चांगले संबंध आणि आनंदाचे काय आहे कनेक्शन

* गरिमा पंकज

अनुभवला नुकतेच मॅनेजर बनवले गेले होते. आता त्याच्या जीवनात एकच गोष्ट महत्वाची होती आणि ती म्हणजे काम. याशिवाय तो आपला वेळ कुठेही खर्च करत नाही. अगदी नाती निभावणं सोडाच पण मित्रांसोबत थट्टामस्करीही करत नाही. सकाळी ऑफिसला निघून जायचा आणि पूर्ण दिवस फायलींमध्ये हरवून जायचा.

रात्री उशिरा घरी परतायचा तोपर्यंत त्याची मुले झोपलेली असायची. पत्नीशीसुद्धा फक्त कामाविषयीच बोलायचा. इतर वेळेस मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये व्यस्त असायचा. कालांतराने त्याचं आयष्य नैराश्याने भरून गेलं. ऑफिसचे कलीग्सही त्याच्याशी किनारा करू लागले. पत्नीबरोबर भांडणं होऊ लागले.

सतत चिडचिड करू लागला. एवढा चिढखोर झाला की मुलांचे मस्ती करतानाचे ओरडणेसुद्धा सहन करू शकत नसे आणि म्हणून त्यांच्यावर हात उचली. नेहमी आजारी पण राहू लागला. एके दिवशी अनुभवच्या डॉक्टर मित्राने त्याला चांगल्या संबंधाची गरज आणि मानसिक आनंदाचा आरोग्यावर पडणारा प्रभाव याविषयी विस्तीर्ण माहिती दिली. त्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिकवला. तेव्हा अनुभवलाही कळून चुकले की नातेसंबंधात कटकट करून तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. वेळोवेळी झाडांप्रमाणे नात्यांचेही प्रेम आणि विश्वासाच्या पाण्याने पोषण करणे गरजेचे आहे.

या गोष्टी लक्षात घेतल्या तर नातेसंबंध आणि जीवनात प्रेम टिकून राहील.

जीवनाला खूप गंभीरपणे घेऊ नका

काही लोक जीवनाला एवढे गंभीरपणे घेतात की ते जीवनातील लहानमोठे चढउतारही स्वीकारू शकत नाही आणि डिप्रेशनमध्ये जातात, याउलट व्यक्तिचे व्यक्तित्व असे असायला हवे की मोठयांहून मोठे वादळसुद्धा मनाला विचलित करू शकणार नाही. लोकांशी वाद घालण्यापेक्षा गोष्टींना हसून टाळायला शिकले पाहिजे. यामुळे नात्यांमध्ये कधी वितुष्ट येत नाही आणि आपल्यातील प्रसन्नतासुद्धा कायम टिकून राहते.

थँकफुलनेस आवश्यक

एका अभ्यासानुसार आपण ज्या गोष्टींसाठी दुसऱ्यांचे आभारी आहात त्या गोष्टी एका डायरीत किंवा मोबाईलमध्ये लिहून ठेवल्याने मनात एक वेगळा आनंद निर्माण होतो. असे करणे परस्पर नातेसंबंधांसह आरोग्यासाठीही खूप फायद्याचे असते. बऱ्याच वेळा आपण कोणा व्यक्तीच्या त्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करु लागतो, जेव्हा त्याने आपल्याशी वाईट वर्तणूक केली. यामुळे आपली वागणूकही त्याच्याशी कठोर होऊन जाते. यामुळे नात्यांमध्ये कटुता येण्याची दाट शक्यता असते. अशावेळेस लिहिलेल्या त्या जुन्या गोष्टीं वाचाव्याते जेव्हा त्याने आपली मदत केली होती, काही चांगले केले होते.

‘पर्सनल रिलेशनशिप’ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार तसे कपल्स जे आपल्या रिलेशनशिपमध्ये एकमेकांप्रति थँकफुलनेस कायम बाळगतात, त्यांच्यात डिवोर्स कमी होतात.

प्रगाढ नाते आवश्यक

जेव्हा आपण एखाद्याशी कपटीपणा न करता हृदयापासून जोडलेले असता, त्याच्या सुख-दु:खाला आपले मानत आणि आपल्या हृदयाची प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करतो, तेव्हा आपले मन खूप हलके होते. आनंदी राहण्यासाठी अशाप्रकारचे प्रगाढ नाते बनविणे गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण काही लोकांशी मनापासून जोडलेले असता.

सोशल मिडियाचा वाढता हस्तक्षेप

कामात व्यस्त राहण्याबरोबरच आजकाल नात्यांमध्ये येणाऱ्या दुराव्याचे खास कारण लोकांच्या जीवनात सोशल मिडियाचा वाढता हस्तक्षेपही आहे. आजकाल लोक गॅझेटच्या जगात एवढे मग्न असतात की त्यांना आपल्या जवळपास बसलेल्या लोकांची पण पर्वा राहत नाही. आजकाल काल्पनिक जगतातील नाते खऱ्या नाते-संबंधावर वरचढ ठरू लागले आहे. ते अशाप्रकारे बिझी तर आहेत पण प्रसन्न नाहीत. खरी प्रसन्नता आणि आरोग्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आतापर्यंतचे सगळयात विस्तारित आणि लांबलचक संशोधन केले.

‘हार्वर्ड स्टडी ऑफ एड्ल्ट डेव्हलपमेंट’ नावाचा हा अभ्यास १९३८ पासून सुरु झाला. ज्यात ८०० पेक्षा जास्त लोकांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूंचा व्यापक अभ्यास केला गेला. जवळपास ८ दशके चाललेल्या या अभ्यासात ३ समुदायाच्या लोकांना जोडले गेले. पहिल्या समुदायात २६८ उच्च शिक्षित हार्वर्ड ग्रॅज्युएट्स होते, दुसरा समुदाय ४५६ लोकांचा होता, जो बोस्टनजवळील परिसरातील मुलांचा होता. हे प्रतिकूल परिस्थितीत राहत होते.

येथे चांगल्या संबंधाचा अर्थ गहन आणि बळकट नात्यांशी आहे. एकटेपणा आपले दु:ख आणि डिप्रेशनला वाढवतो. याउलट नात्यांतील मधुरता दु:खांना कमी करण्यास सहाय्यक ठरते. नातेसंबंध खूप सारे असावेत हे गरजेचे नाही, पण जे कुठले नाते असावे ते बळकट आणि गहन असावे.

या, जाणून घेऊया कसे नात्यांना बळकट बनवले जाऊ शकते.

माफ करायला शिका

विनाकारण कोणाबद्दल आपल्या हृदयात कटुता ठेवण्याची सवय न केवळ नात्यांना कमकुवत बनवते तर त्याचबरोबर आपल्या मानसिक आरोग्यासाठीसुद्धा धोकादायक असते. अशा स्थितीत उत्तम हे आहे की आपण सर्व हेवेदावे विसरून हृदयापासून लोकांना माफ करायला शिका. यामुळे मनाला आराम आणि जीवनात उत्साह टिकून राहतो.

धोका देऊ नका

नात्यांमध्ये रुपये-पैसे, शंका घेणे इत्यादींना थारा देऊ नका. प्रेम मोठ्या मुश्किलीने होते. नाते खूप हळुवारपणे बळकट होत असते. जर आपण समोरच्यांशी काही रुपयांसाठी बेईमानी केलीत, त्याच्या विश्वासाला तोडले तर मग त्याच्याबरोबर आपल्या नात्याचा गोडवा राहणार नाही. आपण त्या व्यक्तीला गमावून बसतो. खुद्द आपल्यालासुद्धा कधी न कधी या गोष्टीची जाणीव जरूर होते की आपण त्याच्याशी चुकीचे वागलो आहोत.

मदत करायला शिका

जीवनाने आपणास जे काही दिले आहे त्याचा उपयोग लोकांच्या मदतीसाठी करा. स्वत: पुढे या आणि जेवढी शक्य होईल तेवढी दुसऱ्यांची मदत करा. यामुळे आपल्या मनाला प्रसन्नता लाभते. कधी आपण केलेल्या कामाचा राग आळवू नये, एखाद्याला मदत करून विसरून जा. अशा व्यक्तींशी सगळे नाते बनवू इच्छितात.

आपल्या अहंकाराला आपल्या मार्गात येऊ देऊ नका

नात्याच्या बंधनाला आपल्या इगोपायी तोडू नका. नात्यात कोणी छोटा किंवा मोठा नसतो. कोणाच्या पुढे झुकल्याने जर नातेसंबंध टिकून राहत असतील तर याच्यात काही वाईट नाही. कारण रुपये-पैसे यापेक्षा मौल्यवान नातेसंबंध असतात. कोणाच्या यशावर आनंदी होण्याऐवजी आपण चिडू लागलात, त्याला हीन वागणूक देण्याचा प्रयत्न करू लागलात तर समजून जा आपण जीवनाची सगळयात महत्वपूर्ण संपत्ती अर्थात त्या नात्याला गमावणार आहात.

आशा-अपेक्षा कमी ठेवा

नेहमी आपण आपल्या जवळच्या लोकांकडून गरजेपेक्षा जास्त अपेक्षा बाळगतो. पण जर त्या पूर्ण न झाल्यास हृदयात आंबटपणा निर्माण होतो. मग आपण नात्याला नियमानुसार जगत नाहीत. आशा-अपेक्षामुळे आपण दुखी होतो आणि नात्यांत वितुष्टता येते. यासाठी उत्तम हे आहे की आपण आपल्याकडून कोणत्याही नात्याला आपले सर्वस्व द्यावे, पण समोरच्यांकडून कुठल्या बदलाची इच्छा ठेवू नये.

या सर्व गोष्टींबरोबरच आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ आपल्यासाठी अवश्य काढावा. यामुळे जेथे नात्यांमध्ये जिवंतपणा कायम राहतो, तेथेच मनसुद्धा आनंदीत राहते आणि तेव्हा आपण आपले काम डबल उत्साहाने करू शकतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें