तुम्हाला आयुष्यभर तणावमुक्त राहायचे असेल तर मिनिमलिस्ट लाईफस्टाइल फॉलो करा

* मोनिका अग्रवाल

मिनिमलिस्ट लाइफस्टाइल

असं म्हटलं जातं की गरज असेल तेवढ्याच गोष्टी विकत घ्याव्यात. मात्र, आता ऑनलाइन शॉपिंग आणि मॉल्सच्या जमान्यात लोक गरज नसतानाही खरेदी करतात. अनेकवेळा असे घडते की, गरज नसतानाही आपण काहीतरी खरेदी करायला जातो आणि कपडे, शूज आणि मेकअपच्या वस्तू परत आणतो. पण ही छोटीशी खरेदी भविष्यात तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकते असा विचार तुम्ही केला आहे का?

जगभरातील लोक आता या चुकांमधून शिकत आहेत आणि किमान जीवनशैली स्वीकारत आहेत. मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे काय आणि त्याचे फायदे, चला जाणून घेऊया :

योग्य जगण्याची पद्धत

किमान जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही अनावश्यक तणावापासून दूर राहता. या जीवनशैलीत तुम्ही सर्व सुविधांसह जीवन जगता, परंतु कमीत कमी गोष्टींसह. म्हणजे तुम्ही अनावश्यक कपडे, वस्तू, जीवनशैलीच्या इतर वस्तू इत्यादींवर खर्च करत नाही. ढोंगापासून दूर जाऊन तुम्ही आनंदाने जगायला शिका. संतुलित जीवन जगण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

किमान जीवनशैलीचे फायदे

मिनिमलिस्ट जीवनशैलीचे फक्त एक नाही तर अनेक फायदे आहेत. याच्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन सुसह्य करू शकता.

किमान जीवनशैली तुमची ऊर्जा वाचवते. जेव्हा तुमच्याकडे सामान कमी असते तेव्हा तुम्ही ते हाताळण्याच्या त्रासापासून वाचता. यामुळे तुमची ऊर्जा आणि वेळही वाचतो.

मिनिमलिस्ट लाईफस्टाईल हे कंजूषपणे नव्हे तर हुशारीने जगण्याचे नाव आहे. याचा अवलंब करून तुम्ही वर्षभरात लाखो रुपयांची बचत करू शकता. यामुळे तुमची बचत वाढेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य जाणवेल.

जेव्हा तुमच्या आजूबाजूला कमी सामान असते तेव्हा तुमचे मन अधिक आरामशीर वाटते. तुमचे घर सर्व वेळ व्यवस्थित ठेवलेले दिसेल, ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल.

अशा मिनिमलिस्ट जीवनशैलीचा अवलंब करा

मिनिमलिस्ट जीवनशैली अंगीकारणे खूप सोपे आहे. सर्वात आधी त्याचे फायदे विचारात घ्या आणि मग त्यासाठी मानसिक तयारी करा. खरेदी करण्यापूर्वी यादी तयार करा. अनावश्यक गोष्टींपासून लक्ष हटवा. ज्या वस्तूंची गरज आहे तेच घरी आणा. मिनिमलिस्ट जीवनशैलीमध्ये कमी वस्तू खरेदी करणे आणि जुन्या निरुपयोगी वस्तू काढून टाकणे समाविष्ट आहे. म्हणून, वेळोवेळी खराब वस्तू काढून टाका. नेहमी कमी वस्तूंनी घर सजवण्याचा प्रयत्न करा.

पाळीव प्राणी ठेवतात व्यसनमुक्त आणि तणावमुक्त

* मेनका गांधी

मुंबईच्या एका व्यसनमुक्ति केंद्राला पाहून समजून येतं की तिथे समाजातील कोणत्या वर्गाचे लोक येतात. इथे श्रीमंत लोकांच्या तरुण मुलांची संख्या अधिक आहे, ज्यांच्याजवळ पैसा तर खूप आहे, परंतु आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो. ठरलेल्या रूटीननुसार ही मुलं महिन्यातून दोनदा परदेशात फिरायला जातात, खातातपितात, सिनेमे बघतात.

या व्यसनमुक्ति केंद्राला पाहून असं वाटतं की इथे अशा प्रकारची प्रकरणं वारंवार येत असणार. मी व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका अशा तरुणाला ओळखते, जो या केंद्रात तिसऱ्यांदा आलाय. इथे येणाऱ्या लोकांच्या दु:खाचं कारण म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणं, लहानपणी त्यांच्यासोबत वाईट वर्तण होणं वा पैशाच्या बळावर वाया जाणं अशा अनेक गोष्टी आहेत. याचं कारण म्हणजे अनेकदा मानसिक आरोग्य मेंदूमध्ये फिरणाऱ्या रसायनांच्या गडबडीमुळे बिघडत जातं.

पाळीव प्राणी होऊ शकतात सहाय्यक : अलीकडे अशाप्रकारचे प्रयोग करून पाहिले जात आहेत की कुत्रे या तरुणांना बरे होण्यात मदत करू शकतात का? जे या व्यसनमुक्ति केंद्रात उपचार करून घेत आहेत.

या शोधाच्या संशोधक लिंडसे एल्सवर्थ या वॉशिंग्टन स्टेट महाविद्यालयात संशोधनाच्या विद्यार्थी आहेत. या स्पोकन ह्यूमन सोसायटीतून एक्सेल्सिअर यूथ सेंटरमध्ये कुत्रे घेऊन आल्या. या सेंटरमध्ये उपचार करवून घेणारे सर्व तरुण होते. एक्सलसिअरच्या दररोजच्या मनोरंजनाच्या वेळी इथल्या काही तरुणांनी व्हिडिओ गेम्सपासून ते बास्केटबॉल खेळून आपला वेळ व्यतीत केला. काही तरुणांनी कुत्र्याची स्वच्छता केली, त्यांना जेवण भरवून व त्यांच्यासोबत खेळून आपला वेळ व्यतीत केला. अशाप्रकारच्या क्रिया सुरू करण्यापूर्वी आणि समाप्त केल्यानंतर तरुणांचं एका प्रक्रियेद्वारे मूल्यांकन केलं जातं. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ १ ते ५ पर्यंतच्या स्केलवर तरुणांच्या ६० प्रतिक्रियांचं मुल्यांकन करतात आणि त्यांच्या भावनांना समजण्याचा प्रयत्न करतात.

ज्या तरुणांनी कुत्र्यांसोबत वेळ व्यतीत केला होता, त्यांनी आपल्यामध्ये आनंद, सतर्कता आणि शांतीचा छानसा अनुभव केला. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या तरुणांनी ‘उत्साहित,’ ‘उर्जावान’, ‘आनंदी’सारख्या शब्दांचा वापर केला. त्यापैकी काही तरुण जे एखादा अपघात वा धक्क्यानंतरच्या तणावातून जात होते, त्यांच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा पहायला मिळाल्या.

संशोधकांच्या मते कुत्र्यांची सोबत ही साधारणत : ओपिऑइड्स, सायकोअॅक्टीव्ह रसायनांचा प्रवाह मेंदूत वाढवतो, ज्यामध्ये रुग्णांना वेदनेपासून दिलासा मिळण्याबरोबरच त्याला समाधानाचीदेखील जाणीव देतं. शेवटी लोक व्यसन का करतात? वारंवार व्यसन करणाऱ्यांमध्ये काही काळानंतर एकटेपणा असा काही वाढत जातो की ते आत्महत्या करण्यापर्यंत निर्णय घेतात. अशावेळी कुत्र्यांसोबत वेळ घालवल्याने नकारात्मक विचार कमी येतात आणि मूडदेखील चांगला राहतो. एकूणच तणाव कमी होतो.

वागणुकीत सुधारणा : व्यवहारिक अडचणीतून जाणाऱ्या एका तरुणाने कुत्र्यासोबत वेळ घालविण्याचा परिणाम संशोधक सांगतात की कुत्र्यासोबतच्या पहिल्या दोन मुलाखतीमध्ये तरुण आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवायला शिकला कारण कुत्रे आपली विचित्र वागणूक पाहून घाबरू नयेत. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीत आणि आवाजात बदल झाला. तो पूर्वीपेक्षा अधिक सचेत झाला आणि आपल्या प्रतिक्रियांवर लक्ष देऊ लागला. कुत्र्यांसोबत काही सेशन केल्यानंतर तरुणाचा सुधार केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रति वागणूकीत सकारात्मक बदल झाला.

ऐल्सवर्थ सांगते, ‘‘मला हे पाहून खूपच आश्चर्य वाटलं की मुलं कुत्र्यांसोबत वेळ घालवताना खूपच शांत होती. त्यांची उग्र वागणूक कमी होत होती. त्यांच्या वागणुकीतील बदल दिवस व रात्र याप्रमाणे स्पष्ट होता.’’

उपचाराचा स्वस्त पर्याय : जर हा शोध गंभीरतेने समजून घेतला तर नशामुक्ति केंद्रावर करण्यात येणाऱ्या पारंपरिक उपचाराच्या तुलनेत ही पद्धत सुगम आणि स्वस्तदेखील आहे.

केवळ कुत्रेच नाही तर कैंट फॅसियर्स संस्थेनुसार लोकांमध्ये ऑपिआइड्सचा स्त्राव फेलाइंस म्हणजेच टायगर,

या व्यसनमुक्ति केंद्राच्या प्रबंधकानुसार, विज्ञान वा वैज्ञानिक प्रयोगावर आधारीत कार्यक्रमांना अशा प्रकारच्या केंद्रांमध्ये नियमितरित्या लागू करायला हवं. माणसांना चांगल्या फीलिंगची जाणीव करून देणारं रसायन डोपामाइन नैसर्गिकरित्या मेंदूत आढळतं. या तरुणांच्या मेंदूतदेखील हे रसायन कुत्र्यांसोबत वेळ घालविल्यानंतर रिलिज झालं. कुत्र्यांचा वापर करण्यासारखे नैसर्गिक उपाय मेंदूत अशा रसायनांच्या क्रियाप्रतिक्रियांना सुचारू रूपाने संचालित करू शकतात.

प्रयोग सुरू आहे : संशोधकांच्या मते शेल्टरमध्ये राहणारे कुत्रे घरातल्या कुत्र्यांपेक्षा अधिक प्रतिक्रियाशील असतात. विज्ञान जिथे प्राण्यांना या तरुणांवर पडणाऱ्या प्रभावाची तपासणी करतंय; तिथे कॅरेन हॉकिंस अमेरिकेच्या ‘मे’ शहरात एक हिलिंग फॉर्म चालवत आहेत जिथे अशी मुलं आणि प्राणी येतात, ज्यांना उपचाराची गरज असते.

कॅरेन नुसार, ‘‘माझ्याकडे येणारी काही मुलं अशी आहेत, ज्यांचं पालनपोषण एक तर कमी झालंय वा झालंच नाहीए. माझ्या देखरेखीबरोबर जंगली वातावरण त्यांना ही जाणीव करून देतं की त्यांची देखभाल वा पालनपोषण कसं असायला हवं. मी अशा मुलांच्या वागणुकीत नरमपणा येताना बघितलाय, जे अगोदर खूपच रागीट, क्रूर आणि दुराचारी स्वभावाचे होते. यांपैकी अधिक तरुण होते. त्यांच्यामध्ये विश्वास ठेवण्याची भावना आली, ते हळूहळू आपल्या गोष्टी प्राण्यांशी शेअर करू लागले आणि नंतर प्राण्यांसोबतदेखील त्यांचं नातं अधिक दृढ होऊ लागलं.’’

साउथ कोरियाच्या एका मानसोपचार तज्ज्ञाला आढळलं की त्यांच्या देशात १० ते १९ वयोगटातील १० टक्के मुलांना इंटरनेटचा वापर करण्याची वाईट सवय लागली आहे. मुलं रात्रभर जागून पोर्न व्हिडिओ पाहतात, ऑनलाइन गेम्स खेळतात इत्यादी. इथल्या नविन स्थापित केंद्रांनी या तरुणांची व्यसनं सोडविण्यासाठी एक विचित्र उपाय शोधला. घोडा थेरपिस्टचं मानतं होते की घोडेस्वारी थेरेपी खूपच सहायय्क ठरते. जेव्हा सर्व उपाय असफल होतात. माणूस आणि प्राण्यांमध्ये बनलेलं नातं भावनात्मक समस्येतून सुटण्याचा उत्तम उपाय आहे.

माणूस या ग्रहावर एकटा राहू शकतो का? नाही. माणसांचं प्राण्यांसोबत उत्तम नातं असणंच त्यांच्या भावनांना नियंत्रणात ठेवण्याचा मूळ सिद्धांत आहे. जेव्हा आपण नातं संपवतो तेव्हा त्याच्यासोबत आनंद मिळविण्याचे अनेक मानसिक मार्गदेखील बंद होतात.

ज्याप्रकारे हिरवळ, हिरवीगार झाडंझुडपं आपल्याला आनंद देतात. पाऊस, फुलपाखरं आणि सूर्य आपल्याला आनंद देतात, त्याच प्रकारे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना आनंद देणं आणि त्यांना एक परिपक्व व परीपूर्ण माणूस बनवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात एक पाळीव प्राणी असणं गरजेचं आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें