परदेशी शहरं हिवाळी पर्यटनासाठी स्वस्त अन् मस्त

– प्रतिनिधी

जगात अनेक प्रकारचे लोक आहेत. वेगवेगळी विचारधारा आणि पध्दतीचे काही लोक आपलं जीवन निमूटपणे व्यतित करतात. तर काही लोक असेही असतात, ज्यांना केवळ फिरायची आवड असते. अशा प्रकारचे लोक नेहमी संधीच्या शोधात असतात की कधी त्यांना संधी मिळेल आणि कधी ते कुठे फिरायला जातील.

परंतु या सर्वांमध्ये जेव्हा अनेकदा आपण परदेशी पर्यटनाचा विचार करतो, तेव्हा मनात पैशांचा विचार येतो आणि आपण पैशांचं तोंड पाहत राहतो व पैसा खर्च होईल या भीतिने आपण आपला प्लॅन रद्द करतो, पण आता आम्ही आपल्याला सांगतोय की आपणही परदेशी पर्यटनाला जाऊ शकता, तेसुद्धा कमी खर्चात…विश्वास बसत नाहीए ना तुमचा?

तर आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की आता आपण या टेन्शनला निरोप द्या. कारण आपण परदेश यात्रा करू इच्छितो असाल आणि पैसाही समस्या असेल तर आम्ही आपणास  काही शहरांविषयी सांगू इच्छितो, जिथे जाऊन राहणे, खाणे, फिरणे आणि शॉपिंग करणे खूप स्वस्त आहे, परंतु आपल्याला तिथे प्रवासाला जायचं असेल, तर थंडीचा मोसम आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

सेन मिगुएल डे अल्लेन्डे, मॅक्सिको

मॅक्सिकोमध्ये सेन मिगुएल डे अल्लेन्डे खूप सुंदर शहर आहे. नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी हे ठिकाण चांगले व स्वस्त सिध्द होऊ शकते. कारण सुरुवातीला वातावरण कोरडे असते. त्यामुळे इथे सूर्य आणि वातावरणाबाबत विचार न करता, आरामात आपण फिरायला जाऊ शकता आणि शहरातील सुंदर ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.

पॅरिस, फ्रांस

पर्यटकांच्या लिस्टमध्ये पॅरिस सर्वात वरती असतं. परंतु उन्हाळ्यात इथे गर्दीमुळे पर्यटकांना कम्फर्ट झोन कमी मिळतो. तरीही लोकांना इथे जायला आवडतं. थंडीच्या काळात हे ठिकाण खूप कूल असतं. शॉपिंग आणि मौजमस्ती करणाऱ्यांसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे.

काबो सान लुकास, मॅक्सिको

काबो सान लुकास शहरही मॅक्सिकोमध्ये थंडीच्या सुट्टीच्या काळात फिरण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. अशावेळी इथे जास्त गर्दी होण्यापूर्वी आणि वस्तूंच्या किंमती वाढण्यापूर्वी आपण थंडी संपवण्याच्या आत इथे जाऊ शकता. काबोमध्ये आपल्याला मासे पकडणे आणि व्हेल मासा पाहण्याचा गोल्डन चान्स मिळेल.

रिओ डे जेनेरो, ब्राझिल

थंडीच्या महिन्यांत इथे गेल्यावर स्वर्गसुख मिळते. ब्राझिलमध्ये हा एकप्रकारे वसंताचा काळ आहे. अशा वेळी जे लोक जास्त थंडीत फिरायचं टाळतात, अशा लोकांसाठी या मोसमात इथे फिरणे स्वस्त आणि सर्वात चांगले ठरेल. पर्यटकांना इथे समुद्रकिनारी वेळ घालवायला खूप आवडतं.

फोएनिक्स, एरिजोना

पर्यटनासाठी एरिजोनातील हे शहरही खूप चांगले आहे. यावेळी येथील तापमान गरमीच्या तुलनेत खूप कमी होते. त्यामुळे इथे दक्षिण-पश्चिमी शहराच्या पायी प्रवासाने अनोखी दृश्ये पाहायला मिळतील. इथे पर्यटक गोल्फसारखे आउटडोर गेमही खेळू शकतात.

रेकाजाविक, आइसलँड

अमेरिकेतून युरोपच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या पर्यटकांसाठी रेकाजाविक, आइसलँड एक लोकप्रिय आणि सुंदर स्टॉपओव्हर ठिकाण आहे. रेकाजाविक एक मनोरंजक शहर आहे, जे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. इथे स्वस्त उड्डाणाची मजा घेण्याबरोबरच बरीचशी प्रेक्षणीय स्थळेही पाहायला मिळतील.

ऑरलँडो फ्लोरिडा

फ्लोरिडाच्या ओरलँडो शहरात नोव्हेंबरमध्ये तापमान खूप सामान्य असते. पर्यटकांना इथे गरम मोसमाची जाणीव होईल. त्यामुळे सुट्ट्या घालवण्यासाठी हा काळ एकदम परफेक्ट आहे. सुरुवातीला गर्दी कमी असल्याने वस्तू स्वस्त असतात. अशा वेळी आपण येथील डिद्ब्रानी वर्ल्ड पार्कसारख्या ठिकाणी आरामात मस्ती करू शकतात.

पाम स्प्रिंग्स, कॅलिफोर्निया

कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्स शहरही खूप शानदार आहे. लॉस एन्जिल्सपासून एका छोट्याशा ड्राइव्हने इथे जाता येईल. इथे गेल्यानंतर जगापासून दूर एका वेगळ्याच शांतीचा अनुभव येतो. शांतिपूर्ण रेगिस्तान शहरात हॉटेल, रिसॉर्ट्स आणि भाड्याच्या घरांत नोव्हेंबर महिन्यात चांगला वेळ घालवता येईल.

बार्सिलोना, स्पेन

स्पेनचे बार्सिलोनाही जगातील स्वस्त आणि चांगल्या शहरांपैकी एक आहे. इथे समुद्रात डुबकी मारण्याची एक वेगळीच मजा आहे. अर्थात, आपल्याला या मोसमात समुद्रात डुबकी मारायची इच्छा नसेल, तरीही इथे फिरण्यासाठी खूप सारी इतर ठिकाणेही आहेत. अलमुडेना गिरजाघर चर्च त्यापैकीच एक आहे.

बँकॉक, थायलँड

थायलँडच्या बँकॉक शहरातही फिरण्यासाठी थंडीचा महिना चांगला आहे. या मोसमात इथे हलकं ऊन पडतं. एवढंच नव्हे, येथील उड्डाणेही बऱ्यापैकी स्वस्त असतात. त्यामुळे सुट्टीच्या काळात इथे फिरण्याची एक वेगळीच मजा आहे.    निळ्या समुद्राचं सौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें