वाढत्या वयातही असे दिसाल तरूण

* गरिमा पंकज

तुम्ही तुमचे वय वाढण्यापासून रोखू शकत नाही, पण वाढत्या वयाचे दुष्परिणाम नक्कीच कमी करू शकता. तरुण आणि सक्रिय राहाण्यासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा…

आहार

आपण काय आणि कसे खातो याचा थेट संबंध आरोग्याशी, व्यक्तिमत्त्वाशी आणि आपल्या सक्रिय राहाण्यावर होत असतो. म्हणूनच आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

काय खावे

* सुका मेवा, कडधान्य, चिकन, अंडी, भाज्या आणि फळे यांसारखे भरपूर अँटिऑक्सिडंट असलेले पदार्थ खा. अँटिऑक्सिडंट्स हे शरीरातील जीवाणू-किटाणूविरोधात लढून वृद्धत्वाच्या खुणा कमी करतात. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच रोगाशी लढण्याची क्षमता मजबूत करून संसर्गापासून रक्षण करतात.

* वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होऊ लागते. यासाठी दिवसातून किमान १ कप ग्रीन टी प्यायल्यास स्मरणशक्ती चांगली राहाते.

* ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्स जसे की मासे, सुका मेवा, ऑलिव्ह ऑइल इत्यादींनी समृद्ध असलेले पदार्थ खा. ओमेगा-३ तुम्हाला तरुण आणि सुंदर ठेवते.

* क जीवनसत्त्व शरीरासाठी नैसर्गिक बोटॉक्ससारखे कार्य करते. यामुळे त्वचेच्या पेशी निरोगी राहातात आणि त्यावर पुरळ उठत नाही. यासाठी संत्री, हंगामी फळे, कोबी इत्यादींचे सेवन करा.

* काही गोड खावेसे वाटल्यास डार्क चॉकलेट खा. यामध्ये फ्लॅव्हनॉल भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य निरोगी राखण्यास मदत होते.

* तरुण आणि सक्रिय राहाण्यासाठी जास्त खाणे टाळा. भूकेच्या फक्त ८० टक्के खा.

काय खाऊ नये

* रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे पदार्थ खाऊ नका. यामुळे कंबरेचा घेर वाढतो. प्रमाणापेक्षा मोठया आकाराची फळे, रस, साखर, गहू इत्यादींचे सेवन कमी करा.

* सोयाबीन, मका आणि कॅनोला तेलाचे सेवन टाळा, कारण त्यात पॉली सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते. या ऐवजी ब्राऊन राइस आणि ऑलिव्ह ऑइलचे सेवन करा.

* लाल मांस, चीज, फॅटी दूध आणि मलईमध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. यामुळे धमन्या ब्लॉक होतात आणि हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.

* मैद्यापासून बनवलेला पांढरा ब्रेड, पास्ता, पिझ्झा इत्यादी कमी प्रमाणात खा.

कॅलरीजच्या सेवनावर ठेवा लक्ष

लठ्ठपणा आणि कॅलरीजचे सेवन यांचा परस्परसंबंध आहे. लठ्ठपणा वाढल्याने आरोग्यावर परिणाम होईलच, सोबतच शारीरिक हालचालीही मंदावतील आणि वयही जास्त दिसू लागेल.

जीवनशैलीत बदल

दैनंदिन सवयींमध्ये छोटेसे बदल करून तुम्ही दीर्घकाळ तरूण आणि सक्रिय राहू शकता :

* आपले मन नेहमी गुंतवून ठेवा. काहीतरी नवीन शिकत राहा, जेणेकरून तुमचे मन सक्रिय राहील आणि तुम्ही मानसिकदृष्टया तरुण राहाल.

* काही हार्मोन्स वृद्धत्व रोखण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. ग्रोथ हार्मोन, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, थायरॉईड, कोर्टिसोल आणि डीएचई एजिंगच्या प्रक्रियेत ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तुमच्या हार्मोनल पातळीवर नियंत्रण ठेवा, जेणेकरून तुम्ही वृद्धत्वाशी संबंधित लक्षणांपासून दूर राहू शकाल.

* तुम्ही प्रत्येक गोष्टींकडे कसे पाहता हा महत्त्वाचा घटक तुम्हाला तरुण आणि सुंदर ठेवण्यास मदत करतो. प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू पाहा. स्वत:ला आनंदी आणि उत्साही ठेवा.

त्वचेला ठेवा तरूण आणि सुरक्षित

उन्हात बाहेर जाण्याने त्वचा काळवंडते. या काळया भागांवर पटकन चट्टे पडतात. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन अवश्य वापरा.

त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी, त्वचेनुसार नॉनटॉक्सिक मॉइश्चरायझर्स निवडा. ते विशेषत: झोपण्यापूर्वी लावा.

चेहऱ्याचा व्यायाम

चेहऱ्याच्या स्नायूंसाठी व्यायाम केल्याने चेहऱ्याला सुरकुत्यांपासून संरक्षण मिळते. कपाळाला मुरुमांपासून वाचवण्यासाठी, आपले दोन्ही हात कपाळावर ठेवा आणि केसांची रेषा आणि भुवया यांच्यामध्ये बोटे पसरवा. बोटांनी कपाळावर हलका दाब देऊन बोटे हळूहळू बाहेरच्या दिशेने सरकवा.

चेहऱ्यासाठी आहेत काही चांगले व्यायाम

गाल वर करणे (चीक लिफ्ट) : ओठ हलके बंद करा आणि गाल डोळयांकडे खेचण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ओठांचे बाह्य कोपरे रुंद स्मिताने वर करा. असे १० सेकंद करा. हसणे हा गालांसाठी चांगला व्यायाम आहे.

फिश फेस : हा गाल आणि जबडयासाठी चांगला व्यायाम आहे. याने तुमचे ओठ योग्य आकारात येतात. आपले ओठ हलके बंद करा. गाल शक्य तितक्या आत खेचा. या आसनात हसण्याचा प्रयत्न करा.

कठपुतळीसारखा चेहरा (पपेट फेस) : हा व्यायाम संपूर्ण चेहऱ्यासाठी उपयक्त ठरतो. यामुळे गालांचे स्नायू सैल न होता मजबूत होतात. बोटांचे टोक गालावर ठेवून स्मित करा. गाल वरच्या दिशेने खेचा आणि स्मितहास्याच्या या मुद्रेत ३० सेकंद राहा.

घरी व्हिटॅमिन सी सीरम कसा बनवायचा?

* मोनिका अग्रवाल एम

व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत असेलच. आपण ते अनेक प्रकारे वापरू शकतो. जसे की व्हिटॅमिन सी असलेले फळ किंवा पदार्थ खाल्ल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढते. यासोबतच व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि ती तरुण दिसण्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु जर आपण व्हिटॅमिन सी सीरम खरेदी केले तर ते खूप महाग आहेत. आपल्यापैकी काहींना ते परवडत नाही. म्हणूनच तुम्ही स्वतःसाठी व्हिटॅमिन सी सीरम बनवू शकता. हे सीरम कसे बनवले जाते आणि ते कसे वापरले जाते ते जाणून घेऊया.

व्हिटॅमिन सी कसे कार्य करते?

व्हिटॅमिन सी सीरम तुमच्या त्वचेसाठी एक प्रकारचे अमृत आहे. ते आपली त्वचा घट्ट होण्यास मदत करते, आपल्या त्वचेच्या सुरकुत्या कमी करते, त्वचा सुधारते आणि तरुण दिसण्यास मदत करते. जर तुम्ही नियमितपणे व्हिटॅमिन सी सीरम वापरत असाल तर तुमची त्वचा पूर्वीपेक्षा घट्ट आणि उजळ होईल. यासोबतच ते त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यास सक्षम आहे. तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सीचा वापर केला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही याचा वापर करू शकता.

कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?

व्हिटॅमिन सी बनवताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे? चला जाणून घेऊया.

व्हिटॅमिन सी च्या 2 गोळ्या.

2 चमचे गुलाबजल.

1 चमचा ग्लिसरीन.

एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल.

सीरम साठवण्यासाठी रिकामी काचेची बाटली.

व्हिटॅमिन सी सीरम कसा बनवायचा?

व्हिटॅमिन सीच्या गोळ्या बारीक करून त्यापासून पावडर बनवा आणि ती पावडर रिकाम्या बाटलीत ठेवा. आता त्यात गुलाबजल टाका आणि दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा. गुलाबपाण्यामध्ये पावडर नीट मिसळत नाही म्हणून नीट ढवळून घ्यावे. मिक्स केल्यानंतर या मिश्रणात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. आता हे सर्व मिश्रण नीट मिसळण्यासाठी बाटली थोडा वेळ हलवा. यानंतर, बाटली थंड आणि गडद ठिकाणी ठेवा. तुम्ही हे सीरम २ आठवडे वापरू शकता. त्यानंतर नवीन सीरम बनवा.

हे सीरम तुमच्या त्वचेसाठी बाजारातील सीरमइतकेच प्रभावी आहे. जर तुम्ही हे सीरम नियमितपणे वापरत असाल तर तुम्हाला काही दिवसातच तुमच्या त्वचेत खूप फरक जाणवू लागेल. जर तुमची त्वचा खूप निस्तेज झाली असेल आणि तुम्हाला वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली असतील तर तुम्ही हे सीरम एकदा वापरून पहा. त्याचे परिणाम पाहून तुम्हाला धक्का बसेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें