मला जे आवडणार ते घालणार

* गरिमा पंकज

अलीकडेच दिल्लीत एका नामवंत रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला तिने साडी घातली होती म्हणून प्रवेश दिला गेला नव्हता. दिल्लीच्या अंसल प्लाझामधील अक्विला रेस्टॉरंटवर आरोप करत पीडिता अनिता चौधरीने फेसबुकवर एक व्हिडिओ टाकला ज्यात पाहू शकतो की कसं गेट मॅनेजरने त्या महिलेने साडी नेसली आहे म्हणून आतमध्ये जाण्यापासून रोखलं होतं.

अनिता चौधरीने जेव्हा स्टाफला विचारलं की साडी घालून येण्याची मनाई का आहे त्यावर कर्मचाऱ्याने उत्तर दिलं की साडीला स्मार्ट कॅज्युअलमध्ये मोडलं जात नाही आणि इथे फक्त स्मार्ट कॅज्यूअल घालूनच येण्याची परवानगी आहे.

यानंतर या मुद्दयावर खूपच चर्चा झाली. राष्ट्रीय महिला आयोगाने माहिती घेत दिल्ली पोलिसांना चिठ्ठी लिहिली. रेस्टॉरंटमध्ये या महिलेबाबत झालेल्या भेदभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप वाढला होता. साडी स्मार्ट कॅज्युअल नाही यावर कोणी ह्याला विचित्र गोष्ट म्हणू लागलं, तर कोणी यावर प्रश्न विचारू लागलं की जेव्हा ख्रिश्चन मुस्लीम देशातदेखील साडीवर बॅन नाही आहे तर मग भारतात अशी मानसिकता कशी होऊ शकते. खरंतर साडी आपला पारंपारिक पेहराव आहे.

नंतर रेस्टॉरंटच्या वतीने एक उत्तर देण्यात आलं की त्या महिलेने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केलं होतं म्हणून हे पाऊल उचलावं लागलं आणि साडीला एक कारण बनवाव लागलं.

कारण कोणतही असो आपण कोणालाही सांगू शकत नाही की या ड्रेसमुळे तुम्हाला येथे प्रवेश दिला जाणार नाही. आपल्याला आपल्या पसंतीनुसार कपडे घालण्याचं स्वातंत्र आहे. खासकरून सार्वजनिक जागी अशाप्रकारे ड्रेसकोडबद्दल बोलणं चुकीचं आहे. मग कुठेही ड्रेस कोड लागू करणं चुकीचं आहे.

स्वत:च्या मर्जीने स्त्रियांनी का सजू नये

२०१७ साली लंडनच्या संसदेने स्त्रियांना त्यांच्या आवडीचा ड्रेस कोड नाही म्हणून काही कंपन्यांवर दंडित केलं होतं. लंडनच्या एका रिसेप्शनिस्टने उंच टाचांच्या सँडल वापरण्यास नकार दिला म्हणून ऑफिसमधून घरी पाठवण्यात आलं होतं. या दबावामुळे ड्रेस कोडला आव्हान देत याचिका दाखल करण्यात आली. लाखो लोकांनी यावर सह्या केल्या होत्या.

कपडे आणि इतर वस्तूंबाबत टीकाटिपणी आणि कोड भारतात अनेकदा दिसून येतो. मग ती मोठी टिकली असो, बॉडी हँगिंग वा ऑफ शोल्डर टॉप असो, फाटलेली जीन्स वा घुंगरू असलेली चप्पल वा आवाज करणाऱ्या हिल्स असो, लोकांच्या भुवया आपोआप उंचावतात. खासकरून मुलींच्या कपडयांतबाबत आणि मेकअपबाबत अनेकदा या गोष्टींवर चर्चा केली जाते. मुलींना घरातून लहानपणापासूनच शिकवलं जातं की हे घाल वा हे घालू नकोस. मोठं झाल्यावर त्यांना पूर्णपणे समाज शिकवू लागतो की त्यांनी काय घालायला हवं आणि काय नाही.

मनपसंत कपडे वापरण्याची सुट का नाही

छोटया शहरातील मुली जीन्स वापरणं तसंच ओढणीशिवाय कुठे बाहेर पडणं यासाठी कितीतरी लढाया लढल्या आणि हरल्या आहेत. २६ वर्षाची प्रियंका शर्मा सांगते, ‘‘त्यावेळी दिल्लीमध्ये ती नवीन होती. मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून ती इंग्लिश वर्तमानपत्राच्या कार्यालयात सरोजिनीनगरमधून विकत घेतलेला मोठया गळयाचा टॉप घालून पोहोचली. थोडयाच वेळात एका सीनियर सहकारीने मला खोलीत बोलावलं. थोड औपचारिक बोलल्यानंतर मला वरपासून खालपर्यंत पहात ती गंभीरपणे म्हणाली की, काय आज कोणाला काम करू देणार नाहीस का?

‘‘मला काहीच समजलं नाही. ती सहकर्मी अजून थोडी गंभीर झाली. मला समजावत म्हणाली की तुला नाही माहित की या ऑफिसमधील लोकांची विचारसरणी काय आहे. ते तुला चुकीचं समजतील. म्हणून जा आणि जवळच्या मार्केटमधून एक ओढणी विकत घेऊन ये. तोपर्यंत माझा हा स्टॉल ओढून घे.

तिच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर बराच वेळ मला हे समजलं नाही की केवळ तिचीच विचारसरणी संकुचित आहे का पूर्ण ऑफिसची वा समाजाची?’’

‘‘मी दुपट्टा विकत घेऊन आली परंतु तो घातला नाही. आतून खूप विचित्र आणि राग आला होता. थोडया वेळानंतर मी त्यांच्या केबिनमध्ये ऑफिसमध्ये जशी आली होती तशीच ओढणीविना गेली. यानंतर ती सीनियर स्त्री माझ्याशी कायम नाराज राहू लागली.’’

शरीर, विचार आणि तुमचा लुक

आपण स्वत:ला कशा प्रकारे दाखवता, स्वत:ला किती फीट ठेवता, एखाद्या परिस्थितीबाबत काय विचार करता आणि कुठे जाण्यासाठी कसे तयार होता, हे सर्व तुमच्या मर्जीवर अवलंबून असायला हवं, ना ही लोकांच्या सांगण्यावरून. ज्याप्रकारे तुमची विचारसरणी व बॉडी शेप कोणी बदलू शकत नाही तसंच तुमचा पेहराव व लुकवर कमेंट करण्याची वा दखल देण्याचा अधिकार त्यांना देता कामा नये आणि नाही या आधारावर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ शकतो. कपडे वा लुकच्या आधारावरती कोणालाही जज केलं जाऊ शकत नाही. तुमची मोठी टिकली तुमच्या अॅक्टिविस्ट होण्याचा पुरावा होऊ शकत नाहीत वा मिनी स्कर्ट /शोर्टस वा स्लीटेड गाऊन तुमच्या बिंदास होण्याची निशाणी मानली जाऊ शकत नाही.

पूर्वीच्या स्त्रियांचा पेहराव

जुन्या काळात पाहिल्यावर समजतं की पूर्वी स्त्रियांच्या शरीरावर खूपच कमी कपडे असायचे. इसवीसन ३ च्या शतकांपूर्वी मौर्य आणि शुंग राज वंशाच्या काळातील दगडाच्या मूर्ती सांगतात की तेव्हा स्त्री आणि पुरुष आयताकार कपडयाचा एक तुकडा शरीराच्या खालच्या भागात आणि एक वरच्या भागात वापरत असत.

गुप्त राजवंशाच्या दरम्यानदेखील म्हणजे सातव्या आणि आठव्या शतकाच्या दरम्यान स्त्रियांच्या छातीपर्यंत एक पट्टीसारखं वस्त्र असायचं जे त्या पाठीवर बांधत असत. त्या कमरेच्या खालचे कपडेदेखील वापरत असत.

स्त्रीची लज्जा कायमच चेहरा आणि शरीर झाकण्यासाठीच्या कृतीशी संबंधित राहिलेली नाहीए. भारतात हवापाणी याचं सर्वात मोठं कारण राहिलंय. लोकांनी फक्त तेच केलं जे त्यांना योग्य वाटलं. परंतु क्षेत्रीय विविधता खरोखरच खूप आश्चर्यकारक होत्या. दक्षिण भारतात अगदी जुन्या काळातदेखील काही स्त्रिया आपल्या शरीराचा वरचा भाग झाकत नसत. अनेकदा स्त्रिया सरळ साडीला पदर बनवायच्या.

हळूहळू भारतात इतर संस्कृतींशी संपर्क झाला तसा फॅशन आणि विचारांमध्येदेखील बदल झाला. कधी मुगल, कधी ग्रीक, कधी रोमन अरबी आणि कधी चीनी संस्कृतीच्या संपर्कात आल्यामुळे याचा परिणाम झाला.

पंधराव्या शतकात मुसलमान आणि हिंदू स्त्रिया वेगवेगळया प्रकारचे कपडे घालत असत. मुसलमान स्त्रिया अधिक कपडे घालत असत त्या स्वत:ला पूर्णपणे झाकत असत आणि त्यांच्या पेहेरावात अनेक भाग होते. सोळाव्या आणि सतराव्या शतकात या काळात जेव्हा भारतात मुगलांची सत्ता होती तेव्हा याचा परिणाम सरळसरळ दिसून येतो.

पुढे जाऊन सुप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ सत्येंद्र्रनाथ टागोर यांची पत्नी ज्ञानदानंदिनी देवीने ब्लाउज, बंडी, कुर्ती आणि साडीसारख्या पेहरावाची फॅशन आणली होती. साडीच्या आतमध्ये ब्लाऊज वापरण्याची फॅशनदेखील त्या काळात जोरात होती. भारतात आज स्त्रिया आपल्या पेहरावाबाबत अधिक स्वतंत्र आहेत. तरीदेखील काळानुसार ड्रेस कोड बनवले जातात. कारण स्त्रियांना नियंत्रित करण्याचा आपला तथाकथित अधिकार समाजाला कायम ठेवायचा आहे. त्यांना कायमच त्यांच्या पेहरावाबाबत बंधने घालण्यात आली आहेत.

अश्लील कपडयांवर बंदी

सप्टेंबर २०१८ साली इटलीची ही बातमी सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली होती की जेवढा छोटा ड्रेस तेवढाच त्यांना अधिक टॅक्स द्यावा लागणार. या बातमीनुसार इटलीमध्ये ज्या स्त्रिया छोटे आणि तंग कपडे घालून लग्न करायच्या त्यांना सभ्यता म्हणजे डिसेन्सी टॅक्स जास्त द्यावा लागायचा.

एक इटालियन पादरीने याची शिफारस केली होती त्याचं म्हणणं होतं की ज्यादेखील स्त्रिया छोटे आणि तंग कपडे घालून लग्न करतात त्यांनी अधिक टॅक्स द्यायला हवा. याव्यतिरिक्त व्हेनिसच्या ओरिगोचे फादर क्रिस्तियानो बॉबीनेदेखील सांगितलं होतं की चर्चमध्ये स्त्रियांच्या छोटया कपडयावर टॅक्स लावण्याचा रिवाज असायला हवा. यामुळे जेवढे छोटे कपडे असतील तेवढा अधिक टॅक्स स्त्रियांना द्यावा लागणार.

अशाप्रकारच्या टॅक्सची मागणी करणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं की यानंतरदेखील स्त्रियांनी छोटे आणि अश्लील कपडयांवर बंदी आणता येईल. ज्या स्त्रिया चर्चसारख्या जागी अश्लील कपडे वापरतात त्यांच्यावर टॅक्स लावला जाईल, ज्यामुळे त्या हे सर्व काही करू शकणार नाही. धर्मगुरूंच असं म्हणणं होतं की चर्चमध्ये लग्नासाठी येणाऱ्या स्त्रिया आणि महिलांनी अशा प्रसंगी भडक जाऊन वापरण्यावर बंदी यायला पाहिजे.

हे पहिल्यांदाच नाही तर जेव्हा कोणती स्त्री आपल्या पेहरावाबाबत गुन्हेगार म्हणून उभं करण्यात आलं तेव्हा हे संकट आलं आहे. आपला समाज वर्षानुवर्षे स्त्रियाना हे समजावू लागला आहे की त्यांनी काय वापरायला हवं आणि काय नाही. समाजाचे तथाकथित ठेकेदार आणि धर्मगुरू स्त्रियांच्या पेहरावाबाबत टीका करत आपली नैतिक जबाबदारी समजतात. मग स्त्रिया घर चालवत असो वा मोहल्ला, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये असो वा कोणत्या खेळात सहभागी होत असो अथवा आपल्या कॉलेजमध्ये वा ऑफिसमध्ये असो, आजूबाजूची अनेक जागरूक लोकं तिला समजावून अनुचित टिपण्या करण्यात मागे पुढे राहत नाही.

विरोध का

लोक मोठया राष्ट्रीय व सामाजिक विषयावर भलेही तोंड बंद करुन बसतील, कोणता गुन्हा होत असेल तर मूक बनून बसतील, स्त्रियांच्या सुरक्षेवर कोणीही बोलणार नाही, परंतु जेव्हा स्त्रियांच्या पेहरावबाबत गोष्ट येते तेव्हा सर्वांची तोंडे उघडली जातात. त्यांनी काय वापरायला हवं यावर सगळयांचे एकमत होतं. अलीकडेच नॉर्वेच्या स्त्री वॉलीबॉल टीमने युरोपियन बीच हॅन्ड्बॉल चॅम्पियनशिपमध्ये स्पेन विरुद्ध एका सामन्याच्या दरम्यान बिकनी बॉटमच्या जागी शॉर्ट्स वापरली असता, नॉर्वे फेडरेशनने या खेळाडूंना पाठिंबा दिला आणि म्हटलं की त्या दंड भरण्यासाठीदेखील तयार आहेत. युरोपियन हॅण्डबॉल फेडरेशनने टीमला योग्य कपडे न वापरण्यासाठी १५०० युरो जवळजवळ १,३०,००० रुपयांचा दंड केला होता.

टोकीयो २०२० मध्ये जर्मनीच्या महिला जिमनास्टनेदेखील बोडी कव्हरिंग युनितार्ड वापरला. महिला जिमनास्टचे कपडे पूर्ण शरीर झाकलेले नसतात तर पुरुष जिमनास्ट संपूर्ण शरीर झाकणारे कपडे वापरतात. या भेदभावाविरुद्ध या टीमने मोठया प्लॅटफॉर्मवर विरोध दर्शविला होता.

आसामची एक तरुणी एग्रीकल्चर प्रवेश परीक्षा देण्यासाठी पोहोचली. तिला परीक्षा हॉलमध्ये तिने शॉर्टस घातली होती म्हणून प्रवेश देण्यात आला नव्हता. जेव्हा तिने सांगितलं की अॅडमिट कार्डमध्ये असं काहीच लिहिलं नाही तेव्हा तिला सांगण्यात आलं की ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मुलीला पडद्याने पाय झोकून परीक्षा द्यावी लागली.

अलीकडेच एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. बंगळुरूचा हा व्हिडिओ होता ज्यामध्ये रस्त्याने चालणाऱ्या माणसाने शॉर्ट घातलेल्या एका मुलीला म्हटलं की तिने भारतीय कायदे मानायला पाहिजेत आणि योग्य कपडे घालायला हवेत.

काही काळापूर्वी दिल्लीच्या गोल्फ क्लबने एका खास जातीच्या एका स्त्रीला प्रवेश दिला नव्हता. खरं तर स्त्रीने आपला पारंपरिक पेहराव केला होता. गेट कीपर्सने तिच्याशी गैरवर्तणूक केली आणि सांगितलं की ती एखाद्या मोलकरणीसारखी दिसत आहे, म्हणून तिला प्रवेश देता येत नाही.

शरीर झाकण्याचा सल्ला

अभिनेत्री श्रिया सरनला एका कायक्रमाच्या दरम्यान तिच्या ड्रेसबाबत काही लोकांनी विरोध दर्शविला वा म्हणायचं झाल्यास मॉरल पोलिसिंगचा सामना करावा लागला. तिच्या पेहरावाबाबत विरोध करण्यात आला. या कार्यक्रमात तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम करुणानिधी उपस्थित होते. अभिनेत्री विरुद्ध पोलिसात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आणि त्यांनी हिंदू आणि तमिळ लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून माफी मागावी लागली.

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने आपली पत्नी हसिन जहानसोबत एक फोटो टाकला होता. फोटोमध्ये हसीन जहाने स्लीवलेस पेहराव केला होता. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तिला हिजाब वापरण्याचा, बुरखा घालण्याचा, शरीर झाकण्याचा सल्ला दिला होता

पेहराव वाईट का

अलीकडे बंगळुरूमधील एका कॅथलिक कॉलेजने प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थिनीला विज्ञानाचे डीनने कॅप्री वापरलेले पाहिलं, तेव्हा तिला कपडे बदलावे लागले. विद्यार्थिनीकडे कोणताच पर्याय नव्हता. तिने बाजारात जाऊन नवीन पॅन्ट विकत आणली, तेव्हा ती कॉलेजमध्ये जाऊ शकली.

मोनाली ठाकूर, नर्गीस फाखरी, दीपिका पादुकोण, करीना कपूर, मलायका अरोरासारख्या कितीतरी अभिनेत्रींना कपडयावरून ट्रोल करण्यात आलं आहे. अभिनेत्यांच्या फोटोवरून कधीच अशा कमेंट्स येत नाही परंतु अभिनेत्रिना मात्र येतात. देशात असे अनेक कॉलेजेस आहेत जिथे स्ट्रीक्त ड्रेसकोडच्या नावाखाली मुलींना गुडघ्याखाली कुर्ता वापरावा लागतो, लेगिंग्स व जीन्सवर बंदी आणलेली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एखाद्या माणसाला असं का वाटतं की दुसऱ्यांनी अमूक एक कपडे घालण्याची पद्धत शिकवायला हवी. प्रत्येक मनुष्य स्वत:ला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. तो काहीही घालू शकतो. त्याला वा त्याच्या घरच्यांना जर हा पेहराव वाईट वाटत नसेल तर मग दुसऱ्यांना सांगण्याचा हक्क कसा काय मिळाला?

उफ… काय घालू

– अपर्णा मुजूमदार

सुधा सकाळपासून त्रस्त झाली होती. तिला संध्याकाळी तिच्या बेस्ट फ्रेंडच्या घरी फेस्टिव्ह पार्टीला जायचे होते. तिला कळत नव्हते की कोणता ड्रेस घालून पार्टीला जावे. तिच्या वॉर्डरोबमध्ये ड्रेसेसची कमतरता होती असे नव्हे, तिचा वॉर्डरोब ड्रेसेसनी खचाखच भरला होता, तरी ती कोणता ड्रेस घालावा, याची निवड करू शकत नव्हती.

एखाद्या खास पार्टीचे आमंत्रण मिळाले किंवा सणासुदीचे दिवस असतील तर मन कसे प्रफुल्लित होऊन जाते, परंतु त्यासाठी ड्रेसची निवड करताना कोणताही ड्रेस पसंतीस उतरत नाही, तेव्हा मात्र मन खट्टटू होऊन जाते. अशावेळी आपल्याला स्वत:चाच राग येतो की काही खास निमित्तांसाठी आपण १-२ ड्रेस का घेऊन ठेवले नाहीत?

जर अशा समस्येतून तुम्हीही जात असाल, तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही, कारण ९० टक्के महिला किंवा तरुणींना अशा प्रॉब्लेममधून जावे लागते. आतापर्यंत जे झाले ते झाले, पण पुढे मात्र या काही गोष्टींची काळजी घेतलीत, तर अशा समस्येचा सामना करावा लागणार नाही.

वॉर्डरोब ब्लंडर्सपासून वाचा

बहुतेक महिला आपल्या वॉर्डरोबला व्यवस्थित ठेवत नाहीत. त्यांचा वॉर्डरोब अस्ताव्यस्त असतो. उलट तो नीटनेटका ठेवला पाहिजे.

निरीक्षण करा

वेळोवेळी आपल्या वॉर्डरोबचे निरीक्षण करा. निरीक्षण करताना जर एखादा ड्रेस तुम्हाला अनफिट, आउट डेटेड किंवा कमी स्टाइलिश वाटला, जो पुन्हा घालण्याची इच्छा नसेल तर असे ड्रेस लगेच वॉर्डरोबबाहेर काढा. कारण अशा ड्रेसेसमुळे खास प्रसंगी एखादा ड्रेस निवडताना आणखी समस्या निर्माण होते.

मोह करू नका

अनेक महिला अनफिट, आउटडेटेड, अनकंफर्टेबल किंवा कमी स्टायलिश ड्रेस यासाठी वॉर्डरोबमध्ये जमा करून ठेवतात, कारण त्यांच्यासोबत काही आठवणी जोडलेल्या असतात. उदा. हा खूप महागडा आहे, हा आजोबांनी दिला आहे, हा सिंगापूरवरून आणलाय, हा गोल्डन नाइटला घातला होता. या सगळया गोष्टी बाजूला ठेवून तो वॉर्डरोबबाहेर काढा.

अलबम बनवा

तुमच्याजवळ किती ड्रेस आहेत, कोणत्या स्टाइलचे आहेत, कोणत्या कलर किंवा प्रिंटचे आहेत, या गोष्टी आपल्या लक्षात नसतात. यासाठी तुम्ही एक अल्बम बनवा. मोबाइलमध्ये कॅमेरा असल्याने तुम्ही आपल्या प्रत्येक ड्रेसचा फोटो काढून मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. ते पाहून तुम्ही खास प्रसंगी ड्रेसची निवड करू शकता.

जेव्हा तुम्ही ड्रेस घेण्यासाठी बाजारात जाल, तेव्हा अल्बम पाहून त्यापेक्षा वेगळया स्टाइल, कलर आणि प्रिंटचे ड्रेस खरेदी करू शकता.

वॉर्डरोबची देखभाल

वॉर्डरोबमध्ये अनेक कप्पे असतात. कॅज्युअल ड्रेस, पार्टी ड्रेस, हेवी ड्रेस, ऑफिस ड्रेस इ. वेगवेगळया कप्प्यांत ठेवा. जेणेकरून प्रसंगानुसार ड्रेस शोधताना त्रास होणार नाही.

होमवर्क करा

शॉपिंगला जाण्यापूर्वी चांगल्याप्रकारे होमवर्क करा. वाटल्यास हे नोट करून ठेवा की मार्केटमध्ये जाऊन आपल्याला कोणत्या स्टाइल, कलर आणि कोणत्या बजेटचा आउटफिट खरेदी करायचा आहे, तसेच ही गोष्टही लक्षात घ्या की आपल्याला कोणत्या प्रकारचे आउटफिट उदा. कॅज्युअल, ऑफिशिअल, हेव्ही किंवा पार्टीवेअर खरेदी करायचे आहेत.

नंबर ऑफ ड्रेसेस

वॉर्डरोबमध्ये नंबर ऑफ ड्रेसेस वाढविण्यापेक्षा क्वालिटीवर विशेष लक्ष द्या. बहुतेक वेळा महिला क्वालिटी पाहण्याऐवजी ड्रेसेसची संख्या पाहतात. त्यांच्या वॉर्डरोबमध्ये ड्रेस भरलेले असतात, पण काही खास कारणासाठी त्यांच्याकडे ड्रेस नसतात. कॅज्युअल, ऑफिशिअल, हेव्ही किंवा पार्टी ड्रेसच्या संख्याकडेही लक्षा द्या. कुठे असे होऊ नये की वॉर्डरोबमध्ये हेव्ही आणि पार्टी ड्रेसेसची संख्या जास्त आणि कॅज्युअल, ऑफिशिअल ड्रेसेसची संख्या कमी असेल.

ड्रेसची फिटिंग

ड्रेस कितीही महागडा असला तरी त्याची फिटिंग व्यवस्थित नसेल, तर तो चांगला दिसत नाही. त्यामुळे शरीरानुरुप ड्रेस पसंत करा, तरच तो शोभून दिसेल. एखादा ड्रेस दुसरीला चांगला दिसत असेल, तर तो तुम्हालाही चांगला दिसेल हे जरूरी नाही. म्हणून स्वत: घालून ट्राय करून पाहा. जर तो तुमच्या शरीराला शोभून दिसत असेल, तरच खरेदी करा.

कोणताही ड्रेस असा विचार करून घेऊ नका की तो तुम्हाला एकदाच घालायचा आहे. ड्रेस कोणत्याही निमित्ताने खरेदी करा, पण तो घालून पाहिल्यानंतरच खरेदी करा. नाहीतर खरेदी करून आणल्यानंतर तो आवडला नाही, म्हणून मग वॉर्डरोबमध्येच पडून राहील.

कलर्सची निवड

प्रत्येक कलरचा ड्रेस सर्वांनाच चांगला दिसेल, असं नाही. म्हणून ड्रेस घालून नॅचरल प्रकाशात स्वत:ला कसा दिसतोय, ते पाहा. ज्या ड्रेसचा रंग चेहऱ्याला ग्लो देईल, असाच ड्रेस पसंत करा.

एक्सक्लिव्ह ड्रेस

आजकाल एक्सक्लिव्ह ड्रेसचा काळ आहे. म्हणून कोणाची नक्कल करू नका. स्वत:ची स्टाइल बनवा. टीव्ही सीरियल किंवा एखाद्या अभिनेत्रीची कॉपी करू नका. आपल्या एज, प्रोफेशन आणि कॉम्प्लेक्शननुसार ड्रेसची निवड करा.

विंडो शॉपिंग

वेळ काढून अधूनमधून विंडो शॉपिंग करावी. विंडो शॉपिंगमुळे ट्रेंड आणि रेटबाबत सहजपणे कळून येते. त्याचबरोबर आउटडेटेड ड्रेसेस वॉर्डरोबमधून बाहेर काढण्यातही मदत मिळते.

ड्रेसची देखभाल

डेली वेअर वेगळे ठेवा. त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. हेवी व पार्टीवेअरला ड्रायक्लीन करा. कोणत्याही ड्रेसची कुठल्याही बाजूने शिलाई निघाली असेल, तर लगेच शिवा. जरी किंवा मोती निघाले असतील, तर त्यांना ठीक करा. खूप ड्रेसेस एकावर एक ठेवू नका. बनारसी व कोसाच्या साड्यांच्या जागा बदलत राहा.

वॉर्डरोबमध्ये कपडे ठेवताना त्यांना योग्य जागी ठेवा. बाहेरून आल्यानंतर कपडे व्यवस्थित झाडा. नंतर हँगरला टांगून ठेवा. घाम सुकल्यानंतरच ड्रेस वॉर्डरोबमध्ये ठेवा. सेफ्टीसाठी त्यात नॅप्थोलिनच्या गोळया किंवा ओडोनिल जरूर ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें