खुलून दिसतील केस हेअर स्टायलिंग टूल्सने

* गुंजन गौड, कार्यकारी संचालक, एल्पस ब्यूटी क्लिनिक

आजकाल हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर बराच वाढला आहे. पण त्यांचा वापर
करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हेअर ड्रायर : केसांची नवी स्टाईल करताना इलेक्ट्रिक उपकरणांपैकी एक
असलेला हेअर ड्रायर मुख्य आहे. केस व्यवस्थित ठेवण्यासाठी आठवडयातून
एकदा तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता. पण रोज किंवा वरचेवर वापर
केल्यास केस रूक्ष होणे, डँड्रफ अशा समस्या वाढू शकतात. हेअर ड्रायरच्या उत्तम
परिणामांसाठी या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या :
* तुमच्यासाठी हेअर ड्रायरचा वापर गरजेचा असल्यास केसांना नियमित तेल
लावा. आठवडयातून जास्तीत जास्त एकदाच याचा वापर करा.
* ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडिशनिंग करायला विसरू नका.
* हेयर ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना नॅरिशमेंट सीरम लावा. ड्रायरच्या उष्णतेमुळे
केस मऊ होतील.
* केस कुरळे असतील, रुक्ष, मऊ किंवा सिल्की, केसांचा प्रकार आणि
आवश्यकतेनुसार हेयर ड्रायरचा वापर करा.
* ६ ते ९ इंच अंतर ठेवूनच हेयर ड्रायर वापरा, अन्यथा केसांचा कोरडेपणा वाढेल.
* केस रुक्ष असल्यास ड्रायरचा उपयोग कमीत कमी करा. केस तेलकट
असल्यास ड्रायर जास्तीत जास्त वापरा.

हेयर आयर्न
केस स्ट्रेट ठेवण्यासाठी आजकाल हेअर आयर्नचा खूपच वापर केला जात आहे.
परंतु याच्या चांगल्या परिणांमासाठी लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट
म्हणजे नेहमीच चांगल्या प्रतीच्या प्लेट आणि वेगवेगळया तापमानासाठी
सिरॅमिक प्लेट्सची आयर्न घ्यावी, ज्या स्वयंचलितपणे बंद होतात. केस खूपच
पातळ आणि खराब असतील तर सुरुवात कमी सेटिंगपासून करावी. केस कुरळे
आणि जाड असतील तर हाय सेटिंगवर जा.
केसांवर आयर्न वापरण्यापूर्वी त्यांना शाम्पू आणि कंडिशनिंग करा. ओल्या
केसांवर कधीच स्ट्रेटनिंग केले जात नाही. म्हणून आधी ब्लो ड्रायरने केस कोरडे
करा. केसांना अधुनमधुन थंड हवेनेही ब्लो ड्रायर करा. अन्यथा ते जाळण्याची
भीती असते. केसांसाठी चांगल्या हिट प्रोटेक्टरचा वापर करा. जेणेकरून हॉट
आयर्नमुळे ते खराब होणार नाहीत. ते खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात तेल
किंवा जास्त प्रमाणात सिलिकॉन नसावे. त्याचा केवळ एक थेंबच पुरेसा असतो.

व्हायब्रेटर मसाजर
व्हायब्रेटर मसाजरने केलेला मसाज हातांनी केलेल्या मसाजपेक्षा वेगळा असतो.
व्हायब्रेटर केसांच्या मांसपेशी आणि टाळूच्या त्वचेमध्ये कंपन निर्माण करून
उत्तेजना वाढवते, यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि नसांवरील ताण कमी
होऊन थकवा दूर होतो. केस निरोगी ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.केस
एकमेकांना घासले जाणे हानिकारक असते. हातांनी केलेल्या मालिशमुळे केस
बऱ्याच प्रमाणात एकमेकांवर घासले जातात. व्हायब्रेटरने केलेल्या मालिशमुळे
केस एकमेकांवर घासले जाण्याची शक्यता दूर होते, तसेच रक्ताभिसरण
वाढल्याने केसांची मुळे मजबूत होतात. व्हायब्रेटर मसाजरने मसाज करण्यासाठी
झाकणासारख्या गोल आकाराच्या दातांच्या अॅप्लिकेशनचा वापर केला जातो.

चांगल्या परिणामांसाठी केसांच्या त्वचेची मालिश करण्यासाठी व्हायब्रेटरची
क्षमता प्रति मिनिट २००० कंपनांपेक्षा जास्त नसावी. मसाज करताना हलू नये,
कारण धक्का लागल्यास दुखापत होऊ शकते. कोरडया केसांना तेल
लावल्यानंतरही व्हायब्रेटर मसाजरचा वापर केला जाऊ शकतो.

स्काल्प स्टीमर
हे इलेक्ट्रिक डिव्हाइस थोडयाच वेळात पाण्याची वाफ तयार करतो. कुठल्याही
प्रकारच्या केसांच्या समस्येसाठी स्टीम ट्रीटमेंट विशेष फायदेशीर ठरते. वाफेमुळे
त्वचेची रंध्रे उघडतात आणि त्यात अडकलेली घाण बाहेर येते. रक्ताभिसरण
वेगवान झाल्यामुळे केसांना संपूर्ण पोषण मिळते. याच्या अधिक चांगल्या
परिणामांसाठी, स्काल्प स्टीमरद्वारे नियमितपणे दोन आठवडयांसाठी स्टीम
ट्रीटमेंटचा वापर करावा. केसांना दिल्या जाणाऱ्या सर्व उपचारांमध्ये स्टीम पद्धत
विशेष फायदेशीर आहे. वाफ दिल्यानंतर केस धुवू नयेत.

इन्फ्रारेड रेज लॅम्प
इन्फ्रारेड किरण उष्णता निर्माण करणारे असे किरण आहेत जे दिसत नाहीत.
त्यांना प्रकाशाशी एकरूप केले तरच ते दिसतात. इन्फ्रारेडच्या तापमानाचा वेग
सुरुवातीला कमी असतो, पण काही मिनिटांतच तो उच्च तापमानापर्यंत पोहोचतो.
याद्वारे त्वचेतील मांसपेशी आणि त्वचेवर होणारा प्रभाव दीर्घकाळ राहतो.
शुद्ध रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या दिशेने अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या
रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरणाचा वेग वाढल्यामुळे त्या ठिकाणी आवश्यक
पोषक तत्त्व आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळू लागते. यामुळे मांसपेशीत
निर्माण होणाऱ्या समस्या जसे की सूज येणे, मांसपेशी आखडणे, थकवा येणे,
नलिकांमधील थकवा आणि वेदना दूर करण्यासाठी याचा विशेष फायदा
होतो.इन्फ्रारेडचा वापर करताना डोळे स्वच्छ ठेवा. कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा
लावत असाल तर काढून ठेवा. तुम्ही सोनेचांदी किंवा इतर कोणत्याही धातूचे

दागिने घातले असतील तर तेदेखील काढून ठेवा, अन्यथा ते गरम झाल्यामुळे
त्वचा भाजू शकते. लॅम्पच्या वापरानंतर तसेच त्वचा सामान्य झाल्यानंतर शाम्पू
करा. त्यासाठी कोमट पाणी वापरा. लॅम्प २५ ते ३० इंचाच्या अंतरावर ठेवा.

ओझोन रेंज लॅम्प
या इलेक्ट्रिक उपकरणाद्वारे ओझोन किरणांची निर्मिती केली जाते. ओझोन
किरणे रोग पूर्णपणे बरा करतात. या किरणांचा वापर करीत राहिल्यास केस
आणि टाळूच्या त्वचेत कोणत्याही प्रकारचे संक्रमण होण्याची किंवा कोणत्याही
रोगाची शक्यता उरत नाही. केस पांढरे होण्याची समस्या, टक्कल पडणे, केस
मोठ्या प्रमाणात गळणे अशा सर्व समस्या कायमच्या दूर करण्यासाठी ओझोन
किरणे पूर्णपणे सक्षम असतात. या उपकरणासोबत कंगव्यासारखा एक बल्बही
असतो. याचा उपयोग करून ओझोन किरणांना सहजपणे आणि योग्य प्रकारे
केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवता येते.
ओझोन किरणे नेहमी कोरडया केसांमध्येच सोडली जातात. ओल्या केसांमध्ये
चुकूनही त्यांचा वापर करू नका. कारण यात विद्युत प्रवाह असल्यामुळे करंट
लागू शकतो.
केसांमध्ये संसर्ग किंवा एखादा रोग बळावल्यास नियमितपणे दीड ते अडीच
मिनिटे ओझोन किरणे दिली जाऊ शकतात. महिने दर आठवडयाला हा उपचार
करावा. उपचारानंतर केसांच्या मुळांवर एखादे हेअर टॉनिक लावावे. हे खूप
फायदेशीर आहे. या उपचारामुळे केसांच्या वाढीसाठी विशेष फायदा होतो.

ब्रायडल मेकअपचे बारकावे

* तोषिनी राठोड

प्रत्येक नववधूला वाटत असतं की तिची स्टाइल आणि लुक असा पाहिजे, ज्याने ती फक्त तिच्या जीवनसाथीचंच नव्हे तर सासरच्यांचंही मन जिंकेल. मग असं काय करावं जेणेकरून नववधूचं सौंदर्य पतीचं मन मोहीत करेल?

सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ओजस राजानी सांगतात की सर्वात आधी नववधूचं व्यक्तिमत्त्व, स्किन टाइप, केसांचं टेक्सचर, कलर, आयब्रोजचा शेप आणि फेस कट पाहावा लागतो. जर यात कोणत्या प्रकारची कमतरता असेल तर नववधूला एक्सरसाइज आणि स्किन केअर रूटीनचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे मेकअपपूर्वी त्वचा अधिक टवटवीत आणि उजळलेली दिसावी

स्किन केअर रूटीन

स्किन केअर रूटीनबद्दल सांगताना ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आकांक्षा नाईकचं म्हणणं आहे की नववधूला आपला स्कीन टाईप माहिती असणं खूप गरजेचं आहे. लग्नाआधी तिने रोज क्लिंजिंग, टोनिंग आणि माइश्चरायिझंगचं रूटीन अवलंबलं पाहिजे. जर स्किन ड्राय असेल तर सोप फ्री कंसीलरचा वापर केला पाहिजे. त्वचेला दिवसातून दोन वेळा माइश्चरायझरही केलं पाहिजे.

जर स्किन टाईप ऑयली असेल, तर क्लिंजिंगसह दिवसातून २-३ वेळा चेहरा धुतला पाहिजे. ऑयली स्किन टाइपसाठी टोनिंग खूप गरजेचं आहे. याने चेहऱ्याचे पोर्स बंद होतात आणि त्वचेतून तेल बाहेर येणं थांबतं. त्याचबरोबर त्वचेला माइश्चराइज्ड करण्यासाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. ऑयली स्किनसाठी फेस मास्क लावणंही खूप गरजेचं आहे. याने चेहऱ्यावरील डेड स्किनपासून सुटका मिळते आणि त्वचा श्वास घेऊ शकते.

वॉटर बेस्ड व क्रीम बेस्ड मेकअपमधील निवड

मेकअपमध्ये फाउंडेशन योग्य असणं खूप जरूरी आहे. जर बेस मेकअप चांगल्याप्रकारे लावलं गेलं आणि फाउंडेशनचा रंग स्किनच्या अनुरूप असेल, तर एक लायनर लावूनही नववधू सुंदर दिसू शकते.

अशाप्रकारे क्रीम बेस्ड मेकअप त्यांच्यासाठी उत्तम ठरतो. ज्यांच्या चेहऱ्यावर डाग, पिंपल्स आणि डार्क स्पॉट्स नसतात. पण ऑयली स्किनसाठी क्रीम बेस्ड मेकअपचा वापर अजिबात करू नये, तर डाग असणाऱ्या स्किनसाठी वाटर बेस्ड मेकअप गरजेचा आहे.

कॉप्लेक्शननुसार मेकअप

आकांक्षाने सांगितलं की भारतीयांचे कॉप्लेक्शन ३ प्रकारचे कॉप्लेक्शन असतात. गोरा, गव्हाळ आणि सावळा कॉप्लेक्शननुसार मेकअपची निवड करा.

गोरी त्वचा : जर तुमचा रंग गोरा आहे तर तुमच्यावर रोजी टिंट बेस कलर आणि काही प्रसंगी सोनेरी रंगाचं फाऊंडेशन बेस सूट होईल. डोळ्यांचा मेकअप करताना लक्षात ठेवा की आयब्रोज ब्राउन कलरने रंगवा. गोऱ्या रंगावर पिंक आणि हलक्या लाल रंगांचं ब्लशर खूप सुंदर वाटतं. तिथेच ओठांवर हलक्या रंगाचीच लिपस्टिक चांगली वाटते.

गव्हाळ रंग : जर तुमचं कॉप्लेक्शन गव्हाळ असेल तर तुम्ही तुमच्या स्किन कलरला मॅच करणारं वॉटर बेस्ड फाऊंडेशन लावलं पाहिजे. त्वचेवर हलक्या रंगांचं फाऊंडेशन वापरू नये. डोळ्यांच्या मेकअपसाठी ब्राँज किंवा ब्राउन कलरचा वापर केला पाहिजे. गालांवर ब्राँज कलरच्या ब्लशरचा वापर केला पाहिजे. या स्किनटोननुसार तुमच्यावर डार्क रंगांची लिपस्टिक शोभून दिसेल.

सावळी त्वचा : सावळ्या त्वचेचा मेकअप करण्याआधी सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी. सावळ्या त्वचेसाठी वॉटर बेस्ड नॅचरल ब्राउन टोन फाऊंडेशनचा वापर केला पाहिजे. यासाठी फाऊंडेशनच्या ब्लेडिंगवरही चांगल्याप्रकारे लक्ष दिलं पाहिजे.

लक्षात ठेवा तुम्ही त्वचेच्या रंगापेक्षा गडद शेडच्या फाऊंडेशनचा वापर टाळा. डोळ्यांचा मेकअप करताना लाइट रंगांच्या आयब्रोज कलरचा वापर करू नये, पण आउटलाइनसाठी काजळचा वापर करा. ब्लशरसाठी प्लम आणि ब्राँज कलरचा वापर करा. लिप कलरसाठी पर्पल, रोज आणि पिंक ग्लासचा वापर करू शकता.

ओजसच्या म्हणण्यानुसार नववधूने मेकअप अधिक गडद होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. ती वयस्क दिसू लागते म्हणून आणि मेकअप टाळावा.

काळजीपूर्वक लिप कलर निवडा

ओजसच्या म्हणण्यानुसार आजकाल बॉलिवूडच्या तारकासुद्धा कमी मेकअप आणि लाइट शेडची लिपिस्टिक लावणं पसंत करतात. आता हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचे दिवस आहेत, जे तुमच्या मेकअपचे बारकावे अधोरेखित करतात. जर तुम्ही डार्क रंगाची लिपस्टिक लावली तर याने तुमच्या लग्नाच्या फोटोमध्ये तुम्ही भयानक दिसाल.

ट्रेंडनुसार आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाइट शेडच्या लिपस्टिक आल्या आहेत, ज्या लाइट असूनही तुम्हाला डार्क लिपस्टिकसारखा लुक देतात. यामुळे तुमच्या लिप्सला थोडा पाउट लुकही मिळेल. त्याऐवजी जर तुम्ही डार्क लिपस्टिकचा वापर केला, तर तुम्ही डोळ्यांचा मेकअप कमी केला पाहिजे. जर तुम्ही हेवी आय मेकअप करत असाल, तर तुम्ही लिप कलरमध्ये लाइड शेडच निवडली पाहिजे.

रंगीत लेन्सची निवड

ओजस सांगते की तुमचा रंग गोरा असो, गव्हाळ असो किंवा सावळा असो, तुम्ही आय लेंससाठी हलक्या तपकीरी रंगाचा वापर केला पाहिजे. आय लेंसमध्ये ग्रीन आणि ब्राउन मिश्रित एक नवीन कलर बनवला आहे, जे दिसायला खूप चांगला वाटतो.

मेकअपआधी फ्लॅश टेस्ट

नववधू असो किंवा कलाकार तुमचा मेकअप बेस किंवा फाऊंडेशन परफेक्ट असला पाहिजे. कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे मेकअप आधीच ग्रे दिसतो. अशात तुम्ही बेस लावल्यानंतर आपल्या फोनच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश ऑन करून एक फोटो काढायला हवा. यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही फाऊंडेशन चांगल्याप्रकारे लावलं आहे की नाही. याला मेकअप आर्टिस्ट फ्लॅश टेस्ट म्हणतात.

कमी बेससह गरजेच्या मेकअपकडे लक्ष दिलं पाहिजे. कमी फाऊंडेशन, लाइट कलर ब्लश आणि हलक्या रंगांची लिपस्टिक तुमच्या लुकला उभारी देईल. या सॉफ्ट स्टाइलिंगबरोबर नववधू खूप सुंदर दिसते. याव्यतिरिक्त नेहमी आपलं व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन मेकअप केला पाहिजे.

सुंदर दिसण्याचे २० मंत्र

* सोमा घोष

  1. सौंदर्य ही एक मानसिक अवस्था आहे, जी आतून येते. जर तुम्ही विचार केला की आपण सुंदर आहोत तर तुम्ही नेहमीच सुंदर दिसाल. जसा तुम्ही स्वत:बाबत विचार कराल तशाच तुम्ही दिसाल. जर तुम्ही स्वत:ला स्वर्गातील परी समजत असाल तर तुम्ही स्वत:ला नक्की तसेच अनुभवाल.
  2. सकारात्मक मानसिकतेने सौंदर्य उजळते. गोरा रंग अथवा पिंगट केस याने कोणीच सुंदर दिसू शकत नाही. स्मिता पाटीलचे सौंदर्य आजच्या सगळया अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे. सुंदर दिसण्यासाठी गोरे असणे आवश्यक नाही.
  3. 3. साधे राहूनही सौंदर्य दिसते, कमी आणि लाईट मेकअपमध्येसुद्धा अनेक अभिनेत्री सुंदर दिसतात. अनेकदा सामान्य मेकअपमुळे तुमचे नाकडोळे उठून दिसतात. मेकअपपूर्वी आपल्या त्वचेला तयार करण्यासाठी प्रायमर लावायला विसरू नका, यामुळे मेकअप करणे सोपे जाते.
  4. 4. याशिवाय मेडिटेशन आणि योगा केल्यानेही सौंदर्यवृद्धी होते, कारण जितकी एखादी व्यक्ती तणावमुक्त असेल तेवढी तिची त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी वाटेल.
  5. सुंदर दिसण्यासाठी सध्याच्या काळात योग्य ग्रुमींग आवश्यक आहे. यात तुमच्या आयब्रोचा योग्य आकार, हेअरकट, फिगर योग्य असणे वगैरे सामील असते, कारण कोणत्याही कामात योग्य प्रेझेंटेबल महिलेलाच चांगली नोकरी मिळते. जर तिचे केस लांब असतील तर तिने आपल्या चेहऱ्यानुसार योग्य हेअरकट करण्याचा प्रयत्न करावा.
  6. याशिवाय हेअर कलर तुमचे वय आणि रंगानुरूप असावा.
  7. सौंदर्यासाठी तुमची त्वचा निरोगी असणे आवश्यक आहे आणि यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही शांत राहाता, ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. जर त्वचेवर डाग अथवा पिगमेंटेशनची समस्या असेल तर मेकअपने तुम्ही ते लपवू शकत नाही.
  8. जास्त हायपर झाल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. शरीरात अनेक समस्या जाणवू लागतात, ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. म्हणून वेळोवेळी स्वत:ला डिटॉक्स करण्यासाठी कारल्याचा रस प्यावा किंवा चेहऱ्याला बर्फ लावू शकता. सब्जा घातलेले पाणी प्यायल्याने त्वचा उजळते.
  9. व्हिटॅमिनयुक्त उत्पादने चेहऱ्यासाठी वापरल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा ताजीतवानी वाटते.
  10. चेहऱ्याच्या आकारानुसार मेकअप करा. जर चेहरा रुंद असेल, तर चेहऱ्याला कटुरिंग करणे आवश्यक असते. शाईन अजिबात लावू नका. शाईन लावल्याने चेहरा गुटगुटीत वाटेल. ज्यांचा चेहरा गुटगुटीत आहे अशांनी जास्त ब्लशऑन न लावता आपला चेहरा क्लीन ठेवला पाहिजे. अशा फेसकटसाठी केसांच्या काही बटा चेहऱ्यावर आणाव्या, जेणेकरून चेहऱ्याचे कटुरिंग होईल. याशिवाय लिपस्टिकसुद्धा हलक्या रंगांचा लावणे योग्य ठरेल.
  11. अशा आकाराच्या महिलांना आपल्या डोळयांना व्यवस्थित शेप द्यायला हवा, ज्यात लायनर, मस्कारा लावणे आवश्यक आहे.
  12. ज्यांच्या चेहऱ्यावर डाग असतील, त्यांनी बी बी आणि सी सी क्रीम वापरून पाहावे, ज्यामुळे डाग फिकट होतील.
  13. लिपस्टिकबाबत बोलायचे झाले तर नोकरदार महिलांसाठी मॅट फिनिश लिपस्टिक योग्य ठरते, या अलीकडे ट्रेंडमध्येही आहेत. ग्लॉसी लिपस्टिक जास्त करून ओठांवर पसरते, म्हणून त्याचा वापर टाळा.
  14. दिवसा ग्लॉस लिपस्टिक लावणे टाळावे. मॅट फिनिशिंग असलेल्या लाँग लास्टिंग लिपस्टिक बाजारात उपलब्ध आहे, त्यांचा वापर करावा.
  15. नेहमी स्किन टोनच्या हिशोबाने लिपस्टिक लावावा. डस्की स्किन टोन असलेल्यांना मरून, पिची अथवा ऑरेंज शेड चांगली दिसते. त्यांच्यावर गुलाबी लिपस्टिक खूपच वाईट दिसते. ब्लशऑनसुद्धा गुलाबी न लावता पिची असावे.
  16. गोऱ्या स्किन टोन वर गुलाबी लिपस्टिक आणि गुलाबी ब्लशऑन खूपच छान दिसते. अशा स्किन टोनवर गडद रंगाची लिपस्टिक लावल्यास चेहरा हार्श वाटतो.
  17. सावळया किंवा डस्की रंगावर ब्राऊन आय लायनर खूप छान दिसते.
  18. पिची क्रीम लिपस्टिक तुम्ही कोणत्याही वेळी किंवा मूडमध्ये लावल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येते. याशिवाय लाल रंगाची लिपस्टिक कोणालाही कोणत्याही वेळी सूट करते.
  19. दिवसा चमकणारे आयशॅडो खूप भयानक वाटतात. मॅट अथवा क्रेयॉन पेन्सिल टाईप आयशॅडो कोणतीही स्त्री लावू शकते, हे लावून थोडे स्मच केल्यास चेहरा सुंदर दिसतो, सॉफ्ट पिची कलर दिवसा नेहमी छान दिसतो. सध्या आय लायनरपेक्षा आय शॅडो लावण्याचा ट्रेंड आहे. मस्कारा आणि आयशॅडो डोळयांसाठी पुरेसे असतात. याने चेहरा नेहमी नाजूक वाटतो.
  20. म्यॅच्युअर महिलांनी कधीच चमकणारी आयशॅडो लावू नये, यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसू लागतात. मॅट फिनिश नेहमी छान दिसते. तरुण मुलींसाठी क्रिमी मेकअप जास्त चांगले असते. यामुळे चेहऱ्यावर निरागसता दिसते.

याशिवाय ओजस संदेश देते की स्वत:ला नेहमी तरूण आणि ताजेतवाने ठेवा, मेकअप कमीतकमी करा,    नेहमी खुश राहा, प्रेमाने वागा आणि सर्वांना प्रेम वाटा.

ओठ फुटण्यापासून असे सांभाळा

* डॉ. भारत खुशालानी

बऱ्याचदा लोक ओठ फुटण्याच्या समस्येला फार गांभीर्याने घेत नाहीत. घरातील उष्ण कोरडया हवेमुळेही ओठ हलकेसे फुटतात, पण जेव्हा ओठ गंभीर प्रकारे फुटतात, तेव्हा ते एखादा रोग किंवा आजार असल्याचे दर्शवतात. असे कुपोषण किंवा निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन यामुळेही होऊ शकते. हे त्वचेच्या दाहामुळेही होऊ शकते.

त्वचेचा दाह ही कोरडया त्वचेची एक अशी स्थिती आहे जी उष्णतेमुळे कधीकधी उत्तेजित होते. त्वचेवर काही उत्पादनांचा वापर केल्यानेही त्वचा संवेदनशील होऊ शकते. खूप वेळपर्यंत सूर्याच्या प्रखर किरणांच्या संपर्कात आल्यामुळेही त्वचेचे नुकसान होते, ज्यामुळे ओठ सुकतात आणि फुटू लागतात.

समस्येचे कारण

हर्पीस व्हायरसमुळे त्वचा कोरडी होते. या व्हायरसने निर्माण केलेले हे ‘थंड घाव’ खूप संसर्गजन्य असतात. जर या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तिचा कप दुसऱ्या कोणा व्यक्तिने वापरला तर त्याला हा रोग होण्याची पुरेपुर शक्यता असते. जेव्हा ओठांवर अशा थंड घावांची स्थिती निर्माण होते, तेव्हा डॉक्टर त्यावर बेंजोकोन जेल लावायला सांगू शकतात.

हे एक लोकल अॅनेस्थेटिक असून सर्वसाधारणपणे कॉमन पेन रिलीफसाठी वापरले जाते. तोंडाच्या अल्सरसाठी मिळणाऱ्या अॅनेस्थेटिक उत्पादनांत आणि मलमांत हा घटक सक्रिय असतो. थंड घाव ठीक होईपर्यंत त्वचेचे रक्षण करण्यासाठी हे मलम वापरत राहणे योग्य ठरते.

नवीन उत्पादनांच्या वापरामुळे ओठांची जळजळ होऊ शकते. त्यामुळे अशी नवीन उत्पादने टाळली पाहिजेत. त्वचा विशेषज्ञांनुसार टूथपेस्ट हेसुद्धा ओठांच्या समस्येचे कारण होऊ शकते. त्यामुळे आपण असा फॉर्म्युला असलेली टूथपेस्ट वापरली पाहिजे ज्यात त्वचेला उत्तेजित करणारे घटक नसतील. ओठ ठीक होईपर्यंत बेकिंग सोडयाचा वापरही करू शकता. सूर्य प्रकाशात, हिवाळयात किंवा उन्हाळयात बाहेर पडताना नेहमी आपल्या ओठांना सनस्क्रीन लावून सुरक्षित ठेवा.

अशाप्रकारे करा देखभाल

ऑनलाइन मिळणाऱ्या मधमाशीच्या मेणाच्या डब्या गंभीररित्या फुटलेल्या ओठांवर उपचार करण्यासाठीही सर्वात जुन्या आणि प्रभावशाली पद्धतींपैकी एक आहेत. हे मेण ओठांना फुटण्यापासून रोखते आणि ओठांना आर्द्रता प्रदान करते.

आपल्या ओठांची त्वचा खूप पातळ असते, त्यामुळे शरीराच्या इतर भागांपेक्षा ती अधिक संवेदनशील असते. खरंतर ओठांवरील बाह्य स्तर हा इतका पातळ असतो की ओठ लाल दिसू लागतात, कारण ओठांचा पातळ थर हा त्वचेच्या खालील रक्तवाहिन्यांना दृश्यमान करतो आणि ओठांची त्वचा ही अतिशय पातळ असल्याने ती कोरडी आणि थंड हवा आणि प्रखर सूर्यप्रकाश यांपासून आपल्याला संरक्षण देऊ शकत नाही.

ब्रँडेड उत्पादने वापरा

जीभ ही ओठांच्या नजीक असल्याने, ती नकळतच स्वयं आपले कार्य करते. जेव्हा आपले ओठ सुकतात, तेव्हा आपोआपच आपली जीभ ओठांवरून फिरली जाते. जेव्हा जीभ ओठांना लागते, तेव्हा लाळेमुळे ओठ ओले होतात. पण काही वेळानंतर या लाळेचे बाष्प होऊन ती उडून जाते आणि मग ओठ पहिल्याहून अधिकच सुकतात. अशावेळी सुगंधी लीप बामचा वापर टाळा, कारण ते ओठांना अधिकच त्रासदायक ठरू शकतात.

ओठांना फुटण्यापासून वाचवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पावले उचलता येतील, उदाहरणार्थ :

* सर्वप्रथम आपल्या ओठांना मॉइश्चराइझ करा, कारण कोरडेपणा राहिला नाही तर ओठ फुटणारच नाहीत.

* चुकूनसुद्धा ओठांवरून जीभ फिरवू नका.

* निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन हे पाण्याच्या कमतरतेमुळे होते आणि हेसुद्धा ओठ फुटण्याचे एक संभावित कारण आहे. त्यामुळे स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. शक्य होईल तेवढे मसालेदार आणि चिवडा-फरसाण अशा पदार्थांपासून दूर रहा. याशिवाय तोंडाने श्वास घेण्याचा जास्त प्रयत्न करू नका.

बेसन आहे गुणकारी

भजी, कढी, लाडू यासारखे कित्येक पदार्थ बनवण्यासाठी वापरात असलेल्या बेसनात कित्येक गुण असतात. त्वचेवर बेसनाचा फेसपॅक अथवा मास्कचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा गोरी आणि चमकदार बनवू शकता.

या, जाणून घेऊ बेसन पॅक आपल्या त्वचेप्रमाणे कसे वापरावेत :

रुक्ष त्वचेत जिवंतपणा आणते बेसन

रुक्ष त्वचेसाठी बेसन, दूध, मध आणि हळद एकत्र करून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १५ मिनिटं राहू द्या. सुकल्यावर पाण्याने धुवा.

या मिश्रणाच्या वापराने त्वचा ओली आणि चमकदार होते.

तेलकट त्वचेसाठी १ चमचा बेसन आणि १ चमचा एलोव्हेरा चांगले एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी पाण्याने धुवा.

या फेसपॅकचा वापर २-३ वेळा करा. एलोव्हेरामध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन, खनिज पदार्थ, अँटीऑक्सिडंट्स वगैरे असतात, जे त्वचेला पोषण देतात.

हा फेसपॅक सन टॅन, सनबर्न, काळे डाग व पिगमेंटेशन कमी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक आहे.

मुरूमपुटकळ्या दूर करण्यात उपयोगी

मुरुमपुटकुळ्या दूर करण्यासाठी एका वाटीत बेसन घेऊन त्यात काकडीची पेस्ट व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर हे मास्कप्रमाणे चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. यानंतर चेहरा सुती कपडयाने अलगद कोरडा करा.

याचा वापर थोडया थोडया वेळानंतर केल्यास मुरूमपुटकळ्या नाहीशा होतात.

त्वचेवरील टॅनसाठी फायदेशीर

उन्हात गेल्याने त्वचा टॅन होते. अशावेळी टोमॅटोच्या रसात बेसन मिसळून त्वचेवर  लावल्यास त्याचा परिणाम कित्येक पटींनी वाढतो. बस्स यासाठी तुम्हाला हवा एक पिकलेला टोमॅटो, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेसन. टोमॅटोच्या बिया काढून टाकायला  विसरू नका.

चेहऱ्यावरील तेज वाढवते बेसन

त्वचेवर चमक आणण्यासाठी १ कप दही, १ चमचा बेसन चांगले एकत्र करून घ्या. मग हे चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा धुवा. हा फेसपॅक दिवसातून ३ वेळा लावा जेणेकरून चेहऱ्यावरील चमक, जी कडक ऊन, धूळमाती आणि प्रदूषणामुळे हरवली आहे, ती चेहऱ्यावर परत येते.

वेदनाशामक आहे बेसन

यात काही दुमत नाही की फक्त बेसनात अनेक गुण आहेत आणि या गुणांमुळेच बेसन घराघरात वापरले जाते. शरीराच्या कोणत्याही भागाला मार लागला तर बेसन त्याच्या वेदनांपासून तात्काळ मुक्ती देते. हे प्रथमोपचाराचे एक अतुलनीय उदाहरण आहे.

मार लागलेल्या जागी बेसनाचा लेप लावल्यास वेदनेपासून लगेच मुक्ती मिळते.

तर मेकअप खुलेल आणि टिकेलही

– सोमा घोष

उत्सवाचा काळ जवळ आला की महिला आपला चेहरा आणि स्किनचा ग्लो याबाबत सतर्क होतात, पण या मोसमात त्वचेला ताजेतवाने ठेवणे हे आव्हानात्मक असते. योग्य आहार आणि दिनचर्येमुळे हे शक्य होऊ शकते. याविषयी क्यूटिस स्किन स्टुडिओच्या तज्ज्ञ डॉक्टर अप्रतिम गोयल सांगतात की या मोसमात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते, ज्यामुळे मेकअप चेहऱ्यावर खुलून दिसेल. खालील टीप्स आजमावल्यास योग्य मेकअप केला जाऊ शकतो.

शरीरातून निघालेले टॉक्सिन्स आणि वातावरणातील प्रदूषणामुळे यामुळे त्वचा

निस्तेज होऊन जाते. अशात फक्त फेस वॉश याला नवचैतन्य देऊ शकत नाही. यासाठी पाण्यात भिजवलेले ओट्स आणि मूग डाळ यांनी दिवसातून एकदा चेहऱ्याचे स्क्रबिंग जरूर करा.

मेकअप रिमूव्हर

मेकअप योग्य प्रकारे चेहऱ्यावरून हटवणे अतिशय आवश्यक असते. यासाठी ऑइल, क्रीम किंवा फेस वॉश पुरेसा नाही, कारण यामुळे चेहऱ्याची आर्द्रता कमी होऊन त्वचा रुक्ष होते. यासाठी ड्राय कॉटन बॉलवर मिस्लर वॉटर घेऊन त्वचेच्या छिद्रांमध्ये असलेले मेकअपचे छोटे छोटे पार्टिकल्स चांगल्याप्रकारे साफ करावेत.

मॉइश्चराइजिंग

वेगवेगळया त्वचेसाठी वेगवेगळया मॉश्चराइझरची गरज भासते. म्हणजे ड्राय स्किनसाठी क्रीम, नॉर्मल स्किनसाठी लोशन आणि ऑइली त्वचेसाठी जेल वापरणे योग्य असते. आपली त्वचा कोणत्याही प्रकारची असो, रात्री झोपण्यापूर्वी मॉश्चराइझर जरूर लावावे.

मास्क

या ऋतूत चेहऱ्यावर फ्रुट मास्क लावल्याने खूप छान रिझल्ट मिळतो. पपई आणि केळयाचा मास्क त्वचेवरील प्रदूषण काढून ग्लो आणतो. ऑइली स्किनसाठी मुलतानी आणि क्लेचा पॅक योग्य असतो. याशिवाय मल्टीस्टेप फेशिअल मास्क आणि शीट मास्क यामुळेही त्वचेवर उभारी येते.

प्रोटेक्शन

सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे चेहऱ्याला उन्हापासून वाचवणे. घरातून बाहेर पडताना त्वचेचे धूळ आणि माती यांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन मॉइश्चराइझर, कॉम्पक्ट पावडर आणि फाउंडेशनचा जरूर वापर करा. याशिवाय फटाके फोडण्याआधी बॅरियर क्रीम लावायला विसरू नका.

सणावारी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे वर्कआउट, फिरणे, जिमला जाणे हे आधीपासूनच सुरू ठेवायला हवे. म्हणजे सणाच्या धावपळीनंतरही तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुमची त्वचाही तजेलदार राहील. स्वत:ला हायड्रेट करण्यासाठी पाणी आणि लिक्विड पदार्थांचे जास्त सेवन करावे.

स्किनवर वॉटर बेस्ड मॉइश्चराइझर लावावे, त्याचबरोबर ज्यांना डार्क सर्कल्स आहेत, त्यांनी व्हिटॅमिन सी असलेल्या सीरमने डोळयांच्या खाली हलक्या हाताने ३-५ मिनिटे मसाज करावा. काकडी आणि बटाटयाचे काप डोळयांखालील डार्क सर्कल्सवर ठेवल्याने पफीनेस आणि काळसरपणा कमी होतो.

मेकअप टीप्स

अप्रतिम सांगतात की जवळजवळ प्रत्येक महिलेला मेकअप करता येतोच, पण तो आकर्षक करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते, जेणेकरून तुम्ही सर्वांपेक्षा हटके आणि सुंदर दिसाल :

* आपल्या स्किन टोननुसार योग्य मेकअप निवडणे सोपे नसते. याबाबतीत थोडे प्रयोगशील राहावे लागते, कारण कोणीही तुमच्या स्किन टोनसाठी योग्य उत्पादन कोणते हे सांगू शकत नाही. तुम्हाला जो ब्रँड आवडतो त्याचे अनेक शेड्स घेऊन ते चेहऱ्यावर लावून योग्य उत्पादन निवडा.

* मेकअपच्या आधी त्वचेला जरूर मॉइश्चराइझ करा.

* मेकअपच्या आधी प्रायमर बेसच्या रूपात लावा. यात इस्टाफिल जेल भरपूर असते, जे काही वेळाकरता तुमच्या चेहऱ्याची रोमछिद्रे बंद करते. ज्यामुळे मेकअप एकसारखा त्वचेवर बसतो आणि स्किनला सुरक्षाही मिळते.

* हल्ली बाजारात अनेक प्रकारचे कंसीलर उपलब्ध असतात. ग्रीन कलरचा कंसीलर चेहऱ्यावरील पातळ कोशिकांना लपवण्यासाठी कामी येतो, तर ब्राउन कलरचा कंसीलर ब्राउन पिगमेंटेशन आणि वांग यांना लपवतो. तर नॉर्मल स्किन कंसीलर डोळयांभोवतीचे डार्क सर्कल्स लपवतो. ऑइली स्किन करता मॅट फिनिश कंसीलर चांगला असतो.

* फाउंडेशनने चेहऱ्याचे कंटूरिंग करणे हाही एक चांगला मेकअप ट्रेंड आहे. यात ३ वेगवेगळया प्रकारच्या फाउंडेशन स्टिक्स मिसळून एका स्टिकमध्ये केले जाते.    ज्यात १ स्टिक ही स्किन टोननुसार असून २ स्टिक्स स्किन टोनपेक्षा २     शेड्स गडद लावल्याने एक वेगळा कलर मिळतो, जो कंटूरिंगसाठी चांगला पर्याय असतो.

* स्टिक आयशॅडोचा वापर डोळयांसाठी करा. हा चेहऱ्यावर सहज लावता येतो आणि याला कलर आयपेन्सिलच्या रूपातही वापरू शकता.

* काजळ आणि स्मज ब्रशचासुद्धा डोळयांसाठी वापर करा. स्मोकी लुकसाठी आयलॅशेसच्या खाली वर सजवा.

* लुकला नवेपण देण्यासाठी गालांवर फेस टींट लावा.

लिपस्टिक गेम चेंजर

* पारुल भटनागर

साधारणत: आपण फेस मेकअपवर लक्ष देतो आणि लिपस्टिककडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे चेहऱ्यावर ते तेज आणि चमक येऊ शकत नाही जी यायला हवी. जेव्हा की लिपस्टिकची मेकअपमध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका असते. साधे लिपस्टिकसुद्धा सगळया चेहऱ्याचा लुक बदलवून टाकते. मग अशावेळी गरज आहे मेकअपला लिपस्टिकने फायनल टच देण्याची.

मेकअपतज्ज्ञसुद्धा कबूल करतात की लिपस्टिक गेमचेंजर असते. भले ती आपण शेवटी लावतो. पण ही सगळयात महत्वाची आणि आवश्यक स्टेप असते, जी संपूर्ण चेहऱ्याचा लुक बदलवायचे काम करते.

अलीकडे बाजारात ढीगभर लिपस्टिकची व्हरायटी आली आहे, जी चेहऱ्यावर वेगवेगळा परिणाम दर्शवते. म्हणून हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि फिनिशिंगच्या हिशोबाने कोणती लिपस्टिक वापरू इच्छिता.

लिपस्टिकचे प्रकार

मॅट लिपस्टिक, टीकते खूप वेळ : मॅट लिपस्टिक क वेगळा प्रभाव टाकते. विशेषत: याचे मॅट फिनिश वेलवेट टेक्स्चर आणि उत्तम कलर्सचे  आउटपुट महिलांना फार आवडते.

ही लिपस्टिक विशेषत: पिगमेंटेड लिप्सकरीता खूप चांगली आहे.

लिप क्रीम देतं एक्स्ट्रा मॉइश्चर : अनेकदा ऋतू बदलल्याने आपले ओठ रुक्ष होतात, ज्यासाठी गरज असते ओठांना मॉइश्चर देण्याची आणि यासाठी लिप क्रीमपेक्षा दुसरे काहीच चांगले नाही. कारण त्यात वॅक्स आणि भरपूर प्रमाणात तेल असल्याने ओठांना अतिरिक्त मॉइश्चर देण्याचे काम करते. हे तुम्ही रोज लावून छान फिल करू शकता.

लिप क्रेयॉनने मिळवा स्मूद टच : मेकअप प्रॉडक्ट्स कोणाला आवडत नाही. अशात लिप क्रेयॉन खूप चांगले असते, कारण एकतर स्मूद फिनिशसोबत याचे टेक्श्चर खूपच सॉफ्ट असते. तसेच  तुम्ही हे लिप लायनरप्रमाणे अथवा लिप कलर करण्याकरिता वापरू शकता.

लिप ग्लॉसने मिळवा ग्लॉसी लिप्स : ग्लॉसी लिप्स जितके छान दिसतात, तितकाच त्याचा आऊटफिट्सची ग्रेस वाढवण्यात महत्त्वाचा वाटा असतो. अलिकडे लिपस्टिकमध्ये लिपग्लॉसची मागणी वाढली आहे, कारण यामुळे पातळ आणि लहान ओठ योग्य आकारात नजरेत भरतात आणि रुक्ष ओठांचा कोरडेपणासुद्धा नाहीसा होतो. कारण यात मॉइश्चर खूप जास्त असते. शिवाय याचे सेमी शीर फिनिश ग्लॉस लुक आणखीनच सुंदर करते.

लिक्विड लिपस्टिक टिकते खूप वेळ : ही आपल्या टेक्स्चरमध्ये ग्लॉसी असल्याने लावल्यावर तुम्हाला सेमीमॅट फिनिश देते आणि खूप काळ टिकून राहते.

लिप  स्टेन : हे लिक्विड आणि जेल रूपात असते, जे लवकर वाळण्यासोबतच खूप काळ टिकून राहते.

लिप लायनरने द्या योग्य आकार : साधारणत: आपण लिपलायनर लिपस्टिक आणि ग्लॉसला योग्य आकार देण्यासाठी वापरतो. आजच्या काळातील मेकअपप्रेमी लिपलायनरला टु इन वन म्हणजे ओठांची आऊटलाईन करण्यासोबतच रंग भरण्यासाठीसुद्धा वापरतात.

लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत

अनेकदा आपण छान शेडची लिपस्टिक खरेदी करतो  पण तरीही ती ओठांवर तेवढी सुंदर दिसत नाही, जेवढी दिसायला हवी. अशावेळी योग्य पद्धतीने लिपस्टिक लावायची गरज असते. यासाठी या गोष्टी आत्मसात करा.

* ज्याप्रमाणे चेहऱ्यासाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे, जेणेकरुन मृत त्वचापेशी नाहीशा होतील. अगदी त्याचप्रमाणे ओठांसाठीसुद्धा जेणेकरुन ओठ सॉफ्ट दिसतील.

* लिप प्रायमर ओठांना स्मुद करण्यासोबत तुमच्या शेडला खूप काळ टिकवून ठेवण्याचे काम करते आणि तुम्हालासुद्धा हेच हवे असते.

* प्रायमरनंतरसुद्धा जर तुमचे ओठ पिगमेंटेड वाटत असतील तर त्यावर कंसीलर लावा.

* परफेक्ट पाऊट देण्यासाठी तुमचा चेहरा नेहमी तयार असायला हवा यासाठी ओठांना आकार देणे खूप गरजेचे असते.

* शेवटी आपल्या ओठांना कलारबार वेल्वेटमेंट लिपस्टिक फ्युशियाने फायनल  टच द्या.

आता तुम्हाला कळले असेल की लिपस्टिक योग्य पद्धतीने लावली तर किती अमेझिंग लुक मिळतो.

पण अनेक असे प्रश्न जे नेहमी लिपस्टिक लावताना आपल्यासमोर उभे ठाकतात आणि आपण ते समजू शकत नाही की अशा परिस्थितित हे कसे सोडवायचे. या जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित उत्तरं.

लिपस्टिक खूप काळ राहण्यासाठी काय करावे?

लिपस्टिक खूप काळ टिकवून ठेवण्यासारही तुम्ही सगळयात आधी लिपस्टिक लावा. त्यानंतर आपल्या ओठांमध्ये ब्लॉटिंग पेपर लावून दोन्ही ओठ दाबा. नंतर ते काढून परत लिपस्टिक लावा. तुम्ही पाऊटवर टिशू पावडर लावून लिपस्टिकचा दुसरा थर लावू शकता.

लिपग्लॉसला मॅट लुक कसा द्यायचा?

सगळयात आधी लिप ग्लॉस लावा. मग ओठांमध्ये ब्लॉटिंग पेपर ठेवून हलके दाबा. यानंतर स्पंज अॅप्लिकेटरने साधी पावडर लावा. ही क्रिया तोवर करत राहा, जोवर तुम्हाला हवा तसा लुक मिळत नाही.

मॅट लिपस्टिकने कसा मिळेल ग्लॉसी टच?

मॅट लिपस्टिकवर थोडासा क्लिअर लिप बाम व ग्लॉस लावल्याने तुम्हाला ग्लॉसी लुक मिळू शकतो.

लिपस्टिकसा इतर मेकअप प्रोडक्टच्या रूपात वापरू शकतो का?

अर्थातच, तुम्ही लिपस्टिक ब्लश अथवा आय शॅडो म्हणून वापरू शकता. तुम्ही न्यूड शेडचा फेस काँटूर आणि व्हायब्रण्ट शेड्सचा कलर करेक्टर म्हणून वापर करू शकता.

स्टायलिश केसांद्वारे स्मार्ट लुक

* गरिमा पंकज

सुंदर दिसण्यासाठी आकर्षक वेशभूषा आणि मोहक अदांसोबतच केस स्टायलिश आणि निरोगी दिसणेही गरजेचे आहे. दिल्ली प्रेसमध्ये आयोजित फेबच्या कार्यक्रमात हेअर आणि केमिकल आर्टिस्ट नाजिम अली यांनी अॅडव्हान्स हेअर कटिंग, थ्री डी हायलायटिंग, केरोटिन स्मूथनिंग ट्रीटमेंट, टेंपररी रोलर सेटिंग आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

दिल्लीस्थित गांधी नगरातील ‘साहिबसाहिबा ब्यूटी सलून’चे मालक नाजिम अली यांनी भारतात पहिल्यांदा फायर हेअरकट लोकप्रिय केला. फायर हेअरकट एक नवीन ट्रेंड आहे जो मुले आणि तरुणाईला आकर्षित करतो. यात वॅक्सशिवाय जेल, स्प्रेद्वारे केसांना फंकी लुक दिला जातो.

अॅडव्हान्स हेअरकट

अॅडव्हान्स हेअरकट अनेक प्रकारचे असतात. जसे की डायमंड कट, लाँग हेअरकट, ग्रॅज्युएशन कट इत्यादी. यात कानापासून कानापर्यंत केसांचे चार भाग करून त्यांना मल्टिलेअर दिले जातात. त्यानंतर टेक्स्चरायजिंग केले जाते. यामुळे पातळ केसही भारदस्त दिसू लागतात आणि बाऊन्सी होतात.

थ्री डी हायलायटिंग

यात सर्वप्रथम केसांना प्रीलाईट करतात. त्यानंतर त्यात थ्री डी (लाल, हिरवा, निळा असे तीन वेगवेगळे रंग) घेऊन हायलायटिंग केले जाते. यामुळे केस स्टायलिश आणि आकर्षक दिसू लागतात.

केरॅटिन स्मूदिंग ट्रीटमेंट

या उपचार पद्धतीत सर्वात आधी केसांना शाम्पू करतात. त्यानंतर केस ८० टक्यांपर्यंत सुकवतात. मग केसांवर सेक्शन टू सेक्शन ट्रीटमेंट अप्लाय करून ४५ मिनिटे केस तसेच ठेवतात. त्यानंतर १०० टक्के ब्लो ड्राय केले जाते. मग फाईनफाईन म्हणजे केसांचे बारीक बारीक सेक्शन घेऊन आयरनिंग केले जाते. त्यानंतर ग्राहकाला दोन दिवसांनी बोलावून शाम्पू करून कंडिशनर आणि मास्क लावले जाते. त्यानंतर कोल्ड ड्रायरने सुकवून सीरम लावतात. हे केसांना ३० टक्क्यांपर्यंत स्ट्रेट करते, तसेच केस रिपेअर करण्याचेही काम करते.

खबरदारी : एखाद्या चांगल्या कंपनीचा शाम्पू आणि कंडिशनरचाच वापर करा, जेणेकरून दीर्घकाळपर्यंत केस सरळ ठेवता येतील.

ओलाफ्लेक्स

यात कलर रिबॉण्डिंग केलेल्या केसांना ट्रीटमेंट देऊन त्यांना मुलायम आणि सिल्की बनवले जाते.

टेंपररी रोलर सेटिंग

सर्वात आधी केसांना हेअर स्प्रे करतात. त्यानंतर त्याचे सेक्शननुसार रोलर लावतात. यामुळे सरळ केस कुरळे आणि जाडसर दिसू लागतात.

थ्री डी बेबी लाँग ब्रँड हेयरडू

या हेअरस्टाइलची सुरुवात पुढे पफ काढून केली जाते. त्यानंतर केसांमधून थ्री डी लेयर काढून काही केस फ्रंट स्टायलिंगसाठी वापरले जातात. मागील उरलेल्या केसांमधून एक एक करून लेयर काढून त्याला कर्व म्हणजे वक्राकार आकार देतात. ते एकावर एक अशाप्रकारे सजवून तुम्ही आकर्षक हेयरडू बनवू शकता.

शेवटी तुमच्या आवडीची हेअर अॅक्सेसरीज किंवा हेअर ज्वेलरी वापरून तुम्ही त्याला अधिकच सुंदर बनवू शकता. कर्वच्या मधोमध रिकाम्या ठिकाणी अॅक्सेसरीज लावून ते अधिक मनमोहक बनवू शकता.

पॅटर्न हाय बन विथ रोजेस

सर्वप्रथम केसांच्या मध्यभागापासून दोन भाग करून पुढचे केस सोडून देतात. नंतर मागील भागातील केस डोक्यावर घेऊन उंच पोनी बांधतात. त्या पोनीचे चार भाग करून एक क्रॉस म्हणजे फुल्लीचा आकार देतात. त्यानंतर त्या पोनीवर एक मोठा डोनट आणि एक छोटा डोनट बनवून पिनअप करतात. त्यानंतर चार भागातील एक भाग घेऊन रोज म्हणजे गुलाबाचा आकार तयार करतात. त्यानंतर त्यात एक कर्व म्हणजे वक्राकार वळण घेऊन यू आकार देतात आणि त्या भागाला रोजखाली घेऊन जातात. हीच पद्धत उर्वरित तीन भागांसाठी वापरतात.

पुढच्या केसांचे काटयाच्या मदतीने तीन भाग घेऊन थ्री डी लेअरिंग काढून क्लिपच्या मदतीने त्याला आकार देतात. अशाप्रकारे तुम्हाला मिळतो मनाजोगता हेअरडू.

विंटर मेकअप ट्रेण्ड

* प्रीती जैन

हॉट, गॉर्जियस आणि फॅब्यूलस लुकसाठी नवीन ट्रेण्ड समजून आणि याचा स्वीकार करून तुम्ही आपल्या व्यक्तिमत्वात नवीन तेज आणू शकता. मात्र, हे जरुरी नाही की सुंदर दिसण्याच्या नादात तुम्ही घरातच सौंदर्यप्रसाधनांचं दुकान उघडावं, तर इथे गरज आहे ती फॅशन, ब्यूटी आणि मेकअपच्या बदलत्या ट्रेण्डबरोबरच आपली पर्सनालिटीही अपडेट करण्याची.

पॉप रेड ग्लॅम लिप्स

या सीझनमध्ये ओठांसाठी १०० टक्के पॉप ग्लॅम आयडिया बेस्ट ठरेल. म्हणजे निओन मेकअपचं चलन तर असेलच पण त्याचबरोबर हॉट रेड, निओन शेड, प्लम शेड आणि पिंक ग्लॅमरस शेड्सचं चलन असेल. म्हणून लिपस्टिकचा वापर करताना जरा बोल्ड आणि ग्लॅमरस शेड्सचा वापर करा.

हेअर वर्क

केसांमध्ये फंकी पिनअप, अनइवन लुक, रोलर, शायनिंग, स्टे्रटनिंग, सॉफ्टी रोलिंग, वीविंग, निटिंग, ट्विस्ट पफ, अनटायझिंग स्मजिंग वेनी, नोटिड बन इत्यादी स्टाइलचं चलन असेल, ज्याला ग्लॅमराइझ करण्यासाठी आर्टिफिशिअल फ्लोरलने डायग्नल डिझाइनमध्ये डेकोरेट केलं जाईल. याव्यतिरिक्त जरकन, पर्ल, ग्लिटर, फेदर इत्यादींपासून नवीन लुक मिळवण्याचं चलन असेल.

निओन मेकअप

सुरुवातीला निओन मेकअपचं चलन असेल. तुम्ही जर आत्मविश्वासाने भरपूर फन लविंग पर्सनॅलिटीची मालकीण असाल आणि हाच गुण तुम्हाला मेकअपमध्येही दाखवायचा असेल तर निओन मेकअपपेक्षा दुसरा चांगला पर्याय नाहीए. तुम्हाला जर सर्वांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर आपल्या स्किन टोनपेक्षा एक शेड लाइटर फाउंडेशनची निवड करा. आयशॅडोमध्ये फन लविंग वायब्रेंट कलर यलो, ऑरेंज, पिंक, ब्लू, पर्पल, फ्यूशिया ग्रीन, फ्लोरो ग्रीन, मजेंटा इत्यादी शेड्सची निवड करा. वॉल्यूमायिझंग थिक लेअर मसकारा आणि हेवी ट्रान्सपरण्ट लिपग्लॉस विद निओन व पेस्टल लिपस्टिकने आपला लुक कम्प्लीट करा. डोळ्यांच्या क्रीझसाठी वॉटर लाइनमध्ये व्हाइट लायनर किंवा पेन्सिलीचा वापर करा. यंगर लुकिंगसाठी पिंक शेड ब्राइट लिपस्टिकची निवड करा.

हायलायटिंग

केसांना हायलाइट करताना क्रिएटिव्हिटीवर जोर राहील. एक्सपेरिमेंटल फंकी व निओन हायलायटिंगचा ट्रेण्ड असेल, ज्यामध्ये हेअर स्प्रे, हेअर चॉक व हेअर ग्लिटर मुख्य राहील. फक्त गोल्डन कॉपर हायलायटिंगच नव्हे तर यावेळी वायब्रेंट कलरचंही चलन असेल.

शीट मास्क

इन्स्टेंट ग्लोसाठी कोरियन शीट मास्कचं चलन असेल. याच्या उत्तम परिणामामुळे येणाऱ्या काळातही याचा ट्रेण्डही आणखीन वाढेल. शीट मास्क लावायला खूपच सोपा आहे. हा चेहऱ्याच्या त्वचेला एक्सफॉलिएशनद्वारे कमालीचा उजळपणा देतो. शीट मास्कमध्ये एण्टीएजिंग, ब्राइटनिंग, हायडे्रटिंग, मॉश्चरायझिंग, एण्टीएक्ने, हायड्रोजेल, पर्ल मास्क इत्यादी मुख्य आहेत. हे तुम्ही ऑनलाइनदेखील ऑर्डर करू शकता.

कॅरेटिन स्मूदनिंग

हेअर ट्रीटमेंटबद्दल म्हणावं तर कॅरेटिन ट्रीटमेंटचं चलन असेल. यामध्ये प्रोफेशनल हेअर केअर प्रॉडक्ट्सच्या वापराने डॅमेज केसांना रिपेअर करायला मदत तर होतेच, त्याचबरोबर केस नरिश होऊन व्हिटामिन मॅरिन बोटॅनिकलच्या मदतीने केसांमध्ये स्मूदनेस आणि शाइनही येते.

मॅग्नेटिक नेल आर्ट

नेल आर्टमध्ये अॅक्रेलिक नेल आर्ट डिझाइन व मॅग्नेटिक नेलपेंट्सचं चलन पाहायला मिळेल. याशिवाय निओन शेड पेस्टल, गोल्ड डस्ट, थीम बेस, ज्वेल नेल, नेल पियर्सिंग, फ्यूजन टिप नेल आर्ट इत्यादींचं चलन असेल. त्याचबरोबर रूटीन लाइफमध्ये मार्बल आर्ट, वर्टिकल लाइन, फेदर टच आणि फ्लोरल आणि रेनबोचा इफेक्ट पाहायला मिळेल.

स्मोकी विद लाँग लॅशेज आईज

या सीझनमध्ये स्मूदी, स्मोकी, मेटॅलिक फिनिश एक्वेटिक आणि फॉरस्टिंग कलर्सचा ट्रेण्ड पाहायला मिळेल. आईज लुकला कम्प्लीट करण्यासाठी लाँगफेअर आर्टिफिशियल लॅशेजने डोळ्यांचं सौंदर्य वाढवलं जाईल.

ग्राफिक आयलायनर

या सीझनमध्ये डबल विंग्स असलेल्या स्टे्रट थिक आउटर कॉर्नरवाल्या कॅट लुक आयलायनरची फॅशन असणार आहे. ग्लॅमरस लुकसाठी आर्टिफिशियल लॅशेजबरोबर उठावदार दिसणाऱ्या आयलायरनचा वापर डबल विंग्स आणि ज्योमॅटिक विंग्सच्या रूपात विशेषरीत्या पसंत केलं जाईल. याशिवाय कलर्स मेटॅलिक फिनिशिंग लायनरची क्रेझ पाहायला मिळेल.

आय ग्लॉस

आय ग्लॉस आईज मेकअपचा ट्रेण्ड असणार आहे, ज्यामध्ये कार्बन ग्लॉस लायनर असो वा वायब्रेंट ग्लॉस, टोटली स्मजफ्री आणि लाँगलास्टिंग इफेक्टसोबत बेस्ट आयडियल फॉर १ मिनिट टचअपसाठी तुम्ही ट्राय करा,

कोरडी त्वचा दिसेल तजेलदार

– आभा यादव

हळूहळू वातावरणात गारठा वाढू लागलाय. या ऋतूतील गारवा आणि रूक्षपणा त्वचेतील ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे त्वचा कोरडी, दुभंगलेली दिसू लागते आणि थोडी सेन्सिटिव्हदेखील होते. परंतु अशा ऋतूत तुम्ही थंडगार वाऱ्यांना तुमच्या त्वचेचा मित्रदेखील बनवू शकता, ज्याचे उपाय सांगत आहेत साकेत सिटी इस्पितळाची डर्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर लिपी गुप्ता :

त्वचा का होते कोरडी

थंडीच्या दिवसांत त्वचा शुष्क होते; कारण कोरडी हवा त्वचेतील ओलावा शोषते. त्वचेत ओलाव्याच्या अभावामुळे सेल्सचा बाहेरचा भाग कोरडा होऊन फुटलेला दिसतो, तेव्हा ओलाव्याचं सुरक्षाकवचदेखील निघून जातं. यामुळे आतील त्वचेवरदेखील ऋतूचा प्रभाव होऊ लागतो.

अशा त्वचेवर स्थायी वा अस्थायी रेषा आपली जागा निर्माण करू लागतात.

असं होऊ नये यासाठी तुम्ही पुढे सांगितलेले उपाय करून त्वचेची देखभाल करून त्याचा ओलावा कायम राखू शकता.

हॉट शॉवर स्नान

या ऋतूत दररोज सकाळी स्फूर्तिदायक गरम पाण्याने स्नान करणं खूपच महत्वाचं आहे; कारण असं स्नान तुम्हाला ताजंतवानं करतं आणि त्वचेतील हायजीन कायम ठेवतं. परंतु पाणी अधिक कडकडीत नसावं याची काळजी घ्या; कारण ते त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेतं. हायडे्रटेड त्वचेसाठी कोमट पाणी सर्वोत्तम उपाय आहे.

बॉडी ऑइलिंग

थंडीच्या दिवसांत कोरड्या हवेपासून त्वचेचं संरक्षण आणि कोरडेपणा दूर करण्याची परिणामकारक पद्धत आहे कोमट तेलाने मालीश करणं. परंतु मालीशसाठी अशा तेलाची निवड करावी जे खूप चिकट नसेल आणि शरीरात अधिक शोषणारं असावं. जसं ऑलिव्ह, तीळ आणि एलोवेरा तेल. तेलाने मसाज झोपण्यापूर्वी वा अंघोळीपूर्वी एक तास अगोदर करावं, ज्यामुळे तेलाचा परिणाम व्यवस्थित होईल.

फेशवॉश कसा असावा

थंडीच्या दिवसांत सर्वात जास्त चेहऱ्याची अधिक काळजी घ्यावी लागते. यासाठी संतुलित, सौम्य व हायडे्रटिंग फेसवॉश वापरावा, ज्यामध्ये क्लांजिंग व मॉश्चरायझिंग वनौषधींबरोबरच कोरफड अधिक प्रमाणात असावी. ही तत्त्वे त्वचेला हायड्रेट करतात.

साबणाची निवड

त्वचेची नियमित स्वच्छता व मुलायमपणासाठी ऑलिव्ह ऑइल आणि कोरफडीचे गुण असणाऱ्या सॉफ्ट साबणाची निवड करावी.

घरगुती मॉश्चराय

अर्धा चमचा गुलाबपाण्यात १ चमचा मध मिसळा आणि चेहऱ्यावर हळूहळू चोळा. १५-२० मिनिटं असंच ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ करा. मधाने कोरड्या त्वचेचा ओलसरपणा परत मिळेल.

याव्यतिरिक्त नखांच्या आजूबाजूला मौश्चरायझर लावा; कारण पाण्यात अधिक वेळ काम केल्याने ते गुळगुळीत आणि कोरडे होऊ शकतात. तुम्ही ग्लोव्हजचादेखील वापर करू शकता.

स्क्रबिंग

थंडीच्या दिवसांत धूळमातीपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी आठवड्यातून दोनदा स्क्रबिंग नक्की करून घ्या. स्क्रबिंग त्वचेत जमलेला मळ आणि मृतत्वचा प्रभावी पद्धतीने काढण्यात आणि त्वचेतील अतिरिक्त मॉश्चरायझर शोषण्यास सक्षम असल्यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार राहाते.

टोनर आणि क्लींजिंग मिल्क

थंडीच्या दिवसांत घाम येत नसल्यामुळे लोक फेसवॉश करण्याकडे थोडं कमीच लक्ष देतात, ज्यामुळे त्वचेची स्वच्छता व्यवस्थित होऊ शकत नाही. अशावेळी उत्तम क्वालिटीचे टोनर आणि क्लींजिंग मिल्क प्रभावी पद्धतीने त्वचेची आतून स्वच्छता करतात आणि कोरड्या त्वचेला स्वच्छ, मुलायम व आर्द्रतायुक्त बनवितात.

मॉश्चराय

थंडीच्या दिवसांत अशा मॉश्चरायझरचा वापर करा जे उन्हापासून संरक्षण देईल. तुम्ही नॉर्मल मॉश्चरायझरच्या जागी सेरेमाइकयुक्त मॉश्चरायझरचा वापर करा.

सेलिब्रिटीज मेकअप एक्सपर्ट आशमीन मुंजाळ यांच्या मते, मॉश्चरायझर त्वचेत पीएच बॅलन्सला मेन्टेन करतं. जर पीएच बॅलन्स वाढला तर एक्नेला सुरूवात होते आणि कमी झालं तर चेहऱ्यावर रिंकल्स येतात, म्हणूनच अशा मॉश्चराझरचा वापर करा, जे त्वचेत पीएच बॅलन्स योग्य ठेवतील. याव्यतिरिक्त बदाम क्रीम, व्हॅसलिन व ग्लिसरिनचा वापर करावा. हे त्वचेवर एक सुरक्षाकवच बनवितात ज्यामुळे त्यावर कोरड्या हवेचा परिणाम होत नाही.

चांगलं मॉश्चरायझर त्वचेचा ओलावा कायम राखतो त्याबरोबरच नवीन थर निर्माण करण्यातदेखील परिणामकारक ठरतं. हे धूळ, ऊन आणि ऋतूंच्या मारापासून वाचवतं. मेकअपमधील आर्द्रता कायम ठेवतो. जिथे कोरड्या त्वचेसाठी सामान्य मॉश्चरायझर मदतनीस ठरतो. तिथे तेलकट त्वचेसाठी ऑइल फ्री मॉश्चरायझर उत्तम पर्याय आहे.

सनस्क्रीन लोशन आवर्जून वापरा

डॉक्टर लिपी यांच्या मते, थंडीतदेखील ऊन तुमच्या त्वचेवर सरळ परिणाम करतं. यासाठी उन्हाळ्याप्रमाणे थंडीतदेखील सनक्रीन लोशनचा आवर्जून वापर करावा.

खरंतर, थंडीतदेखील अल्ट्राव्हायलेट किरण नुकसानकारक असतात आणि तुम्ही थंडीत उन्हात अधिक वेळ असाल तर त्वचेवर अल्ट्रावायलेट किरणांचा परिणामदेखील अधिक होतो. सनस्क्रीन लोशन याच्या परिणामाने त्वचेचं नुकसान करतं, यामुळे तुमच्या उघड्या त्वचेवर होणाऱ्या सुरकुत्या आणि एज स्पॉट वगैंरेंपासूनदेखील रक्षण करतं.

आहारची घ्या खास काळजी

थंडीच्या दिवसांत आपल्या खाण्यापिण्याची खास काळजी घ्या. तुमची त्वचा हायडे्रट करण्यासाठी दिवसभर कमीत कमी ८-१० ग्लास पाणी प्या. या ऋतूत तशी तहान कमीच लागते तरीदेखील तुम्ही थोड्या थोड्या वेळाने कोणतं ना कोणतं लिक्विड नक्की घेत राहा. गरम पाण्यात लिंबू टाकूनदेखील प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात आणि इम्यून सिस्टमदेखील मजबूत होते.

याव्यतिरिक्त ग्रीन टी, नारळपाणी, स्प्राउट, फलाहार करा. खाण्यापिण्यात संतुलन ठेवा व पौष्टिक आहाराला प्राधान्य द्या.

पुरेशी झोप घ्या

त्वचा सुंदर बनविण्यासाठी ७-८ तास पुरेशी झोप घ्या; कारण ही आपल्या उर्जेला ताजंतवानं करते आणि शरीर चपळ बनवते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें