नोकरदार महिलांसाठी ऑनलाईन शिक्षणाचं आव्हान

* गरिमा पंकज

अलीकडच्या काळात कोव्हिड -१९ मुळे मुलांच्या शाळा बंद आहेत आणि त्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. इकडे नोकरदार महिलांना स्वत:च्या ऑफिसची कामेदेखील घरीच करावी लागताहेत. पूर्वी महिला मुलांना शाळेत वा खेळायला पाठवून आरामात आपापली कामे करत असत, मात्र आता मुलं सतत घरीच असतात. यामुळे नोकरदार महिलांना स्वत:च्या कामाबरोबरच मुलांच्या ऑनलाईन क्लासेसवर लक्ष ठेवणं तेवढं सहजसोपं राहीलेल नाहीए. ना त्या स्वत:च काम सोडू शकत ना मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकत. यामुळे त्या द्विधा मनस्थितीत अडकल्या आहेत.

चला तर जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी :

* सर्वात मोठं आव्हान म्हणजे आईने स्वत:च्या ऑफिसचं काम करायचं की मुलांचा ऑनलाईन अभ्यास व्यवस्थित चालला आहे की नाही याकडे लक्ष द्यायचं.

* अनेकदा मुलं अभ्यासाऐवजी दुसऱ्या साईट्स चालू करून त्याच पाहत बसतात. ती लॅपटॉप वा फोनवर चुकीच्या गोष्टी पाहू शकतात. त्यांचं मन एकाग्र होत नाही आणि अनेकदा ती ऑनलाईन क्लास बुडवून वा क्लास संपवून गेम्स खेळू लागतात.

* ऑनलाईन वर्गाच्या दरम्यान मुलांच्या डोळयांवरदेखील परिणाम होतो. प्रकाशयोजना  व्यवस्थित नसेल वा वर्ग अधिक वेळ चालत असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो.

* मुलांचे क्लासेस आणि घरातील कामाबरोबरच स्वत:च्या ऑफिसची कामे करणं खूपच आव्हानात्मक काम आहे.

यासंदर्भात किंडरपासच्या फाउंडर शिरीन सुलताना यांच्याशी याबाबत विस्ताराने चर्चा झाली. त्यांनी सुचविलेले काही खास उपाय खालीलप्रमाणे :

मुलांचं मन अभ्यासात एकाग्र होण्यासाठी

मुलांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये यासाठी पॅरेंटिंग कन्ट्रोल फीचर्सचा वापर करायला हवं. तुम्ही लॅपटॉप वा मोबाईलच्या  सेटिंगमध्ये काही बदल करून मुलांच्या चुकीच्या साईट्स पाहण्यावर तसंच गेम्स यावर नियंत्रण ठेवू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला ज्या साईट्स वा गेम्सपासून मुलांना दूर ठेवाworking women time management for kids studiesयचंय त्या  ब्लॉक करून ठेवा. सर्चइंजिन म्हणजेच गुगल, बिंग इत्यादींचे प्रेडिक्टिव्ह टेस्ट ऑप्शन बंद करा. यामुळे यामध्ये सर्च करतेवेळी ऑटो सेशनच फिचर चालू होणार नाही आणि मुलं सर्च करतेवेळी दुसरं काही पाहू शकणार नाहीत. मुलांचं लहान वय पाहता तुम्ही गुगल ऐवजी मुलांना सर्च इंजिनचा वापर करायला शिकवा. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. यामध्ये कोणतंही चुकीचं कन्टेन्ट नसतं.

अधूनमधून स्वत:च्या कामातून ब्रेक घेऊन मुलांवर लक्ष ठेवत रहा. ते काय वाचताहेत आणि त्यांना त्यातील काय समजतंय याकडे लक्ष ठेवा. लॅपटॉप, फोन इत्यादींची हिस्ट्री चेक करत रहा, यामुळे मुलांनी चुकीची साईट तर खोलली नाहीए ना हे समजेल. या वाईट गोष्टींपासून दूर राहावं, चुकीची लिंक ओपन करू नये आणि फॉरवर्डदेखील करू नये हे मुलांना समजावून सांगा. यामुळे डोक्यात आणि लॅपटॉप /फोनमध्ये वायरस घुसू शकतो. प्रायवसी कशी सांभाळायची हे त्यांना समजावून सांगा.

घरातल्या घरात कामाची वेगळी जागा बनवा

स्वत:चं काम आणि मुलांच्या अभ्यासासाठी विचारपूर्वक जागेची निवड करा. मुलांची एकाग्रता टिकून रहावी यासाठी योग्य प्रकाशयोजना करावी. घरातच त्यांना शाळेच्या वर्गासारखं वाटावं यासाठी ही जागा त्यांच्या झोपण्याच्या, खेळण्याच्या जागेपासून दूर असावी. या जागी खेळणी वगैरे नसावीत. योग्य वातावरणात मुलं रमतील आणि त्यांना शाळेच्या वर्गासारखंच वाटेल.

डिवाइस तयार करा

उत्तम ऑनलाईन शिक्षणासाठी वायरलेस कनेक्शन गरजेचं आहे. योग्य कनेक्शनची निवड करा, ज्याच बँडविड्थ तुमचं काम आणि मुलांचं शिक्षण यासाठी मदतनीस ठरेल. अक्षरं वाचतेवेळी डोळयांना त्रास होणार नाही अशा स्क्रीनची निवड करा. तुमचं काम आणि मुलांच्या ऑनलाईन वर्गाची वेळ एकच असेल तर ऑडिओ सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये हे सुनिश्चित करा. यासाठी तुम्ही हेडफोन्सचादेखील वापर करू शकता.

दिनचर्या आणि शिस्त

लॉकडाऊनमुळे लोकांच्या खूपच बदल झालाय. सध्या सगळंच थंडावलंय. मात्र घरातदेखील शाळेसारखी दिनचर्या बनवून तुम्ही मुलांचं आयुष्य घडवू शकता. मुलांना वेळेत जागे करा. वर्गाची वेळ सुरु होण्यापूर्वीच नाश्ता द्या, दिवसाच्या टाइमटेबल नुसार त्यांची पुस्तकं काढून ठेवा. वर्ग सुरु असताना मुलाला वारंवार उठायला लागू नये याची काळजी घ्या. संघ्याकाळचा थोडा वेळ घरच्या अभ्यासासाठी राखून ठेवा. अशाप्रकारची शिस्त लावणं तसं कठीणच आहे, मात्र त्याची सवय लावली तर आयुष्य नक्कीच सहजसोपं होऊन जाईल.

ब्रेक घेण्यासाठी वेळ ठरवून ठेवा

मुलांची खासकरून लहान मुलांची एकाग्रता २५ मिनिटापेक्षा अधिक काळ टिकत नाही. यासाठी मुलांना ब्रेकच्या दरम्यान एखाद्या पाळीव प्राण्यांसोबत खेळायला सांगा, थोडावेळ चालायला वा फिरायला तसेच घरातील लोकांसोबत वेळ घालवायला सांगा. अशाप्रकारचा छोटासा ब्रेक तुम्हाला आणि तुमच्या मुलाला ताजतवानं करेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल.

मुलांच्या गरजा समजून घ्या

प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही मुलांना ऑनलाईन क्लासेस सोपे पडतात तर काहींना यापेक्षा अधिक मार्गदर्शनाची गरज असते. प्ले स्कूल वा लहान वर्गातील मुलांना सकाळी क्लास सुरु होताच दिवसभर शिकविल्या जाणाऱ्या विषयांची माहिती दिली जाते. अशावेळी शक्य झाल्यास मुलांसोबत रहा. यामुळे तुम्ही मुलांच्या गरजेनुसार पूर्ण दिवस तयार रहाल. तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाची क्षमता योग्यप्रकारे जाणता. मुलांचा अभ्यास छोटयाछोटया भागांमध्ये करून घ्या आणि मुलं कोणत्यावेळी अधिक उत्साही असतात ती वेळ साधून अभ्यास घ्या.

डोळयांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

अलीकडे अनेक पालक मुलांना अधिक काळ स्क्रीनसमोर राहावं लागतं म्हणून चिंतीत आहेत. मुलांमध्ये डोकेदुखी, डोळेदु:खीसारख्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यासाठी २०:२०:२० हा सहजसोपा उपाय आहे. दर २० मिनिटानंतर २० सेकंदासाठी २० फूट अंतरावरील एखाद्या वस्तूकडे एकटक पाहत रहा.

ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम मुलांच्या डोळयावर होऊ नये यासाठी मुलांचा स्क्रीनटाइम निश्चित करा. अभ्यासानंतर त्वरित टीव्ही वा व्हिडीओमध्ये गुंतवून ठेवू नका. त्यांना अधूनमधून स्क्रीनपासून दूर ठेवा. यासाठी तुम्ही स्वत: मुलांसोबत कॅरम, चेस, बॅडमिंटनसारखे खेळ खेळू शकता वा त्यांना बाहेर दुसऱ्या मुलांसोबत खेळण्यासाठी पाठवू शकता. तुम्ही दररोज तासभर एखादं पुस्तकं वाचून दाखवू शकता वा त्याला स्वत:ला वाचायला सांगू शकता. व्हिडीओ कॉल करून नातेवाईकांशी बोलायला द्या वा शुभेच्छा कार्ड बनवायला सांगा. तुम्ही कडक शिस्तीचे पालक बनण्याऐवजी मुलाचे मित्र बनून रहा.

मुलांना डोळयांचे व्यायाम करण्यास तसंच थोडयाथोडया वेळाने बागेत फिरून येण्यासदेखील सांगा. तुम्ही अधूनमधून ऑनलाईन अभ्यासाच्या दरम्यान मुलांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवत रहा. वर्ग संपल्यानंतर त्यांना सोबत बसवून आज कायकाय शिकवलं गेलय आणि काय समजलं नाहीए हे आवर्जून विचारा. दर आठवडयाने अभ्यास घेण्याऐवजी दररोज अभ्यास घ्या. मुलांना शिक्षक तसंच मित्रांसमोर अजिबात ओरडू नका, वर्ग संपल्यानंतर मात्र काय योग्य आहे काय चुकीचं आहे हे आवर्जून सांगा.

शिक्षक, पालक आणि मुलांसाठी घरून शिक्षण हे शिक्षणाचं एक नवीन पद्धत बनलीय. यासाठी सकारात्मक रहा आणि संयम ठेवा. एकत्रित मिळून परिस्थिती अनुकूल बनवू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें