आरोग्य परामर्श

* डॉक्टर सुदीप जैन, एमएस एमसीएच (एम्स), डायरेक्टर, स्पाईन सोल्युशन्स इंडिया, नवी दिल्ली

प्रश्न : मी ४५ वर्षीय नोकरदार स्त्री आहे. गेल्या काही दिवसापासून कमरेत वेदना होत आहेत. तपासणी केल्यावर बल्जिंग डिस्क असल्याचं समजलं. यापासून कशी सुटका मिळेल?

उत्तर : बल्जिंग डिक्सच्या उपचारात फिजीओथेरेपी खूप महत्त्वाची आहे. जर यापासून आराम मिळत नसेल तर उपचार आवश्यक होतात. बल्जिंग डिक्समध्ये वर आलेल्या भागाला एंडोस्कोपिंग तंत्रज्ञानाद्वारे काढलं जातं. हे एक मिनीमली इन्वेसिव्ह प्रोसिजर असतं, ज्याला लोकल अॅनेस्थेशिया देऊन केलं जातं. यामध्ये इस्पितळात भरती होण्याची वा बेडरेस्ट करण्याची गरज नसते. काही दिवसातच तुम्ही पूर्णपणे तुमची सामान्य दिनचर्या सुरु करू शकता.

प्रश्न : माझ्या पतींचे एक्सीडेंट झालं होतं. त्यानंतर त्यांना स्लिप डिस्कची समस्या निर्माण झाली. मला जाणून घ्यायचयं की सर्जरी व्यतिरिक्त असे आणखीण कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

उत्तर : स्लिप डिस्कचा उपचार यावर निर्भर अवलंबून असतो की समस्या कोणत्या प्रकारची आहे आणि डिक्समध्ये किती खराबी आली आहे. औषध आणि फिजिओथेरेपीने बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की स्लिप डिस्कच्या ९० टक्के प्रकरणांमध्ये ऑपरेशनची गरज नसते, परंतु १० टक्के प्रकरणांमध्ये सर्जरी करणं गरजेचं होऊन जातं.

प्रश्न : मी ४६ वर्षीय प्राध्यापिका आहे. मला कोविड-१९ मुळे ऑनलाइन क्लासेस आणि झुम मीटिंगसाठी सतत गॅझेट्स वापरामुळे माझ्या कमरेच्या खालच्या भागांमध्ये वेदना होऊ लागल्या आहेत. कधी कधी वेदना सहन करण्या पलीकडे असतात. काय करू?

उत्तर : कोविड-१९ च्या दरम्यान गॅझेट्सच्या अत्याधिक वापरामुळे अनेक लोकांना स्पाईनशी संबंधित समस्या निर्माण झाल्यात. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर समस्या अधिक गंभीर होईल. तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवा. फिजिओथेरेपी आणि पेन किलरच्या मदतीने ८० टक्के लोकांना आराम मिळतो. ज्यांची समस्या अधिक गंभीर आहे त्यांच्यासाठी एमआरआय, एक्स-रे आणि इतर तपासण्या केल्या जातात. तपासणी केल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुमची समस्या किती गंभीर आहे आणि ती कशी ठीक केली जाऊ शकते.

प्रश्न : माझ्या सासूबाई ६२ वर्षांच्या आहेत. त्यांना ऑस्टिओपोरॉटिक वर्टिब्रल कम्प्रेशनची समस्या निर्माण झाली आहे. स्पाइन सर्जनने वेसेलप्लास्टि करायला सांगितलं आहे. कृपया उपचाराच्या या तंत्रज्ञानाबद्दल सांगा?

उत्तर : वेसेलप्लास्टि एक नवीन तंत्रज्ञान आहे, जे क्षतिग्रस्त पाठीच्या कणाच्या उपचारासाठी वापरलं जाते. मग पाठीच्या कणामध्ये जर ऑस्टिओपोरॉसिसमुळे खराबी आली असेल, एखादी दुर्घटना व इतर आजारामुळे या तंत्रज्ञानाने उपचार केल्याने परिणाम खूपच चांगले आहेत. प्रथम वर्टीकल कॉम्प्रेशनसाठी ओपन सर्जरी केली जात होती, परंतु वेसेलप्लास्टि एक मिनीमली इनविसिव्ह सर्जरी आहे.

यामध्ये कोणतेही इमप्लांट करण्याची गरज नसते उलट बोन सिमेंटचा वापर केला जातो ज्यामुळे त्वरित पाठीच्या कणा सेटल होतो आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय आयुष्यभर हाड मजबूत बनवून ठेवतं.

प्रश्न : मला अनेकदा मानेमध्ये वेदना होतात. मला जाणून घ्यायचंय की ही समस्या का होते? यापासून वाचण्याचे उपाय आणि उपचार यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत?

उत्तर : मानेच्या वेदनेला चिकित्सिय भाषेमध्ये सर्वाइकल पेन म्हणतात. मानेपासून जर सर्वाइकल स्पाईनचे सांधे आणि डिक्समध्ये समस्या झाल्यास सर्वाइकल पेन होतं. समस्या साधीच असेल तर त्याला जीवनशैलीमध्ये थोडे बदल करून ठीक केलं जाऊ शकतं. गंभीर समस्या असल्यास उपाय करण्याची गरज पडते. जर फिजिकल थेरेपी आणि औषधांनीदेखील सर्वाइकल पेन बरं होत नसेल तर सर्जरी केली जाते. यापासून वाचण्यासाठी बसताना, चालताना, कॉम्प्युटरवर काम करतेवेळी तुमचं पोश्चर व्यवस्थित ठेवा. नियमितपणे व्यायाम करा. मोबाईल फोनला तुमच्या कान आणि खांद्याच्यामध्ये टेकवून बोलू नका.

प्रश्न : माझ्या पतींना काही दिवसापूर्वीच स्पायनल स्ट्रोक आला आहे. डॉक्टरांनी सर्जरी करण्याचादेखील सल्ला दिला आहे. कृपया सांगा की सर्जरी करणं योग्य राहील का?

उत्तर : स्पायनल स्ट्रोकमध्ये स्पाइनल कार्डमध्ये रक्तात अडथळे येतात. स्पाईनल स्ट्रोक एक गंभीर स्थिती आहे आणि यासाठी त्वरित उपचाराची गरज असते. जर समस्या अधिक गंभीर नसेल तर सूज कमी करण्यास, रक्त पातळ करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणाऱ्या औषधांनी आराम मिळू शकतो. तुमच्या पतींची स्थिती गंभीर असणार म्हणूनच डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे.

सर्जरीला घाबरू नका. मिनीमली इन्वेसीव सर्जरी तंत्रज्ञानाने सर्जरी खूपच सहज होते. यामध्ये पारंपारिक सर्जरीच्या तुलनेमध्ये खूप कमी त्रास होतो आणि इस्पितळात जास्त थांबण्याची गरजदेखील नसते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें