* अनुराधा गुप्ता

प्रेम विवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न, प्रत्येक मुलीच्या मनात सासर विषयी थोडी भीती असतेच. अनेकदा तर ही भीती काळजीचे रूप धारण करते. पण समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा मुलीच्या मनात सासरच्यांविषयी नकारात्मक दृष्टीकोन तयार होऊ लागतो. अशा स्थितीत कुठलाही आधार नसतानाही मुलगी भावी सासरच्यांमंडळींमध्ये उणिवा शोधू लागते.

मॅरेज काऊंसेलर डॉ. वीरजी शर्मा सांगतात, ‘‘मुलींमध्ये सासरबद्दल भीती असणे स्वाभाविक आहे. पण अनेकदा ही भीती इतकी वाढते की मुलगी स्वत:च काही कल्पना रचून असा विचार करून ठरवून टाकते की सासरचे त्या स्थितीत तिच्यासोबत कसे वागू शकतील. जास्तीत जास्त मुली नकारात्मक विचारच करतात. याची दोन कारणे असू शकतात. पहिले की मुलीला सासरच्या सर्व सदस्यांचे स्वभाव माहीत असावेत व दुसरे हे की होणाऱ्या सासरच्यांबद्दल तिला काहीही माहीत नसावे.’’ दोन्हीही परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता तिला घेरून टाकतात. अशा काही चिंतांमधून कसा मार्ग काढावा यासाठी काही उपाय...

स्वत:ला व्यक्त न करू शकण्याची भीती

हे तर स्पष्टच आहे की सासरची जागा आणि माणसे दोन्ही मुलीसाठी अनोळखीच असतात. अशावेळी प्रत्येक मुलीला सासरच्या कुठल्याही सदस्याकडे आपल्या इच्छा, समस्या आणि भावना व्यक्त करण्यासाठी संकोच वाटतो. उदाहरण म्हणून एका नववधूचा चेहरा पाहण्याच्या विधीबद्दल बोलायचे झाले तर या विधिमध्ये काही कमतरता आहेत तर काही लाभसुद्धा आहेत. त्यातील लाभ हा आहे की घरातील नवी सदस्य झालेल्या नववधूला भेटण्याची, ओळख करून घेण्याची संधी सर्व नातेवाईकांना मिळते, तर उणीव अशी की दमलेली वधू लोकांच्या त्या गर्दीत स्वत:ला असुरक्षित समजू लागते.

या विधीव्यतिरिक्त असेही काही प्रसंग येतात, जेव्हा मुलगी तिच्या मनातील भावना सासरच्यांसमोर व्यक्तही करू शकत नाही आणि निराशेसह त्यांच्या म्हणण्यानुसार मान डोलावत राहते. डॉ. वीरजी याबाबत सांगतात, ‘‘लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसात ही समस्या प्रत्येक मुलीला असते. पण ही काही कायमस्वरूपी नसते. पहिली बाब म्हणजे आपल्या मनातील बोलणे हा काही गुन्हा नाही. जर योग्य पद्धतीने आपले म्हणणे सर्वांसमोर मांडले तर सर्वजण त्याला पाठिंबा देतात. सासरच्यांसमोर हळूहळू खुलण्याचा प्रयत्न मुलीला स्वत:लाच करावा लागतो. यात तिला कोणी मदत करू शकत नाही.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...