टीनएज ब्राची निवड करण्यापूर्वी

* एनी अंकिता

टीनएजमध्ये प्रामुख्याने नेहमीच होणारी चूक म्हणजे, कोणत्याही पेहरावावर कोणतीही ब्रा वापरली जाणे. तुम्ही म्हणाल, काय फरक पडतो… परंतु आपण हे जाणून घेणं आवश्यक आहे की, कोणत्या पेहरावावर कोणती ब्रा वापरली पाहिजे. जरा विचार करा, तुम्ही एक छानसा महागडा ड्रेस घातलाय आणि त्यासोबत एक जुनी साधी ब्रा घातलीय… कसे दिसेल. खरे तर तुम्हाला त्याच्या जोडीने एक पॅडेड ब्रा घातली पाहिजे. अन्यथा तुमचा लूक अट्रॅक्टिव्ह वाटणार नाहीच आणि मग आपला मूडही जाईल.

अशा वेळी आईने विचार केला पाहिजे की, तुम्ही आपल्या टीनएज मुलीसाठी जेव्हा शॉपिंगला जाल, तेव्हा त्यांच्यासाठी वेगवेगळया व्हरायटी व डिझाइन्सच्या ब्रा जरूर खरेदी करा जेणेकरून ब्राच्या फॅशनमध्ये त्या अपडेट राहातील.

टीशर्ट ब्रा : टीशर्ट ब्रामध्ये शेप देण्यासाठी हलकासा पॅड लावलेला असतो. ही आरामदायक असतेच, पण यामुळे क्लिन लूक मिळतो. खासकरून आपण जेव्हा फिटिंगचा व पातळ ड्रेस परिधान करता तेव्हा.

स्ट्रॅपलेस ब्रा : नावावरून तुम्हाला कळले असेल, यामध्ये स्ट्रॅप नसतात. जर तुम्ही स्ट्रॅपलेस ड्रेस, टँक टॉप, हॉल्टर नेकचा ड्रेस परिधान करत असाल, तर या ब्राची निवड करा. स्ट्रॅपलेस ब्रा खरेदी करताना हे जरूर लक्षात घ्या की, ब्राची साइड आणि मागची पट्टी रुंद असावी. जेणेकरून ब्रा आपल्या योग्य जागी टिकून राहून तुम्हाला योग्य फिटिंग देईल.

पुशअप ब्रा : टीनएज तरुणी विचार करतात की, त्यांना पुशअप ब्राची काय गरज आहे. परंतु आपली फिगर चांगली दिसावी, असे वाटत असेल, तर आपण ही ब्रा अवश्य वापरा. या ब्रामध्ये जेलयुक्त कप लावलेले असतात, जे ब्रेस्टला उभार देतात. ही वेगवेगळया डिझाइन्स, कलर, प्रिंट व लेसवर्कमध्ये मिळते.

वायरलेस ब्रा : ही खूप आरामदायक असते. जर तुम्हाला अंडरवायर ब्रामध्ये कंफर्टेबल वाटत नसेल, तर हे आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ही टॉप, ड्रेस, स्वॅट शर्टवर चांगली दिसते.

पॅडेड ब्रा : ही त्या मुलींसाठी परफेक्ट आहे, ज्याचे ब्रेस्ट छोटे आहेत. या ब्रामुळे ब्रेस्टला उभार मिळतो. पॅडेड ब्रामुळे लो कट ड्रेसमध्येही आपले क्लीवेज तसेच दिसतील, जसे मोठे ब्रेस्ट असलेल्या मुलींचे दिसतात.

मिनिमायजर ब्रा : ही त्या मुलींसाठी उपयुक्त आहे, ज्यांची बॉडी थोडी कर्व आणि ब्रेस्ट थोडे मोठे असतात. ही ब्रा त्यांच्या कप साइजला थोडे कमी दाखवून उत्तम लूक देतात.

रिमूव्हेबल पॅडिंग ब्रा : या ब्रामध्ये एक पॉकेट असते, ज्याच्यात गरजेनुसार पॅड घातले जातात. ही त्या तरुणींसाठी योग्य आहे, ज्यांना रोज पॅडेड ब्रा घालायची इच्छा नसते. केवळ खास प्रसंगीच त्या पॅड वापरतात.

सिलिकॉन पॅडिंग : ही ब्रा सरळ स्किनला लावली जाते. ही स्किनसारखी मऊ असते. ही घातल्यानंतर आपल्याला हिची जाणीवही होत नाही. ही तुम्ही बॅकलेस ड्रेस, सेंटर कट ड्रेससोबतही वापरू शकता. आपल्या वॉर्डरोबमध्ये ही जरूर ठेवा.

फॅब्रिकवरही लक्ष द्या : या वयात त्वचा बरीच संवेदनशील व कोमल असते. काही तरुणींना सिंथेटिक फॅब्रिकमुळे अॅलर्जी होऊ शकते. म्हणून कॉटन फेब्रिकने बनलेल्या इनरवेअरची निवड करा. फॅब्रिककडे लक्ष देण्याबरोबरच हेही लक्षात घ्या की, ती ब्रा किती टिकावू व फॅशनेबल आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला आतून आत्मविश्वास येणार नाही, तोपर्यंत तुम्ही बाहेरून सुंदर दिसणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें