* पारुल भटनागर

आता ऑनलाईनचा जमाना आहे. तुम्ही एक ऑर्डर करताच तुमचं सामान तुमच्या दरवाज्यावर पोहोचतं. परंतु तुम्ही स्वत:साठी कोणत्याही ऑनलाईन साइटवर ड्रेस ऑर्डर केला, जो इमेजमध्ये तुम्हाला छान वाटत होता, कलरदेखील छान होता, साईजदेखील परिपूर्ण होती, परंतु ड्रेस घरी आला आणि तुम्ही तो ट्राय करुन पाहिलं तेव्हा तुमचा सर्व मूड ऑफ झाला वा मग तुम्ही त्याला पाहूनच तुमचा मूड बदलला कारण विकत घेतेवेळी ती वस्तू जशी दिसत होती तशी ती नव्हती.

अशावेळी तुम्हाला एवढं काळजी करण्याची गरज नसते कारण तुमच्याजवळ तो बदलण्याचा वा तो परत करण्याचा पर्याय असतो. याची पूर्ण प्रक्रिया खूपच सहजसोपी असते आणि तुमचे पैसेदेखील काही दिवसांतच परत येतात. परंतु ही गोष्ट ऑनलाइन नववधू ऑर्डरच्या बाबतीत योग्य नाही आहे कारण कोरोनाच्या संकटाच्या काळात जेव्हा पार्टनरची निवड ऑनलाइनच शक्य होती, तिथे जोडीदारा अदलाबदलीवाला ऑप्शन चालणार नाही. एकदा सामान ऑर्डर केलं आणि तुमचा हमसफर घरी घेऊन आलात की त्याच्याशी तडजोड तर करावीच लागणार, नाहीतर ते भारी पडणार.

पारंपरीक पद्धत व्हीएस नवीन रूप

पूर्वी जिथे जोडीदाराची निवड करताना दोन्ही कुटुंबातील लोकं आपापसात अनेकदा भेटत असत, शेजारीपाजारी चौकशी होत असे, इच्छुक वरवधूदेखील मोकळेपणाने समोरासमोर गप्पा मारत असत, छान भेटीगाठी होत असत म्हणजे योग्य प्रकारे ओळख होई आणि आयुष्यातील या अतूट नात्यांमध्ये बांधल्यानंतर त्रास होता कामा नये. दोन्ही कुटुंबीयदेखील एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत असंत. म्हणजे पुढे जाऊन कुठे वाद होता कामा नये.

परंतु जेव्हा आता सगळया जगात कोविड १९ मध्ये पसरलेला आहे आणि यामुळे बराच काळापर्यंत लग्नदेखील पुढे ढकलली जात आहेत, ही लग्न पुढे ढकलणं योग्य नाही आहे. अशावेळी मनात नसूनदेखील ऑनलाइनच पार्टनर्स सर्च करावा लागत आहे. केवळ सर्चच नाही तर भेटणंदेखील वर्चुअल झालं आहे. एकदा मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा योग्य वाटल्यावर फोनवर व्हिडिओ कॉलिंगवरती गप्पा चालू होतात. अगदी कुटुंबीयदेखील एकमेकांना फोन वा व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून लग्नाच्या सर्व गप्पा मारतात. कारण यावेळी वारंवार घर बोलावणं व बाहेर भेटणं सेफ नाही आहे. अशावेळी ऑनलाइन सर्व लग्नाची तयारी केली जाते. तर जुन्या पद्धतीत प्रत्येक गोष्टीसाठी समोरासमोर बसून बोलणं योग्य समजलं जात होतं. अशावेळी नवीन पद्धत आपल्यामध्ये नव्या रूपात समोर आली आहे. ज्यामध्ये पावलोपावली सावधानता बाळगण्याचीदेखील गरज आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...