गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • माझे पती नुकतेच त्यांच्या अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. मला दोन मुले आहेत, जी विवाहित जीवन जगतात आणि दुसऱ्या शहरात राहतात. माझे पती नोकरीतून सेवानिवृत्त झाले तेव्हा वाटले की आता उर्वरित आयुष्य शांततेत व्यतित करू. पण माझ्या पतिच्या बदललेल्या वागण्याने मला आश्चर्य वाटले. खरं तर पती महिन्यात २-४ दिवस दुसऱ्या शहरात जातात आणि तेथे कॉलगर्लसमवेत वेळ घालवतात. हे सर्व मला त्यांच्या मोबाइलवरून कळाले आहे. दुसरी मोठी समस्या म्हणजे घरात होणाऱ्या पार्ट्यांची, ज्यात खाण्या-पिण्याबरोबर भरपूर मद्यपान चालते आणि आसपास राहणाऱ्या नणंदासुद्धा पार्टीत सामील होण्यासाठी येतात. कधीकधी असे वाटते की मी माझ्या मुलांना ही सर्व माहिती द्यायला हवी, परंतु नंतर असा विचार करून देत नाही की आपल्या वडिलांचा हा घृणित चेहरा पाहिल्यानंतर वडील आणि मुलांमधील नातेसंबंध बिघडतील. मी माझ्या पतिला पुष्कळ वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु उत्तर हेच मिळते की मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सर्वासाठी घालवले आहे, आता मी फक्त माझ्यासाठी जगेन. पतिला कशाप्रकारे योग्य मार्गावर आणता येईल यासाठी मला कोणताही मार्ग दिसत नाही. कृपया मला सांगा, मी काय करू?

वाढत्या वयानुसार इच्छा किंवा शारीरिक आवश्यकता कमी होत नाहीत. हे चांगले आहे की आपली मुले आपल्या पायावर उभी आहेत आणि चांगले आयुष्य व्यतित करत आहेत, तेव्हा आपल्याकडेसुद्धा जुन्या आठवणींना मुक्तपणे ताजेतवाने करण्यास आणि आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्यासदेखील वेळ असेल.

स्वत:ला वृद्ध न मानता काळाबरोबर चला. साजश्रृंगार करा, आपल्या पतीबरोबर चित्रपट पाहा, मॉलमध्ये जा, खरेदी करा, जेणेकरून आपल्यालासुद्धा आपल्या पतिची जवळीक आवडेल.

जर पतिमध्ये थोडा बदल झाला तर त्यांना प्रेमाने समजावू शकता. आपण आपल्या नणंदानाही असे सांगू शकता की जेव्हा त्या दारू इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर राहतील तेव्हाच त्यांचे घरी स्वागत होईल. आपणसुद्धा त्यांच्या पार्टीत सामील झालात तर बरे होईल, पण दारूची फेरी होणार नाही या अटीवर.

असे असूनही जर पती आणि नणंदा योग्य मार्गावर येताना दिसत नसतील तर आपण कठोरपणे वागू शकता. जर आपण गोष्टी बिघडत असल्याचे पाहिले तर आपण सर्व काही मुलांसोबत शेअर करू शकता.

तसही, या वयात विवाहित पुरुष किंवा स्त्री या दोघांनाही एकमेकांची जास्त गरज असते, कारण या वयात येईपर्यंत मुलेही स्थायिक होतात आणि आपापले स्वत:चे कुटुंब आणि करिअर बनविण्यात व्यस्त होतात. जर आपण आपल्या पतिबरोबर जास्तीत जास्त वेळ राहिलात तर त्यांनादेखील आपले पाठबळ मिळेल आणि शक्य आहे की ते योग्य मार्गावर येतील.

  • मी एक ३६ वर्षीय महिला आणि ९ वर्षाच्या मुलीची आई आहे. ५ वर्षांपूर्वी पतिचा एका अपघातात मृत्यू झाला. माहेर आणि सासरचे लोकसुद्धा दुसरे लग्न करण्यावर ठाम आहेत, पण नवऱ्याचा चेहरा माझ्या मनातून उतरत नाही. माझ्या माहेर आणि सासरच्यांना एक मुलगा आवडला आहे. मुलगा विनाअट लग्न करण्यासदेखील तयार आहे. मी काय करू?

आयुष्य एखाद्याच्या आठवणी आणि विश्वासाने चालत नाही किंवा थांबत नाही. तुमची मुलगी अजून लहान आहे. उद्या मुलीचे लग्न होईल आणि तीही आपल्या कुटुंबात आनंदी असेल.

आपल्याकडे आता वेळ आहे. म्हणूनच दुसरे लग्न करण्यात काहीही चूक नाही. आपल्या मुलीला योग्यप्रकारे प्रशिक्षण देण्याची आणि तिचे लग्न करण्याची जबाबदारी आपण वेळेवर तेव्हाच पार पाडू शकता, जेव्हा आपल्या घर संसाराचा जम बसला असेल. आपली इच्छा असल्यास मुलीच्या पालन-पोषणासाठी आपण भावी पतिशी आधीच चर्चा करू शकता.

  • मी २६ वर्षांची अविवाहित मुलगी आहे. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. ऑफिसचे वातावरण ठीक आहे, पण मी माझ्या एका सहकाऱ्यावर नाराज आहे. खरंतर तो दिवस-रात्र व्हॉट्सअॅपवर मला मेसेज पाठवत राहतो. तो उत्तर देण्यासदेखील सांगतो, परंतु मला चिड येते. एकतर वेळेचा अभाव आणि दुसरे म्हणजे कामाचा भार. वास्तविक, त्याचे संदेश मर्यादेच्या बाहेर नसले तरी वारंवार संदेशांमुळे मी अस्वस्थ होते. माझे लक्षदेखील कामापासून विचलित होते. माझी अशी इच्छा नाही की त्या सहकाऱ्यामुळे माझ्या कार्यालयीन वागणूकीवर परिणाम व्हावा, परंतु त्याचबरोबर त्याने मला असा त्रास देऊ नये अशीही माझी इच्छा आहे. सांगा, मी काय करू?

आपल्याला त्या सहकाऱ्याचे व्हॉट्सअॅप करणे आवडत नसल्यास आपण त्यास थेट नकार देऊ शकता. आपण असे म्हणू शकता की जर संदेश कामाशी संबंधित असेल तर ठीक आहे अन्यथा व्यर्थचे व्हॉट्सअॅप मेसेज करू नका. आपण त्याला असे देखील सांगू शकता की ऑफिसच्या वेळेस व्हॉट्सअॅपवर टाईमपास करून आपली प्रतिमा बिगडेल आणि जेव्हा ही गोष्ट बॉसपर्यंत पोहोचेल तेव्हा प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकेल.

तसेच त्याने पाठविलेल्या सततच्या व्हॉट्सअॅप संदेशाकडे दुर्लक्ष करा आणि कुठलाही प्रतिसाद देऊ नका. त्यानंतर काही दिवसांनी तो स्वत:च व्हॉट्सअॅप करणे बंद करेल. अशाने सापदेखील मरेल आणि काठीही तुटणार नाही.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • माझ् ?या हाताच्या वरच्या भागावर लाल रंगाचे लहान लहान फोड आले आहेत. वास्तविक पहाता मला यामुळे खाज अथवा वेदना होत नाही. पण यामुळे मी बिनबाह्यांचे ड्रेस घालू शकत नाही. हे नाहीसे करायला एखादा उपाय सांगा?

त्वचेवर लाल रंगाचे लहान फोड म्हणजे बंप्स होण्याची समस्या ज्याला केराटोटिस पाइलेरिस म्हटले जाते. जवळपास ५० टक्के माणसं या व्याधीने पीडित असतात. बंप्स सामान्यत: लाल आणि पांढऱ्या रंगाचे मुरमांप्रमाणे  दिसतात. प्रत्यक्षात हे इतर काही नसून, मृत त्वचा असते. ज्यात त्वचेवरील केस व्यत्यय आणू शकतात. हे केवळ तुमच्या हातावरच नाही तर पार्श्वभागावर आणि जांघांच्या मागेसुद्धा येऊ शकतात. यातून सुटका मिळवायला तुम्ही दिवसातून दोनदा उत्तम मॉइश्चराइजरचा वापर करा. तुम्ही सेलीसिलिक आणि अल्फा हायड्रॉक्सी निवडू शकता. ए जीवनसत्वयुक्त क्रीमने त्वचेच्या पेशींची स्थिती चांगली होते. एक्सफॉलिएशनमुळे मृत त्वचा पेशीत लक्षणीय घट होते. एक्सफॉलिएटिंग स्क्रबचासुद्धा वापर करू शकता. लक्षात ठेवा की कोणतेही क्रीम लावण्याआधी त्वचाविकार तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. उत्तम परिणाम दिसावे यासाठी या गोष्टींचा वापर नियमित करा.

  • माझा चेहरा सतत धुवूनही चिपचिपा दिसतो. मी चेहऱ्याला कोणतेही क्रीम लावत नाही, पण बघताना असं वाटते  की मी अनेक क्रीमचे थर चेहऱ्यावर थापते. कृपया एखादा उपाय सांगा?

तुमची त्वचा अतिशय तेलकट आहे आणि अशी त्वचा असणारे लोक आपल्या त्वचेमुळे  वैतागलेले असतात. पण जांभूळ ऑयली त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. हे तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यात सहाय्यक असते. म्हणून आपल्या त्वचेवर जांभळाचा फेसपॅक लावू शकता. ऑयली त्वचेसाठी जांभळाचा फेस पॅक बनवण्यासाठी याचा गर काढून एका बाउलमध्ये ठेवा. आता नंतर यात एक चमचा आवळयाचा रस आणि एक चमचा गुलाबजल मिसळा. यानंतर हे मिश्रण नीट एकत्र करा आणि घट्ट पेस्ट तयार झाली की हे आपल्या चेहऱ्यावर लावा. २०-३० मिनिटांनी चेहरा धुवा.

  • माझे वय २० वर्ष आहे. माझे केस खूपच ऑयली आहेत. यामुळे जवळपास रोजच मला हे धुवावे लागतात. पण आता माझ्या केसात कोंडासुद्धा होऊ लागला आहे. मी काय करू जेणेकरून माझा त्रास दूर होईल?

तुम्ही झेंडूच्या फुलांचे हेअर टॉनिक वापरा. झेंडूच्या फुलात फायटोकॉन्स्टिट्यूंट्स असतात, जे कोंडा नाहीसा करण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय हे केसांना चिकट होण्यापासून सुरक्षित ठेवते. ऑयली केस असणाऱ्या व्यक्तींसाठी झेंडूचे फुल हा फारच छान घरगुती उपाय आहे. हे वापरण्याकरिता झेंडूची सुकलेली फुलं कोमट पाण्यात उकळत ठेवा. हे पाणी गाळून घेत चोथ्यापासून वेगळे करा आणि शाम्पू केल्यावर एकदा या पाण्याने आपले केस धुवा. कोंडा निघून जाईल.

  • माझी त्वचा ऑइली आहे. मला असे वाटते की ऑयली त्वचेला मॉइश्चराइजर केल्यास ती अजूनच चिपचीपी बनेल. ऑयली त्वचेला मॉइश्चराइज करणे गरजेचे आहे का?

हो, ऑयली त्वचेलासुद्धा मॉइश्चराइज करावे लागते. तुम्ही संत्र्यांचा रस आणि कोरफडीचा गर यापासून बनवलेला हायडे्रटिंग फेस मास्क लावू शकता, जो ऑयली त्वचेतील अतिरिक्त सिबम शोषण्यासाठी सक्षम असतो आणि त्वचेला तजेलदार बनवतो. यासाठी सर्वात आधी १ मोठा चमचा संत्र्याचा रस आणि १ चमचा कोरफडीचा गर घ्या. दोन्ही एका वाटीत एकत्र मिसळा. हे चेहऱ्यावर लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ करा आणि स्वच्छ हाताने ही पेस्ट लावा. डोळयांपाशी लावू नका नाहीतर जळजळ होऊ शकते. साधारण २० मिनिट पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

  • माझं वय ३० वर्ष आहे. माझ्या चेहऱ्यावरचे त्वचाछिद्र आत्तापासूनच मोठे दिसू लागेल आहेत. मी काय करू की माझ्या चेहऱ्यावरील त्वचाछिद्र बंद होतील. आणि माझी त्वचा पूर्वीसारखी होईल?

कोरफड चेहऱ्याला मॉइश्चराइज करते आणि मोठया त्वचाछिद्रांना संकुचित करते. कोरफडीच्या पानाच्या आत असलेला गर चेहऱ्याला उत्तम पोषण देतो आणि चेहऱ्यावर जमलेले तेल आणि मळ नाहीसे करतो, ज्यामुळे त्वचाछिद्रांवर आकुंचन पावतात. आपल्या चेहऱ्यावरील पोअर्सवर कोरफडीचा थोडा गर लावून थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर १० मिनिट तसेच ठेवा. मग थंड पाण्याने चेहरा धुवा.

  • माझे वय २५ वर्ष आहे. माझ्या कपाळावर आत्तापासूनच सुरकुत्या आल्या आहेत, ज्या खूपच वाईट दिसतात. या नाहीशा करायला एखादा घरगुती उपाय आहे का?

वयाआगोदर जर तुमच्या कपाळावर सुरकुत्या आल्या असतील तर, जवसाचे तेल हा खूप चांगला आणि तात्पुरता आणि घरगुती उपाय आहे. यात तुम्हाला जवसाच्या तेलाने मालिश करायचे नाही, तर १ चमचा जवसाचे तेल दिवसातून ३-४ वेळा प्यायचे आहे. हे त्वचेच्या बाहेरील थरांना वर आणतात, ज्यामुळे कपाळाच्या सुरकुत्या आणि रेषा कमी होतात.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

 * मी २१ वर्षांची तरुणी आहे. मला फिरायला, मौजमजा करायला आवडते. अभ्यासात किंवा घरकामात माझे मन लागत नाही. यामुळे घरातीलही सर्व माझ्यावर नाराज असतात. मी माझ्या सवयी कशा बदलू ते सांगा?

तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता. सध्या तुम्हाला फिरायला, मौजमजा करायला नक्कीच आवडत असेल, पण जेव्हा तुमचे मित्र मेहनतीने अभ्यास करुन पुढे जातील, चांगली नोकरी करू लागतील तेव्हा तुम्हाला खूपच पश्चाताप होईल.

तुम्हाला घरातली कामे करायलाही आवडत नाहीत. याचा अर्थ तुम्ही करिअरही करू शकणार नाही आणि घर कामातही पारंगत होणार नाही.

तसे तर आईवडील शक्य तोपर्यंत मुलांना लाडाने वाढवतात. त्यांच्यातील उणिवा लपवतात आणि त्यांच्यावर प्रेमही करतात. पण तुमचे लग्न होईल तेव्हा सासरचे तुम्हाला तुमच्या याच रुपात स्वीकारतील असे मुळीच नाही.

त्यामुळे वेळीच स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला तुमचा दिनक्रम बदलावा लागेल.

रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून फिरायला जा. व्यायाम करा. चांगली पुस्तके वाचा. असे एखादे काम करा ज्यामुळे दुसऱ्यांचे भले होईल. सोबतच घरातील कामातही हातभार लावा.

सुरुवातीला हे कंटाळवाणे वाटेल. पण यामुळे लवकरच तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव होऊ लागेल. यामुळे तुम्ही घरातल्यांच्या लाडक्या व्हाल शिवाय करियरही करू शकाल.

* मी २९ वर्षांची विवाहिता आहे. पती माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठे आहेत. आम्हाला एक मुलगा असून तो ज्युनिअर केजीत आहे. घरात सर्वकाही ठीक आहे. पण मुख्य समस्या पतीची आहे. वेळ मिळताच ते मोबाइलमध्ये फेसबुक, ट्विटरमध्येच हरवून जातात. रात्री उशिरापर्यंत असेच चालते. याचा माझ्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत आहे. ते महिनाभर सेक्स संबंध ठेवत नाहीत. मी पुढाकार घेतल्यावर तयार होतात, पण पहिल्यासारखे नाहीत. मोबाइलमुळे आमच्यात अनेकदा भांडणही झाले. कृपया सांगा, मी काय करू?

सोशल नेटर्वकिंग साईट्समुळे नाती आणि भावनांना तडा जात आहे. याचा परिणाम सेक्स संबंधावरही होत आहे. तरुणाई सेक्स लाईफ केवळ यामुळेच खराब करतात. तरीही हे थांबायचे नाव घेत नाही, उलट अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ब्रिटनमध्ये केलेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, तेथे १६-४४ वर्षांचे लोक महिन्यातून पाचपेक्षाही कमी वेळा सेक्स करतात. सोशल नेटर्वकिंग साईट्स, आर्थिक चणचण आणि तणाव हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे.

सध्या तुम्हाला संयमाने वागवे लागेल. पतीची ही सवय सोडवण्यासाठी त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. सोबत फिरायला जा, सिनेमा बघा, बाहेर जेवायला जा, सकाळ-संध्याकाळ सोबत फिरा आणि वेगवेगळया विषयांवर चर्चा करा. एकांतपणी त्यांच्या आवडीचा ड्रेस घाला आणि सोबतच संसारातील वेगवेगळया जबाबदारींची जाणीव त्यांना हसतखेळत करुन द्या.

तुम्ही अशा प्रकारे वागू लागल्यानंतर पती आपोआपच मोबाइल सोडून तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल.

मी २७ वर्षीय तरुण असून एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. मी स्वत:च माझ्यासाठी समस्या बनलो आहे. कारण, मला कधीच कोणती मुलगी आवडली नाही किंवा मी आतापर्यंत एखाद्या तरुणीशी सेक्स संबंध ठेवलेला नाही. मात्र, एका मुलासोबत माझी मैत्री आहे आणि आम्ही गेली ३ वर्षे एकत्र राहत आहोत. आईवडिलांना माझे लग्न लावून द्यायचे आहे, पण मला एखाद्या मुलीचे जीवन उद्भवस्त करायचे नाही. सांगा, मी काय करू?

असे वाटते की तुम्ही होमो सेक्सुअल आहात. मानसोपचारतज्ज्ञांचे असे मत आहे की, समालिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटण्यामागील एक कारण म्हणजे आपलेपणाचा अभाव, हे असू शकते.

खरंतर कुटुंबात दु:खी असणारे किंवा एखाद्या अन्य कारणामुळे त्रस्त असताना कुणीतरी आधार दिल्यास ती व्यक्ती त्यांना जवळची वाटू लागते.

संशोधनानुसार, समलिंगी सेक्सबाबत आकर्षणाचे कारण हार्मोन्सचे असंतुलन हेदेखील असू शकते. हे वंशपरंपरागत असते किंवा मग अन्य प्रभावांमुळेदेखील असे होऊ शकते.

त्यासाठी तुम्ही एखाद्या सेक्सुअल काऊन्सिलरची भेट घ्या. आवश्यकता भासल्यास मेडिकल चेकअप करा. तरच खरं कारण समजू शकेल.

तुम्हाला तुमचे आयुष्य कोणासोबत आणि कसे व्यतित करायचे आहे, याचा निर्णय तुम्ही स्वत: घ्या.

पाहायला गेल्यास आपल्या समाजात अशा नात्यांना स्वीकारले जात नाही, पण आता सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करून समलैंगिक व्यक्तींना त्यांचा हक्क बहाल केला आहे.

आरोग्य परामर्श

– डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी १६ वर्षांची तरुणी आहे. माझे नाक खूप रुंद आहे. ते चेहऱ्याला शोभत नाही. अशी काही सोपी युक्ती आहे का, ज्यामुळे माझे नाक आकाराने छोटे, पातळ आणि सुंदर दिसेल?

उत्तर : नाकाच्या सौंदर्यात सुधारणा करण्यासाठी एखाद्या सोप्या घरगुती उपायाचा प्रश्न आहे, तर विश्वास ठेवा अजूनपर्यंत असा कोणताही व्यायाम, मालीश, तेल किंवा क्रीम बनलेली नाही, जी आपली इच्छा पूर्ण करू शकेल. जर आपण या समस्येमुळे जास्त त्रस्त असाल, तर त्यासाठी एक व्यावहारिक उपाय आहे.

आपल्या समस्येबाबत आपण आईवडिलांसोबत कॉस्मॅटिक प्लास्टिक सर्जन किंवा ईएनटी सर्जनला भेटावे, जे नाक सुंदर बनवण्यासाठी राईनोप्लास्टी ऑपरेशन करतील. ऑपरेशनमुळे होऊ शकणाऱ्या सुधारणांबाबत सविस्तर जाणून घ्या. ऑपरेशनच्या वेळी येऊ शकणाऱ्या समस्यांबाबत प्रश्न विचारा. आरोग्य लाभ आणि सामान्य होण्यास किती वेळ लागेल, हे जाणून घ्या. ऑपरेशन आणि उपचारावर किती खर्च येईल इ. गोष्टी जाणून ऑपरेशनचा निर्णय घ्या.

पण हो, जर तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला असेल, तर आपण हे ऑपरेशन आपला शारीरिक विकास पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच १८-१९ वर्षांच्या वयानंतरच करणे योग्य ठरेल.

प्रश्न : मी २२ वर्षांची नवतरुणी आहे. माझे ब्रेस्ट खूप छोटे आहेत आणि पाळीही दर महिन्याला येत नाही. डॉक्टरने तपासणी करून सांगितले की माझ्या ओवरिजला सूज आणि गाठी आहेत. औषध घेतल्यानंतर सूज आणि गाठी बऱ्या झाल्या, पण पाळी अजूनही वेळेवर येत नाही. तसेच ब्रेस्टचाही पुढे विकास झाला नाहीए. मी काय करू?

उत्तर : आपल्या पत्रावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की आपल्या शरीरात एक तर सेक्स हार्मोन्स नीट बनत नाहीत किंवा मग त्यांच्या प्रमाणात काहीतरी कमतरता आहे. याच केमिकल समस्येमुळे आपली पाळी वेळेवर येत नाहीए आणि आपल्या ब्रेस्टचा विकासही अर्धवट झाला आहे.

सेक्स हार्मोन्सची ही कमतरता अनेक पातळांवर उत्पन्न होते. मेंदूतील हायपोथॅलेमस ग्लँड, पीयूष ग्रंथी आणि ओव्हरीजमध्ये आपसातील ताळमेळ बिघडणे, तिन्हीपैकी एखाद्या गोष्टीचा रुग्ण होणे किंवा ओव्हरिज सुरुवातीलाच योग्य विकसित न झाल्याने ही समस्या निर्माण होते. परिणामी एका बाजूला ओव्हरिजमधून दर महिन्याला एक अंडे बाहेर येण्याच्या सामान्य प्रक्रियेत बाधा निर्माण होते, तर दुसऱ्या बाजूला एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स निर्मितीमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे स्त्री शरीराची नैसर्गिक जननांगीय लय बिघडते. साहजिकच ना वेळेवर पाळी येते, ना ब्रेस्टचा विकास योग्य प्रकारे होतो.

एखाद्या कुशल स्त्रीरोग तज्ज्ञाकडून आपण आपल्या सर्व टेस्ट करून घेणे उत्तम ठरेल. पेल्विक अल्ट्रासाउंड, हार्मोन टेस्ट आणि इतर गरजेनुसार दिलेल्या टेस्टचा रिपोर्ट पाहून, हा निर्णय घेता येऊ शकेल की समस्या कोणत्या पातळीवर आणि कोणत्या प्रकारची आहे. त्यानुसार डॉक्टर पुढे उपचाराचे मार्ग निश्चित करू शकतात. आपण आपल्या डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलणे आणि समस्येचे मूळ जाणून घेणेही आवश्यक आहे. ही माहिती आपल्याला आपल्या जीवनाचे लक्ष्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण सिध्द होऊ शकते.

प्रश्न : मी ३९ वर्षांचा विवाहित पुरुष आहे. दिर्घ काळापासून एका मोठ्या समस्येतून जात आहे. जेव्हा मी पत्नीसोबत शारीरिक मिलन करतो, तेव्हा लवकर स्खलित होतो. या समस्येतून सुटण्यासाठी नेहमी मिलनापूर्वी १ पेग वाइन घेतो आणि लैंगिक संबंध बनवताना कंडोमचा वापर करतो, कंडोम वापरल्यामुळे पत्नीला समाधान मिळत नाही. एखादा व्यावहारिक उपाय सांगा, ज्यामुळे माझी या समस्येतून सुटका होईल.

उत्तर : आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या समस्येने ग्रस्त आहात. ही पुरुषांमध्ये आढळून येणारी सामान्य समस्या आहे. याचा संबंध जास्त करून आपल्या मानसिक अवस्थेशी जोडलेला असतो. वाइन घेतल्यानंतर व कंडोमचा वापर केल्यानंतर, जर आपण लैंगिक क्रीडा दीर्घकाळ करण्यास समर्थ ठरता, तर आपल्यात काही शारीरिक कमतरता नाही, हे सिध्द होते. खरे तर हे दोन्ही उपाय लैंगिक सेंसेशन मंद करतात, ज्यामुळे आपल्याला फायदा झाल्याचा अनुभव येतो.

पण डॉक्टरांच्या दृष्टीने पाहिले तर दोन्हीपैकी कोणताही उपाय समस्येतून सुटका करून देण्यात योग्य ठरवता येणार नाही. समस्येतून सुटका करून घेण्यासाठी तर आपण एखाद्या युरोलॉजिस्ट किंवा मग रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन स्पेशालिस्टला भेटून योग्य औषध घेऊ शकता. यापेक्षाही उत्तम उपाय हा आहे की आपण एखाद्या सेक्सुअल थेरपिस्टच्या निगराणीखाली कीगल एक्सरसाइज शिकू शकता. त्यामुळे योनीच्या पेशी आधीपेक्षा जास्त मजबूत होतात. या सोप्या व्यायामाचे अनेक फायदे असतात, त्यामध्ये प्रीमॅच्योर इजॅक्युलेशनपासून सुटका होणे हाही आहे.

हा लाभ घेण्यासाठी कीगल एक्सरसाइज नियमित करावी लागते. अभ्यासातून हे आढळून आले आहे की २ ते ६ महिन्यापर्यंत सतत कीगल एक्सरसाइज करत राहिल्याने ५० टक्क्यांपेक्षा जास्त पुरुष प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या समस्येतून सुटका मिळविण्यात यशस्वी होतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें