विणकामाची कला का म्हणावे अलविदा

* संगीता सेठी

एक काळ असा होता जेव्हा भरतकाम आणि विणकाम महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. जेवण करून झाल्यावर महिला दुपारी स्वेटर विणायला बसायच्या. गप्पा तर व्हायच्याच सोबत एकमेकींकडून डिझाइन्सची देवाणघेवाणही व्हायची. त्यावेळी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वेटर विणणे हे प्रत्येक महिलेसाठी आवडते मनोरंजन होते. त्यावेळी टीव्ही, व्हॉट्सअप, इंटरनेट, फेसबूक यापैकी काहीही नव्हते.

तंत्रज्ञानाचा समाजाच्या इतर पैलूंप्रमाणेच विणकामावरही परिणाम झाला आहे, या सगळयामुळे नकळत आजच्या तरुण पिढीने विणकाम कलेचा निरोप घेतला आहे. ‘हाताने विणलेले स्वेटर कोण घालते?’ किंवा ‘ही एक जुनी पद्धत आहे’ यासारख्या वाक्यांनी महिलांना हाताने विणलेल्या स्वेटरच्या कलेपासून दूर केले आहे, पण या सर्व विधानांना न जुमानता मी माझी विणकामाची आवड सोडली नाही. ही कला जुन्या पद्धतीची समजणाऱ्या जगापासून लपवून विणकाम करत राहिले. कधी चार भिंतींच्या आत तर कधी रात्रीच्या अंधारात स्वेटरच्या नवनवीन डिझाईन्स शोधत राहिले.

परदेशात क्रे विणकामाची

माझ्या जर्मनीच्या प्रवासादरम्यान जेव्हा मी विमानात एका जर्मन महिलेला चकचकीत रंगाचे हातमोजे विणताना पाहिले आणि त्यानंतर मी मेट्रो ट्रेनमध्ये काही महिला विणकाम करताना पाहिल्या तेव्हा मला आश्चर्य वाटले. तिथल्या एका दुकानात जायची संधी मिळाली तेव्हा लोकांना हाताने बनवलेले स्वेटर घालण्याची किती आवड आहे, हे मी पाहिले.

दुकानात ठेवलेल्या पुस्तकांमधून लोक स्वेटरच्या डिझाइन्स शोधून तेथील महिलांना ऑर्डर देत होते. ते त्यांच्या स्वेटरसाठी तेथे ठेवलेल्या सामनातून बटणे, लेस आणि मणी निवडतानाही दिसले. मला हे समजल्यावर आनंद झाला की, इथल्या भौतिकवादी देशातही लोक हाताने बनवलेल्या वस्तूंकडे आकर्षित होतात.

नुकतीच मी अमेरिकेला गेले होते, तेव्हा विणकामाच्या दुकानांना भेट देणे हे माझ्या दौऱ्यात समाविष्ट होते. बोस्टन शहरातील ब्रॉड वे रस्त्यावर एक दुकान आहे ज्याचे नाव ‘गेदर हेअर’ आहे. मला ते त्याच्या नावाप्रमाणेच भासले. आतील दृश्य केवळ कलात्मकच नव्हते तर गेदर हेअरसारखे होते. एका मोठया गोल टेबलाभोवती आठ महिला विणकामाच्या काठया घेऊन जमल्या होत्या. प्रत्येकीच्या हातात काठया होत्या आणि प्रत्येकजण शिकण्याच्या उद्देशाने आली होती.

सोफियाने सांगितले की ती तिच्या भावासाठी टोपी विणत होती. लारा तिच्या मुलासाठी मोजे विणत होती. त्या महिलांमध्ये एक माय-लेकीची जोडीही आली होती. त्यांच्याशी संवाद साधल्यावर समजले की, दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आणि चौथ्या गुरुवारी ते इथे जमतात. येथे ते एकमेकांकडून डिझाईन शिकतात आणि त्यांच्या कलेला विकसित करतात.

कोवळया सूर्यप्रकाशात विणकाम

त्याच हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यात, दोन पुरुष आणि एक महिला बसली होती, ते त्यांनी तयार केलेल्या स्वेटरचे बटण लावत होते. एका कोपऱ्यात चहा, कॉफी आणि नाश्त्याचे सामान होते, जे फक्त त्या महिलांसाठीच होते. लोकर, विणकामाच्या सुया, क्रोकेट (धागा), बटणे आणि तयार वस्तूंचे सुंदर प्रदर्शन यासह अनेक कच्च्या मालाने हे दुकान सुंदरपणे सजवले होते. हे सर्व पाहून मला आश्चर्य वाटले. मला माझ्या देशात घालवलेले ते दिवस आठवले जेव्हा मी माझ्या आजी, काकू आणि काकांना त्यांच्या घराच्या अंगणात कोवळया उन्हात बसून हे सर्व करताना पाहिले होते.

पण आता ही सर्व सुंदर दृश्ये माझ्या देशातून हरवत आहेत. मुली आणि महिलांच्या हातात मोबाईल किंवा कानात स्पीकर असतो. नेट वापरणाऱ्या मुलींना नेटवर सर्फिंग केल्यास हाताने बनवलेल्या वस्तूंचा खजिना सापडतो आणि त्या बनवण्याची कलाही शिकता येते हे माहीत नसते. मुळात विणकामासारख्या कलांमुळे तुम्हाला कंटाळा येत नाही आणि तो तुम्हाला एकटेपणा जाणवू देत नाही. तुमच्या मनाचा समतोल राखण्यासाठीही या कला खूप प्रभावी ठरतात.

परदेशात अती नैराश्य आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांनी दिलेल्या यादीत औषधांसोबत ‘विणकाम’ही लिहिलेले असते, म्हणजेच विणकाम केल्यास तुमचा बीपी नियंत्रित राहील, असा सल्ला डॉक्टर देतात.

भौतिक सुखसोयींनी संपन्न असलेल्या अमेरिकेसारख्या देशात लोक आजही विणकामाची कला सुंदरपणे जोपासतात. बोस्टनमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाच्या विद्यापिठात एक खोली आहे, जिथे लोकरीचे शिलाई मशीन, क्रोकेट (धागे,), सुया आणि बेल्ट बटणे सर्व ठेवलेले आहे. जेव्हा  विद्यार्थ्यांनां अभ्यासाचा कंटाळा येतो तेव्हा ते या खोलीत येऊन त्यांची आवडती सर्जनशीलता जोपासू शकतात आणि मन प्रसन्न करू शकतात.

माझी मुलगी, जी बॉस्टनमध्ये एमआयटीमध्ये शिकत आहे, ती मला एकदा खूप उत्साहाने म्हणाली, ‘‘आई, मी एका परिसंवादात थोडी लवकर पोहोचले आणि पाहिले की व्याख्यान देणारी प्राध्यापिका विणकाम करत होती. कदाचित ती ते स्वत:ला प्रोत्साहित करण्यासाठी करत असेल. आई, त्यावेळी मला तुझी खूप आठवण आली.’’

एक सुखद भावना

विणकाम आता आपल्या देशात धोक्यात येऊ लागले आहे. ते केवळ डिझायनिंगच्या अभ्यासक्रमांपुरते मर्यादित राहिले आहे, जे त्यांची सेवा यंत्राद्वारे देत आहेत. मोठा स्वेटर किंवा जर्सी नको, पण निदान टोपी आणि मोजे असे काहीतरी लहान विणा. माझी आई एकदा खूप आजारी पडली. तिला अंथरुणावरून उठणे कठीण झाले होते. मी लोकर आणि विणकामाच्या सुया आणून तिच्यासमोर ठेवल्या.

आईने मोज्यांच्या अनेक जोडया विणल्या. मग जो कोणी तिच्या प्रकृतीची विचारपूस करायला यायचे त्यांना ती एक जोडी मोजे भेट म्हणून द्यायची. आईच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि भेटवस्तू घेणाऱ्या व्यक्तीचा आनंद पाहण्यासारखा होता. या उपक्रमात आई तिच्या आजारपणाचे दु:ख विसरायची. विणकामाचा आनंद वेगळाच असतो. या हिवाळयात एकदा विणकाम करून तर पाहा.

विणकाम अशा प्रकारे बनवा स्टायलिश

* गरिमा पंकज

हाताने केलेल्या विणकामाचा हंगाम नव्याने आला आहे. ज्यांना याची आवड आहे ते वेळात वेळ काढून आपल्या प्रियजनांसाठी हिवाळयात सुंदर भेटवस्तू म्हणजे हाताने विणलेले स्वेटर नक्कीच बनवतात. आजकाल तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. सोबतच विणकाम इत्यादी जुन्या कलाही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, पण जर तुम्हाला विणकामाची आवड असेल तर हा छंद तुमच्या मानसिक आरोग्यासाठी वरदान ठरू शकतो. त्यासाठी त्यात सातत्य ठेवा आणि त्याचा प्रचार करत रहा.

जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट विणण्याची इच्छा होते तेव्हा आजच्या फॅशन ट्रेंडबद्दल जागरुक असणे खूप गरजेचे ठरते. तुम्ही जे काही विणकाम कराल ते फॅशन ट्रेंडमध्ये असेल, तरच सर्वांच्या नजरा त्यावर खिळतील आणि तुमची मेहनतही फळाला येईल, कारण आजकाल अबालवृद्ध सर्वांनाच स्टायलिश आणि स्मार्ट दिसायचे असते. चला, जाणून घेऊया, विनकामात सध्या कोणता नवीन ट्रेंड आहे :

महिलांसाठी

सेल्फ-पॅटर्नचे हुडेड स्वेटर ट्रेंडमध्ये आहेत. नोकरदार महिलांसोबत महाविद्यालयात जाणारी तरुणाईही अशा डिझाइन्सचे स्वेटर पसंत करतात.

डिटेचेबल डिझाईन्स असलेले संपूर्ण बाह्यांचे स्वेटर्सही आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. मुलींसोबत मुलांनाही ते खूप आवडतात. यातील पुढचा भाग रॉयल निळा, मरून, गडद राखाडी किंवा जांभळा इत्यादी गडद छटांमध्ये विणलेला असतो आणि स्लीव्हजसोबत हुडीज मल्टीकलर कॉम्बिनेशन असते. मुलगा आणि मुलीनुसार रंगाची निवड केली जाऊ शकते.

गोल गळयाचे कधीही वापरता येणारे पुलोवर

मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल प्रत्येकाची पहिली पसंती गोल आकाराचा गळा असलेले स्वेटर असते. हिवाळयात ते खूपच आरामदायक ठरतात. विणण्यासाठी फारसा वेळही लागत नाही. प्रिंटेड लोकर किंवा आवडीचा रंग, डिझाईनचा वापर करून तुम्ही ते पुढून बंद करू शकता किंवा गळा उघडाही ठेवू शकता. याच्यावर जाकीट खुलून दिसते.

मुलांसाठी

कॉलर नसलेला स्वेटर कोट हा गळा व्यवस्थित आकारात कापून डबल बॉर्डरने विणला जातो. तो किशोरवयीन मुलांना खूपच छान दिसतो. तो मिश्र रंगातही विणता येतो.

सदाबहार स्वेटर कोट

स्वेटर कोटचा ट्रेंड कायम असतो, फक्त त्याच्या आकारात बदल होत राहतो. विणकामाची आवड असणारे कल्पकतेचा वापर करून हा स्वेटर अतिशय सुंदर डिझाईनमध्ये तयार करू शकतात.

कॉलर नसलेला गोल आकार : थोडासा छोटा गळा बनवून किंवा गळयाकडे हलकेसे कापून गळयाचा आकार बनवा. मुलांसाठी पार्टी किंवा अन्य कार्यक्रमात हा कोट ब्लेझरसोबत घातल्यास खूपच सुंदर दिसतो. पुरुषांसाठी लोकर निवडताना निळा, सौम्य आकाशी, काळा इत्यादी रंग तुम्ही निवडू शकता.

मुलींसाठी : लाल, गुलाबी, गडद मरून, पिवळा, मजेंडा, सौम्य भगवा इत्यादी रंगाच्या लोकरीचा वापर करून पुढून काहीसा उघडा, गोल गळयाचा स्वेटर कोट विणता येतो. कमी थंडीत बिनाबाह्यांचा स्वेटर कोटही चांगला दिसतो. त्याला तुम्ही पुढून बंद करून आणि दोन किंवा एक मॅचिंग पाकीट बनवून अधिक आकर्षक बनवू शकता.

गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट आणि मॅचिंग बूटसोबत तो फारच सुंदर दिसतो.

कॉलर नसलेल्या गोल आकाराच्या स्वेटरसोबतच लांबलचक श्रग आणि मॅचिंग स्कार्प मुलींसाठी खूपच ट्रेंडमध्ये आहेत.

प्रौढ किंवा वृद्ध महिलांसाठी स्वेटर कोट खूपच उत्तम ठरतात. ते थंडीपासून रक्षण करतात, सोबतच दिसायलाही आकर्षक असतात. लांबलचक कोट कार्डिगन कमरेपासून गुडघ्यांपर्यंत ऊबदारपणा देतात.

सदाबहार टोपी आणि स्कार्फ

हे पटकन विणून होतात. विविधरंगी लोकरींपासून ते बनवता येतात. थंडीत ते ट्रेंडमध्ये असतात. विविद्य रंग आणि आकारांच्या कॅप आणि स्कार्फने मुलींचा वॉर्डरोब भरलेला असतो. मोठया लोकरीच्या टोप्याही ट्रेंडमध्ये आहेत, ज्या पटकन विणून होतात.

अशा प्रकारे तुम्ही हिवाळयातही स्मार्ट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसू शकता. त्यासाठी फॅशन ट्रेंड आणि आपला बांधा लक्षात घेऊन कपडयांची निवड करा. त्यामुळे थंडीपासून रक्षण होईल, सोबतच तुम्ही ट्रेंडी आणि सुंदर दिसाल

अशा प्रकारे लोकरीच्या कपड्यांची काळजी घ्यावी

* पारुल भटनागर

आनंददायी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आपण बऱ्याचदा डोंगराळ ठिकाणीही जातो. परंतु या मजेच्या दरम्यान शरीरास थंडीपासून बचाव करण्यासाठी, आमचे जाकीट कोट, स्टाईलिश स्वेटर आणि स्टॉल्स खूप उपयुक्त ठरतात, कारण ते जसे शरीराला उबदार ठेवण्यासाठी कार्य करतात, तसेच ते स्टाईल स्टेटमेंट्सदेखील असतात.

अशा परिस्थितीत या नाजूक आणि महागडया लोकरीच्या कपडयांची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे जेणेकरून त्यांची चमक कायम राहील आणि वर्षानुवर्षे ते नवीन दिसतील.

वर्षानुवर्षे नव्यासारखे टिकवून ठेवण्यासाठी या टीपा अवलंबण्यास विसरू नका :

*  जेव्हा आपण लोकरीचे कपडे धुता तेव्हा त्यांच्यावर लिहिलेल्या सूचना नक्कीच वाचा. उदाहरणार्थ, जर एखाद्या गरम कपडयावर लिहिलेले असेल की फक्त ड्राईक्लीन तर आपण त्यास हातांनी धुण्याची चूक करू नये.

* धुतल्यानंतर लोकरीच्या कपडयांमधून जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी त्यास पिळण्याऐवजी टॉवेलने आरामात गुंडाळा. अशाने लवकर कापड कोरडे होते आणि त्याचे ढिले होण्याची भीती नसते.

* लोकरीच्या कपडयांवर परफ्यूम मारु नका, यामुळे त्यांच्यात अळी होण्याची भीती असते.

* प्रवासादरम्यान, लोकरीच्या कपडयांचा आकार कायम ठेवण्यासाठी आणि त्यांना संकुचित होण्यापासून वाचवण्यासाठी, कपडे हलके दुमडवा आणि त्यांना टिश्यू पेपरमध्ये लपेटा.

* नेहमीच सौम्य लिक्विड डिटर्जंट वापरा, कारण यामुळे त्यांचे खराब होण्याची आणि रंग कमी होण्याची शक्यता कमी असते.

* लोकरीचे कपडे नेहमी ब्रशने झटकत रहा. यामुळे त्यांच्यावर धूळमाती साचत नाही आणि ते बऱ्याच काळासाठी नवीन दिसतात.

* कपाटात, बॉक्समध्ये जिथे कोठेही आपण लोकरीचे कपडे ठेवता, त्यात कडुलिंबाची पाने, फिनाईल गोळया अवश्य घाला कारण त्यांचा सुगंध कीटकांना कपडयांपासून दूर ठेवतो.

* लोकरीच्या कपडयांना ड्रायर करणे टाळा.

* स्वेटरचे आयुष्यमान वाढविण्यासाठी, त्यास उलटे करून ठेवा.

* स्वेटरला कधीही खुंटीला टांगू नका, तर त्यास फोल्ड करून योग्य ठिकाणी ठेवा कारण टांगल्याने खेचून जाण्याची भीती असते, ज्यामुळे त्याचा आकार बदलू शकतो आणि त्याचा लुक खराब होऊ शकतो.

* दुर्गंधी रोखण्यासाठी लोकरीचे कपडे ओलसर भागापासून दूर ठेवा.

असे करावे संरक्षण उबदार कपड्यांचे

* डॉ. विभा खरे

उन्हाळयाचा हंगाम जवळजवळ आला आहे आणि उबदार कपडे परत कपाटात ठेवण्याची वेळ आली आहे. चला, आम्ही आपल्याला काही सूचना देऊ इच्छितो, त्यांचे अनुसरण आपल्या लोकरीच्या कपडयांचे आयुष्य वाढविण्यासाठी करा :

* पुरुषांचे उबदार सूट, मुलांचे पँट-कोट, गणवेश इ. ठेवण्यापूर्वी ते तपासा, ते फार घाणेरडे असतील तर ड्रायक्लीन करूनच त्यांना ठेवा. जर मागील वर्षीच मोठयांचे कपडे ड्रायक्लीन केले असतील तर यावर्षी हे न करतादेखील काम चालून जाईल.

* कपडयाच्या दोन्ही बाजूंना ब्रशने धूळ काढून टाकल्यानंतरच ते कपाटात ठेवा.

* एका मगाच्या ५०० मिली लीटर पाण्यात, १ मोठा चमचा अमोनियाचे द्रावण तयार करा. केमिस्टच्या दुकानात अमोनिया मिळेल. कोटच्या कॉलर, कफ आणि खिशाच्या वरच्या बाजूला अधिक घाण चिकटलेली असते. म्हणून, मऊ कापड किंवा स्पंजने पिळून घ्या आणि त्या भागावर अमोनियाचे द्र्रावण लावा. २-३ वेळा लावल्याने घाण दूर होते. जर अमोनिया मिळत नसेल तर आपण ३०० मिली पाण्यात १ मोठा चमचा स्पिरीट किंवा ब्रँडी मिळवूनदेखील ते स्वच्छ करू शकता. नंतर हे कपडे दिवसभर उन्हात हँगरवर लटकवा, जेणेकरून ते ओले राहणार नाहीत. ३ ते ४ दिवसात सर्व कपडे कपाटात ठेवण्यासाठी तयार होतील.

* प्रथम शालला चांगल्या प्रकारे झटकून धूळ काढा. नंतर हलक्या हाताने ब्रश करा. जर कापड गरम असेल तर केवळ त्यास झटकणे पुरेसे आहे. नंतर शालच्या दोन्ही बाजूंना अमोनियाचे द्रावण लावून धुऊन घ्या आणि ऊन दाखवा. जर अन्नाचे, गुळगुळीत डाग लागले असतील तर ड्रायक्लीन करणेच योग्य होईल. तसंच कार्डिगन, गरम ब्लाउज इत्यादी सौम्य साबणाने किंवा रिठयाच्या पाण्याने धुऊन सुकवून घ्या.

* मुलांचे तर प्रत्येक कपडे धुतलेले वा ड्रायक्लीन केलेले असावेत. लहान झालेले स्वेटर वगैरे बाजूला ठेवा. पावसाळयात आपल्याकडे अतिरिक्त वेळ असतो तेव्हा त्या वेळेत यांना उसवून काढून काहीतरी नवीन बनवा.

* ब्लँकेट आणि लहान कार्पेट यांनाही चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या आणि भरपूर सूर्यप्रकाश दाखवा. सुक्या तंबाखूची पाने बाजारातून उपलब्ध होतील. ती २०० ग्रॅम खरेदी करा. कडुनिंबाची पाने उपलब्ध असल्यास फांदीसहित उन्हात वाळवा आणि पाने काढून घ्या. नंतर त्यांना ब्लँकेट आणि कार्पेट्सवर पसरवा आणि मग त्यांना गुंडाळून ठेवा.

* आपण ज्या सूटकेस किंवा पेटीमध्ये कपडे ठेवणार आहात त्यासदेखील उन्हात ठेवा. सर्व प्रथम, तळाशी कडुलिंब किंवा तंबाखूची पाने पसरवा. जर पत्र्याची पेटी असेल तर तिच्या कोपऱ्यात पाने किंवा तंबाखू अवश्य ठेवा. त्यावर २-३ वर्तमानपत्रे पसरवा. वर्तमानपत्रातील शाई किडे येण्यास प्रतिबंध करते. त्यावर जुने मऊ कापड घालून कपडे ठेवण्यास प्रारंभ करा, एका व्यक्तिचे कपडे एकाच पेटीमध्ये किंवा पेटीच्या एकाच भागामध्ये ठेवा जेणेकरून आवश्यकता असल्यास ते सहज उपलब्ध होतील. प्रत्येक २-४ कपडयांनंतर फिनाईलच्या गोळया किंवा कडुलिंबाची पाने घाला. घरात धुतलेले किंवा घरी स्वच्छ केलेले लोकरीचे कपडे प्रत्येक ड्रायक्लीन केल्या गेलेल्या कपडयाच्या खाली-वरती ठेवा. ड्रायक्लीन करताना ते लोक कीटकनाशके वापरतात. त्याचा वास आपल्या इतर कपडयांना संरक्षण देईल. सगळयात शेवटी, एक जुना मऊ कापड पसरवा आणि बंद करा. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि नंतर (जून आणि ऑक्टोबरमध्ये), फक्त एकदा पेटीचे झाकण उघडून ऊन दाखवा. कपडे काढण्याची गरज नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें