विवाहबाह्य संबंधांचे कारण लैंगिक अतृप्तता तर नाही

* वेणीशंकर पटेल

काही वर्षांपूर्वी आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या एका मुख्य निर्णयानुसार कलम ४९७ रद्द करत विवाहबाह्य संबंधांना अपराधाच्या श्रेणीतून हटवण्यात आले. त्यावेळचे सीजेआय दीपक मिश्रा यांनी आपला निर्णय सुनावला की विवाहबाह्य संबंध हा एक व्यक्तिगत मुद्दा असू शकतो. तो घटस्फोटाचे कारण ठरू शकतो, पण हा अपराध नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. समाजात वाढत असलेला व्यभिचार हा समाजाची वीण तोडण्याचा कुत्सित प्रयत्न तर करत आहे, पण असाही प्रश्न निर्माण होत आहे की या वाढत्या व्यभिचार आणि विवाहबाह्य संबंधांची कारणे काय आहेत?

मानवी संस्कृतीचा विकास होताना समाजाने शारीरिक समाधान आणि सेक्स संबंधांच्या मर्यादेसाठी विवाह नामक संस्थेला सामाजिक मान्यता दिली असावी. विवाहपश्चात पती पत्नीतील सेक्स संबंध सुरुवातीला ठीक असतात, पण कालांतराने सेक्स प्रति अरुची आणि पार्टनरच्या गरजांकडे पुरेसे लक्ष न देणे ही कलहाची कारणे ठरतात.

साधारणपणे सुखद सेक्स त्यालाच मानले जाते, ज्यात दोन्ही पार्टनर्सना ऑर्गेज्मचा आनंद मिळतो. जर पतिपत्नी सेक्स संबंधांत एकमेकांना समाधानी करण्यात यशस्वी झाले तर त्यांच्या दाम्पत्य जीवनाची केमिस्ट्री ही उत्तम राहते.

राकेश आणि प्रतिभा यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. त्यांना २ वर्षांची एक मुलगीही आहे. परंतु मुलीच्या जन्मानंतर प्रतिभा मुलीच्या संगोपनातच रमून गेली. आपल्या पतिच्या लहानसहान गरजांकडे लक्ष पुरवणारी प्रतिभा आता त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली.

कधी रोमँटिक मूड असताना जेव्हा राकेश सेक्सची इच्छा व्यक्त करत असे, तेव्हा प्रतिभा त्याला या गोष्टीवरून झिडकारायची की तुला फक्त या एका गोष्टीशीच मतलब आहे. यामुळे राकेश नाराज होऊन चिडचिड करत असे. मनाला मुरड घालून तो आपली कामेच्छा दाबून टाकत होता. हळूहळू सेक्सच्या ओढीने त्याला दुसरीकडे शारीरिक संबंध निर्माण करण्याचे विचार मनात येऊ लागले. प्रतिभासारख्या अनेक महिलांचे हे असे वागणे राकेशसारख्या पुरुषांना दुसऱ्या महिलांशी संबंध प्रस्थापित करायला प्रवृत्त करतात.

ज्याप्रमाणे चविष्ट भोजन केल्यानंतर लगेचच काही खाण्याची इच्छा होत नाही, त्याचप्रमाणे सेक्स क्रियेत संतुष्ट पतिपत्नी इतरत्र सेक्ससाठी भटकत नाहीत. दाम्पत्य जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी पती आणि पत्नीला आपल्या सेक्स विषयक गरजांकडे लक्ष देणे गरजेचे असते. सेक्ससाठी पुढाकार साधारणपणे पतिकडून घेतला जातो. पत्नीनेही असा पुढाकार घेतला पाहिजे. पतिपत्नीमधील कोणीही घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करून, सेक्स संबंध स्थापित करून, एकमेकांच्या समाधानाची काळजी घेऊन विवाहबाह्य संबंध टाळता येतात.

मुलांच्या जन्मानंतरही सेक्स प्रति उदासीन राहू नका. सेक्स दाम्पत्य जीवनाचा एक मजबूत आधार आहे. शारीरिक संबंध जितके सुखद असतील, भावनात्मक प्रेमही तितकेच मधुर असेल. घरात पत्नीच्या सेक्स प्रति रुक्ष व्यवहारामुळे पती अन्यत्र सुखाच्या शोधात संबंध निर्माण करतो. कामात व्यस्त असलेल्या पतिकडून पुरेसा वेळ आणि लैंगिक समाधान न मिळाल्याने पत्नीही दुसऱ्या पुरुषासोबत संबंध निर्माण करू शकते. ज्याची परिणती दाम्पत्य जीवनातील तणाव आणि ताटातूट यात होते.

बदल स्वाभाविक असतो

मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की संबंधांतील बदल होणे हे स्वाभाविक आहे. लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांत पती आणि पत्नी यांना एकमेकांविषयी जे आकर्षण वाटत असते ते कालांतराने कमी होत जाते आणि मग सुरू होतो नात्यांतील एकसुरीपणा.

आर्थिक, कौटुंबिक आणि मुलांच्या चिंता हा एकसुरीपणा अधिकच वाढवतात. मग हा एकसुरीपणा दूर करण्यासाठी पतिपत्नी बाहेर शांतता मिळवण्याचा प्रयत्न करू लागतात, जिथे त्यांना पुन्हा एकदा आपल्या वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या वर्षांचा रोमांच अनुभवता येईल. इथूनच विवाहबाह्य संबंधांची सुरुवात होते.

एका रिसर्चनुसार असे पुढे आले आहे की वेगवेगळया लोकांमध्ये या संबंधांची वेगवेगळी कारणे असतात. कोणाशीतरी भावनात्मक पातळीवर लगाव, सेक्स लाइफमधील असमाधान, सेक्सशी निगडित काही नवीन अनुभव घेण्याची लालसा, कालानुरूप आपसांतल्या संबंधांत निर्माण झालेली प्रेमाची कमतरता, आपल्या पार्टनरच्या एखाद्या सवयीला त्रासणे, एकमेकांना जळवण्यासाठी असे करणे ही विवाहबाह्य संबंधांची कारणे आहेत.

महिलांच्या प्रति दुय्यम दर्जाची मानसिकता

भारतीय संस्कृतीत महिलांना आजही दुय्यम दर्जा दिला जातो. सामाजिक परंपरांच्या मुळाशी स्त्री द्वेष लपलेला आढळून येतो. या परंपरा महिलांना पिढयान पिढया गुलाम याखेरीज अधिक काही मानत नाहीत. त्यांना अशाचप्रकारे वाढवले जाते की त्या स्वत:च्या शरीराचा आकार इथपासून ते त्यांचा वैयक्तिक साजशृंगार यासाठीही अनुमती घ्यावी लागते.

ज्या महिला आपल्या मर्जीने जगण्यासाठी परंपरा आणि निषिद्ध मानलेल्या गोष्टी यांना आवाहन देतात त्यांच्यावर समाज चरित्रहीन असल्याचा आरोप ठेवतो. पतीला घरात चोख व्यवस्था, पत्नीचा वेळ आणि चविष्ट आणि मन तृप्त होईल असे भोजन, आनंदी वातावरण आणि देह संतुष्टी या गोष्टी हव्या असतात. पण पती तिला आवश्यक सोयी सुविधा आणि शारीरिक गरजा यांची काळजी घेताना दिसत नाही. पत्नीकडून अशी अपेक्षा केली जाते की तिने पतिच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत.

मानसशास्त्रज्ञांनुसार विवाहबाह्य संबंध रोखण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. जर परस्पर नात्यातील प्रेम कमी झाले आहे असे वाटले तर नात्याला एखाद्या जुन्या कपडयांप्रमाणे काढून फेकले जाते आणि नवीन कपड्यांनुसार नवीन नाती बनवणं हे काही समस्येचे समाधान नाही. आपल्या पार्टनरला समजावण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्याशी बोलून समस्या सोडवता येऊ शकते. सेक्सविषयी केलेली बातचीत, सेक्सचे नवनवे प्रकार आजमावून एकमेकांना शारीरिक संतुष्टी देऊन विवाहबाह्य संबंधांना आळा घालता येऊ शकतो.

फोरप्ले ते ऑर्गेज्म पर्यंतचा प्रवास

एका नामांकित फॅशन मॅगझिनच्या सर्वेक्षणानुसार महिलांमध्ये ऑर्गेज्मसंबंधी काही महत्त्वाची तथ्ये समोर आली आहेत. या ऑनलाइन शोधात १८ ते ४० वयोगटातील २३०० महिलांना प्रश्न विचारण्यात आले. ज्यातील ६७ टक्के महिलांनी हे मान्य केले की त्या फेक ऑर्गेज्म म्हणजे ऑर्गेज्म झाल्याचे नाटक करतात. ७५ टक्के महिलांनी हे मान्य केले की त्यांचा पार्टनर हा वीर्यस्खलन झाल्यावर त्यांच्या ऑर्गेज्मवर लक्ष देत नाही. सर्वेक्षणाचे हे आकडे दर्शवतात की बहुतांश प्रकरणांत पती आणि पत्नी हे सेक्स संबंधांत ऑर्गेज्मपर्यंत पोहोचतच नाहीत.

सेक्सला केवळ रात्री उरकण्याची क्रिया असे मानून पार पाडणे याने सहसंतुष्टी मिळत नाही. जेव्हा दोन्ही पार्टनर्सना ऑर्गेज्मचे सुख मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने सहसंतुष्टीचा आनंद मिळतो. पत्नी आणि पतिचे एकत्र स्खलन होणे म्हणजे ऑर्गेज्म असते. सुखद सेक्स संबंधांच्या यशात ऑर्गेज्मची भूमिका फार महत्त्वाची असते.

सेक्स हे शारीरिक तयारी सोबतच मानसिक तयारीनिशीही केले गेले पाहिजे आणि हे पतिपत्नीतील आपसांतील जुगलबंदीनेच शक्य होते. सेक्स करण्याआधी केलेली सेक्स संबंधी छेडछाडच योग्य वातावरण तयार करायला मदत करते. खोलीतले वातावरण, पलंगाची रचना, अंतर्वस्त्रे अशा छोटया छोटया गोष्टी सेक्ससाठी उद्दीपनाचे कार्य करतात.

सेक्सच्या वेळी कौटुंबिक समस्यांची चर्चा करणे टाळले पाहिजे. सेक्स संबंधाच्या दरम्यान छोटया छोटया गोष्टीवरून केलेल्या तक्रारी संबंधांना बोजड आणि सेक्सप्रति अरुचीही निर्माण करतात. सेक्ससाठी नवीन स्थान आणि नवीन प्रकार आजमावून संबंध अधिक दृढ करता येतात.

सेक्सची सहसंतुष्टी नक्कीच दाम्पत्य जीवन यशस्वी बनवण्यासोबतच विवाहबाह्य संबंध रोखण्यासाठीही साहाय्यकारी ठरू शकते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें