वेडिंग गिफ्ट काय द्यावे काय नाही

* सुमन बाजपेयी

लग्नात काय भेटवस्तू द्यावी हे यावर अवलंबून असते की ज्याचे लग्न आहे त्यांच्याशी तुमचे काय नाते आहे. त्यानंतर हे महत्त्वाचे ठरते की तुम्ही कोणत्या प्रकारचे गिफ्ट त्यांना देऊ इच्छिता. गिफ्ट चांगले असेल याची काळजी अवश्य घ्या, पण त्याचबरोबर हे ही पहा की तुमचे बजेट कोलमडणार नाही. जर तुम्हाला वर किंवा वधूची पसंत नापसंत माहीत असेल तर मग त्यानुसारच गिफ्ट निवडा. जर ते शक्य नसेल तर अशी एखादी वस्तू द्या जी भविष्यात त्यांच्या कामी येईल. त्यांच्या संसारात उपयोगी ठरेल अशीच वस्तू द्या नाहीतर तुमचे गिफ्ट त्यांच्या घरातल्या एखाद्या कोपऱ्यात नुसतेच पडून राहील. सादर आहेत गिफ्ट निवडण्याच्या काही टीप्स :

डेकोरेटिव्ह आयटम्स

नवीन घर सजवायला डेकोरेटिव्ह आयटम्सची फार गरज असते. म्हणूनच तुम्ही हे गिफ्ट म्हणूनही देऊ शकता. बाजारात शोभेच्या सजावटी वस्तूंची खूप व्हरायटी उपलब्ध असते. शो पिसेस, फोटो फ्रेम, कलात्मक वस्तू, पेंटिंग आणि हँडीक्राफ्टचे सामान देता येईल. पण अशा वस्तू देताना या गोष्टी विचारात घ्या की ज्यांना तुम्ही हे गिफ्ट्स देणार आहात त्यांना अशा प्रकारच्या वस्तू आवडतात की नाही अन्यथा तुमचे गिफ्ट त्यांच्यासाठी कुठल्या निरुपयोगी वस्तूपेक्षा कमी ठरणार नाही.

सिल्व्हर गुड्स

चांदीच्या वस्तू अशा ओकेजन्ससाठी सर्वात उत्तम पर्याय असतात, कारण त्यांना एक ट्रॅडिशनल व्हॅल्यू असते. चांदीच्या वस्तूंचे वैशिष्टय म्हणजे वर आणि वधू दोघांनाही भेट देता येते. सिल्व्हर ज्वेलरी मग ती अंगठी असो किंवा इयररिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट किंवा मग चांदीचे पैंजण वधूसाठी सर्वोत्तम असतात. सिल्व्हर ज्वेलरी फार एलिगंट दिसते. खासकरून तेव्हा जेव्हा त्यावर डायमंड, रुबीसारखे स्टोन्स जडलेले असतात. चांदीची हेअर पिन, ब्रोचेस किंवा घडयाळसुद्धा देता येते. सिल्व्हर वर्क केलेल्या हॅन्डबॅग्स या उपयुक्त असतातच शिवाय ट्रेंडी लुकसुद्धा देतात. वराला सिल्व्हर चेन, रिंग आणि ब्रेसलेट देऊ शकता. दाम्पत्याला सिल्वर कटलरी सेट, सिल्व्हर पेपर आणि सॉल्ट शेकर्स किंवा सिल्व्हर बॉटल ओपनरसुद्धा देता येतो.

इलेक्ट्रॉनिक वस्तू

आजच्या काळात पती आणि पत्नी हे दोघेही नोकरी करणारे असतात. आणि त्यांचं आधुनिक गॅजेट्सवर अवलंबून राहणं वाढलं आहे. मग अशावेळी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपेक्षा उत्तम असा काय पर्याय असू शकतो. वर वधूच्या गरजेनुसार त्यांना या वस्तू कस्टमाइज्ड करूनही देता येतात. किचनमध्ये लागणारी उपकरणे जसे मिक्सर, फूड प्रोसेसर, ज्युसर, टोस्टर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्ट्रिक कॅटल, वॉशिंग मशीन इ. फार उपयुक्त गिफ्ट्स ठरतात. याशिवाय टीव्ही, फ्रीP, म्युझिकसिस्टम, सेलफोन यासुद्धा अशा वस्तू आहेत, ज्या नेहमीच त्यांच्या कामी येतील.

ज्वेलरी

भलेही या दिवसांत सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत, तरीही जवळच्या नात्यात ज्वेलरी गिफ्ट करण्याची पद्धत अजूनही आहे. हल्ली बाजारात इतक्या प्रकारच्या ज्वेलरी उपलब्ध आहेत की तुम्ही आपल्या बजेट नुसार त्या निवडू शकता. स्वरोस्की, क्रिस्टल,टायटेनिअम, विभिन्न स्टोन्स ज्वेलरी गिफ्ट म्हणून देता येतात. प्लॅटिनमसुद्धा असं मेटल आहे की ज्याची ज्वेलरी आजकाल खूप फॅशनमध्ये आहे. नोकरदार महिला खासकरून ती पसंत करतात. प्लॅटिनम एक क्लासी टच देतो, जो आजच्या आधुनिक वधूला फार आवडतो.

वरासाठी गिफ्ट

वराला तुम्ही टाय, कफलिंक्स किंवा स्कार्फ अशा प्रकारच्या अॅक्सेसरीज देऊ शकता. जर तुम्हाला त्याची पसंत माहीत नसेल तर एखाद्या लाइफस्टाइल ब्रँड किंवा इलेक्ट्रॉनिक स्टोरचे गिफ्ट व्हाउचर देणे एक चांगला ऑप्शन आहे. साधारणपणे वराला इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीज नेहमीच आवडतात.

वधूसाठी गिफ्ट

वधू करता वेडिंग गिफ्टचे अनेक पर्याय आहेत, जसे कपडे, दागिने, अॅक्सेसरीज किंवा मग गिफ्ट व्हाउचर्स. लग्नाआधी स्पा किंवा ब्रायडल मेकअपचे गिफ्ट व्हाउचर्स तिच्या खूप कमी कामी येतील. याशिवाय तिला कॉस्मेटिक किट, हेअर ड्रायर, परफ्युम, गिफ्ट हॅम्पर्स, बांगडयांचा सेट वगैरेही देता येते.

कपलसाठी गिफ्ट

वर आणि वधूसाठी ते दोघेही वापरू शकतील अशी वस्तू गिफ्ट म्हणून दिली तर त्याहून चांगले आणखी काय असू शकते. तुम्ही त्यांना ट्रॅव्हल पॅकेज गिफ्ट म्हणून देऊ शकता. त्यांचे दोघांचे हनिमून तिकीट किंवा मग हॉटेल बुकिंग्स याची व्यवस्था करू शकता. एखाद्या हॉटेलचे फूड व्हाउचर किंवा मग वीकेंड हॉलिडेचे तिकिटसही भेट म्हणून देता येतात. हल्ली वुड, रॉट आयर्न, लेदर इ. व्हरायटीमध्ये उपलब्ध असलेले फर्निचर हेसुद्धा कपल्साठी बेस्ट गिफ्ट ऑप्शन आहे. तुम्ही त्यांना डबल बेड, सोफा सेट, डायनिंग टेबल इ. देऊ शकता. पण त्याआधी त्यांच्या होम डेकोर आणि घराच्या साइझची अवश्य माहिती घ्या.

कॅश सर्वात परफेक्ट

वेडिंग गिफ्ट म्हणून कॅश देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे वर आणि वधू आपल्या पसंत आणि आवश्यकतेनुसार जेव्हा हवे तेव्हा वस्तू खरेदी करू शकतात. किंवा त्यांना वाटल्यास ते पैसे बँकेत ठेवून भविष्यासाठी सेविंग्सही करू शकतात. तसेही लग्न झाल्यावर सेटल होण्यासाठी आणि हनिमूनसाठी मोठया कॅशची गरज भासतेच. त्यामुळे कॅश ही कधीही कामी येतेच.

आकर्षक पॅकिंग

उपयुक्त गिफ्टसोबत आकर्षक पॅकिंगही चांगला प्रभाव निर्माण करते. गिफ्ट रॅपिंगसाठी थोडे जास्त पैसे खर्च करणे चांगलेच असते. आपण यासाठी स्पेशल वेडिंग गिफ्ट रॅपरचा वापर करू शकता. पॅकिंगचे अगणित पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही ज्यांना गिफ्ट देत आहात, त्यांनी तुमच्या शुभकामना आणि प्रेम कायम लक्षात ठेवावे म्हणून गिफ्टच्या रॅपिंगवर विशेष मेहनत घ्या. सोने किंवा चांदीची नाणी एखाद्या सुंदर अशा बॉक्समध्ये ठेवून गिफ्ट देऊ शकता.

हल्ली फार सुंदर दिसणाऱ्या अशा पोटल्या मिळतात. त्यातही गिफ्ट ठेवता येते. रॅप करण्याचे पेपरही अनेक व्हरायटीजमध्ये उपलब्ध असतात. ज्यांना आपण हवे तसे कापडी फुलांनी वगैरे सजवू शकतो. हल्ली लोक पॅकिंगच्या बाबतीत बरेच कॉन्शिअस झाले आहेत. म्हणूनच ड्रेसपासून ते ज्वेलरीपर्यंत प्रत्येक वस्तू खास अंदाजात पेश करायला पॅकिंगमध्ये नवनवीन प्रयोग करणे पसंत करत आहेत.

कार्डबोर्डच्या नक्षीदार बॉक्समध्ये वस्तू ठेवून गिफ्ट दिल्या जातात. पाने पेंट करून खासकरून केळयाची पाने पेंट करून गिफ्ट रॅप केली जातात. याशिवाय गिफ्टच्या आकारानुसार लाकूड, मेटलच्या टोपल्या किंवा ट्रेचा वापरही केला जात आहे.

काय द्यायचे नाही

विचार करा जेव्हा एखादे नवपरिणीत जोडपे आपल्या प्रियजन, नातेवाईक यांनी लग्नात दिलेली गिफ्ट्स उघडायला बसले आहेत आणि त्यांच्या समोर एकसारखेच दिसणारे  ६ बाउल सेट, १० घडयाळे, १० वॉल हँगिंग्स, ७-८ लॅम्प शेड्स, आईस्क्रीम कप, क्रॉकरी सेट आले तर त्यांना कसे वाटेल. हे सर्व मग पुन्हा रॅप करून ठेवावे लागते किंवा घरातल्या स्टोर रूममध्ये ठेवावे लागते.

त्यामुळे लग्नात तुमच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नाहीत असे गिफ्ट्स न देणे हेच योग्य असते. बुके देणेही टाळा. कारण त्यांचा काहीच उपयोग होत नाही. बुके देणे म्हणजे पैशाची नासाडी आहे. त्यापेक्षा कॅश द्यावी.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें