* पूजा नागदेव, कॉस्मेटोलॉजीस्ट,फाउंडर ऑफ इनाचर

थंडीचा त्रास वयोपरत्वे अधिक धोकादायक होतो. जसजसे आपण मोठे होतो आपली त्वचा पातळ होत जाते. खासकरून काही अशा लोकांना जे उन्हाच्या अधिक संपर्कात राहतात. सोबतच वय वाढल्यामुळे आपलं शरीर अधिक कोरडं होत जातं.

अशावेळी हिवाळयात या स्किन केअर टीप्सचं पालन करणं खूपच गरजेचं आहे.

क्लिंजरचा वापर

वास्तविकपणे आपल्याला दररोज आपल्या शरीराला वरपासून खालपर्यंत साबणाने स्वच्छ करण्याची काहीच गरज नसते. मॉइश्चरच या जागी राहणं खूपच गरजेचं आहे, जिथे त्याची गरज आहे. जसं की काख, पाय आणि चेहरा. साबणाचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. परंतु साबणाचा वापर आपल्या त्वचेला कोरड करतो. म्हणून गरजेचं आहे की आपल्या शरीरातील मॉइश्चर अधिकाधिक शरीरावर असावं आणि ते साबणाने काढता कामा नये.

जिथे खरी गरज आहे तिथे एक मुलायम सुगंध नसणाऱ्या क्लिंजर कॉपीचा वापर करा. अशी उत्पादनं शोधा ज्यामध्ये मॉइश्चराइजर वा तेल असावं. अशाप्रकारे तुम्ही या जागा स्वच्छ करण्याबरोबरच मॉइश्चराइजरदेखील करू शकता, जिथे मॉइश्चरची गरज असते.

थंड पाण्याने अंघोळ करा

हिवाळयातील सर्वात थंड दिवसात तुम्हाला गरम पाण्याने अंघोळ कराविशी वाटते. परंतु अधिक गरम पाणी तुमच्या शरीरातील नैसर्गिक बॅरियर खराब करू शकतं, जे शरीरातील मॉइश्चरला रोखण्यासाठी बनविण्यात आलेलं असतं.

टेंपरेचर कम्फर्ट होण्यासाठी पाणी पुरेसं गरम असायला हवं. लक्षात ठेवा की जर टेंपरेचर पाच वर्षाच्या मुलासाठी अधिक असेल तर ते तुमच्यासाठीदेखील अधिकच आहे. जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुमच्या त्वचेला दररोज पाण्याच्या संपर्कात आणणं गरजेचं आहे. तुमच्या त्वचेच्या सर्वात वरच्या थराला संपर्कात आणण्यासाठी १० ते १५ मिनिटे गरम पाण्याखाली बसा.

अंघोळीपूर्वी

शॉवर घेण्यापूर्वी लोशन वा क्रीम लावा, अन्यथा तुम्ही पाण्याच्या माइश्चराइजिंगचा लाभ घेऊ शकणार नाही. जेव्हा तुम्ही शॉवर घेऊन बाहेर पडता, तेव्हा तुमची त्वचा व्यवस्थित हायड्रेट होते. परंतु तुम्ही पाण्याची उणीव पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर एखादं तेल वा लोशन लावलं नाही तर तुमची त्वचा पूर्णपणे कोरडी होईल.

अनेक महिला बॉडी मॉइश्चराइज करण्यासाठी सुगंधित लोशन वा तेलाचा वापर करतात, जे शरीराला इरिटेट करू शकतं.

त्वचेला तेलापासून दूर ठेवू नका

भलेही तुमची त्वचा तेलकट किंवा मुरूम फुटकुळयानी भरलेली असेल परंतु तुम्हाला तुमच्या शरीराप्रमाणे स्वत:चा चेहरा धुतल्यानंतरदेखील सुगंध नसलेलं मॉइश्चराइजर लावणे गरजेचे आहे. तुमची त्वचा तेलकट असली तरीदेखील तुमच्या चेहऱ्या खालचा थर कोरडाच असतो. यासाठी एक हलका तेलमुक्त मॉइश्चराइजरचा वापर करा. खासकरून जर तुम्ही मुरूमपुटकुळया काढणाऱ्या उत्पादनाचा वापर करत असाल. प्रिस्क्रिप्शन वा ओव्हर द काउंटरची उत्पादनं मुरुमांना कोरडी आणि त्रास देणारी असतात. म्हणून तुम्हाला हे सहन करण्यासाठी सक्षम व्हावं लागणार.

सनस्क्रीनसोबत स्टिक करा

आपल्याला हिवाळयात भलेही ऊन लागत नसलं तरी हानिकारक किरण यामध्येदेखील असतात. ही किरणं चेहऱ्याच्या आतपर्यंत जातात, जे त्रासाचं प्रमुख कारण बनतात. जर तुम्ही अधिक काळ बाहेर रहात असाल तर एसपीएफ -३० सोबत दररोज एक मॉइश्चराइजर लावणं गरजेचे आहे. परंतु जर तुम्ही बाहेर असाल वा जर तुम्ही डोंगराळ भागात रहात असाल वा जिथे अनेकदा बर्फ पडत असेल तर तुम्ही दिवसातून अनेकदा मॉइश्चराइजर लावण्याची गरज आहे.

आरोग्याकडे लक्ष द्या

प्रत्येक ऋतूच्या हिशोबाने तुमच्या त्वचेची देखभाल करणं खूपच गरजेचं आहे. खासकरून जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या त्रासामुळे कंटाळलेले असता, जो अनेकदा हिवाळयात होतो. जसं की एझिमा इत्यादी. कोणतीही गोष्ट रोखण्यापेक्षा कोणतीही गोष्ट ठीक करण्याचा त्रास अधिक असतो. समस्या निर्माण होण्यापूर्वीच तुम्ही हिवाळयाच्या ऋतूमध्ये स्किनकेअर रुटीन सुरू करणं अधिक योग्य आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...