पावसाळ्यातील गरमागरम मेजवानी

* पाककृती सहकार्य : ओम प्रकाश गुप्ता

  • पिनट पकोडा

साहित्य

*  १ कप शेंगदाणे

*  १ मोठा चमचा बेसन

*  १ छोटा चमचा बारीक चिरलेलं आलं

*  १ छोटा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची

*  १ छोटा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

*  चिमूटभर हळद

*  अर्धा छोटा चमचा लाल तिखट

*  १ छोटा चमचा धणे पावडर

*  अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर

*  तेल गरजेपुरतं

*  मीठ चवीनुसार.

कृती

शेंगदाणे व तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्रित करा आणि पुरेसं पाणी टाकत घट्ट पेस्ट बनवा. कढईत तेल गरम करा. शेंगदाणे या पेस्टमध्ये घोळवून मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या. हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

  • बेक्ड टोफू पोटली

साहित्य

*  अर्धा कप टोफू मॅश केलेला

*  १ कप मैदा

*  १ मोठा चमचा शेंगदाण्याचा जाडसर कूट

*  १ छोटा चमचा हिरवी मिरची पेस्ट

*  १ छोटा चमचा आलं लसूण पेस्ट

*  २ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

*  १ छोटा चमचा चाट मसाला

*  अर्धा छोटा चमचा जिरे

*  १ छोटा चमचा धणे पावडर

*  अर्धा छोटा चमचा कुटलेली लाल मिरची

*  चिमूटभर हिंग

*  २ छोटे चमचे तेल

*  मीठ चवीनुसार.

कृती

मैद्यात चिमूटभर मीठ आणि १ चमचा तेल टाकून व्यवस्थित रगडून घ्या. नंतर थोडं थोडं गरम पाणी टाकून मळून घ्या आणि झाकून ठेवा. कढईत १ चमचा तेल टाकून गरम करून घ्या. यामध्ये हिंग, जिरे, आलंलसूण पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून परतवून घ्या. मॅश केलेला टोफू आणि इतर साहित्यदेखील टाकून व्यवस्थित परतवून घ्या. मिश्रण आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. मळून ठेवलेलं मैद्याचं पीठ पुन्हा मुलायम मळून घ्या आणि त्याचे छोटेछोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळयाची लाटी लाटून घ्या. १-१ मोठा चमचा टोफू मिश्रण घेऊन त्यांच्या पोटल्या बनवून घ्या. वरून तेल लावून २०० डिग्री सेन्टीग्रेट प्रिहीटेड ओव्हनमध्ये १९-२० मिनिटं ठेवा. पोटल्या जर ब्राऊन झाल्या नसतील तर ३-४ मिनिटं अजून ठेवा. पोटल्या पूर्णपणे बेक झाल्यानंतर टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

मान्सून स्पेशल : रिमझिम पावसातील चटकदार स्वाद

* पाककृती सहकार्य : संजय चौधरी

  • साबुदाणा बटाटा चटणी क्रोक्यूटीस

साहित्य

* २२० ग्रॅम बटाटे

* ८० ग्रॅम साबुदाणे

* १०० एमएल घट्ट पुदीना चटणी

* अर्धा लहान चमचा जिरे

* १ मोठा चमचा चिरलेलं आलं

* १ मोठा चमचा चिरलेली हिरवी मिरची

* अर्धा लहान चमचा चाट मसाला

* १ मोठा चमचा कॉर्नफ्लोर

* १ कप ब्रेडक्रंब्स

* १ लहान चमचा लाल मिरची पावडर

* तळण्यासाठी आवश्यक तेल

* मीठ चवीनुसार.

कृती :

साबुदाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी मऊ होईपर्यंत शिजवा. त्यातील गरम पाणी काढून त्यात थंड पाणी टाकून तेसुद्धा काढून घ्या आणि बाजूला ठेवा. बटाटे बेक करून सोलून घ्या आणि मग बारीक किसून थंड व्हायला ठेवा. यात आलं, हिरवीमिरची, जिरे, मीठ आणि चाटमसाला मिसळा. मग यात साबुदाणे घालून व्यवस्थित मिक्स करा. याचे छोटे गोळे बनवून त्यात बोटाने छिद्र करून पुदीना चटणी भरा आणि मग रोल बनवा. आता हा रोल कॉर्नफ्लोर आणि ब्रेडक्रंब्समध्ये घोळवून मंद आचेवर तेलात तळून टोमॅटो कैचअपसह खायला द्या.

  • वांगी कॉर्न लेंटिल डंपलिंग्स

साहित्य

* १६० ग्रॅम कॉर्न

* १६० ग्रॅम वांगी

* २४० ग्रॅम मुग डाळ पिठ

* १ मोठा चमचा चिरलेला कांदा

* १ मोठा चमचा चिरलेली हिरवी मिरची

* १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबिर

* १ चिमूटभर जिरे पाडवर

* २ मोठे चमचे किसलेलं मोजरेला चीज

* १ मोठा चमचा लाल सिमला मिरची

* १ लहान चमचा बारीक चिरलेलं आलं

* मीठ चवीनुसार.

कृती

वांग्याचे लहानलहान तुकडे कापून तेलात सोनेरी होईपर्यंत तळून किचन पेपरवर ठेवा. सर्व साहित्य मिसळा. कढईमध्ये तेल गरम करा आणि थोडं थोडं मिश्रण टाकून सोनेरी होईपर्यंत तळून स्पायसी आल्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें