आत्मविश्वासाच्या प्रकाशात साजरा करा दिव्यांचा उत्सव

* जगदीश पवार

सण उत्सवांचं भारतीय जीवनात खूप महत्त्व आहे. सणवार आपल्या आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करतात. वर्षभराचा आनंद एन्जॉय करण्याची संधी देतात आणि वर्षभरातील दु:ख विसरण्यासाठी प्रेरित करतात. आयुष्यात नवीन जोश, नवीन आत्मविश्वास, नवा उत्साह देणाऱ्या या सर्वात मोठया सणाची म्हणजेच दिवाळीची तयारी बरेच दिवस अगोदर सुरू होते.

दिवाळी अंधारातून उजेडाकडे जाण्याचं प्रतिक मानलं जातं. आपल्या भारतीयांचा विश्वास आहे की सत्याचा नेहमीच विजय होतो आणि असत्याचा नेहमी नाश होतो. म्हणून दिवाळीला रामायणातील एका दंतकथेशी जोडलं आहे. हिंदूंचा विश्वास आहे की या दिवशी अयोध्येचा राजा राम, लंकेचा राजा रावणाचा वध करून परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी आनंदाप्रीत्यर्थ तुपाचे दिवे लावण्यात आले होते. म्हणून हा सण साजरा केला जातो.

इकडे, कृष्णभक्तांचं म्हणणं आहे की यादिवशी श्रीकृष्णाने अत्याचारी राजा नरकासुराचा वध केला होता. या नृशंस राक्षसाचा वध केल्यामुळे जनतेला खूप आनंद झाला होता आणि लोकांनी या आनंदाप्रीत्यर्थ तुपाचे दिवे लावले होते. परंतु प्राचीन साहित्यात हा सण साजरा करण्यामागे यापैकी कोणताही पुरावा सापडत नाही. मात्र हा सण साजरा करण्यामागे नव्या पिकाच्या आगमनाचं वर्णन नक्कीच सापडतं.

दु:ख या गोष्टीचं आहे की या सणाचे स्वरूप खूपच बदललं आहे. दिव्यांचा हा सण घोर अंधारालादेखील सोबत घेऊन चालला आहे. खरंतर दिवाळीच्या सणात अंधश्रद्धेचा अंधार भरला गेला आहे. धर्माच्या व्यापाऱ्यांनी आनंदाच्या या सणाला धार्मिक कर्मकांडाशी जोडलं आहे, कारण या दरम्यान त्यांची कमाई होत राहील तसंच खुशालचेंडू, टिळाधारिंची शिरापुरीची व्यवस्थादेखील होईल. यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी नंतरदेखील धार्मिक साहित्यात अनेक भय व अंधश्रद्धेलादेखील उभं केलं आहे आणि सोबतच सुखसमृद्धीची लालूचदेखील दिली आली आहे.

लक्ष्मीला या सणाची अधिष्ठात्री देवी सांगून तिला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपायदेखील सुचविण्यात आले आहेत. लक्ष्मीची कृपा करण्यासाठी तिची पूजा करणे गरजेचे आहे. तिला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या विधी करणं गरजेचं आहे असा प्रसार केला गेलाय. असं सांगण्यात आलंय की देवीच्या प्रसन्नतेमुळे धनाची प्राप्ती होईल. म्हणून तर भटब्राम्हण दिवाळीच्यावेळी यजमानांकडून वसुली करण्यासाठी एका घरातून दुसऱ्या घरात पळत असताना दिसतात. कर्म, पुरुषार्थाच्या आधारे समृद्ध मिळविण्याची प्रेरणा देणाऱ्या या सणात ते लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे उपाय, दानाचे मार्ग सांगून लोकांची दिशाभूल करतात आणि त्यांना पूर्ण अंधकाराकडे घेऊन जातात.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अर्थात अंधारातून ज्योति (प्रकाश)कडे जाणं, त्याऐवजी समाजात अंधार आणि अंधाराकडे जाऊन समृद्धी शोधताहेत, खरंतर दिवाळीला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं विजय पर्व म्हणतात.

जागवा आत्मविश्वास

दिवाळी व्यक्तिगत आणि सामूहिक पद्धतीनेदेखील साजरा करणारा खास सणउत्सव आहे. ज्याची स्वत:ची सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ठ आहेत. या सणाचा व्यक्तिगत आणि सामूहिकपणे एक आनंद घ्या. घरात कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण बनवा, घरातील कानाकोपरा आनंदाने उजळवा, नवीन कपडे घाला, कुटुंबांसोबत नव्या वस्तूंची खरेदी करा, फराळाची भेट एकमेकांना द्या, एकमेकांना भेटा, आपापसातील गैरसमज दूर करा, घरोघरी सुंदर रांगोळी बनवा, दिवे लावा, फटाके फोडा, हा आनंदच आहे जो तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो.

या सणावारी सर्व आनंद एकत्रित करून आपल्या जिवलगांचं अधिक प्रेम मिळवा. फराळाचा कुटुंबीयांसोबत आनंद घ्या. दिवाळीनिमित्त भरणाऱ्या जत्रांमध्ये जा. विविध समूहाचा हा सण असल्यामुळे सगळीकडे खूप धामधूम असते. तुम्ही सर्व अंधश्रद्धेचा अंधार दूर करून या आत्मविश्वासाने भरलेल्या सणाचा आनंद घ्या. या काळात आनंदित लोकं बाजारात फिरतात. दुकानात खास सजावट आणि गर्दी दिसून येते. प्रत्येक कुटुंब आपल्या गरजेनुसार कोणती ना कोणती खरेदी करत असतं.

दिवाळी आयुष्यातील रंगांचं पर्व आहे. हे अंधश्रद्धेच्या अंधारात हरवून बसू नका. घर, कुटुंब, समाज व देशाच्या आनंदाचा संकल्प करा. यामुळेच प्रकाश निर्माण होईल, प्रगती येईल. धर्माने आज जीवनाच्या प्रत्येक भागात आपल्याला जखडून ठेवलं आहे. याने जन्म, लग्न, उत्सव, सणवार, मनोरंजन, मरण इत्यादी सर्वच जागी स्वत:चा कब्जा करून ठेवला आहे.

धर्म व धर्माच्या व्यापारांनी उत्सवाच्या या आनंदावरदेखील विनाकारण कर्मकांड आणि अंधश्रद्धेची भीती निर्माण केली आहे. काही मिळविण्याचा लोभ लोकांच्या मनात भरून ठेवला आहे. तुम्हाला कळणारदेखील नाही की कशाप्रकारे धर्माच्या व्यापाऱ्यांनी तुमच्या भावविश्वात घुसखोरी केली आहे.

सणावारी हावी झालेल्या अंधश्रद्धा दूर करा. बदलत्या काळानुसार आज समस्या आणि मान्यतादेखील बदलत आहेत. अशावेळी दिवाळीसारख्या सणउत्सवाच्या स्वरूपाला नियंत्रित करणंदेखील गरजेचं झालं आहे. कर्मकांडांसोबत सणावारी अपव्यय आणि दिखावादेखील वाढला आहे. प्रेम, जिव्हाळा, बंधुभावाच्या जागी सतत पुढेपुढे करण्याची वृत्ती मागे घेऊन जात आहे. अनेक मध्यमवर्गीयांची मिळकत निश्चिंत असते आणि तशी कमी असते. परंतु परंपरेत बांधल्यामुळे दिवाळीत चादरीच्या बाहेर पाय पसरल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

नवीन सुरुवात करा

दिवाळीत प्रत्येक घराच्या व्हरांडयावर झगमगणारे दिवे कायम अंधकारातून प्रकाशाकडे प्रगती करण्याचा संदेश देतात. हाच खरा प्रकाशाचा उत्सव आहे. हेच खरं संपूर्ण जीवनाचं सार आहे. या दिवशी नवीन खाती खोलली जातात. घराबाहेर स्वच्छता केली जाते. परंतु केवळ घरदुकानचं नाही, तर मनाची स्वच्छता, मनुष्याची आंतरिक चेतना जगविण्याची म्हणजेच भारतीय जनजीवनाची ऊर्जा व उल्हास खऱ्या अर्थाने अभिव्यक्त केल्यास, हे पर्व वास्तवात प्रगती आणि विकासाचा संदेश देऊ शकेल.

आजदेखील काही लोकं अशी आहेत जी तर्क आणि बुद्धीसोडून मूर्खासारखे भाग्य, अंधश्रद्धा आणि अवडंबर माजवत आहेत आणि पुरुषार्थवर विश्वास ठेवण्याऐवजी दिवा स्वप्नांमध्ये भटकत आहेत. सर्वात दु:खाची बाब ही आहे की गावखेडयांतील लोकच नाही तर स्वत:ला आधुनिक आणि अपडेटेड म्हणविणारे सभ्य लोकंदेखील कर्मकांड आणि अंधश्रद्धामध्ये बुडाले आहेत.

दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरात जळणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशाचा उद्देश मनात लपलेल्या निरर्थक अंधश्रद्धा आणि अवडंबर दूर करणं आहे. याउलट पूजापाठ आणि भटाब्राम्हणांच्या नादी लागून लोकं मेहनत व प्रामाणिकपणा ऐवजी अशी काही कामं करत आहे जी त्यांना आतून कुचकामी आणि आळशी बनवितात. अंधश्रद्धा व अवडंबर आपल्याला आतून कमजोर बनवतं. तसंच आपला संकल्प पोकळ करून टाकतो. जी लोकं वर्षभर जुगार खेळत नाहीत तीदेखील या दिवशी रुढी, परंपरा व अंधश्रद्धांचा डांगोरा पिटत जुगार खेळतात आणि हे सर्व धर्माच्या नावाखाली होतं.

या दिवाळीत एक प्रण करा की तुम्ही अंधश्रद्धा आणि अवडंबर ऐवजी समाजाच्या प्रगतीत स्वत:ला झोकून द्याल. स्वताला नवीन विचारांच्या प्रकाशात पहाल आणि घराबाहेरच्या स्वच्छतेबरोबरच मनालादेखील विवेकाच्या आधारे जागृत कराल. तेव्हाच सगळीकडे धनधान्य आणि आनंदाचे दिवे जळतील आणि तेव्हाच दिवाळी एका खऱ्या अलौकिक पर्वाचं रूप घेईल.

एकत्रित दिवाळी साजरी करा

अलीकडच्या अतिव्यस्त काळात जर हा प्रकाशोत्सव शेजाऱ्यांसोबत मिळून-मिसळून साजरा केला तर आजूबाजूच्या वातावरणासोबतच मनदेखील उजळून निघेल. जर समाजातील कटुता आणि वैमनस्य संपवायचं असेल तर दिवाळीचा आनंद शेजाऱ्यांसोबत साजरा करा. अनेकदा एखाद्या शेजाऱ्याची काही अडचण असेल वा त्यांची मुलं शिक्षणासाठी, नोकरीसाठी जर दुसऱ्या शहरात असतील तर तुम्ही अशा शेजाऱ्यांना स्वत:च्या आनंदात सहभागी करा आणि या दिवाळीत यांच्याशी चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश उजळवा.

अमावस्येच्या अंध:कारात, अंधारातून प्रकाशाकडे जाणारा संदेश देणारा दिवाळीचा सण जिथे सत्याच्या विजयाचा संदेश देतो, तिथे जीवनात जगण्याचा उत्साह आणि उल्हासाचे रंग भरण्याची संधीदेखील देतो. दिवाळीत विनाकारण खूप पैसे खर्च होतात. मध्यमवर्गीय भारतीय समाजासाठी सणावारी पैशाचा अपव्यय करणं जणू अभिशापच बनलं आहे. कुटुंबीयांच्या सणावारी मागण्यानंपुढे कमाऊ नोकरदार सणांनाचं जणू घाबरू लागले आहेत. वास्तविकपणे आनंदाच्या जागीच सण औपचारिकतेचं पर्व बनता कामा नये, म्हणून अशा सणावारी अतिभावूकता व आस्थेचा त्याग करून आनंदाला महत्त्व द्या. दिव्यांच्या उत्सवाला अंधश्रध्येच्या या अंधारात नाही, तर आत्मविश्वासाच्या प्रकाशात उजळवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें