तरूण दिसण्यासाठी मेकअप टीप्स

– पूनम पांडे

४० शी पार करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मेकअप करायचाच नाही. या वयातदेखील तुम्ही मेकअपच्या योग्य शेड्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण दिसू शकता. ४०+ स्त्रियांनी यंग आणि फ्रेश लुकसाठी त्यांच्या व्हॅनिटी बॉक्समध्ये काय ठेवायचं हे जाणून घेण्यासाठी आम्ही मेकअप आर्टिस्ट मनीष केरकर यांच्याशी बोलणं केलं.

कॉन्फिडन्स वाढवतो मेकअप

मान्य आहे की मेकअप चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतो, परंतु हेदेखील एक सत्य आहे की मेकअप केल्याने आत्मविश्वासदेखील द्विगुणीत होतो. जेव्हा तुम्ही कुठे नटून थटून जाता आणि लोक तुमची स्तुती करतात तेव्हा आपोआप तुमची बॉडी लँग्वेज बदलते कारण त्यावेळी स्वत:ला आत्मविश्वास येतो. म्हणून जेव्हादेखील घराबाहेर पडाल मेकअप करायला विसरू नका.

मेकअपपासून दुरावा का

अनेकदा एकल स्त्रिया खासकरून घटस्फोटिता वा विधवा मेकअप करत नाहीत, उलट त्यांनी असं अजिबात करता कामा नये. डार्क करू नका, परंतु मेकअपच्या लाईट शेड्सने तुमचं सौंदर्यदेखील वाढू शकतं. अशा प्रॉडक्ट्सना मेकअप बॉक्समध्ये खास जागा द्या. फाउंडेशन ऐवजी बीबी वा सीसी क्रीम लावा. यामुळे तुम्हाला नॅचरल लुक मिळेल. ओठांवर लिपबाम लावा. आय मेकअपसाठी काजळचा वापर करू शकता. हे विसरू नका की गर्दीमध्ये तुम्ही उठून दिसण्यासाठी प्रेसेंटेबल दिसणं गरजेचं आहे.

मॉइश्चराय

वाढत्या वयासोबत त्वचादेखील कोरडी होते. अशावेळी त्वचेला गरज असते ती एक्स्ट्रा मॉइश्चरायझरची, जी त्वचेतील ओलावा कमी  करू शकेल. त्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी दिवसा आणि रात्री दोन्हीवेळी मॉइश्चरायझर लावून चेहऱ्याला मॉइश्चराइझ करा. यामुळे त्वचा मऊ मुलायम होईल आणि ग्लोदेखील करेल.

अँटीएजिंग क्रीम

चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या लपविण्यासाठी अँटीएजिंग क्रीमचा वापर करा. यामुळे त्वचा टाईट होईल. तुम्ही हवं असल्यास बाजारात उपलब्ध सीसी क्रीमदेखील वापरू शकता. यामध्ये मॉइश्चरायझर, अँटीएजिंग क्रीम, सनस्क्रीम इत्यादींचे खास गुण असतात. ज्यामुळे तुम्हाला फाउंडेशन, सन स्क्रीन, अँटीएजिंग क्रीम इत्यादी वेगवेगळया लावण्याची गरज पडत नाही.

बेस मेकअप

* बेस मेकअपसाठी फेस पावडर वापरू नका. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसून येतात.

* परफेक्ट बेससाठी मॅट फिनिशचं लिक्विड फाउंडेशन वापरा.

* जर तुम्हाला कन्सिलर वापरायचं असेल तर फाउंडेशनऐवजी कन्सिलरदेखील लिक्विड बेस्ड विकत घ्या.

फाउंडेशन

* यंग लुकसाठी मॉइश्चरायझर युक्त फाउंडेशन विकत घ्या. हे कोरडया त्वचेला मुलायमपणा देतं.

* त्वचेला शायनी इफेक्ट देण्यासाठी हलक्या पिवळया शेडचं फाउंडेशन लावा.

* पूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याची चूक करू नका. हे फक्त चेहऱ्यावर उभारलेल्या फाईन लाइन्स, रेडनेस, ब्राऊन स्पॉट इत्यादी लपविण्यासाठीच वापर करा.

* थिक फाउंडेशनच्या वापराने तुमच्या फाईनलाईन्स दिसू शकतात. त्यामुळे लाईट वेट फाउंडेशन विकत घ्या.

मानेचा मेकअप

* हे वयात फक्त बेस मेकअपने काम चालणार नाही, परफेक्ट लुकसाठी तुमच्या मानेचा मेकअपदेखील करणे गरजेचे आहे.

* बेस मेकअपप्रमाणे मानेच्या मेकअपसाठीदेखील मान आणि बस्ट एरिया, जर तुम्ही डीप नेकचा ड्रेस घालणार असाल तर फाउंडेशन लावा.

आय मेकअप

* आयशॅडो लावण्यापूर्वी प्रायमर लावून आय मेकअपला परफेक्ट बेस द्या. यामुळे फाईन लाईन्स दिसू शकणार नाहीत.

* प्रायमरप्रमाणे परफेक्ट बेससाठी कन्सिलरदेखील लावू शकता, परंतु हे डोळयाच्या चाहूबाजूनी नाही तर फक्त डोळयाच्या खालच्या भागावर लावा म्हणजे डार्क सर्कल्स लपून जातील.

* चांगल्या परिणामासाठी कन्सिलरमध्ये थोडीशी आयक्रीम मिक्स करून अप्लाय करा.

आय शॅडो

* डार्क आय मेकअप करू नका. यामुळे तुमचं वय अधिक दिसून येईल.

* मॅट फिनिशच क्रीम बेस्ड आय शॅडो वापरा.

* फुल शिमर शेडऐवजी शॅम्पन आय शॅडो लावा. हे तुम्हालाच यंग लुक देईल.

* पूर्ण पापण्यांवर आय शॅडोचा कोणतंही डार्क कलर लावू नका. होय, डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन लावू शकता.

* ब्राईट आयशॅडोचा वापर करू नका यामुळे सुरकुत्या दिसून येतील.

ब्लॅक आयलाइनर

* ब्लॅक आयलाइनरऐवजी तुमच्या व्हॅनिटी बॉक्समध्ये डीप ब्राऊन शेडचं आयलाइनर ठेवा.

* लिक्विड आयलायनरचा वापर तुमच्या आय मेकअपला हेवी लुक देऊ शकतो. म्हणून लॅक्मेचं पेन्सिल आयलाइनर विकत घ्या. यामुळे सॉफ्ट लुक मिळेल.

* नॅचरल लुकसाठी आयलाइनर फक्त डोळयांच्या वरच्या आयलीडवर लावा. खालच्या आयलीडवर लावू नका. लायनरने पापण्याच्या कोपऱ्यात आणून वरच्या दिशेने लावा. यामुळे डोळे मोठे आणि आकर्षक दिसून येतील.

करर्ली आयलॅशेज

* वाढत्या वयाबरोबरच आयलॅशेज कमी होतात म्हणून मस्कारा लावून आईलॅशेजला कर्ल करायला विसरू नका.

* डिफरंट लुकसाठी ब्लॅक वा ब्राऊनऐवजी ग्रे रंगाचा मस्कारा लावा.

* ट्रान्सपरंट मस्कारा लावूनदेखील आयलॅशेज कर्ल करू शकता.

* कलरफुल वा ब्राईट शेड्सचा मस्कारा लावू नका.

लिपस्टिक

* ओठांची त्वचा खूप नाजूक असल्यामुळे ती लवकर कोरडी दिसून येते. ती मुलायम बनवण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर व्यासलीन लावा.

* जर लीपला शेप देण्यासाठी लीप लायनरचा वापर करत असाल तर लक्षात ठेवा की यासाठी लाइनरची शेड लिपस्टिकच्या एक शेड लाईट असावी.

* नैसर्गिक आणि डीप शेड लिपस्टिकऐवजी दोन्हीच्या मधली शेड  निवडा.

* मॅटऐवजी क्रिमी लिपस्टिक विकत घ्या. ही ओठांना सॉफ्ट टच देईल.

* लिपस्टिकसाठी ब्राऊन, बर्गंडीसारख्या डार्क शेड निवडू नका. लाईट शेड्सना महत्व द्या.

चीक मेकअप

* वाढत्या वयाबरोबरच चेहऱ्याचं फॅट कमी होतं. अशावेळी चीक बोनला हायलाईट करून तुम्ही आकर्षक लुक मिळवू शकता.

* चिक्ससाठी पावडर नाही, तर क्रीम बेस्ड मॅट ब्लशरचा वापर करा.

* पीच, पिंकसारखे ब्लशर तुम्हाला यंग लुक देऊ शकतात.

हायलाईटरने लपवा सुरकुत्या

मेकअप पूर्ण झाल्यानंतरदेखील जर सुरकुत्या दिसत असतील तर त्याला लपविण्यासाठी हायलाईटरचा वापर करा, परंतु हे पूर्ण चेहऱ्यावर लावण्याची चूक करू नका, फक्त तिथेच लावा जिथे सुरकुत्या दिसत आहेत. जर तुम्ही सावळया असाल तर शॅम्पन शेड आणि गोऱ्या असाल तर गोल्डन बेज कलरचं हायलाईटर विकत घ्या.

नेहमी रहाल तरूण अणि सुंदर

* पारुल भटनागर

कोरोना काळात आपण विशेषत: तरुणाईने त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटले की, आता आपण घरीच आहोत, कुठेही जात नाही, कोणाला भेटत नाही, तर मग त्वचेची काळजी घेतली नाही तरी काय फरक पडणार? पण त्यांची हीच विचारसरणी त्यांची त्वचा खराब करण्याचे काम करते, हे त्यांना माहीत नसते.

फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिल्टरची मदत घेऊन स्वत:ला सुंदर दाखवून इतरांकडून ते स्वत:चे कौतुक करून घेतात, पण वास्तव यापेक्षा खूपच वेगळे असते. म्हणूनच जर तुम्हाला कायम नैसर्गिकरित्या तरुण आणि सुंदर त्वचा मिळवायची असेल, तर आधीच सावध व्हा, अन्यथा तारुण्यातच तुमची त्वचा वयाच्या ६० वर्षांसारखी दिसू लागेल. चला तर मग, स्वत:ला तरुण कसे ठेवायचे ते जाणून घेऊया :

सुरकुत्यांची समस्या कधी निर्माण होते?

वयाच्या २० व्या वर्षी, त्वचा तारुण्यात असते. त्वचेवर समस्या कमी आणि चेहऱ्यावर चमक, तेज तसेच आकर्षकपणा जास्त असतो. मात्र या वयात त्वचेकडे दुर्लक्ष झाल्यास बारीक रेषांसोबतच चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागतात.

जेव्हा आपल्या त्वचेच्या वरच्या थराला आधार देणाऱ्या कोलेजन आणि इलास्टिन नावाच्या प्रथिनांचा थर कमी होऊ लागतो तेव्हा त्वचेवर सुरकुत्या पडतात. यामुळे त्वचा आर्द्र्रता आणि सौंदर्य गमावते. म्हणूनच सुरकुत्यांपासून दूर राहण्यासाठी त्वचेच्या काळजीसोबतच पौष्टिक खाण्याची सवय स्वत:ला लावून घ्या.

तणावाला ठेवा स्वत:पासून दूर

सध्या घर असो किंवा नोकरी, सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. काहींना या महामारीत आपल्या माणसांना गमावल्याचे दु:ख आहे. कोणाला भविष्याची चिंता आहे तर कोणाला नोकरी जाण्याची भीती आहे. खासकरून तरुणवर्ग जास्त काळजीत आहे आणि हीच काळजी त्यांचे आरोग्य बिघडवत आहे.

आपल्या शरीरात कार्टीसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन असते. आपण सतत चिंतेत राहिल्यास त्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे चेहऱ्यावर पुळया, सुरकुत्या येतात. मेटाबॉलिज्म असंतुलित होऊ लागते. त्यामुळे वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच शक्य तेवढा सकारात्मक विचार करून तणावापासून दूर राहा, अन्यथा हा तणाव तुमच्या चेहऱ्यावरील चमक नाहीशी करेल.

घरगुती उपायही प्रभावी

वेळेआधीच म्हातारे दिसावे, असे कोणालाच वाटत नाही. त्यामुळेच घरगुती उपचार केल्यास हे उपाय थोडयाच दिवसांत सुरकुत्या दूर करून त्वचेवरील हरवलेले तारुण्य तुम्हाला पुन्हा मिळवून देतील.

* दररोज अॅलोवेरा जेलने त्वचेची मालिश केल्यास चेहरा चमकू लागेल. त्वचेवर कोलेजन वाढल्यामुळे त्वचा हायड्रेड राहील. सोबतच सुरकुत्याही कमी होतील.

* केळे आरोग्यासाठी चांगले असते, सोबतच ते त्वचेचे रुपडे पालटते. यामागचे कारण म्हणजे त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते, शिवाय ते नैसर्गिकरित्या डिटॉक्स करून चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करते. त्यासाठी तुम्ही केळयाची पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने धुवा. काही आठवडयांतच तुम्हाला फरक दिसेल.

* खोबरेल तेलात मॉइश्चराइज आणि हायड्रेड करणारी तत्त्वे असल्यामुळे ते त्वचेची लवचिकता वाढवून त्वचा मुलायम बनवते. त्यासाठी तुम्ही दररोज रात्री खोबरेल तेलाने मालिश करून सकाळी चेहरा धुवा. यामुळे हळूहळू सुरकुत्या कमी होऊन चेहरा उजळेल.

* ऑर्गन ऑइल सौम्य असल्यामुळे त्वचेमध्ये सहज शोषले जाते. सोबतच यात फॅटी अॅसिड आणि ई जीवनसत्त्व असल्यामुळे ते सुरकुत्या दूर ठेवते. त्यासाठी तुम्ही रात्री चेहऱ्यावर ऑर्गन ऑइल लावून मालिश करा. महिन्याभरात तुम्हाला फरक जाणवू लागेल.

काही खास सवयी ज्या सुरकुत्यांपासून ठेवतील दूर

तुम्ही बाहेर जात नसला तरी दररोज सीटीएम म्हणजे क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग करायलाच हवे. यामुळे त्वचेवर जमा झालेली अस्वछता दूर होऊन त्वचेवरील पीएचची नैसर्गिक पातळी टिकून राहते. ती त्वचेला तरुण ठेवण्याचे काम करते.

अनेकदा असा विचार केला जातो की, घराबाहेर जायचे नसल्यामुळे सनस्क्रीन लावण्याची गरज नाही. प्रत्यक्षात असा विचार करणे चुकीचे आहे, कारण आपण स्मार्ट डिव्हाइसमधून येणारा निळा प्रकाश, अल्ट्राव्हायोलेट किरण यांच्या संपर्कात येतोच. त्यामुळे कोलेजन, इलास्टिक टिश्यूवर आघात होतो आणि वयापूर्वीच त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. म्हणूनच सनस्क्रीन अवश्य लावा.

* त्वचेची जळजळ करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळा, कारण यामुळे त्वचेवरील नैसर्गिक मॉइश्चर आणि चमक गायब होते. सुरकुत्यांची समस्या निर्माण होते.

* मेकअप व्यवस्थित काढल्यानंतरच झोपा, अन्यथा मेकअपमध्ये वापरली जाणारी नैसर्गिक द्रव्ये वय होण्याआधीच सुरकुत्या येण्यासाठी कारणीभूत ठरतात.

* तळलेल्या पदार्थांऐवजी पौष्टिक आहार घ्या. यामुळे तुमची त्वचा अंतर्बाह्य उजळेल.

* शक्य तेवढे साखरेचे प्रमाण कमी करा, कारण रक्तातील साखर वाढल्यामुळे  सुरकुत्या येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें