* पारूल भटनागर

लिपस्टिकशिवाय मेकअप अर्धवट मानला जातो. परंतु लिपस्टिक लावूनदेखील ओठ कोरडे राहात असतील आणि त्यानंतर ते क्रॅक म्हणजेच फुटत असतील तर मेकअपवरती पूर्ण पाणी फिरून जातं. अशावेळी जर तुमचे ओठ कोरडे असतील व ते फुटण्याची समस्या असेल तर तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे ते म्हणजे बीटच्या रसात थोडीशी मलई एकत्रित करून ती ओठांवर दहा मिनिटे मसाज करा यामुळे ओठ गुलाबी होण्याबरोबरच त्यांचा कोरडेपणादेखील हळूहळू कमी होऊ लागेल. बीट रूट न्यूट्रीएंट्सने पुरेपूर असतो आणि मलईमध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे हे दोन्ही ओठांसाठी खूपच फायदेशीर आहेत.

ग्रीन टी बॅग : तुम्ही ग्रीन टी बॅगदेखील अप्लाय करू शकता. याला हलकं गरम करून ओठांवर वापर करा. यामुळे ओठ फूटण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल. कारण यामध्ये अनेक अँटीऑक्सीडेंट्स असण्याबरोबरच टॅनींसदेखील असतात. जे त्वचेला हिल करण्याबरोबरच त्यांना मुलायम आणि हायड्रेट करण्याचेदेखील काम करतात. तुम्ही अर्धा चमचा मलईमध्ये चार-पाच थेंब मध व तीन गुलाब पाकळया टाकून त्यांना व्यवस्थित मॅश करून घ्या. नंतर ओठांवर लावून पंधरा मिनिटांसाठी सोडून द्या. नंतर व्यवस्थित मसाज करा. यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होण्याबरोबरच ते सुंदर देखील बनतात.

कशी असावी लिपस्टिक : जेव्हा एखादी लिपस्टिक वापरता, तेव्हा त्यामध्ये साधारणपणे तीन गोष्टी असतात -वीज वॅक्स, एखादं ऑइल आणि कलर या सर्वांची मिळून लिपस्टिक तयार होते. खूपच महागडया लिप्स्टिकमध्ये वीज वॅक्स आणि ऑइलबरोबरच रेड वाइनदेखील टाकली जाते. विज बॅग बेस्ट असतं. परंतु ज्या स्त्रियांना प्राण्यांची चरबीसारख्या गोष्टींचा वापर करायचा नसतो त्यांच्यासाठी लिपस्टिकमध्ये कोनोवा वॅक्स टाकलं जातं. जे प्लांट बेस्ड म्हणजेच पाम ट्रीने काढलं जातं. ते देखील ओठांसाठी उत्तम मानलं जातं.

लिपस्टिकची किंमत त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनावर अवलंबून असते. जसं कोणी त्यामध्ये मिनरल ऑइलचा वापर करतं, कोणी कोको बटर वापरतं, कोणी कॅस्टर ऑईल, कोणी जोजोबा ऑईल. यामध्ये कोणतं ऑइल वापरलं गेलं आहे आणि ते किती महाग आहे यावर लिपस्टिकची किंमत अवलंबून असते. दोन्ही वॅक्स उत्तम आहेत.

तेल तुमच्या ओठांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना मॉइश्चरदेखील देतं. ज्या लिपस्टिकमध्ये ऑइल अधिक असतं ते अधिक ग्लॉसी दिसून येतं. तर ज्या लिपस्टिकमध्ये वॅक्स अधिक असतं त्यामध्ये ग्लॉस कमी आणि कलर म्हणजेच थिकनेस अधिक दिसतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिपस्टिकमध्ये कोणते पिगमेंट्स टाकले गेले आहेत, कारण चांगल्या पिगमेंटसने लिपस्टिक आपल्या नैसर्गिक रंगात दिसून येते.

लिपस्टिकमध्ये लेडचा वापर हानिकारक असतो. हे लिप्स्टिकमध्ये अधिक काळ स्टे करण्यासाठी वापरलं जातं. म्हणून प्रयत्न करा की लिपस्टिकमध्ये प्यारा बिन, मिथाईल प्याराबिन, पॉली प्याराबिन, लीड्अन नसावा. या ऐवजी सोडियम बेंजोएट, रेटिनोल, सॉल्ट, क्ले, मध असावं. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या लिप्स्टिकला कोरडेपणापासून वाचवू शकता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...