महिला दिन विशेष

आश्मीन मुंजाल,  कॉस्मेटोलॉजिस्ट

*  गरिमा पंकज

आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतून २५ वर्षांपूर्वी आश्मीन मुंजाल यांनी ‘आश्मीन ग्रेस’ नावाचे पार्लर सुरू केले. हळूहळू महिलांना ते आवडू लागले आणि त्यामुळेच पार्लरचा विस्तार होत गेला आणि पहिल्या मजल्यावरील इतर खोल्यांमध्येही पार्लरचे काम सुरू झाले. ८ वर्षांनंतर प्रथमच साऊथ एक्सच्या कमर्शिअल मार्केटमध्ये त्यांनी पार्लर उघडले आणि त्याला ‘आश्मीन मुंजालस अंपायर ऑफ मेकओव्हर’ असे नाव दिले,  मागणी वाढत गेली आणि लोक युनिसेक्स सलूनची मागणी करू लागले. त्यावेळी त्यांनी ‘स्टार सलून प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने स्वत:ची कंपनी नोंदणीकृत केली,  जिथे त्या कंपनीच्या संचालक होत्या आणि इतर भागीदार होते. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी स्टार सलूनमध्ये ‘स्टार अकॅडमी’ सुरू केली,  जिथे लोकांना सुंदर बनवण्याचे शिक्षण दिले जाऊ लागले. अशाप्रकारे, केवळ एका खोलीतून सुरू झालेले पार्लर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सलून बनले.

आश्मीन मुंजाल यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते कौशल्य विकासासाठी पुरस्कार मिळाले. उपराष्ट्रपती एम. वैकय्या नायडू यांच्याकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना महिला सक्षमीकरणासाठीही पुरस्कार मिळाले आहेत. सुषमा स्वराज पुरस्कारही मिळाला आहे. मेकअप आणि सौंदर्य क्षेत्रात अनेक ऑल इंडिया एक्सलन्स पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

आश्मीन मुंजाल मानतात की, जीवनात वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचे करिअर घडत राहील. पैसा आणि प्रसिद्धीही येत-जात राहील. तुमची आवडही कधी ना कधी जोपासता येईल, पण तुमच्या मुलांचे बालपण मात्र कधीच परत येणार नाही. म्हणूनच आपल्या मुलांचे बालपण आनंदाने अनुभवा. त्यांना पूर्ण वेळ द्या,  नाहीतर येणारी अपराधीपणाची भावना भविष्यात तुम्हाला तुमच्या यशाचा आनंद घेऊ देणार नाही.

या क्षेत्रात महिलांची प्रगती कशी होईल?

जर तुमची आवड लोकांना सुंदर बनवण्याची असेल तर तुम्ही पार्लर उघडले नाही तरी तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. आज इन्स्टाग्राम, फेसबुक, गुगल, जस्ट डायल इत्यादी गोष्टी आहेत, ज्याद्वारे सर्व काही फोनवर उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त ब्युटी किट आणि इतर पार्लर प्रसाधनांसाठी थोडीफार गुंतवणूक करावी लागेल. बाकी तुम्ही सर्व काम तुमच्या घरातूनच व्यवस्थापित करू शकता. वेगळे दुकान असण्याची विशेष गरज नाही. ग्राहकांना तुमचा पत्ताही मोबाईलवरच मिळेल. नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व कामं खूप सोपी झाली आहेत. त्यामुळे महिलांना घरून काम करणे सोपे आहे. तसेही, आजकाल लोकांमध्ये छान तयार होण्याची आणि सुंदर दिसण्याची खूप क्रेझ आहे. हेअरस्टाईल करणं असो किंवा मेकअप करणं असो,  महिला पार्लरमध्ये येतच असतात.

एखादी महिला सक्षम कशी होऊ शकते?

तुम्हाला स्वत:ला जे बनायचे आहे ते तुम्ही बनता. जर तुम्ही स्वत:ला बिचारी, कमककुवत महिला म्हणून पाहात असाल किंवा तसा विचार करत असाल तर तुम्ही तशाच बनाल, पण जर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर यायचे असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. जोपर्यंत तुमचा स्वत:वर विश्वास नाही की तुम्ही अमुक एक गोष्ट करू शकता, तोपर्यंत तुम्ही ती कशी करू शकाल? प्रत्येक महिलेच्या आत शक्ती आणि ऊर्जा असते. ही शक्ती फक्त तुमच्यात आहे. ती कोणत्या मार्गाने वळवायची, हे देखील तुमच्याच हातात आहे.

पुढे जाण्यासाठीची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

माझ्या आईने मला नेहमीच खूप पाठिंबा दिला. ती एक नोकरदार महिला होती. दिल्ली पोलिसात इन्स्पेक्टर होती. तिने आयुष्यभर काम केले आणि कुटुंब तसेच तिच्या नोकरीत समतोल साधला. पुढे ती पोलीस स्टेशनची प्रभारी झाली. अनेकदा ती वुमन क्राइम सेलची प्रभारी होती. अनेक कठीण जबाबदाऱ्या तिने चांगल्या प्रकारे पार पाडल्या. या सोबतच तिने आपल्या तीन मुलांचे संगोपन करणे, नातेवाईकांशी संपर्क ठेवणे, प्रवास करणे इत्यादी सर्व काही व्यवस्थित केले. त्यामुळेच आई माझी प्रेरणा झाली. तिने मला नेहमी शिकवले की, तू लग्न केलेस आणि मूल झाले तरी तू स्वावलंबी होण्यासाठी, स्वत:साठी काहीतरी केलं पाहिजेस.

महिला दिन विशेष

अमृता गुप्ता, संचालक, मंगलम ग्रुप

* गरिमा पंकज

मंगलम ग्रुपच्या डायरेक्टर अमृता गुप्ताना कायमच आधुनिक, सस्टेनेबल रियल इस्टेट डिझाईन बनविण्याची आवड होती. एससीएडी, अटलांटामधून सस्टेनेबल डिझाइन प्रोजेक्ट्समधून मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर त्यांनी रियल इस्टेट इंटेरियरमध्ये दीर्घ अनुभव घेतला आणि नंतर अमृता गुप्ता डिझाईन्सची स्थापना केली. मंगलम ग्रुपमध्ये त्यांनी अनेक रेसिडेन्शीअल आणि प्रोजेक्ट्सना लीड केलंय, एका इनहाउस डिझाइनची स्थापना केली आहे आणि १५० युनिट्सची डीलीव्हरी केली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ग्रुपसाठी विविध परियोजनांच नेतृत्व करण्यासाठी मंगलम ग्रुपमध्ये हॉस्पिटालिटी विंगची स्थापना केली आहे. अमृता गुप्ता लैंगिक समानताच्यादेखील प्रबळ समर्थक आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची जाणीव ठेवत क्रेडाईने त्यांना या इंडस्ट्रीमध्ये महिलांची संख्या वाढविण्यासाठी २०१९ साली राजस्थानमध्ये महिला विंगची संस्थापक अध्यक्ष बनण्यासाठी आमंत्रित केलं.

नंद किशोर गुप्तानी स्थापन केलेला मंगलम समूह एक मोठा भारतीय समूह आहे. हा रियल इस्टेट शाखा, मंगलम बिल्ड-डेवलपर्स त्यांच्या उत्कृष्ठतेसाठी ओळखला जातो. अमृता गुप्ता सांगतात कि आम्ही ‘आपका सपना हमारा प्रयास’ आणि सर्वांसाठी घर यासाठी वचनबद्ध आहे आणि हेल्थकेयर, हॉस्पिटालिटी आणि मनोरंजनमध्ये आमच्या जवळ एक वेगळा पोर्टफोलिओ आहे.

अमृता गुप्ता सांगतात कि रियल इस्टेटकडे पुरूषांचं क्षेत्र म्हणून पाहिलं जातं. तर महिलाकडे डिझाईन आणि उद्योगाच्या इतर अनेक महत्वाच्या बाबींकडे एक नवीन नजर घेऊन येते. महिला निर्णय घेण्याच्या प्रक्रीयांमध्ये सक्रीयरित्या सहभागी होऊन, पारंपारिक मान्यतानां आव्हान देवून पुढे जाऊ शकतात. चला त्यांच्याशी या विषयांवर बातचीत करूया :

एक बिनेस वूमन होण्यासाठी स्त्रीमध्ये कोणती खासियत असायला हवी?

एक यशस्वी महिला व्यावसायिक होण्यासाठी महिलांमध्ये सहानुभूती, लवचिकपणा, नेतृत्व कौशल्य आणि दृढतासारखे गुण असायला हवेत. त्यांच्यामध्ये सामाजिक रूढी बदलण्याची आणि नव्या विचारांना स्विकारण्याची क्षमता असायला हवी. कायम आव्हानांचा सामना करण्याची क्षमता दाखवणं देखील गरजेचं आहे.

महिला रियल इस्टेटमध्ये कशा प्रकारे इन्वेस्टमेंट करू शकतात?

अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार ६६ टक्के भारतीय स्त्रिया बचत म्हणून ठराविक रक्कम आणि सोन्याच्या तुलनेत रियल इस्टेटला प्राधन्य देतात. यावरून स्पष्टपणे दिसून येतंय कि महिलांची रियल इस्टेटबद्दल जागरूकता वाढली आहे.

अनेक स्त्रियांना इंवेस्टमेंट वा फायनान्सची फारशी आवड नाहीये. मग ते घरातील खर्चाबाबत असो वा मग गुंतवणूक करण्याबद्दल. त्या मोठे निर्णय नेहमी पुरुषावर सोडतात. याबद्दल काय सांगाल?

हे खरं आहे कि अनेक स्त्रिया इंवेस्टमेंट वा आर्थिक निर्णयामध्ये सक्रीयरित्या सहभागी होत नाहीत आणि अनेकदा या गोष्टी पुरुषावर सोडून देतात. या वागण्यामागचं मुळ हे आपले सोशल नॉर्म्स आणि फायनांशीयल एज्युकेशनची कमी हे आहे. फायनांशीयल एज्युकेशन देवून स्त्रियांना जागरूक बनवता येईल. घरात गुंतवणूकीबाबत मोकळया चर्चेला प्रोत्साहित करणं देखील गरजेचं आहे. असं वातावरण तयार करायला हवं ज्यामुळे स्त्रियांना आत्मविश्वास येईल. ज्यामुळे त्यांच आर्थिक स्वातंत्र आणि सुरक्षा सुनिश्चित होईल.

समाजात स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारची सुधारणा शक्य आहे?

भारतीय समाजात स्त्रियांची स्थिती परंपरा आणि आधुनिकतेचं जटील मिश्रण दर्शवितं. खरंतर शिक्षण आणि रोजगाराच्या प्रकरणात प्रगती झालीये. परंतु खासकरून ग्रामीण क्षेत्रात लैंगिक असमानता बनलेल्या आहेत. महिलांची स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण सुधारणा, महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणारे कायदे सख्तीने लागू करणं आणि आर्थिक सशक्तीकरणाच्या पावलांची गरज आहे. याव्यतिरिक्त लिंगभेद विरोधी कार्यक्रम आणि मीडिया अभियानाच्या माध्यमानातून पितृसत्ताक मानसिकतेला आव्हान देणं गरजेचं आहे. समान संधींना पाठींबा देवून आपण स्त्रियांची स्थिती योग्य करू शकतो.

महिला दिन विशेष

आभा दमानी संचालक, आयसीपीए

* गरिमा पंकज

४५ वर्षीय आभा दमानी हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी आपली कंपनी आईसीपीए हेल्थ प्रोडक्ट्स लिमिटेडला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी (जे एक फार्मासिस्ट होते) या कंपनीची स्थापना केली होती. अंकलेश्वर, गुजरात येथे सुरू करण्यात आलेल्या या कंपनीशी आभा २२ वर्षांपूर्वी जोडल्या गेल्या आणि या कंपनीला त्यांनी नवीन उंचीवर नेले. आभा दमानी यांचे पती व्यावसायिक आहेत. त्यांना ९ वर्षांचा मुलगा आहे. कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळत त्या त्यांच्या कामाप्रतीही पूर्णपणे समर्पित आहेत.

त्यांची कंपनी आईसीपीएचे दंत, त्वचा, इएनटी म्हणजे नाक, कान, घसा, हर्बल उत्पादनांमध्ये स्पेशलायझेशन म्हणजे विशेषीकरण आहे. ही उत्पादने विशेषत: दंतवैद्य, ऑन्कोलॉजिस्ट, ईएनटी विशेषज्ञ आणि त्वचा शास्त्रज्ञांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. पोस्ट केमो ओरल इन्फेक्शन टाळण्यासाठी ऑन्कोलॉजिस्टही घेण्याचा सल्ला देतात.

आभा दमानी या कंपनीशी जोडल्या गेल्या तेव्हापासून कंपनीची उलाढाल आता १० पटीने वाढली आहे. त्यांनी एक मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादनाचे युनिट तयार केले आहे, त्यांच्या या प्लांटला अनेक आंतरराष्ट्रीय प्राधिकरणांनी मान्यता दिली आणि त्यानंतर कंपनीने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला. आज आईसीपीए ऑस्ट्रेलिया, यूके, मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिण पूर्व यासह ३५ देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. कंपनीमध्ये सुमारे ८०० कर्मचारी काम करतात, त्यापैकी ५०० मार्केटिंग म्हणजेच विपणन क्षेत्रात आहेत, एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १००-१५० महिला कर्मचारी आहेत. मार्केटिंगमध्ये महिला कमी आहेत, पण प्लांट आणि कार्यालयात महिलांची संख्या जास्त आहे.

एक यशस्वी महिला उद्योजक होण्यासाठी महिलांमध्ये कोणती वैशिष्ट्ये असायला हवीत?

महिलांनी त्यांच्या कामात लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यांनी संसार आणि कुटुंबासह कार्यालयीन कामात पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. महिलांनी संयम राखणेही महत्त्वाचे आहे, कारण कधीकधी परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. त्यावेळी संयम गमावून चालत नाही. याशिवाय महिलांनी निराश होऊ नये. अनेकदा लोक म्हणतील की, तुम्ही महिला आहात, त्यामुळे तुम्हाला जमणार नाही, पण तुम्हाला ते करुन दाखवावेच लागेल, कारण तुम्ही भांडलात किंवा रागाने बोललात तर काहीही होणार नाही, पण जेव्हा तुम्ही धीर धरून चांगले काम केले तरच तुम्हाला स्वीकारले जाईल आणि तुमचा आदर केला जाईल. तुम्ही कधीही हार मानू नका.

समाजात महिलांच्या स्थितीबद्दल काय सांगाल? ती सुधारणे कसे शक्य आहे?

महिलांच्या स्थितीत बरेच बदल झाले आहेत. आता लोक सर्वत्र महिलांना स्वीकारू लागले आहेत. महिलांमध्ये जागृती येत आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे ज्ञान तर वाढलेच आहे, सोबतच त्यांच्यावर कामाचा ताणही वाढला आहे. आधी समाजात महिला-पुरुषांच्या भूमिका, त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट होत्या, पुरुषांना बाहेरची कामं करावी लागायची, कमावून आणावे लागायचे तर महिला घर सांभाळायच्या. हळूहळू आपण आपल्या मुलींना स्वतंत्रपणे कसे जगायचे आणि सर्व क्षेत्रात कसे काम करायचे हे शिकवले, पण मुलांनी घरातली कामं कशी करायची आणि पत्नीला कसा हातभार लावायचा, हे आपण आपल्या मुलांच्या मनात बिंबवले नाही. महिलांसाठी ही वेळ आणखीनच अवघड झाली आहे, कारण त्यांना घरातले आणि बाहेरचेही काम करायचे आहे. सर्व ठिकाणी ताळमेळ साधत पुढे जायचे आहे.

आभा दमानी सांगतात की, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्ससाठी आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या अनेक प्रकारचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रमही राबवतात, जसे की, रुग्णालयात मशीन दान करणे इ. यासाठी त्यांना मुख्यमंत्र्याकडून अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. हा प्लांट अंकलेश्वरमध्ये असल्यामुळे तेथील मुलींच्या शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी त्या अनेक उपक्रम राबवत आहेत.

आभा सांगतात की, जीवनात अनेक आव्हाने येतात, पण नेहमीच कुठून ना कुठून मदत मिळतेच, म्हणजेच जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला मार्ग सापडतात. आपल्याला फक्त पुढे जात राहण्याची गरज असते. तुमच्यातील जिद्द पाहून तुम्हाला मदत करणारे अनेक लोक भेटतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें