मिश्किली * समीक्षा राऊत

नवरा बायकोची भांडणं तर नेहमीच होतात. पण बायको रागावून माहेरी जाऊन बसली तर नवऱ्याची परिस्थिती काय असते यावर आम्ही विचार केला, तेव्हा लक्षात आलं की वीस पंचवीस वर्षांपूर्वी जी परिस्थिती असायची ती आज राहिली नाहीए.

पूर्वीच्या भांडणाची कारणंही तशी निरागस असायची. ‘‘मिसेस गोखल्यांच्या साडीसारखी साडी मला हवीय,’’ बायकोचा हट्ट असायचा. नवरा जर ऑफिसात बॉसकडून सज्जड दम घेऊन आला असेल तर संतापून ओरडायचा, ‘‘हवी आहे तर आपल्या माहेराहून आण ना?’’

‘‘हे बघा, माझ्या माहेरचं नाव काढायचं नाही,’’ अन् बघता बघता भांडण इतकं वाढायचं की बायको सरळ माहेरी जाऊन बसायची...झालं! इकडे नवऱ्याचा वनवास सुरू.

सकाळी लवकर दूधवाला येतो. त्याच्याकडून दूध घेऊन पुन्हा अंथरूणावर पडल्या पडल्या गाढ झोप लागते. जाग आल्यावर कळतं, उठायला फारच उशीर झाला आहे. तेवढ्यात ती मोलकरीण येते. बायकोनं अगदी निवडून पारखून कुरूप अन् कळकट बाई निवडली आहे, काय बिशाद आहे घरातला पुरूष तिच्याकडे बघायचं धाडस करेल. तिला तशीच परत पाठवायची अन् जे काही फ्रीजमध्ये दिसेल ते पोटात ढकलून बिना इस्त्रीचे कपडे अंगावर घालून, बिना पॉलिशचे बूट पायात घालून ऑफिसला धापा टाकत पोहोचायचं. उशीर झाल्यामुळे साहेबांची नजर चुकवावीच लागते.

दुपारी सगळे आपापले डबे उघडतात अन् चविष्ट भाज्यांच्या वासानं भूक एकदम खवळते. कॅन्टीनचं बेचव जेवण घशाखाली उतरत नाही. मनात येतं, ‘उगीचच बायकोशी भांडलो...ती माहेरी गेली नसती तर निदान छानसा जेवणाचा डबा तर मिळाला असता.’

सायंकाळी गेल्यावर सकाळचं दूध तसंच ओट्यावर दिसतं. चहा केला तर तो नासतो, कारण दूधच नासलेलं असतं. टीव्हीवरचे कार्यक्रम फारच रटाळ वाटतात. रात्रीच्या जेवणासाठी खिचडीचा बेत ठरतो. स्वयंपाकघरात कधी जावंच लागलं नव्हतं. तरीही डाळतांदूळ धुवून एकत्र करून कुकरमध्ये शिजायला लावलं. पाणी कमी झाल्यामुळे सेफ्टी वॉल्व्ह उडाला. स्वत:लाच शिट्या घालत तीन जिने उतरून स्कूटरला किक मारून जवळचाच एक धाबा गाठला. छोले भटूरे खाऊन घरी आल्यावर अंथरूणावर झोपू म्हटलं तर सकाळचे ओले कपडे अन् टॉवेल तिथंच पसरून बसलेले. त्यांना बाजूला ढकलून झोपायचा प्रयत्न केला. त्यावेळी बायकोची फारच आठवण आली...फोन करून बोलावून घ्यावं का? पण तेवढ्यात पुरूषी अहंकाराने फणा काढला. स्वत: गेली आहे, तर येईल स्वत:च!

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...