सुपर किड बनविण्याच्या शर्यतीत बालपण चिरडले जाते

* दीप्ती अंगरीश
प्रत्येक पालकांची अशी इच्छा असते की त्यांच्या मुलाने तो स्तर गाठला पाहिजे,
जो त्यांनी साध्य केला नाही. कधीकधी यासाठी मुलांवर अतिरिक्त दबावदेखील
निर्माण केला जातो. आजकाल टीव्हीवरील सर्व प्रकारचे रिअॅलिटी शो मुलांशी
संबंधित देखील आहेत. या बद्दलही पालक आपल्या मुलांबद्दल अधिक जागरूक
होत आहेत. प्रत्येकजण आपल्या मुलास एक सुपर किड बनवू इच्छित आहे. मूलं
जसजसे मोठे होत जाते तसतसे ते आपल्या सभोवतालच्या वातावरणावरून
शिकत जाते. प्रथम कुटुंबातून, नंतर मित्रांकडून किंवा मग टीव्ही कार्यक्रमांमधून.
सृष्टीचे वय अंदाजे ८ वर्षे आहे. ती शाळेत जाते. शाळेतून परत येईपर्यंत तिचे
संगीत शिक्षक घरी येतात. त्यानंतर तिला शिकवणी वर्गात जावे लागते, तेथून
परत येईपर्यंत पोहण्याच्या वर्गात जाण्याची वेळ होते. संध्याकाळी नृत्य वर्ग
असतात. तेथून परत आल्यावर गृहपाठ पूर्ण करायचा असतो. तोपर्यंत तिला
जांभई येऊ लागते. जेव्हा ती डुलक्या देऊ लागते तेव्हा तिला आईची ओरड
ऐकावी लागते.
आता आपणच विचार करा की एक लहानसा जीव आणि इतके अधिक ओझे. या
धावपळीच्या दरम्यान ना तर निरागस बालपणाला आपल्या स्वत:च्या इच्छेने
पंख पसरायला वेळ आहे आणि ना थकल्यावर आराम करण्याची वेळ आहे.अशी
दिनचर्या आजकाल प्रत्येक त्या मुलाची आहे, ज्याचे पालक त्याला सर्वकाही
बनवू इच्छित आहेत. आजकाल पालकांनी कळत-नकळत आपली अपूर्ण स्वप्ने

आणि इच्छा, निरागस मुलांच्या क्षमतेचे आणि आवडी-निवडींचे आकलन न
करता त्यांच्यावर लादल्या आहेत. प्रत्येक पालकांची केवळ एकच इच्छा असते
की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीत त्यांचे मूल अव्वल यावे. त्याचे मूल
अष्टपैलू असावे. इतर मुलांपेक्षा अधिक हुशार असावे. सुपर हिरोंप्रमाणेच त्यांचे
मूलही एक सुपर किड असावे.
दिल्लीचे ज्येष्ठ अधिवक्ता सरफराज ए सिद्दीकी यांचे म्हणणे आहे की
पालकांच्या या महत्त्वाकांक्षेचा बोजा निष्पापांना नैराश्याकडे नेत आहे. गुणांच्या
खेळामध्ये अव्वल असणे ही त्यांची विवशता बनली आहे. हेच कारण आहे की
दरवर्षी परीक्षेचा निकाल येतो तेव्हा आपल्याला मुलांच्या आत्महत्येच्या दु:खद
बातम्या वाचायला मिळतात. असे करू नये. प्रत्येक पालकांनी असा विचार केला
पाहिजे की प्रत्येक मुल प्रत्येक क्षेत्रात अव्वल असू शकत नाही.
पालक मुलांची खूप काळजी घेतात. पण परिणाम काहीही नाही. तर मग
कमतरता कुठे आहे? सत्य तर हे देखील आहे की टीव्हीवरील मुलांच्या रियलिटी
शोने निष्पाप मुलांच्या जीवनात क्रांती घडविली आहे.
त्यांची प्रतिभा सिद्ध करण्याच्या या धडपडीच्या नावाखाली पालकांनी आपले
नाव जगभरात प्रसिद्ध करण्याचे एक साधन म्हणून त्यांना समजले आहे.
त्यांना अष्टपैलू बनवण्याच्या खेळामध्ये बालपणातील निर्मळता आणि उत्स्फूर्तता
हरवली आहे. मुले नैसर्गिकरित्या खूप काल्पनिक असतात हे सांगण्याची गरज
नाही.
समाजशास्त्रज्ञ डॉ. राकेश कुमार म्हणतात की मुलांना ज्या क्षेत्रात रस आहे
त्यात त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. मुलांना
कौशल्यानुसार आणि क्षमतेनुसार स्वत:ला सुधारण्यासाठी, त्यासाठी सर्वतोपरी
प्रयत्न करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांद्वारेच त्यांना मार्गदर्शन केले जाऊ शकते,
मुलांचे मन समजून घेतले पाहिजे, अशा प्रकारे त्यांना सहकार्य आणि पाठींबा

दिला पाहिजे की जेणेकरुन मोठयांच्या आशा-अपेक्षा त्यांच्यासाठी ओझे नाही तर
उत्प्रेरक बनतील. पालकांनी हे समजून घेणे महत्वाचे आहे की मुले केवळ
पालकांची कौशल्य प्रदर्शित करण्याचे साधन नाहीत.
मुलामधील बलस्थाने ओळखा
यासंदर्भात झालेल्या मुलाखतीत अभिनेता आमिर खान म्हणाला, ‘‘मला असे
म्हणायचे आहे की प्रत्येक मुल विशेष आहे. मला हे माझ्या संशोधनातून कळले
आहे. प्रत्येक मुलात काही न काही गुण असतो. पालक म्हणून ही आपली
जबाबदारी आहे की आपण मुलाची ती गुणवत्ता ओळखावी आणि ती सुधारण्यात
मुलास मदत करावी. प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळी क्षमता व दुर्बलता
असते. माझ्यातही काही क्षमता आहे तर काही कमतरतादेखील आहे. मुलाला
काय चांगले वाटते हे आपल्याला पाहावे लागेल. त्याच्या हृदयाला काय हवे
आहे? आपण त्याची इच्छा समजून घेतली पाहिजे, मुलामध्ये काही कमतरता
असू शकते. आपण त्याला मदत केली पाहिजे जेणेकरून तो त्या कमतरतेवर
विजय मिळवू शकेल. आपली शिक्षणपद्धती अशी आहे की लहानपणापासूनच
आपण मुलावर प्रथम येण्यासाठी दबाव टाकू लागतो.
‘‘बरं, प्रत्येक मूल प्रथम कसे येऊ शकते? मुलांवर आपण ही कसली शर्यत
लादत आहोत? अशा प्रकारचा दबाव मुलांना कुठे नेईल याचा विचार करा. प्रथम
येण्याची ही स्पर्धा त्याच्या मनावर आणि मेंदुवर काय परिणाम करेल? आम्हाला
या प्रश्नांवर विचार करावा लागेल. मला वाटते की शिक्षण क्षेत्राशी संबंधित
लोकांनी याबद्दल अवश्य विचार करावा.’’
आपण सुपर किड बनवण्याच्या प्रयत्नात मुलाला स्वार्थी बनवू नये. जेव्हा आपण
मुलावर सर्वांपेक्षा पुढे राहण्याचा दबाव आणतो, तेव्हा ही गोष्ट त्याच्या मनात
घर करून जाते की काहीही झाले तरी त्याने सर्वांना हरवले पाहिजे, त्याला असे
वाटते की प्रथमस्थानी येणे हेच त्याच्या जीवनाचे उद्दीष्ट आहे.

कधी-कधी सर्वांच्या पुढे राहण्याचा हव्यास त्याला स्वार्थी बनवतो. तो फक्त
स्वत:चाच विचार करू लागतो. मूल शाळेतून घरी आल्यावर विचारा की मुला,
आज तू कोणाला मदत केलीस? आज तुझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हास्य
आले? आपण इतरांना मदत करण्याची इच्छा त्याच्यात निर्माण केली पाहिजे,
जर आपण मुलाला अशी प्रेरणा दिली तर जीवनाकडे पाहण्याचा त्याचा
दृष्टीकोनच बदलेल आणि जेव्हा अशी मुले तरुण होतील तेव्हा आपला समाजही
बदलू शकेल.
मुलाला तणाव देऊ नका
मुलांमध्येदेखील प्रौढांसारखा तणाव असतो, परंतु त्यांची तणावाची कारणे वेगळी
असू शकतात. मुलांच्या आसपास वेग-वेगळया प्रकारचे वातावरण असते, ज्याचा
त्यांच्यावर चांगला-वाईट प्रभाव पडतो. त्यांना घर, शाळा, ट्युशन, खेळाच्या
मैदानावर कोठेही तणावाशी सामना करावा लागू शकतो. त्यांच्या जीवनात
बदलदेखील या वेळी खूप वेगवान येत असतात. अशा परिस्थितीत कधी, कोणती
गोष्ट तणावाचे कारण बनेल हे सांगणे कठीण आहे.
आता मुलांच्या पिशव्या पूर्वीपेक्षा बऱ्याच जड झाल्या आहेत. त्यांचे विषयही
वाढले आहेत आणि दरमहा वर्ग चाचणी, युनिट टेस्ट, ट्यूशन टेस्ट इत्यादीचा
दबाव वेगळाच असतो. कुठल्या एखाद्या विषयात चांगली पकड न बसल्यामुळे
तो त्यामध्ये सतत कमकुवत होत जातो. परीक्षेच्या वेळीही ते टेन्शनमध्येच
असतात. सर्व पालकांना त्यांच्या मुलांना प्रथम स्थानावर पहायचे असते. यामुळे
परीक्षेच्यावेळी जास्त अभ्यासामुळे आणि पुरेशी झोप न मिळाल्यामुळे तणाव
त्यांना व्यापून घेतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें