* पारुल भटनागर

समजा तुम्ही एका पार्टीत गेला आहात आणि तिथे तुमच्या शरीराला येणाऱ्या दुर्गंधीमुळे सर्वजण तुमच्यापासून दूर पळत आहेत तर विचार करा तुम्हाला किती लाजिरवाणे वाटेल. तुमच्या शरीराला येणारा दुर्गंधी हा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम तर करतोच पण तुमचा कॉन्फिडन्सही लूज करतो. त्यामुळे तुम्ही काही अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, ज्या तुमच्या शरीराची दुर्गंधी दूर करतील.

याविषयी रचना डाएटचे डॉ. पवन शेट्टी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की जेव्हा आपला फ्ल्युइड इंटेक चांगला नसतो, तेव्हा आपल्या युरिनचा कलर चेंज होण्याबरोबरच त्यातून दुर्गंधीही येऊ लागते आणि ती जागा प्रत्येक वेळी स्वच्छ न केल्याने आपल्या कपडयातून वास येऊ लागतो आणि त्याचबरोबर इन्फेक्शन होण्याचा धोकाही उद्भवतो. त्यामुळे दररोज दर २२ ते ३० मिनिटांनी पाणी पीत राहिले पाहिजे.

जेव्हा आपण ट्रान्सफॅटसारखे जंकफूड जास्त प्रमाणात खातो, तेव्हा त्यातून घामाच्या रूपातून जे विषारी पदार्थ निघतात, त्यांना फार दुर्गंधी येते. इतकेच नाही तर ट्रान्सफॅट युक्त पदार्थ खाल्ल्याने आपले लिव्हरही फॅटी होते. त्यामुळे हेल्दी खाणे घेतले पाहिजे. जेव्हा आपण योग्य आहार घेत नाही, तेव्हा आपल्या इन्टेस्टाइनमध्ये बॅड बॅक्टेरिया तयार होतात, जेणेकरून दुर्गंधी येते.

आहारात हे समाविष्ट करा

लक्षात ठेवा की फ्ल्युइड मेंटेन केल्याने ब्लड क्लॉट्स होत नाहीत आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. त्याचबरोबर युरीन ट्रॅक क्लिअर राहिल्याने इन्फेक्शन होण्याचा धोकाही उद्भवत नाही. त्यामुळे प्रॉपर डाएट करण्यासाठी आपल्या आहारात खालील पदार्थ घेण्यास विसरू नका :

ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीराला दुर्गंधीपासून वाचवण्याचे हे सर्वात सशक्त टूल आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करा.

लिंबू : लिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हा शरीराची दुर्गंधी दूर करण्याचे काम करते, त्याचबरोबर यात अॅसिडिक गुण असल्याने हा स्किनच्या पीएच लेव्हलला कमी करण्याचे कामही करतो. ज्यामुळे बॅड बॅक्टेरिया निर्माण होण्यात अडथळे येतात. याशिवाय लिंबात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या सिस्टमला इंपुव करण्यासाठी दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याने करा. अंडरआर्म्स आणि पायांच्या खालच्या भागात लिंबू चोळल्याने थोडयाच वेळात दुर्गंधी नाहीशी होते.

टोमॅटो : टोमॅटोमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक गुण असल्याने हे शरीरात दुर्गंधी पसरवणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात. यात असलेल्या नॅचरल अॅस्ट्रिजेंटमुळे चेहऱ्यावर घामही येत नाही. त्यामुळे दररोज १/२ कप टोमॅटो ज्यूस अवश्य प्या किंवा भोजनात सॅलड म्हणून टोमॅटोचा समावेश करा. ज्या जागी जास्त घाम येतो, तिथे १०-१५ मिनिटे टोमॅटो लावून ठेवा.

दही : यात उपयुक्त असे जीवाणू असल्याने हे जेवण पचण्यास साहाय्य करते. त्याचबरोबर हे सहजपणे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

वेलची : वेलचीसुद्धा फार उपयुक्त असते. जर तुम्हाला वाटते की तुमच्या शरीरातून छान सुगंध यावा तर खाण्यात १-२ वेलची दाणे अवश्य घाला, कारण यात बॅड बॅक्टेरिया शरीरातून बाहेर काढण्याची शक्ती असते.

आले : आले एकीकडे शरीराची दुर्गंधी दूर करून तुम्हाला फ्रेश फिलिंग देते, त्याचबरोबर हे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे कामही करते.

स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी डेली अँटीबॅक्टेरियल साबणाने अंघोळ करा आणि स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. जेव्हाही तुम्ही बाहेरून याल तेव्हा हातपाय, तोंड  स्वच्छ धुतले पाहिजे नाहीतर घाम येऊन दुर्गंधी येण्याची शक्यता असते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...