पोर्टेबल शौचालय लाज बाळगू नका, रूबाबात चला

* मोनिका

अनेकदा महिला आरोग्य आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. वरवरची स्वच्छता असूनही, आजारी पडण्याचा धोका वाढतो आणि याचे कारण म्हणजे सार्वजनिक शौचालयांचा वापर, जे सर्वसाधारणपणे अस्वच्छ असतात.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची अस्वच्छता हे आजारांचे सर्वात मोठे कारण आहे. अनेकदा महिला तसेच मुली घराबाहेर पडल्यावर नाईलाजाने सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. सार्वजनिक शौचालयाच्या भांडयावर अनेक प्रकारचे जंतू असतात, ज्यामुळे महिलांना योनीमार्गात संसर्ग होण्यासह इतर अनेक आजारांचा धोका असतो.

सार्वजनिक शौचालयांमधील अस्वच्छतेमुळे महिला कमीत कमी पाणी पितात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. तासनतास लघवी थांबवणे आणि कमी पाणी पिणे याचा किडनीवर नकारात्मक परिणाम होतो.

सार्वजनिक शौचालयांच्या वापरामुळे होणारे आजार टाळण्यासाठी महिला आता पोर्टेबल शौचालयांचा वापर करू शकतात. महिलांच्या समस्या जाणून घेऊन बाजारात पोर्टेबल शौचालयाची गरज भासू लागली.

पोर्टेबल शौचालय म्हणजे काय, ते जाणून घ्या

आज बहुतांश सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पश्चिमेकडील शौचालयांचा वापर अधिक केला जात आहे. दिवसभरात कितीतरी प्रकारचे लोक सार्वजनिक स्वच्छतागृह वापरतात, ज्यापैकी बरेच रुग्ण असतात. अशा स्थितीत सार्वजनिक स्वच्छतागृहांकडून स्वच्छतेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. पोर्टेबल शौचालय हे असे उत्पादन आहे ज्याचा वापर महिलांना शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, विमान आणि ट्रेनमध्ये शौचालयात करता येतो.

पोर्टेबल शौचालयाचा वापर करताना शौचालयाच्या भांडयावर बसण्याची गरज नाही. महिला उभ्या राहूनही त्याचा आरामात वापर करू शकतात. गर्भवती महिलांनी वाकणे चांगले नसते. अशा परिस्थितीत पोर्टेबल शौचालय त्यांना वाकण्यापासून तसेच संसर्गापासूनही वाचवते.

प्रत्येकासाठीच आरामदायक

वृद्ध महिलाही याचा सहज वापर करू शकतात. वास्तविक, बहुतेक वृद्ध महिलांना गुडघेदुखीचा त्रास असतो. अशा परिस्थितीतही आता त्या बाहेर गेल्या तरी पोर्टेबल शौचालयाचा वापर करू शकतात. त्यामुळे त्यांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे सोपे होईल आणि त्या आजारांपासूनही दूर राहतील.

बाजारात अनेक प्रकारचे पोर्टेबल शौचालय उपलब्ध आहे. त्यामध्ये लघवीऐवजी प्लास्टिकचे फनेल किंवा उपकरण असते, ज्यामुळे उभे राहून लघवी करण्याची सोय होते. यात एक मोठा पी असतो, ज्याच्या मदतीने महिला सार्वजनिक स्वच्छतागृहाचा सहज वापर करू शकतात. हे एका उत्कृष्ट अशा महिला युरिनेशन किटच्या स्वरूपात उपलब्ध आहे. या किटची अर्थात संचाची खास गोष्ट म्हणजे यात इंटिमेंट वाईप्सही असतात ज्या पूर्णपणे अल्कोहोल विरहित असतात.

योनिमार्ग संसर्गास प्रतिबंध करणे गरजेचं

* शैलेंद्र सिंह

योनिमार्गाचा संसर्ग म्हणजे योनीमार्गात संसर्ग होणे हे लहान मुलीपासून वृद्ध महिलेपर्यंत कोणालाही होऊ शकते. काही महिलांना आयुष्यात अनेकदा हा संसर्ग होतो. योनीमार्गाचा संसर्ग हा एक सामान्य आजार असला तरी त्याकडे दुर्लक्ष केल्याने होणारे परिणाम धोकादायक असू शकतात. वंध्यत्वही होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान योनिमार्गाच्या संसर्गामुळे लैंगिक रोगही होऊ शकतात, ज्याचे शिकार न जन्मलेले आईच्या पोटातील बाळही होऊ शकते.

योनिमार्गाच्या संसर्गामुळे ल्युकोरियासारखा आजारही होऊ शकतो, ज्यामुळे योनीतून पांढरा दुर्गंधीयुक्त स्त्राव होतो. यामुळे पोट आणि पाठदुखी होऊ शकते. महिलांमध्ये तापासोबतच अशक्तपणाही येऊ शकतो.

योनिमार्गाच्या संसर्गाचे मुख्य कारण म्हणजे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे. डॉ. मधू गुप्ता सांगतात की, योनीमार्गाच्या संसर्गामुळेही लैंगिक संबंधातून पसरणारे आजार होऊ शकतात. वैयक्तिक स्वच्छतेची अशा प्रकारे घ्या काळजी :

स्वच्छ पाण्याचा वापर करा : शरीर स्वच्छ ठेवण्याचे काम योनी करते. वैयक्तिक स्वच्छतेसाठी, बाथरूम वापरण्यापूर्वी तिथे फ्लश करणे किंवा पाणी ओतणे आवश्यक असते, कारण जर तुमच्या आधी एखाद्या रुग्णाने ते वापरले असेल तर तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो.

मासिक पाळीदरम्यान घ्या विशेष काळजी : मासिक पाळीच्यावेळी संसर्गाचा धोका जास्त असतो, त्यामुळे या काळात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. संसर्गापासून दूर राहण्यासाठी चांगल्या दर्जाचे सॅनिटरी पॅड वापरा. आवश्यक तितक्या वेळा पॅड बदलत राहा. टॅम्पन लावण्यापूर्वी योनी पाण्याने धुवा. ते ५ तासांपेक्षा जास्त ठेवू नका.

कॉटनचा वापर उत्तम : पँटी वापरताना ती फक्त कॉटनची आहे याची खात्री करा आणि खूप घट्ट बसणारी पँटी वापरू नका. नायलॉन आणि सिंथेटिक पँटीजचा वापर कमी करा. यामुळे घाम येतो, ज्यामुळे योनिमार्गात त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. पँटी धुताना लक्षात ठेवा की, त्यात साबण राहाणार नाही. ती धुण्यासाठी सुगंधी साबण वापरू नका.

अस्वच्छ शौचालयापासून राहा दूर : संसर्ग टाळण्यासाठी गलिच्छ शौचालय वापरू नका. ज्या शौचालयात बरेच लोक जातात ते अतिशय जपून वापरा, कारण अशा शौचालयाचा वापर केल्यास युरिनरी ट्रॅक्ट संसर्गाचा धोका वाढतो.

स्वत:वर करू नका उपचार : योनीमध्ये किंवा आजूबाजूला खाज येत असेल, तर त्या भागाला चोळू नका. खाज कायम राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या मनाने किंवा केमिस्टच्या सल्ल्याने औषध घेऊ नका, अन्यथा त्रास वाढू शकतो.

डॉक्टरांच्या सल्ल्याने करा डचिंग : योनीच्या आतील भाग स्वच्छ करण्यासाठी डचिंगची शिफारस केली जाते. त्यात काही विशिष्ट प्रकारचे औषध सापडते, पण ते स्वत:च्या मनाने लावू नका.

योनीमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे जिवाणू असतात. कधीकधी डचिंगमुळे खराब जिवाणू तसेच चांगले जिवाणूही नष्ट होतात, ज्यामुळे संसर्ग होतो.

अंतर्गत केसांची स्वच्छता : अंतर्गत केस म्हणजे जननेंद्रियाचे केस योनीच्या संरक्षणासाठी असतात. लघवीचा काही भाग योनीत जाण्यापासून रोखण्याचे काम ते करतात. त्यांची वेळोवेळी सफाई करणे फार गरजेचे असते.

तेथील त्वचा अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे हे केस काढून टाण्यासाठी हेअर रिमूव्हर आणि शेव्हिंग क्रीमचा वापर कमी करा. केस ट्रिमिंग करणे हा सर्वात सुरक्षित उपाय मानला जातो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें