वर्क फ्रॉम होमचे फायदे आणि नुकसान

* श्रीप्रकाश

वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून नोकरी करणे. कोरोना काळात वर्क फ्रॉम होमचाच पर्याय अनेक आय टी कंपन्या तसेच अनेक क्षेत्रातील कार्यालयांनी अवलंबला होता. हो, काही कामे अशी असतात की जी घरी बसून केली जाऊ शकतात. तुम्ही जगात कुठेही असा, इंटरनेट आणि वायफायच्या मदतीने ही कामे सहजी पार पाडता येतात. यामुळे काम देणाऱ्या आणि काम करणाऱ्या अशा दोघांचा फायदा आहे. विशेषकरून अशा माता किंवा पिता वा दोघांसाठी जे आपल्या मुलांवर जास्त लक्ष्य देऊ इच्छितात. आधी ही व्यवस्था पश्चिमी विकसित देशांपर्यंतच मर्यादित होती. पण आता आपल्या देशात इंटरनेट आणि वायफायच्या विस्तारामुळे वर्क फ्रॉम होम येथही सहज साध्य आहे.

कोणती कामे घरी बसून शक्य

माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कार्य घरून इंटरनेट आणि वायफायने केले जाऊ शकते. उदाहरणार्थ :

वर्चुअल असिस्टेंट

वर्चुअल असिस्टेंटची आपली कंपनी घरून चालवू शकता किंवा एखाद्या अशा कंपनीसाठी जी आपल्याला दुसऱ्या कंपनीसाठी किंवा क्लाइंटसाठी काम देईल. छोटे व्यावसायिक जे पर्मनंट कर्मचारी ठेवण्यास असमर्थ आहेत, त्यांना अशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते, जे त्यांच्यासाठी घरून काम करू शकतील.

मेडिकल टंरास्क्रिप्ट

डॉक्टरांचे बोलणे ऐकून त्यांचे उपचार, सूचना आणि औषधांसंबंधित बाबी कंप्युटरवर टाईप कराव्या लागतात. डॉक्टर दुसऱ्या देशाचेही असू शकतात. त्यांचे उच्चारण व्यवस्थित समजून घ्यावे लागतात.

अनुवादक

जर आपण एकापेक्षा अधिक बहुप्रचलित आंतरराष्ट्रीय भाषा जाणत असाल तर जगात अशा बऱ्याच कंपन्या आहेत, ज्या आपल्या देशात बसलेल्या आपल्या ऑडिओ फाईल्स किंवा डॉक्युमेंट्स एखाद्या दुसऱ्या भाषेत अनुवादित करू इच्छित असतील.

वेब डिझाइनर

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळयात जास्त वर्क फ्रॉम होमच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात वर्चुअल असिस्टेंट, वेब डेव्हलपर किंवा डिझाइनर, नवीन कस्टम वेब डिझाइन किंवा त्यांच्या वेबमध्ये बदल, सुधार किंवा अपडेटिंगची गरज पडत असते.

कॉल सेंटर प्रतिनिधी

यातही बऱ्याच संधी आहेत. जेव्हा कधी आपण एखाद्या मोठया कंपनीत कुठले सामान किंवा सेवेची ऑर्डर देत असतो, त्यावेळी दुसऱ्या बाजूने आपले बोलणे ऐकणारा कोण्या मोठया कॉल सेंटरमध्ये नसून त्यांचा कोणी प्रतिनिधी असू शकतो, जो घरूनच काम करत असतो.

सहाय्यक तांत्रिक तज्ज्ञ

कॉल सेंटरला आपले कंप्युटर्स व इतर उपकरणांची देखभाल किंवा त्यांची दुरूस्ती वा आधुनिकिकरणासाठी तांत्रिकी मदतीची गरज असते. याचे निराकरण कधी घरी बसून केले जाऊ शकते. तर कधी ऑनसाईट जावे लागते. जर आपण कंप्युटर, इंटरनेट, मोडेम, वायफ्राय इत्यादींचे माहितगार असाल तर हे काम आपण करू शकता.

ट्रॅव्हल एजेंट

जर आपणास या व्यवसायाची माहिती असेल तर आपण पाहिजे असल्यास हे काम घरून करू शकता.

शिक्षणाचं कार्य

सध्या कोरोनामुळे तुम्ही अनुभवलेच असेल की अनेक शाळांनी ऑनलाइन एज्यूकेशन सुरू केले. त्यामुळे शिक्षकांना आपले कार्य घरातूनच करावे लागत आहे. स्कूल आणि कॉलेजमध्ये असे विद्यार्थीही आहेत, ज्यांना कोच किंवा ट्यूटरची गरज असते. आजकाल तर डिस्टेंस एज्युकेशन किंवा कोरस्पोंडेंस कोर्सचे बरेच चलन चालू आहे, ज्यामुळे या क्षेत्रातही वर्क फ्रॉम होमच्या बऱ्याच संधी आहेत.

लेखक किंवा संपादक

लिहिणे, संपादन किंवा प्रुफरिडींगचे काम विशेषकरून वेबसाठी घरून करू शकतात. जर लिहिण्याची माहिती नसेलही तरी ब्लॉगस्फेयर जॉईन करू शकता. यात मजा ही आहे आणि पैसा ही. दुसऱ्यांच्या ब्लॉगसाइटवर लिहूनही कमाई केली जाऊ शकते.

फ्रेंचाईजी

जर बिझनेसची काही मूलभूत माहिती असेल आणि काही रक्कम गुंतवू शकत असाल तर एखाद्या कंपनी किंवा शिक्षण संस्थेची फ्रेंचाइजी घेऊन घरातून हे काम करू शकता.

बुद्धिबळाचा कोच

जर चेस जाणत असाल तर कंप्युटर आणि इंटरनेटवर स्काइपने घरी बसून मुलांना चेस शिकवू शकता. परदेशात राहणारी अनेक भारतीय मुले चेसची कोचिंग घेऊ इच्छितात. यासाठी प्रति तास चांगली रक्कम मिळते.

वर्क फ्रॉम होमचे फायदे

* आपण मुलांना आणि कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकता, विशेषकरून जेव्हा मुलं लहान असतील तेव्हा हे जास्तफायदेशीर ठरते.

* हा सेवानिवृत्त व्यक्तिंसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत आहे.

* अशा महिला ज्यांच्या पतींच्या बदल्या होत असतात, त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम चांगला पर्याय आहे.

* दिव्यांग त्यांच्या सोयीनुसार आणि क्षमतानुसार घरून काम करू शकतात.

* आपल्याला सकाळी-सकाळी उठून तयार होऊन निश्चित वेळेस ट्रेन किंवा बसने किवा स्वत: ड्राइव्ह करून ऑफिसला जायची गरज नाही. महिलांसाठी वर्क फ्रॉम होम अजून जास्त फायदेशीर आहे. त्यांना रोज मेकअप करायची गरज भासणार नाही. वार्डरोबमध्ये कमी कपडे असून देखील काम भागेल.

* आपण आपल्या कामातून ब्रेक घेऊन घराची इतर कामेही करू शकता.

* जर आपण स्वत: शिस्तबद्ध असाल आणि कुटुंबातील इतर सदस्य आपल्या कामाचे महत्व जाणून असतील, तर आपण हे करू शकतात.

* आपण आपल्या घरचे भोजन खाता. बाहेर काम करताना नेहमी कँटीन किंवा रेस्टारेंटमध्ये खावे लागते, ज्यावर खर्च होत असतो. वर्क फ्रॉम होम केल्याने पैशाच्या बचतीबरोबरच घराचे आरोग्यवर्धक भोजनही मिळते.

* ऑफिस भाडे आणि कर्मचाऱ्यांवर होणारे व इतर खर्च लाईट, एयर कंडिशनर, वाहन भत्ता, दुर्घटना विमा इत्यादींची बचत होते.

* घरातून काम करणाऱ्या उपकरणांवर होणाऱ्या खर्चावर आय करातून सूट घेऊ शकता.

* ऋतुमानाचा त्रास सहन करावा लागत नाही. पाऊस, उन्हाळा किंवा हिवाळा यांचा सामना करावा लागत नाही.

वर्क फ्रॉम होमचे नुकसान

परंतू वर्क फ्रॉम होमचे काही नुकसानही आहेत :

* आपण इतरांशी पुरेसे आणि थेट संवाद साधण्यापासून वंचित राहता.

* टीव्ही, किचन आणि गृहिणी आपले लक्ष्य कामावरून विचलित करू शकतात.

* आपल्या व्यावसायिक पद्धती आणि कौशल्ये योग्यरित्या विकसित होत नाहीत.

* जर आपण वर्क फ्रॉम होममध्ये शिस्तबद्ध राहून काम करत नसाल तर त्यामुळे आपण जास्त सुखासीन होऊ शकता.

* ऑफिसमध्ये काम करताना तेथे कंप्युटर वगैरेमध्ये काही बिगाड झाल्यास लगेच सपोर्ट मिळून जातो, पण वर्क फ्रॉम होममध्ये तसे शक्य नसते.

* स्पर्धेच्या भावनेची कमतरता असते. कुठल्याही व्यवसायात उत्तम प्रदर्शनासाठी स्पर्धा चांगली असते.

* कधी-कधी बॉस हेही समजू शकतो की आपल्याशी घरी कुठल्याही वेळेला संपर्क केला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला नको असलेल्या वेळेला पण बॉसच्या सूचना ऐकाव्या लागतात.

* एकटेपणाचा अनुभव होतो. ऑफिसमध्ये काम करताना सहकाऱ्यांशी काही व्यक्तिगत चर्चा होत असते पण वर्क फ्रॉम होममध्ये हे शक्य नसते.

* आपण आपल्या शैलीनुसार काम करत असता. आपल्याला आपल्या वरिष्ठांकडून काही शिकण्याची संधी मिळत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें