* सुधा कसे

‘‘कशी आहेस निधी? तुझी तब्येत कशी आहे? लवकर बरी हो... मी तुझ्या आवडीची भाजी आणली आहे. तुला पडवळ आवडते ना?’’ निधीची शेजारी चित्रा घरात येत म्हणाली.

‘‘अगं, किती दिवस तू माझ्या आवडीचे पदार्थ बनवून आणत राहशील. आता मी बरी आहे, मी स्वयंपाक करेन. आता माझी काळजी करू नकोस,’’ निधी पलंगावरून उठत हसत म्हणाली.

‘‘चित्रा, मी तुझ्या मैत्रिणीच्या हातचे बेचव खाऊन कंटाळलो आहे. काहीही कर, पण निधीला अजून २ दिवस आराम करू दे, म्हणजे मी तुझ्या हातचे चविष्ट पदार्थ खाऊ शकेन,’’ निधीचा नवरा निर्मल चित्राला बसण्याचा इशारा करत म्हणाला.

‘‘भावोजी, हे काय बोलताय? सकाळपासून कोणी भेटले नाही का? मी निधीच्या हातचे कधी खाल्ले नाही का...? तिच्या हातचे खाल्ल्यानंतर किटी पार्टीत सर्वजणी बोटे चाटत राहतात.’’

हे ऐकून निर्मल मोठयाने हसला, पण निधीच्या चेहऱ्यावरचा राग चित्राने पहिला. निर्मल जेव्हा कधी चित्रासोबत अशी थट्टा-मस्करी करायचा तेव्हा निधीच्या चेहऱ्यावरचे हावभाव असेच व्हायचे, निर्मलच्या अशा वागण्यामुळे तिला असुरक्षित वाटायचे, हे चित्राला गेल्या १० दिवसांत जाणवले होते.

थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, त्यानंतर चित्रा तिच्या घरी गेली. निधीच्या चेहऱ्यावरचे तणावपूर्ण भाव पाहून तिला वाईट वाटले. निधी आता बरी झाली आहे आणि स्वत: जेवण बनवू शकते. निधीलाही तेच हवे आहे, त्यामुळे तिला जेवण न देणेच बरे, असे चित्राने ठरवले.

ती निघून जाताच निधी पतीवर रागावत म्हणाली, ‘‘माझ्या आजाराचा फायदा घेऊन तू चित्रासोबत फ्लर्ट का करतोस? प्रत्येकाला दुसऱ्याची पत्नी आवडते, पण वेळेला माझेच बेचव जेवण उपयोगी पडेल, तिचे चविष्ट जेवण नाही,’’ तिने एका दमात तिचा सगळा राग काढला.

‘‘अगं, तू उगाच मनाला लावून घेतेस. मी फक्त यासाठी बोललो, जेणेकरून ती जेवण देत राहील आणि तुला आणखी २ दिवस विश्रांती मिळेल, तू किती संकुचित विचार करतेस? तुमच्या बायकांच्या ईर्षेला काय म्हणायचे...?’’ निर्मलने निधीला प्रत्युत्तर देत तिलाच दोषी ठरवले. नेहमीप्रमाणे निधीच्या अशा संशयी वागण्याचा त्याला राग आला.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...