* प्रतिनिधी
अलीकडेच माझं लग्न झालंय. पती खूपच समजूतदार आहेत आणि माझ्यावर खूप प्रेमदेखील करतात. माझी समस्या ही आहे की माझ्या काही मैत्रिणी आहेत, ज्या अनेकदा माझ्या घरी येतात आणि मला त्यांच्या बॉयफ्रेंड्सबद्दल खूपच जवळच्या आणि अंतर्गत गोष्टी सांगत राहतात. त्या मला फोनवरदेखील फोटो व गोष्टी शेअर करत राहतात. त्या बोलता-बोलता माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दलदेखील चेष्टा करत राहतात. हे सर्व ऐकूण मी स्वत:वर नाराज होते. असं वाटतं की लग्नापूर्वीचं आयुष्य किती छान होतं. मी खूप त्रासलेली आहे. कृपया सांगा काय करू?
फॅन्टसी म्हणजेच काल्पनिक जगतात हरवलेल्या अशा तरुणीं खरंतर यामध्येच आनंद मिळवतात आणि त्या याला स्टेटस सिम्बॉल समजतात. तसेच त्यांना वाटत असतं की दुसऱ्यानेदेखील त्यांच्या प्रमाणे विचार करावा आणि तेच करावं. याचा मनावर नक्कीच परिणाम होत असतो.
तुम्ही असं अजिबात करू नका. कारण आता तुम्ही विवाहित आहात आणि तुमचे पती तुमच्यावर खूप प्रेमदेखील करतात. यासाठी योग्य आहे की वैवाहिक आयुष्याची गाडी व्यवस्थित चालवा. लग्नानंतर आयुष्यात आनंद कमी होत नाही.
तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगू शकता की लग्नाबाबत तुमचे विचार वेगळे आहेत, आता मी विवाहित आहे म्हणून या सर्व गोष्टींमध्ये मला अजिबात रुची नाही आहे.
मी २५ वर्षीय विवाहित स्त्री आहे. आम्ही एका शहरात भाडयाच्या घरात रहातो. काही दिवसांपूर्वी माझ्या पतींचा छोटा भाऊ म्हणजेच माझा दिर आमच्यासोबत राहायला आला आहे. दिर अजून अविवाहित आहे. पती ऑफिसच्या कामात व्यस्त असतात, यामुळे मी माझ्या दिरासोबत शॉपिंग इत्यादी करू लागली. तिकडे काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात बदल झाल्यामुळे मी चिंताग्रस्त आहे. तो आता माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. मला हात लावायला पाहतो. कळत नाही आहे की मी काय करू? यामुळे दोन्ही भावांमध्ये अंतर यावं असं मला नकोय. अनेकदा वाटतं की पतीना याबद्दल सांगावं. परंतु काहीतरी विचार करून मी पुन्हा थांबते. सांगा मी काय करू?
शक्य आहे की जास्त चेष्टा-मस्करी करून तुम्ही त्याला डोक्यावर बसवलं आहे. दिर आणि वहिनीच नातं खूपच पवित्र असतं आणि जर तुमचा दिर मर्यादा विसरून चुकीची इच्छा ठेवत असेल तर नक्कीच त्याच्यापासून दूर रहा. खरेदी वा बाजारसाठीदेखील दिरासोबत न जाता पतीसोबत जा. तुम्ही तुमचं लहान-मोठं सामान पतीसोबत जाऊनदेखील खरेदी करू शकता. पती ऑफिसमधून आल्यानंतर जवळच्या बाजारात जाऊन खरेदी करू शकता. यामुळे पतीलादेखील चांगलं वाटेल. आठवडयाच्या शेवटी वा ज्या दिवशी पतींना सुट्टी असतील त्यांच्यासोबत जाऊन पूर्ण आठवडयाची खरेदी करून घ्या. या दरम्यान तुम्हाला संयमाने काम करावं लागेल.
मी एकत्रित कुटुंबात रहाते. सासू-सासरे चांगल्या पदावर होते. आता ते निवृत्त आहेत. माझे पती आणि मोठे दिर चांगल्या कंपनीमध्ये काम करतात. ननंदेचं अजून लग्न झालेलं नाहीये. घरात कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे म्हणजे सगळी सुखसुविधा आहे. परंतु दररोज किटकिट आणि भांडणामुळे मी त्रासली आहे. पतींना एकत्र कुटुंबात रहायचंय. म्हणून वेगळा फ्लॅट घेऊन राहण्यासाठी सांगू शकत नाही. कृपया सांगा मी काय करू?
घरात छोटी मोठी भांडण होणं सामान्य गोष्ट आहे. असं म्हणतात की जिथे तक्रार असते तिथेच प्रेमदेखील असतं. परंतु जेव्हा मतभेद मनभेदामध्ये बदलून मोठया भांडणाचं रूप घेऊ लागतात तेव्हा ही नक्कीच चिंतेची बाब असते. सध्या तुमच्या घराची अवस्था वाईट नाही आहे की पतीसोबत तुम्ही वेगळं राहण्याचा विचार करावा. घरातील भांडण कोणा मोठया वादाचं रूप घेऊ नये यापासून वाचण्यासाठी तुम्हाला स्वत: पुढाकार घ्यावा लागणार.
एकत्रित कुटुंबात साधारणपणे कामाबाबतदेखील वाद होतात. म्हणून तुम्ही घरातील कामेदेखील व्यवस्थितरित्या मिळून-मिसळून करा. छोटया-मोठया गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्यातच समजूतदारपणा आहे. लोक संयुक्त कुटुंबात राहून स्वत:च्या स्वप्नांना पंख देऊ शकत नाही परंतु एकत्रित कुटुंबात यासाठी खूपच चांगली संधी मिळते. एकत्रित कुटुंबात वाढलेली मुलेदेखील इतर मुलांच्या तुलनेत मानसिक व शारिरिकरित्या अधिक सुदृढ होतात.
मी ४२ वर्षीय पुरुष आहे. एक मुलगा आहे जो होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतोय. मी आणि माझी पत्नी दोघेही नोकरदार आहोत. समस्या वृद्ध वडिलांबाबत आहे. ते चालू फिरू शकत नाहीत आणि त्यांची विशेष देखभाल करावी लागते. कमी वेळ मिळत असल्यामुळे आम्ही त्यांची योग्य देखभाल करू शकत नाही आहोत. त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात ठेवू शकतो का? एखाद्या वृद्धाश्रमाची माहिती मिळाली तर आमचं काम सहज सोपं होईल?
तुम्ही तुमच्या वृद्ध वडिलांची देखभाल करण्यासाठी दिवसा एखादी केअरटेकर ठेवणे योग्य राहील. या अवस्थेत वृद्धांना फक्त आर्थिकच नाही तर शारीरिक व मानसिकरित्यादेखील आपल्या लोकांसोबत राहायला आवडतं. नंतर सकाळ-संध्याकाळ आणि सुटीच्या दिवशी त्यांना तुमची सोबत मिळत राहील. यामुळे ते कंटाळणार देखील नाहीत आणि योग्य देखभालमुळे ते निरोगीदेखील रहातील.