गरिमा पंकज
एक सुव्यवस्थित आणि स्वच्छ घर गृहिणीची स्वच्छता दर्शवते, पूर्वी सिमेंटच्या फरशा होत्या, परंतु आता टाइल्सचे युग आहे. जर टाइल्स चमकवल्या तर संपूर्ण घर सुंदर दिसते. टाइल्स स्वच्छ ठेवणे केवळ एका सुंदर घरासाठीच आवश्यक नाही तर रोगांपासून संरक्षण करण्यासाठीदेखील महत्वाचे आहे.
चला, टाइल्स स्वच्छ करण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टीप्स जाणून घेऊया :
* जर तुम्हाला घर पटकन स्वच्छ करायचे असेल तर एक लिंबू कापून घ्या आणि त्याचा रस एका बादलीभर पाण्यामध्ये मिसळा आणि त्याने टाइल्स स्वच्छ करा किंवा मग टाइल्सवर लिंबू रगडा आणि १०-१५ मिनिटे सोडा. नंतर मऊ ओल्या कपडयाने पुसून घ्या. अशाने टाइल्सवरील सर्व डाग साफ होतील.
* टाइल्सवर चहा, कॉफी इत्यादींचे हट्टी डाग लागल्यास ते स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करा. यासाठी आपण गरम पाण्यात व्हिनेगर थोड्या प्रमाणात मिसळा आणि त्याने टाइल्स स्वच्छ करा. नंतर साबण किंवा डिटर्जंट मिसळलेल्या गरम पाण्याने धुवा. सर्व डाग दूर होतील.
* पॅराफिन आणि मीठात कापड भिजवून टाइल्स स्वच्छ केल्याने त्यांची चमक कायम राहील.
* टाइल्सवर ब्लीचिंग पावडर रात्रभर लावून ठेवा. सकाळी स्वच्छ करा. टाइल्स चमकतील.
* लिक्विड अमोनिया आणि साबणाच्या मिश्रणानेदेखील टाइल्सची घाण साफ करता येते. १ कप अमोनिया आणि साबणाचे मिश्रण एका पाण्याच्या बादलीमध्ये मिसळून फ्लोर टाइल्स स्वच्छ करा.
* टाइल्सवरील डाग दूर करण्यासाठी बटाटयांचा वापर देखील केला जाऊ शकतो. बटाटे कापून टाइल्सवर चोळा. १५ मिनिटांनंतर गरम पाण्याने धुवा. टाइल्स अगदी नव्यासारख्या चमकू लागतील.
* पांढऱ्या टाइल्स साफ करण्यासाठी २५ टक्के ब्लीच किंवा ऑक्सिजन ब्लीच ७५ टक्के पाण्यात मिसळा आणि स्क्रब किंवा ब्रशने स्वच्छ करा.
* पुसताना पाण्यामध्ये डिटर्जंट घाला आणि त्यासह टाइल्स स्वच्छ करा. दररोज असे केल्याने टाइल्स चमकत राहतील.
संगमरवरी स्वच्छ करण्याच्या टीप्स
संगमरवरी नेहमी मऊ कापड किंवा स्पंजने स्वच्छ केले पाहिजे. त्या साफ करण्यासाठी लोखंडी तारेचा ब्रश वापरू नका. व्हिनेगर, लिंबूसारख्या गोष्टींद्वारे संगमरवरी मार्बल साफ करू नये.