* रितू वर्मा

सोमीच्या ऑफिसमध्ये आज सगळयांचे चेहरे फुलले होते. आणि फुलणार ही का नाहीत, आज सर्व कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ मिळाली होती पण सोमी निराश दिसत होती.

जेव्हा कायराने याबद्दल विचारले तेव्हा सोमीच्या हृदयातील ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ‘‘माझ्या पगारावर माझा नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा हक्क आहे.’’

पगारवाढ म्हणजे जास्त काम, पण मला काय मिळणार तर काही नाही. दर महिन्याला माझे पती लहान मुलाप्रमाणे काही हजार माझ्या हाती देतात. विचारले असता सांगतात की सर्व काही तर मिळत आहे, तू या पैशांचे काय करणार, उधळपट्टी करण्याशिवाय?’’

सोमी ही केवळ एकटीच महिला नाही. सोमीसारख्या स्त्रिया प्रत्येक घरात आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्या तरी गुलाम आहेत. पती आणि कुटुंबासाठी त्या फक्त कमाईचे यंत्र आहेत. त्यांचा पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठे गुंतवायचा हा पतीचा मूलभूत अधिकार असतो.

रितिकाची कथाही सोमीपेक्षा वेगळी नाही. तिचा पगार होताच संपूर्ण पैसे विभागले जातात. मुलांच्या शाळेची फी, गृहकर्जाचा हप्ता आणि घरखर्च हे सर्व रितिकाच्या पगारातून होत असते. पण रितिकाचा पती प्रदीपचा पगार कुठे खर्च होतो हे प्रदीपशिवाय कुणालाच माहीत नाही.

प्रत्येक वेळी सुट्टीत फिरायला जाण्याचे नियोजन करणे, दूर-जवळच्या नातेवाईकांसाठी भेटवस्तू खरेदी करणे, पत्नी, मुलांसाठी कपडे खरेदी करणे इत्यादी कामे प्रदीप आपल्या पगारातून करतो आणि सर्वांचाच लाडका बनून आहे. त्याचवेळी प्रदीप रितिकाबद्दल म्हणतो की अहो स्त्रियांचा लाली-लिपस्टिकवरील खर्च रोखण्याचा हा एक नवीन मार्ग आहे की त्यांच्या पगारावर कर्ज वगैरे घेणे.

मासिक ८० हजार कमावणारी रितिका ना तिच्या आवडीचे कपडे घालू शकते ना कोणाला तिच्या आवडीचे गिफ्ट देऊ शकते. एवढी कमाई करूनही ती पूर्णपणे तिच्या पतिवर अवलंबून आहे.

वरील दोन्ही घटना पाहिल्या तर एक गोष्ट दोघींमध्ये समान दिसून येते की सोमी आणि रितिका अजूनही मानसिकरित्या गुलामगिरीच्या बेडयांमध्ये कैद आहेत. दोन्ही महिलांमध्ये एक समानता आहे ती म्हणजे दोघीही मानसिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत.

आपल्या कष्टाच्या घामाची कमाई कशी खर्च करायची हे दोघीनाही कळत नाही.

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसलेल्या महिलांपेक्षा सोमी आणि रितिकासारख्या महिलांची अवस्था वाईट आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कधी प्रेमात तर कधी भीतीपोटी त्या त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाची चावी त्यांच्या पतीच्या हाती सोपवतात, जे अजिबात योग्य नाही.

आजच्या काळात जीवनाची गाडी तेव्हाच सुरळीत चालू शकते जेव्हा पती-पत्नी दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतील. ज्याप्रमाणे गाडीची दोन्ही चाके समान नसतील तर गाडी धावू शकत नाही, त्याचप्रमाणे पती-पत्नीमध्ये समानता असली पाहिजे जेणेकरून आयुष्य सुरळीत चालेल.

जर तुम्ही या छोटया-छोटया गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही तुमची मिळकत तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल.

प्रेमाचा अर्थ गुलामगिरी नाही

स्त्रिया स्वभावाने कोमल आणि भावनिक असतात. प्रेमाच्या नात्यात बांधून जाऊन त्या त्यांच्या पगाराची इत्यंभुत माहिती पतीला देतात. पती आपल्या पगारासह पत्नीचा पगार ही आपल्या हिशोबाने खर्च करू लागतात. सुरुवातीला बायकांना हे सगळं खूप गोंडस वाटतं, पण लग्नानंतर १-२ वर्षांनी त्या मनातल्या मनात याबद्दल कुढू लागतात. पतिच्या हाती तुमचा पगार किंवा एटीएम कार्ड देणं हे प्रेम किंवा निष्ठेचं लक्षण नसून ते गुलामगिरीचं लक्षण आहे.

तुमचा मूलभूत अधिकार

लग्नानंतर मुली स्वत:वर खर्च करण्यास संकोच करू लागल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसून येते. आता घराची जबाबदारी हीच त्यांची सर्वाच्च जबाबदारी झाली आहे, असे त्यांना वाटते. पार्लरमध्ये जाणे किंवा स्वत:वर खर्च करणे, मैत्रिणींसोबत बाहेर जाणे, त्यांना सर्व काही अनावश्यक वाटते जे योग्य नाही. तुमचं पहिलं नातं तुमच्याशी आहे, त्यामुळे त्याला आनंदी ठेवणं हा तुमचा मूलभूत अधिकार आहे.

तुमचे भविष्य सुरक्षित करा

जीवन तुमचे आहे, म्हणून त्याची लगाम तुमच्याच हातात ठेवा. लग्न म्हणजे सारं काही पतिच्या भरवश्यावर सोडून हातावर हात धरुन बसणं असा होत नाही. तुमचे भविष्य सुरक्षित करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमची कमाई योग्य ठिकाणी गुंतवून तुमचे भविष्य सुरक्षित करा.

तुमच्या ऐपतीनुसार देवाणघेवाण करा

पत्नीच्या पगारामुळे पती आपला खोटा अभिमान दाखवत लग्नात आणि फंक्शनमध्ये खूप महागड्या भेटवस्तू देतात असे अनेकवेळा दिसून येते. जर तुमच्या पतीलाही ही सवय असेल तर तुम्ही त्याला पहिल्याच संधीत टोकावे. माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी समानतेने आणि तुमच्या ऐपतीनुसारच देवाणघेवाण करा.

विचारपूर्वक गुंतवणूक करा

तुम्हाला तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवयाचे आहेत किंवा त्याद्वारे एखादा ब्रँड विकत घ्यायचा की मालमत्तेत टाकायचेत. हा तुमचा निर्णय असला पाहिजे, तुम्ही तुमच्या पतिचा सल्ला नक्कीच घेऊ शकता, पण त्याला तुमच्या पैशाचा कर्ताधर्ता बनवू नका.

पैसा खूप शक्तिशाली आहे

हे कटू असले तरी सत्य आहे. पैशात खूप ताकद असते. जोपर्यंत तुमच्याकडे तुमचा पैसा आहे, तोपर्यंत सासरच्या घरात तुमचा सन्मान असेल. तुमचा पतिसुद्धा काही उलटसुलट करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल कारण त्याला ठाऊक असेल की तुमच्या आयुष्याची लगाम तुमच्याच हातात आहे. जर त्यांनी काही चुकीचे केले तर तुम्ही त्यांना सोडण्यास ही मागेपुढे पाहणार नाही.

पतिला हेही चांगलंच ठाऊक असेल की भविष्यासाठी तुम्ही जमा केलेला पैसा हा तुमच्यासोबतच त्यांच्या म्हातारपणाचादेखील आधार आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...