भारतीय भयपट आणि थरारपटांच्या विश्वात दिग्दर्शक विशाल फुरियाने गेल्या दशकभरात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीत 'लपाछपी' या भयपटाने प्रवास सुरू करणाऱ्या विशालने बॉलिवूडमध्ये 'छोरी' आणि 'फॉरेन्सिक'सारख्या दमदार चित्रपटांद्वारे आपली ओळख निर्माण केली. आता तो 'छोरी 2' घेऊन परतला आहे. नुशरत भरुचा आणि सोहा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या भयपट प्रकाराला एक नवे वळण देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

विशाल यांचे भयपटप्रेम लहानपणापासूनच रुजले आहे. त्याला या शैलीची भीती वाटायची, पण हळूहळू त्याचाच मोह वाढत गेला. त्याच्या मते, 'ए नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट' हा पहिलाच चित्रपट होता, ज्याने त्याला चांगलेच हादरवले. “फ्रेडी या पात्राने मला एवढं घाबरवलं की तो स्वप्नात अडकवेल या भीतीने मी झोपायलाच तयार नव्हतो!” तो आठवतो.

'छोरी 2' मध्ये साक्षी (नुशरत भरुचा) ही आता एका 7 वर्षांच्या मुलीची आई आहे. पण जेव्हा तिच्या मुलीचे अपहरण होऊन तिला त्या जुन्या शेतात नेले जाते, तेव्हा ती पुन्हा एका भयावह जगात सापडते. विशालने या चित्रपटात अशा वातावरणाची निर्मिती केली आहे, जी प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपटभर अस्वस्थ ठेवेल—गुंतागुंतीच्या बोगद्यांपासून, विहिरींपर्यंत आणि जुन्या पडक्या घरांपर्यंत!

 

बॉलिवूडमध्ये भयपट हा बहुतांश वेळा अतिरंजित आणि ठराविक फॉर्म्युल्यांमध्ये अडकलेला राहिला आहे. त्यामुळे या प्रकाराला फारसा दर्जा मिळाला नाही. मात्र, टिम बर्टन, गिलेरमो डेल टोरो, जॉर्डन पील, ताकाशी मिके, एम. नाईट श्यामलन आणि एरी एस्टर यांसारख्या जागतिक दिग्दर्शकांपासून प्रेरणा घेणाऱ्या विशालला हा प्रकार पुन्हा प्रतिष्ठित करायचा आहे. “बॉलिवूडमधला भयपट हा जास्त करून मसालेदार आणि बी-ग्रेड टॅग असलेला राहिला आहे. मी भारतीय भयपटाला क्लासिक हॉररच्या दर्जावर नेण्याचा प्रयत्न करतो आहे. या प्रकारात प्रेक्षकांना भीती, थरार, रक्तपात, तसेच सहानुभूती आणि प्रेमाची जाणीव करून देण्याची ताकद आहे,” असे तो सांगतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...