प्रवास मला कायमच आनंदित करतो.