* सोमा घोष

अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं 'ग्रे' नामक एक रहस्यमय थरारक चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला असून त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाददेखील मिळत आहे.

दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' चित्रपटात वैभव 'सिद्धांत' नामक एका युवकाची भूमिका साकारत आहे. 'ग्रे' ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बादल्याच्या बदल्याची कथा आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार आपणांस ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.

Red Bulb Movies आणि का का Kindle Entertainment निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला Zee5 प्रीमियर वर आपल्या भेटीस येणार आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...