४०शीनंतर मिळवा अपार आनंद

* डॉ. नीरजा श्रीवास्तव नीरू

एकटी असण्याचे कारण जे काही असेल म्हणजे अविवाहित असेल, घटस्फोटिता असेल किंवा विधवा. जर आर्थिक रूपात सक्षम असाल तर स्वत:ला आनंदीच माना. इतक्या वर्षांचा अनुभव आहे तुमच्याकडे. हीच वेळ आहे जेव्हा स्वत:च्या हिमतीवर योग्य निर्णय घेऊन आपल्या जीवनाला तुम्ही आनंदी बनवू शकता. स्वत:ची स्वत:ला ओळखून जगात तुमची ओळख बनवू शकता. आर्थिक रूपात सक्षम नसाल तरीदेखील घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतंत्र आहात.    स्वत:ला अनुकूल काम करून कमाई करू शकता. तुमचे रुटीन ठरवू शकता कि तुम्हाला तुमचा वेळ स्वत:च्या पद्धतीने कसा व्यतीत करायचा आहे. कसे आनंदी राहू शकता. बस यासाठी टाईम मॅनेजमेंट गरजेचे आहे. सदैव काही चांगले शिकण्याची प्रबळ इच्छा आणि तुमचा हेतू तुमच्या व्यक्तिमत्वाचे साच्यात घाला. तुमचा विचार, तुमची दृष्टी सकारात्मक ठेवून खालील मुख्य गोष्टींसाठी वेळेचे नियोजन अवश्य करा :

* कामाचा वेळ

* आरोग्यासाठीचा वेळ

* छंदांसाठीचा वेळ

* शेजारी नातेवाईक आणि मित्रांसाठीचा वेळ

* मनोरंजनाचा वेळ

* सामाजिक कार्यांसाठीचा वेळ

यात सगळयात प्रथम आहे कामकाजासाठीचा वेळ. जर तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्या व्यवसायात आहात तर त्यासाठी वेळ आधीच ठरलेला असावा. चांगले असेल की त्याच्या तयारीचा वेळदेखील तुम्ही जरूर निर्धारित करा, जसे की काय घालायचे आणि घेऊन जायचे आहे. हे सगळयात आधीच तयार ठेवा. आवश्यक पेपर्स, फाईल, फोटोकॉपी इत्यादी. जर काम करीत नसाल आणि आर्थिक स्थिती योग्य नसेल तर आपल्या अनुरूप एखादे काम नक्की करू लागा किंवा छोटा-मोठा व्यवसाय करा, जेणेकरून तुमचा वेळ आणि घर दोन्हीही सुव्यवस्थित होऊ शकेल.

स्वत:साठीचा वेळ

नंतर येतात घराबाहेरची कामे. रोजची कामे म्हणजे जेवण बनवणे, झाडांना, कुलरमध्ये पाणी घालणे, वाणसामान, भाजीपाला आणणे किंवा मागवणे, साफसफाई करणे करवून घेणे, बिले जमा करणे, बँकेत जाणे इत्यादी यांसाठीदेखील वेळ निश्चित करा.

सकाळी एक तास आरोग्यासाठी देणे तुम्हाला पूर्ण दिवस स्फूर्तीमय ठेवेल. नियमित जो काही अनुकूल वाटेल असा व्यायाम अवश्य करा आणि संपूर्ण दिवसासाठी चार्ज व्हा. स्वस्थ मन, मेंदू, शरीर असेल तर तुम्ही खुश राहाल. सकारात्मक ऊर्जा आपल्याला चांगले आणि योग्य कार्य करण्यात सहकार्य करते हे सगळयांनाच ठाऊक आहे.

छंदांची सोबत

काही छंद तर असे असतात की त्यांच्यासोबत छोटी छोटी कामेदेखील उरकली जाऊ शकतात, जसे संगीत ऐकण्यासोबत डस्टिंग, टेबल अरेंजमेंट, कुकिंग इत्यादी काहीही आनंदाने करू शकता. हो, पुस्तके वाचणे, पेंटिंग, नृत्य, फिरणे, काही नवे शिकणे इत्यादींसाठी तुम्हाला वेगळा वेळ काढायलाच हवा, मग तो अर्धा तास का असेना. तुम्ही अनुभवाल की तुमच्यामध्ये ऊर्जेचा अनोखा प्रवेश होत आहे. छंदांची सोबत आहे तर मग तुम्ही एकटया कुठे आहात. तुमचे सारे विश्व तुमच्या सोबत असेल.

नातेवाईक आणि मित्रांसाठीदेखील थोडासा वेळ काढा. एखाद्या आपल्या माणसासोबत बोलून सुख-दु:ख शेअर करा. कधी फोनवर, तर कधी भेटून सकारात्मक गप्पा मारा. कधी त्यांच्यासोबत फिरण्यासाठी जा, बिनधास्त शॉपिंग, मौजमस्ती करा. आवडत्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप बनवा. गंभीर विषयांवरदेखील विचारांची देवाण-घेवाण करा आणि आपल्या प्रेरक अनुभवांना व्यक्त करा.

आनंदाची किल्ली

मनोरंजन आणि जगाशी जोडले राहण्याचा वेळदेखील आपल्या रूटीनमध्ये अवश्य ठेवा. यासाठी सगळयात सोपे माध्यम टीव्ही आहे. अर्धा पाऊण तासाचा वेळदेखील पुष्कळ आहे. असे करून तुम्ही स्वत:ला अपडेट ठेवा आणि शेवटचे प्रमुख कार्य, जे आनंदाची किल्ली आहे ते आहे सामाजिक कार्य. तुम्ही आठवडयातून एकदा नक्कीच समाजाच्या भल्यासाठी काही वेळ काढा. मग ते गरीब, अनाथ मुले, वयस्कर, असहाय्य स्त्रिया, अनाथ पशुपक्षी यांच्या कोणाच्यादेखील भल्याचे काम का असेना किंवा भ्रष्टाचार विरोध, व्यसनमुक्ती इत्यादी कोणत्याही मुद्दयावर कार्य करा.

आणखीदेखील पुष्कळ काही आहे चाळीशीच्या पल्याड. घाबरू नका. मग पहा तुम्ही एकटया कुठे आहात? बिनधास्त आनंद साजरा करा, चांगल्या कामांमध्ये हिरीरीने सहभाग घ्या, काही चांगले शिका, शिकवा. एंजॉय करा. जीवन व्यतीत करू नका, जीवन जगा. आनंद शोधा.

जेव्हा तुम्ही करता घरातून काम

* एनी अंकिता

वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करणे. हल्ली वर्क फ्रॉम होमची संकल्पना फार वेगाने विस्तारत आहे. कंपन्या फ्लेक्सिबल ऑप्शन्स देत आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार काम करू शकता. पण जेव्हा घरून काम करायचे असते, तेव्हा सर्वप्रथम एकच विचार आपल्या डोक्यात येतो की, मनात येईल तेव्हा, मनाप्रमाणे करायचे. मान्य की इथे तुम्हाला कोणाचीही रोकटोक नसते. पण इथेही काम करण्याचे काही शिष्टाचार असतात. जर तुम्ही ते पाळले नाहीत तर तुम्ही ताणमुक्त होऊन योग्य पद्धतीने कामच करू शकणार नाही.

जेव्हाही तुम्ही घरून काम कराल, तेव्हा कामाच्या बाबतीत हे शिष्टाचार जरूर पाळा :

वर्क शेड्युल जरुरी आहे : घरातून काम करताना आपण कोणतीही गोष्ट कुठेही लिहून ठेवतो आणि नंतर ती शोधण्यात नाहक आपला वेळ वाया घालवतो. यासाठी वर्क शेड्युल तयार करा, ज्यामुळे तुम्हाला कल्पना असेल की कोणते काम कधी संपवायचे आहे, कोणते काम तुम्ही पूर्ण केले आहे आणि कोणते काम आता पूर्ण करायचे आहे. असे केल्यामुळे तुम्ही कमी वेळेत अधिक काम करू शकता.

नियमित कामाचे तास : कधीही उठून कामाला सुरुवात केली असे करू नका, यामुळे तुमची तब्येत बिघडेल आणि कामावरही त्याचा परिणाम होईल. यामुळे कामासोबतच तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी कामाची वेळ निश्चित करा आणि त्यानुसार काम करा. असे केल्यामुळे तुम्ही योग्य रीतीने काम करून कुटुंबासोबत मौजही करू शकता.

शिस्तीचे पालन करा : काम करताना चॅटिंग किंवा फोनवर गप्पा मारणे हे टाळा. शिस्तीचे पालन करा, कारण जोपर्यंत तुम्ही शिस्त अंगी बाणवत नाही तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाही तोवर ही गोष्ट तुमच्या मित्रपरिवार आणि नातलगांनाही सांगून ठेवा जेणेकरून ते तुम्ही फ्री असल्याचे समजून कामाच्या वेळेस येऊन डिस्टर्ब करणार नाहीत.

काम वेळेवर पूर्ण करा : काहीतरी बहाणे करून काम टाळू नका. असे केल्यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. खरतर वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या संपर्कात राहा : तुम्ही घरून काम करता, तुम्हाला ऑफिसला जाण्याची गरज नाही, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांना भेटणे सोडून दिले पाहिजे, उलट तुमच्या क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात राहा जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळत राहील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें