* शैलेंद्र सिंह

गर्भावस्थेच्या दरम्यान शरीरात विविध प्रकारचे हार्मोनल बदल होत असतात, ज्याचा परिणाम शरीरावर वेगवेगळया प्रकारे होतो. या बदलांमध्ये सर्वाधिक प्रभाव त्वचेवर होतो. ज्यामुळे सुरकुत्या, डाग आणि पिंपल्सदेखील येतात. परंतु त्यासाठी अधिक चिंता करण्याची गरज नाही आहे. बाळाच्या जन्मानंतर काही काळातच हा त्रास आपोआप दूर होतो.

अनेकदा त्वचेवर होणारे काही बदल जसं की सुरकुत्या आणि स्ट्रेच मार्क्सचा प्रभाव त्वचेवर राहतो. यासाठी गर्भावस्थेच्यादरम्यान काही काळजी घेणे गरजेचे आहे.

या संदर्भात लखनौच्या अमरावती इस्पितळाच्या त्वचा आणि केस तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका सिंह सांगतात, ‘‘गर्भावस्था आयुष्याची  खूपच छान अनुभूती आहे. यामध्ये त्वचेशी संबंधित काही त्रास होतो. परंतु याबाबत कोणताही तणाव घेण्याची गरज नसते. थोडीशी काळजी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.’’

पिंपल्सना घाबरू नका

गर्भावस्थेचा त्वचेवर उत्तम प्रभावदेखील पडतो. यादरम्यान त्वचेत चमक येते. मुरूमं, पुटकुळया आल्यामुळे त्वचेवर डाग पडतात. किशोरावस्थेप्रमाणे अनेक स्त्रियांना गर्भावस्थेच्या काळातदेखील मुरूमं पुटकुळया येऊ लागतात. हे सर्व हार्मोन्स स्तराच्या चढ उतारामुळे होतं. गर्भावस्थेच्या सुरुवातीचे महिने असं होण्याची शक्यता अधिक वाढते.

जर पिरिएडच्या पूर्वी वा दरम्यान मुरूमं, पुटकुळया येत असतील तर खूप शक्यता आहे की गर्भावस्थेच्या दरम्यानदेखील त्या येतात. आता  यापासून वाचण्यासाठी लॅक्टिक अॅसिड आणि ट्री ऑइलचा वापर करा.

गर्भावस्थेच्या दरम्यान चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डागदेखील पडतात. हार्मोन वाढल्यामुळे त्वचेवर तीळ, निप्पल इत्यादीदेखील गडद रंगाचे दिसून येतात. उन्हात जाण्याने ही समस्या अधिक वाढू शकते. तसंही काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर हे डाग हलके होतात, परंतू काहीं बाबत असं काही होत नाही.  जेव्हादेखील तुम्ही बाहेर पडाल तेव्हा कमीत कमी ३० एसपीएफ सनस्क्रीन लावायला विसरू नका.

गर्भावस्थेमध्ये त्वचेचा कोरडेपणासाठी व ती ओलसर आणि सुंदर दिसण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येणार नाही आणि ती अधिक तरुण दिसेल.

मॉइश्चरायझर गर्भावस्थेमध्ये त्वचेचा ओलसरपणा वाढवत नाही. परंतु त्याचा नैसर्गिक ओलसरपणा कायम ठेवून देतो. तुमच्या त्वचेच्या अनुरुप सौंदर्य उत्पादनं निवडा आणि जरुरी असेल तर गर्भावस्थेच्या दरम्यान तुमच्या त्वचेच्या अनुसार त्यामध्ये बदल करा.

गर्भावस्थेच्या दरम्यान पूर्ण नऊ महिने त्वचा एकसारखी राहत नाही. म्हणून यामध्ये आलेल्या बदलानुसार क्रीमचादेखील वापर करा. या बाबतीत डॉक्टरांचा सल्लादेखील घेत राहा.

अनेक स्त्रियांना गर्भावस्थेच्या दरम्यान शरीरात वेदना होण्याची तक्रार असते. ज्यामुळे त्यांना झोप घेण्यामध्ये त्रास होतो. पूर्ण झोप न झाल्यामुळे त्वचेवरदेखील याचा प्रभाव पडतो. उत्तम झोपेसाठी झोपण्यापूर्वी डोकं व पूर्ण शरीराला मालिश करणं फायदेशीर ठरतं.

गर्भावस्थेच्या दरम्यान पडणाऱ्या सुरकुत्यापासून वाचण्यासाठी तुमच्या डाएटकडे देखील लक्ष द्या. सुरकुत्या पूर्णपणे ठीक करण्यासाठी लेझर ट्रीटमेंटदेखील एक पर्याय आहे. कोणत्या चांगल्या डीप पिगमेंटेशन क्रीमचा नियमित प्रयोग करण्यानेदेखील फायदा होऊ शकतो.

स्ट्रेच मार्क्स पडणं

सुरकुत्याप्रमाणे स्त्रियांच्या पोटावर आणि स्तनांवर गर्भावस्थेच्या दरम्यान स्ट्रेच मार्क्स पडतात. काही स्त्रियांच्या काख, नितंब आणि हातांवरदेखील स्ट्रेच मार्क्स होतात. हे कधीच जात नाहीत. हा काळानुसार हलके नक्कीच होतात. गर्भावस्थेत पडणाऱ्या स्ट्रेच मार्क्सपासून वाचण्यासाठी गर्भाच्या चौथ्या महिन्यापासून विटामिन ई ऑईल नियमित व हलक्या हाताने लावा. स्ट्रेच मार्क्स नक्कीच कमी होतील.

नसांचे उभारणं

अनेक स्त्रियांना गर्भावस्थेच्या दरम्यान नस उभारण्याची समस्या निर्माण होते. पाय, चेहरा, मान आणि हातांवर साधारणपणे ही समस्या निर्माण होते. काही स्त्रियांना शिरांमध्ये सूज आणि चेहरा लाल होण्याची समस्यादेखील उद्भवते. काही स्त्रियांची त्वचा गर्भावस्थेत कोरडी आणि संवेदनशील होते. यासाठी घरच्या घरी उपचार केले जाऊ शकतात. काही स्त्रियांना खासकरून ज्या थंड जागी राहतात त्यांना मध्ये गर्भावस्थेत अधिक हार्मोन बनल्यामुळे पायांवर तात्पुरते डाग पडतात.

मेकअपनेदेखील लपवू शकता डाग

गर्भावस्थेच्या दरम्यान अशा प्रकारचे डाग पडल्यामुळे सौंदर्य बिघडू नये म्हणून यापासून वाचण्यासाठी मेकअपचा आधार घेता येतो. मेकअप आर्टिस्ट पायल श्रीवास्तव सांगतात, ‘‘गर्भावस्थेमध्ये स्किन केअर सोबतच मेकअप  करण्यात सावधानता बाळगायला हवी म्हणजे कोणत्याही सौंदर्य उत्पादनाचा त्वचेवर वाईट परिणाम होणार नाही. नारळाच्या तेलाने त्वचेची नियमित मालिश करा.

असं न केल्यामुळे त्वचेची रोमछिद्रे बंद होतात, त्यामुळे त्यावर डाग पडू शकतात. दररोज रात्री चेहरा व्यवस्थित स्वच्छ करावा म्हणजे त्यावर मेकअपचं कोणतंही निशाण, मळ, धूळ इत्यादी राहणार नाही.

सकाळी मेकअप करण्यापूर्वी क्लींजिंग करा म्हणजे त्वचा ताजीतवानी, स्वच्छ आणि चिपचिपीत रहित राहील. क्लींजिंगनंतर हलकासा टोनरचा वापर करा. म्हणजे त्वचेची रोमछिद्रे बंद होतील आणि क्लिंजरचं निशान राहणार नाही. त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील.

गर्भावस्थेत त्वचेसंबंधित समस्यांचे कारण चुकीचा आहार घेणं आणि योग्य देखभाल न करणे देखील असतं गर्भावस्थेच्या दरम्यान आहारात पुरेशी ताजी फळं, भाज्या, कडधान्य, वनस्पती तेल, डाळी, अंडी, दूध, पनीर, मासे इत्यादींचा समावेश करा. दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी नक्की प्या. यामुळेदेखील त्वचेचा रंग नितळ होतो. गर्भावस्थेमध्ये जो आहार घेता त्यांचा सरळ परिणाम त्वचेवर होतो.’’

विटामिनने त्वचेची देखभाल

गर्भावस्थेत निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी विटामिन घेणं खूपच गरजेचा आहे. विटामिन ‘ए’च्या कमीपणामुळे त्वचा कोरडी होते. यामुळे सुरकुत्या पडतात आणि त्वचेची छिद्रे मोठी होतात. फळं, भाज्या, गाजर, हिरव्या पालेभाज्या, माशाचे तेल, अंड आणि कलेजीमध्ये विटामिन ‘ए’चे उत्तम स्त्रोत असतात. विटामिन ‘बी’ ने रक्तप्रवाह वाढतो. हे अतिरिक्त तेल कटपणा कमी करतात. त्वचेच्या अधिकांश समस्यांचे मूळ हे विटामिन ‘बी’ ची कमतरता आहे. कडधान्य, कलेजी, हिरव्या पालेभाज्या, मासे इत्यादी विटामिन ‘बी’ चे उत्तम स्त्रोत आहेत.

निरोगी, चमकदार व सुंदर त्वचेसाठी विटामिन ‘सी’ गरजेचं असतं. याच्या वापराने त्वचा सैलसर पडत नाही, तर ती तरुण राहते. आंबट फळं, स्ट्रॉबेरी, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो आणि भाजलेले बटाटे विटामिन ‘सी’ चे उत्तम स्त्रोत आहेत. विटामिन ‘ई’ च्या कमतरतेमुळे त्वचेला सुरकुत्या पडतात. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि वनस्पती तेलांमध्ये विटामिन ‘ई’ पर्याप्त प्रमाणात आढळतं. विटामिन सोबतच काही खनिज पदार्थदेखील त्वचेचे सौंदर्य वाढविण्यात मदतनीस ठरतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...