* गृहशोभिका टिम

फूड होम डिलिव्हरी सर्विस स्विगीचं यावर्षीचं नुकसान रू.३,६२९ कोटी आहे. त्यांच्यासारखं काम करणारी जोमॅटोदेखील नुकसानीत आहे आणि त्यांनी रू.५५० कोटीची मदत अलीकडेच एका फायनान्शिअल इन्वेस्टर करून घेतली आहे. स्विगीला गेल्या वर्षी रू.१,६१७ कोटीचे नुकसान झालं होतं, तरीदेखील त्यांचं मॅनेजमेंट धडाधड पैसे खर्च करत राहिलं आणि आता हे नुकसान दुप्पटपेक्षा अधिक झालं आहे.

स्विगीच्या डिलिव्हरीने आनंदी झालेले ग्राहक हे विसरत आहेत की या नुकसानाची किंमत आज ना उद्या त्यांच्याकडूनच वसूल केली जाईल. जेवढयादेखील अॅप बेस्ड सेवा आहेत त्या फुकट वा स्वस्त असल्यामुळे खूप तोट्यात चालत आहेत, परंतु जेव्हा ते बाजारावर पूर्णपणे कब्जा करतील तेव्हा ते नक्कीच रक्त शोषायला सुरुवात करतील.

स्विगी आता हळूहळू छोटा रेस्टॉरंटचा बिझनेस संपवून टाकत आहे आणि ते क्लाऊड किचनमधून काम करत आहेत. आता ते डिलिव्हरी बॉयला देण्यात आलेल्या अटींवर काम करण्यास विवश करत आहेत. स्विगीशी जे रेस्टॉरंट जोडले जात नाहीत ते कालांतराने बंद होतात, मग त्या रेस्टॉरंटचं खाणं आणि त्यांची सेवा कितीही चांगली का असू देत. स्विगीने घरातील स्त्रियांना काम न करण्याची जणू सवय लावली आहे आणि यासाठी ते एक वर्षाचे रू.३,६०० कोटी खर्च करतात. जर स्त्रिया घराच्या किचनमध्ये गेल्याच नाहीत तर त्यांना तेच खाणं खावं लागेल जे स्विगी वा त्यांच्यासारखं एखादं अॅप उपलब्ध करेल. घरामधून स्वयंपाकघरच गायब होईल, तेव्हा मग लोकं खाण्यासाठी असेच अॅपचा शोध घेत राहतील.

जसं की आता किराण्याची दुकानं अॅमेझान व जिओमुळे नुकसान सहन करून बंद करत आहेत तसेच स्विगी लोकांचा स्वाद बदलत आहे. जे आई व पत्नीने नाही बनवलं आणि डिलिव्हरी केलंय ते तुम्ही खा. आई वा पत्नीचं प्रेम अशा खाण्यातून निर्माण होतं जे ती प्रेमाने बनवते, खायला घालते. जेव्हा या प्रेमाचीच गरज नसेल तेव्हा घराच छप्पर नक्कीच तुटू लागेल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...