सौंदर्य समस्या

– समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

माझ्या चेहऱ्यावर केस उगवत आहेत, त्यामुळे कुठे येण्या-जाण्यास मला लाज वाटते. कृपया असा एखादा उपाय सांगा, ज्यामुळे ते हटवता येतील?

हार्मोनलच्या बदलामुळे चेहऱ्यावर केस उगवण्याची समस्या येऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा. केस हाताने प्लक करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. तुम्ही जेवढे केसांना प्लक करणार, त्याच्या दुप्पट वेगाने ते उगवणार. वाटल्यास आपण ब्युटी पार्लरमधून यासाठी कटोरी व्हॅक्सिंग करू शकता. जर चेहऱ्याच्या केसांवर कायमस्वरूपी उपचार करायचा असेल, तर एक्सपर्टकडून लेझर ट्रीटमेंट करून घ्या.

क्रीमचा वापर केल्याने चेहरा काळा पडतोय, काय करू?

सर्वप्रथम केमिकलयुक्त क्रीम चेहऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त लावणे बंद करा. त्यानंतर घरी बनवलेल्या फेसपॅक आणि स्क्रबच्या मदतीने चेहरा रोज स्वच्छ करा. आपला काळवंडलेला चेहरा पूर्ववत होईल.

माझ्या लिप्सवर व्हाइट स्पॉट होत आहेत, ते कसे बरे करता येतील?

लिंबू, संत्रे यासारख्या आंबट फळांचा रस पाण्यात मिसळून ओठांना लावल्यास डाग कमी करण्यास मदत होऊ शकते. हा रस आपण कापसाच्या बोळ्याने डागांवर लावू शकता. या सोप्या घरगुती उपायाने काही दिवसांतच डाग गायब होऊ लागतात. आपल्या आहारात लसणीचे सेवन वाढवल्याने आपल्याला सफेद डाग कमी करण्यास मदत मिळेल.

प्रेग्नंसीनंतर केस खूप गळत आहेत, असे का?

गर्भावस्थेत महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन नावाच्या हार्मोनचे संतुलन बिघडते. त्यामुळे केस वेगाने गळतात. गर्भावस्थेत आहाराकडे लक्ष दिल्याने हे काही प्रमाणात कमी करता येते.

माझ्या चेहऱ्यावर तीळ आहेत आणि माझी त्वचा कोरडी आहे. मी काय करू, जेणेकरून माझी त्वचा उजळ होईल आणि डागांपासून माझी सुटका होईल?

चेहऱ्याच्या डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा. तो ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. लिंबाचा रस चेहऱ्यावरील डाग कमी करतो. २ महिने ही प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला फरक दिसेल.

संवेदनशील त्वचेच्या देखभालीसाठी काही घरगुती उपाय सांगा?

जर आपली त्वचा संवेदनशील असेल, तर आपण त्वचारोग तज्ज्ञाला दाखवून तपासून घ्या. आपल्याला आपल्या त्वचेबाबत माहीत असले पाहिजे की कोणत्या कारणाने आपली त्वचा एवढी संवेदनशील होतेय. त्वचारोग तज्ज्ञाला दाखवल्यानंतर आपल्याकडे त्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम मार्ग व साधने असतील.

आपली त्वचा संवेदनशील असेल, तर तिची विशेष काळजी घेण्याची गरज असते. उन्हात जाण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावा. खूप पाणी प्या आणि प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करा.

माझे केस कर्ली आहेत आणि जेव्हा ओले असतात, तेव्हा केवळ त्यावेळीच व्यवस्थित असतात. सुकल्यानंतर ते खूप हार्ड होतात. मी कशाप्रकारे माझ्या केसांना मृदू आणि सॉफ्ट करू शकते, एखादा उपाय सांगा?

केसांना मऊ बनवण्यासाठी आणि त्यांच्यात चमक आणण्यासाठी अंड्यापेक्षा उत्तम दुसरे काहीच नाही. हे एवढे प्रभावी आहे की एकदा वापरल्यानंतर आपल्याला फरक जाणवेल. यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन, फॅटी अॅसिड आणि लॅक्टिन असते. ते केसांना निरोगी बनवते. त्यात ऑलिव्ह ऑइल मिसळून लावल्याने फायदा होईल.

दातांचा पिवळेपणा कसा दूर करता येईल?

तुळस तोंड आणि दातांच्या आजारांपासून आपले रक्षण करते. याची पाने उन्हात वाळवून पावडर बनवून मग टूथपेस्टमध्ये मिसळून रोज ब्रश करा. पिवळेपणा दूर होईल. मिठामध्ये सोडियम आणि क्लोराइड दोन्हीचे मिश्रण असते. ते दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करते. परंतु याचा जास्त वापर दातांच्या इनॅमलचे नुकसान करू शकते. तसेही मीठ आणि राईच्या तेलाने दातांना चमक आणण्याचा उपाय प्रचलित आहे. चिमूटभर मिठात २-३ थेंब तेल मिसळून दात स्वच्छ करा.

माझे वय २८ वर्षे आहे. मी खूप बारीक आहे. माझी मानही खूप बारीक आहे. त्यामुळे कोणताही नेकपीस मला शोभून दिसत नाही. मी कशा प्रकारचे नेकपीस व एक्सेसरीजचा वापर करू, कृपया मला सांगा?

तुम्ही ज्याप्रकारे आपल्या शरीराच्या ठेवणीबाबत माहिती दिलीय, त्यावरून वाटते की तुमची मान लांब असावी. उंच मान असणाऱ्या महिलांना कुठल्याही लांबीची चेन शोभून दिसते. उंच व बारीक असणाऱ्या महिलांना मध्यम आकाराचे दागिने जास्त चांगले दिसतात. सामान्यपणे दागिने कपड्यांच्या हिशोबाने घातले जातात. इथे लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे आपले टॉप, कुर्ती किंवा ब्लाउजच्या गळ्याच्या डिझाइनवरही आपल्या नेकपीसचा लुक अवलंबून असतो. ड्रेसच्या गळ्याच्या आकाराची माळ असू नये. उदा. गोल गळ्याच्या ड्रेसवर गोल आकाराची माळ घालू नये. मोठ्या गोल गळ्याच्या ड्रेसवर छोटी चेन आणि व्ही नेकवाल्या ड्रेसवर छोटी गोल किंवा अंडाकार माळेचा वापर करावा.

सौंदर्य समस्या

* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर

डॉ. भारती तनेजा द्वारा

माझं वय ५० वर्षे आहे. माझे केस गळत आहेत. मी माझ्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी एखादा उपाय सांगा?

केसांना निरोगी ठेवण्यासाठी नियमित मसाज करणं गरजेचं आहे. मसाजसाठी हेअर टॉनिक व हेअर ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. तेल केसांना नरिष करण्याबरोबरच मजबूत आणि शायनीदेखील बनवतं. केस प्रोटीनने बनलेले असतात म्हणून खाण्यात प्रोटीनचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे आहे. अंद्मद्दरित डाळी, दूध, अंडी, मासे, सोयाबीन, चिकन इत्यादी प्रोटिन्सचे उत्तम स्त्रोत आहेत. त्यांचा तुमच्या खाण्यात समावेश करा. आठवडयातून एकदा घरगुती पॅकचा वापर करणे योग्य आहे. यासाठी रिठा, आवळा, शिकेकाई व मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते उकळवा. जेव्हा पाणी सुकून जाईल तेव्हा ते वाटून घ्या आणि त्यामध्ये एलोवेरा जेल व अंड एकत्रित करा. नंतर ते पॅकप्रमाणे लावा.

माझं वय २५ वर्षे आहे. माझ्या डोळयाखाली खूपच काळी वर्तुळे आहेत. ती कमी करण्याचा एखादा सोपा उपाय सांगा?

काळी वर्तुळे घालविण्यासाठी संत्र व बटाटयाच्या रसामध्ये कॉटन बुडवून नंतर डोळे बंद करून पापण्यांवर थोडा वेळ ठेवा. असं नियमित केल्यामुळे डोळयांना आरामदेखील मिळेल. या व्यतिरिक्त आराम व पुरेशी झोप घ्या. अंधारात टीव्ही पाहू नका वा फोनवर अधिक काम करू नका. शक्य असल्यास एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन यलो लेझर घ्या. यामुळे काळी वर्तुळं लवकरच निघून जातील. दररोज बदामाच्या तेलामध्ये काही थेंब ऑरेंज ऑइल एकत्रित करून करंगळीने हलकसं डोळयांभोवती मसाज करा.

काजळशिवाय माझे डोळे खूपच सुने दिसतात. लाइनर शिवाय बाहेर जायला छान वाटत नाही. काजळ लावल्यामुळे स्मज होतात. एखादा उपाय सांगा ज्यामुळे मी सुंदर दिसेन?

काजळ विकत घेतेवेळी नेहमी लक्षात ठेवा की ते लाँग लास्टिंग आणि स्मज प्रुफ असावं. तुम्हाला हवं असल्यास पर्मनंट काजळ लावू शकता. जे १५ तास टिकतं. कधी पसरत नाही. लक्षात ठेवा जिथून लाइनर काजळ लावत असाल तिथे हायजिनची खास काळजी घ्या.

माझी नखे खूपच लवकर तुटतात आणि हात सुंदर दिसत नाहीत. नखं मजबूत करण्यासाठी काय करू?

नखे प्रोटीनने बनलेली असतात म्हणून खाण्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असायला हवं. नखांना मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात विटामिन, फायबर व प्रोटीन अधिक प्रमाणात असायला हवं. दररोज हिरव्या भाज्या आवर्जून खा. फळं आणि डाळीदेखील नखांना चांगलं करण्यासाठी मदत करतात.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळेदेखील नखे तुटू लागतात. म्हणून कॅल्शियमयुक्त खाणं जसे की दूध, दही, अंड्याचा वापर करा. नखांना शेपमध्ये ठेवा म्हणजे ती तुटणार नाहीत. दररोज काही वेळासाठी कोमट ऑलिव ऑइलमध्ये थोडावेळ त्यांना भिजवून ठेवा आणि हलका हलका मसाज करा. यामुळे नखे मजबूत होतात आणि नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळेदेखील नखे लवकर तुटत नाहीत.

कपाळावर सतत टिकली लावल्यामुळे त्याजागी डाग पडू लागले आहेत. ते काढण्यासाठी व कमी करण्यासाठी काय करू?

तुमचा टिकलीचा ग्लू उत्तम क्वालिटीचा नसेल तर डाग पडण्याचे चान्सेस राहतात. त्यामुळे नेहमी उत्तम क्वालिटीच्या टिकली विकत घ्या. रात्री झोपण्यापूर्वी काढून ठेवा आणि चेहरा स्वच्छ करून घ्या. डाग पडले आहे ते कमी करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये काही लिंबाचे थेंब टाकून डागाच्या जागी दररोज अर्धा मिनिट मसाज करा आणि नंतर खोबरेल तेल लावून थोडा वेळ सोडून द्या. असं केल्यामुळे फरक पडण्याचे चान्सेस असतात. तुम्ही हवं असल्यास एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन लेझर ट्रीटमेंट व यंग स्किन मास्क लावू शकता. यामुळे डाग खूपच कमी होतील. केमिकल पिलदेखील करू शकता. ज्यामुळे त्वचेचा एक लेयर निघून जाईल आणि डागदेखील कमी होतील.

मला आयब्रोज करतेवेळी थ्रेडिंग केल्यामुळे खूप त्रास होतो. कधी कधी हा त्रास सहन करण्यापलीकडचा असतो. अश्रूदेखील येतात. प्लीज सांगा मी काय करू?

आयब्रोज करणं खूपच गरजेचे आहे. कारण योग्य आकाराच्या आयब्रोज आपल्या चेहऱ्याला योग्य शेप देतात. वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी आयब्रोज करण्यापूर्वी आयब्रोजवर बर्फाने मसाज करा. ज्यामुळे आयब्रोज मुलायम होतील आणि वेदनादेखील कमी होतील. थ्रेडिंगच्या वेदनेपासून वाचण्यासाठी त्यावेळी चुइंगम खा. वेदना कमी होतील.

जी मुलगी तुमच्या आयेब्रोज करणार आहे तिला थ्रेडला वेट करुन घ्यायला सांगा. यामुळे तुम्हाला कमी वेदना होतील. थ्रेडिंग करतेवेळी व्यवस्थित स्ट्रेच करा यामुळेदेखील वेदना कमी होतील. थ्रेडिंगनंतर मॉइस्चरायझरने व्यवस्थित मसाज करा. आयब्रोजवर एलोवेरा जेल लावा, यामुळे वेदना व जळजळ शांत होईल आणि रेडनेसदेखील कमी होतो.

सौंदर्य समस्या

आल्प्स ब्युटी क्लिनिकच्या संस्थापक, संचालिका डॉ. भारती तनेजा द्वारे

कोरोनामधून बरे झाल्यानंतर केस गळतीने मी हैराण आहे. कृपया मला उपाय सांगा की मी माझ्या केसांची काळजी कशी घ्यावी?

या समस्येला ‘टेलोजन एफ्लुव्हियम’ या नावाने ओळखले जाते. याच कारणाने काही आजार किंवा मानसिक धक्का लागल्याने काही काळ केस गळणे सुरू होते. त्यामुळे शरीराच्या यंत्रणेला एक धक्का लागतो. त्यामुळे केसांची नवीन वाढ थांबते आणि काही वेळाने केस गळायला लागतात.

कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर त्यांचे केस काही आठवडे किंवा महिने गळत राहतात कारण ते त्या धक्क्यातून बाहेर पडू शकत नाहीत. जेव्हा रुग्ण हळूहळू बरे होऊ लागतात, तेव्हा त्यांच्या केसांची वाढ परत येते.

त्यामुळे तोपर्यंत शरीरासाठी आणि केसांसाठी अत्यंत आवश्यक असलेले प्रथिने अन्नामध्ये घ्या. केसांच्या वाढीस चालना देणारे लोह, व्हिटॅमिन डी आणि इतर पोषक तत्वांचे सेवन करण्याचे सुनिश्चित करा. केस गळणे टाळण्यासाठी ताजे कोरफड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि जेलमध्ये १/४ ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि दररोज टाळूला मालिश करा.

मालिश केल्यानंतर डोक्यावर शॉवर कॅप घाला आणि सुमारे एक तासानंतर शॅम्पूने धुवा. याच्या नियमित वापराने केसगळती कमी होते.

कोविड-१९ सारख्या महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात सतत घरी राहिल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील चमक हरवत चालली आहे. ती परत आणता येईल का?

कोविड-१९ मध्ये शारीरिक हालचाली कमी झाल्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. शारीरिक हालचालींमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे चयापचय चांगले राहते.

तुमची चयापचय क्रिया कमी होऊ नये म्हणून तुम्ही घरीच वर्कआउट करा. अन्नामध्ये प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी नारळपाणी किंवा ताज्या रसाचा समावेश करावा. याशिवाय ताजी फळे आणि भाज्या खा.

त्वचेची चमक वाढवण्यासाठी काकडी, टोमॅटो आणि बटाटे धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा. सकाळी जेव्हा तुम्ही तुमचे काम सुरू कराल तेव्हा चेहऱ्याला क्युबने मसाज करा आणि कोरडे होऊ द्या. थोडया वेळाने स्वच्छ धुवा.

तुमची त्वचा चमकत राहील. शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी १ चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा ओटमील/रवा मिसळा.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यात गुलाबपाणी टाका. जर तुमची त्वचा सामान्य असेल तर त्यात दही घाला. जर त्वचा कोरडी असेल तर मलाई/दुधाची साय घालून मालिश करा. याने तुमची त्वचा लगेच चमकदार होईल.

माझ्या पोटावर केस आहेत. त्यांच्यामुळे मला शॉर्ट टॉप किंवा ब्लाउज घालता येत नाही. मी त्यांना मुंडण करून उतरवू शकते का?

नाही, तुम्ही रेझर वापरून ते काढू शकत नाही कारण यामुळे जास्त केस परत येतील. जर तुमच्या पोटावर केस कमी असतील तर तुम्ही त्यांना ब्लीच करू शकता. ब्लीचमुळे केसांचा रंग हलका होईल. जोपर्यंत हे केस हलके दिसतील तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही.

ते काढण्यासाठी तुम्ही हेअर रिमूव्हल क्रीम वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही वापरत असलेली क्रीम तुमच्या त्वचेला सूट करणारी असावी. पोटावरील केस काढण्यासाठी तुम्ही पल्स लाइट लेझरदेखील वापरू शकता.

लॉकडाऊनमध्ये फेस मास्कमुळे मेकअप पूर्णपणे खराब होतो. मी मास्क लावून मेकअप करू शकत नाही का?

मास्कसह मेकअप टिकवण्यासाठी तुम्ही मॅट फिनिश आणि खूप वेळ टिकणारे फाउंडेशन आणि कन्सीलर वापरा. याने तुमचा मेकप पसरणार नाही.

हे दोन्ही तुमच्या त्वचेत चांगले मिसळून स्थिरावतात आणि कोरडी चमक आणतात. बेस मेकअप करण्यापूर्वी तुम्हाला कमी वजनाचा, हायड्रेटिंग प्राइमर वापरावा लागेल. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि गुळगुळीतदेखील दिसेल.

मेकअप केल्यानंतर तुम्हाला मेकअप स्पंज किंवा मोठया फ्लॅकी ब्रशच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर थोडी सैल पावडर लावावी लागेल. अतिशय हलकी पावडर लावल्याने तुमची त्वचा चांगली दिसेल आणि तुमचा मेकअपही दिवसभर टिकून राहील. यानंतर तुम्ही पावडरवर सेटिंग स्प्रे करा. कोरडे होऊ द्या. त्यानंतरच मास्क लावा जेणेकरून तुमचा मेकअप योग्य राहील.

लिपस्टिक पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी हायड्रेटिंग घटक असलेले मॅट फॉर्म्युला किंवा लिक्विड लिपस्टिक वापरा, जे तुमचे ओठ कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते.

पर्याय म्हणून तुम्ही कायमस्वरूपी लिपस्टिकही लावू शकता. तुमच्या चेहऱ्यावर फक्त तुमचे डोळे असतात जे मास्क घातल्यानंतरही दिसतात. यासाठी तुम्ही काहीही करून पाहू शकता.

तुम्ही सॉफ्ट स्मोकी आईजपासून रंगीत आयशॅडो, ग्राफिक आयलाइनरपर्यंत काहीही ट्राय करू शकता. भुवया भरण्यास आणि पापण्यांना मस्करा लावण्यास विसरू नका.

सौंदर्य समस्या

– समाधान ब्यूटी एक्सपर्ट, इशिका तनेजाद्वारा

माझ्या चेहऱ्यावर मुरुमं आहेत. ओपन पोर्सचीही समस्या आहे. माझ्यत न्यूनगंड निर्माण झाला आहे. कृपया माझ्या समस्येचं निराकरण करा.

मुरुमं येण्यामागे बरीच कारणं असतात. ही मुरुमं काही अंतर्गत कारणामुळे तर नाही ना? यासाठी तुम्ही रक्त तपासून पाहा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय मलावरोध, कोंडा आणि तेलकट त्वचा यामुळेही मुरुमं येतात. म्हणूनच त्यांना बरं करण्याआधी त्यांच्या येण्याचं खरं कारण जाणून घ्या आणि मग उपाय करा. मुरुमं सुकवण्यासाठी पुदिन्याचा रस लावा. यामुळे काहीच दिवसांत मुरुमं सुकतील. वैद्यकिय उपचार म्हणून ओझोन ट्रीटमेंट घेऊ शकता. यामुळे त्वचा रिवायटलाइज आणि रिजुविनेट होते. शिवाय हीलिंग प्रक्रियाही वेगाने होते. यामध्ये अँटिफंगल आणि अँटिसेप्टिक गुण असल्याने इफेक्टेड स्किन लवकर बरी होते. ओपन पोर्सच्या समस्येसाठी यंग स्किन मास्कची सिटिंग्ज घ्या.

मी ३५ वर्षांची नोकरदार महिला आहे. मी चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप उत्पादनं वापरून पाहिली, पण चेहऱ्याचा कोरडेपणा गेला नाही. कृपया चेहरा ताजातवाना ठेवण्यासाठी घरगुती उपाय सांगा, जेणेकरून माझी समस्या सुटू शकेल.

कोरड्या आणि शुष्क त्वचेमध्ये आर्द्रता कमी असते. त्यामुळे चेहरा फिका पडतो. फिकेपणा दूर करण्यासाठी मास्क बनवा. ३-४ बदाम रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते जाडसर वाटून घ्या. यामध्ये स्मॅश केलेलं अर्धपिकं केळ, १ चमचा मध आणि ५ चमचे दूध मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये अर्धा चमचा कॅलेमाइन पावडर मिसळून चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

माझी त्वचा टॅन झाली आहे. मुलतानी मातीनेही काही उपयोग झाला नाही. मी काय करू?

तुम्ही एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून फ्रूट बायोपील फेशियल करून घेऊ शकता. या फेशियलमध्ये इतर फळांसोबतच पपईच्या एन्द्ब्राइम्सचा वापर केलेला असतो. यामुळे त्वचेचा रंग फिका होतो. यामुळे टॅनिंग रिमूव्ह होतं आणि त्वचेचं डीप क्ंिलजिंगही होते. घरातून निघण्याआधी चेहरा, हात, पाय, पाठ व शरीराच्या अन्य न झाकलेल्या भागांवर सनस्क्रीन लावायला विसरू नका. घरच्या घरी टॅनिंग घालवण्यासाठी दही, अननसचा रस आणि साखरेची पेस्ट करून त्वचेवर स्क्रब करा. स्क्रब केल्याने त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते.

मी ३८ वर्षांची आहे. माझ्या चेहऱ्याची त्वचा सैल, कोरडी आणि पिवळसर आहे. अनेक क्रिम लावल्या, पण चेहरा निस्तेज राहिला. चेहऱ्याची टवटवी कायम राहण्यासाठी उपाय सांगा.

क्रीम वापरल्याने काही खास फायदा होत नाही. त्वचा कॅरोटिन नावाच्या प्रोटिनपासून बनलेली असते. त्वचेला संपूर्ण पोषण मिळावं म्हणून आपल्या आहारात प्रोटिनयुक्त पदार्थ उदाहरणार्थ, दूध, दही, पनीर, अंडी, मासे यांचा समावेश करा.

याशिवाय एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून लेजर ट्रीटमेंट घ्या आणि यंग स्कीन मास्क लावा. लेजरने स्किन रिजनरेट होईल आणि मास्कमुळे त्वचेला कोलोजन मिळेल. यामुळे त्वचा टाइट होईल. याशिवाय सैल त्वचेला अपलिफ्ट करण्यासाठी फेस लिफ्ंिटग ट्रिटमेंट घेऊ शकता.

माझं वय ४१ वर्षं आहे. माझ्या नाकावर खूप ब्लॅकहेड्स आहेत. त्यांना कसं दूर करता येईल. कृपया सांगा.

वेळोवेळी चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून फ्रूट पील करून घ्या. याशिवाय तुमच्या ब्यूटिशियनला ओझोन द्यायला सांगा. यामुळे पोर्स उघडतील आणि ब्लॅकहेड्स सहज निघतील. याशिवाय ब्लॅकहेड्स काढण्यासाठी घरच्या घरीही स्क्रब बनवू शकता. यासाठी अॅलोवेरा जेलमध्ये थोडं बेसन आणि थोडी खसखस मिसळून स्क्रब करा.

माझं वय ३२ वर्षं आहे. माझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आहेत. माझ्यासाठी कोणती क्रिम उपयोगी ठरेल.

तुम्ही बाजारात मिळणारी कोणतीही चांगली क्रिम किंवा आय सिरम वापरू शकता. ज्यामध्ये रेटिनॉल, व्हिटॉमिन ‘ए’ आहे. डोळ्यांभोवती रिंग फिंगरने मसाज करा. यामुळे त्वचेवर खूप कमी दाब येतो.

माझं वय ३५ वर्षं आहे. माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत. त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी एखादा घरगुती उपाय सांगा.

दिवसातून २-३ वेळा त्वचेवर अॅस्ट्रिंजंट लावा. हे अँटीबॅक्टेरियल असतं. यामुळे मुरुमं आणणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. ब्लॅकहेड्स असतील तर ते वेळोवेळी काढा. घरगुती उपाय म्हणून पुदीन्याची पेस्ट त्यावर लावा.

माझ्या चेहऱ्यावर पांढरे डाग आहेत. हे डाग लेजरने कायमचे नष्ट करता येऊ शकतात का?

पांढऱ्या डागांसाठी लेजर नव्हे तर परमनंट मेकअपच्या खास तंत्राद्वारे म्हणजे परमनंट कसरिंगद्वारे लावण्यात येतं. यामध्ये सुरूवातीला एका डागावर प्रयोग केला जातो. त्वचा तो रंग ग्रहण करत असेल तर २-३ महिन्यांनंतर त्वचेशी साधर्म्य असलेला रंग त्वचेच्या डर्मिस लेझरपर्यंत पोहोचवला जातो. यामुळे डाग दिसत नाहीत. परमनंट कलरिंगचा परिणाम २ ते १५ वर्षांपर्यंत राहतो.

सौंदर्य समस्या

* प्रतिनिधी

  • मी १९ वर्षांची आहे. माझ्या चेहऱ्यावर ४-५ वर्षांपासून मुरुमांचा त्रास आहे. मी त्यांना फोडते, म्हणून माझ्या चेहऱ्यावर त्यांच्या खुणा आहेत. कृपया मला सांगा की मी या स्पॉट्सपासून कसे मुक्त होऊ?

आपल्याला ही समस्या आहे कारण आपल्या त्वचेचे छिद्र बंद झालेले आहेत आणि त्यात धूळ आणि घाण भरली आहे. तुम्ही रोज आपला चेहरा स्वच्छ करा. यासाठी क्लीनिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग करा. मुरुमे फोडू नका. डाग काढून टाकण्यासाठी कडुनिंब पॅक लावा. तसेच तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि दिवसाला ८-१० ग्लास पाणी अवश्य प्या.

  • मी ६ महिन्यांपूर्वी रीबॉन्डिंग केले होते. आता माझे केस मुळातून बाहेर येत आहेत. ते परत यावेत म्हणून मी काय करावे? मला एखादा शॅम्पू किंवा तेल सांगा, ज्याच्या मदतीने केस परत येतील?

रीबॉन्डिंग करताना रासायनिक उत्पादने वापरली जातात. म्हणून, रीबॉन्डिंगनंतर केसांची काळजी घेणे आवश्यक असते. आपण एखादा गुळगुळीत शॅम्पू वापरा आणि आठवडयातून एकदा हेअरमास्कदेखील लागू करा. त्याचबरोबर केसांना स्टीमही द्या. नक्कीच फायदा होईल.

  • मी १८ वर्षांची आहे. उन्हात गेल्यावर माझ्या सर्व चेहऱ्यावर लहान-लहान मुरुमे येतात. कृपया या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कुठलाही घरगुती उपाय सुचवा?

कडुलिंब आणि तुळशीचा फेसपॅक लावा. यामुळे त्वचेत असणारी घाण साफ होईल. आठवडयातून एकदा जेल स्क्रब अवश्य लावा. अन्नामध्ये कमी तेल वापरा आणि बाहेर जाण्यापूर्वी आपले तोंड झाकून घ्या.

  • सनबर्नमुळे गळयाचा मागील भाग काळा झाला आहे. उत्कृष्ट ब्लीच आणि वॅक्स वापरुन प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मला असे कोणतेही घरगुती उपचार सांगा ज्याद्वारे माझी समस्या सोडविली जाऊ शकेल?

जर उन्हामुळे होणाऱ्या त्रासाने मानेच्या मागील भागावर काळेपणा आला असेल तर आपण टोमॅटो, काकडी आणि बटाटा यांचा पॅक बनवून घ्या आणि लावा. नंतर २० मिनिटांनंतर हलके हातांनी चोळा आणि त्यातून मुक्त व्हा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. हे दिवसातून ३ वेळा करा. काळेपणा दूर होईल.

  • माझा रंग सावळा आहे आणि चेहऱ्यावर चमक नाही. कृपया एखादा घरगुती उपाय सुचवा?

चेहऱ्यावर चमक आणण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे दिवसाला  १०-१५ ग्लास पाणी पिणे. तसेच कोरफड जेलने दररोज चेहऱ्यावर मालिश करा. जेव्हापण आपण उन्हात बाहेर पडाल तेव्हा नेहमीच आपला चेहरा झाकून ठेवा.

  • माझ्याकडे असलेले बहुतेक कपडे शॉर्ट स्लीव्हचे आहेत. परंतु माझ्या हातांच्या रंगामुळे मी ते घालू शकत नाही. वास्तविक माझे अर्धे हात गोरे आणि अर्धे हात टॅनिंगमुळे काळे झाले आहेत. कृपया मला एखादा असा उपाय सांगा, ज्याद्वारे माझ्या हातांचा रंग एकसारखा होऊ शकेल?

जर हातांना टॅनिंग झाले असेल तर बेसन पीठ, हळद आणि दुधाची पेस्ट बनवून घ्या आणि लावा. थोडया वेळाने त्यातून मुक्त होण्यासाठी हलके हाताने चोळा. रंग हळूहळू साफ होईल. तसेच उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा आणि कॉटनचे हातमोजे अवश्य घाला.

  • माझे केस लांब आणि दाट तर आहेत, परंतु ते खूप विभाजित होत आहेत. बरेच ब्रँडेड शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कृपया काही उपचार सांगा?

जर केस विभाजित होत असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये प्रथिनांचा अभाव आहे. प्रथिने समृद्ध शॅम्पू आपल्या केसांना लावा आणि त्यानंतर केसांना प्रथिने क्रीम लावून १५ मिनिटांनी केस धुवा. दोन महिन्यांच्या अंतराने आपल्या केसांना ट्रिमिंगदेखील करत राहा.

  • मी ४० वर्षांची श्रमिक महिला आहे. प्रत्येक हंगामात माझ्या टाचा क्रॅक होतात. बरेच उपचार केलेत पण काही उपयोग झाला नाही? कृपया समस्या सोडवा?

आपल्या पायांची त्वचा कोरडी आहे. म्हणूनच रात्री झोपायच्या आधी आपले पाय कोमट पाण्यामध्ये काही काळ बुडवून ठेवा आणि नंतर मोहरीच्या तेलाने चांगले मसाज करा आणि काही काळ मोजे घाला. ऑफिसला जातानादेखील सॉक्स घाला. आपण आपले पाय जितके अधिक कव्हर कराल ते तितकेच नरम होतील.

  • मी ३५ वर्षांची श्रमिक महिला आहे. माझ्या केसांमध्ये वारंवार कोंडा होतो, ज्यामुळे ते खूप कोरडे होतात आणि डण्यास सुरवात करतात. मी नियमितपणे तेलदेखील लावते, तरीही असं होतं. कृपया घरगुती उपाय सुचवा?

तेल लावणे हा डोक्यातील कोंडयावर उपचार नाही. आपण कोरफड, नारळ आणि तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून ती केसांवर लावा किंवा मध आणि ग्लिसरीन मिसळा आणि डोक्यातील कोंडा निघत नाही तोपर्यंत केसांना लावा. नियमितपणे हे केल्याने निश्चितच फायदा होईल आणि केस चमकतील.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • मला नेलपॉलिश लावायला आवडते. परंतू नखांवरती पॉलिश जास्त दिवस टिकत नाही. असा कुठला उपाय आहे का ज्यामुळे नेलपॉलिश जास्त दिवस नखांवर टिकून राहील?

हातांना सुंदर दाखवण्यासाठी नेलपॉलिश लावणे एक सामान्य बाब आहे. अनेक रंगामध्ये उपलब्ध नेलपॉलिश हात सुंदर दिसावेत म्हणून वापरली जाते. परंतु अनेक वेळा असं होतं की नेलपॉलिश लावल्यानंतर जसे आपण पाण्याशी निगडित काही काम करता, त्यामुळे नेलपॉलिश निघून जाते. एवढेच नव्हे तर ती एकसाथ जात नाही, जे चांगले दिसत नाही. अशावेळेस पर्मनंट जेल नेलपॉलिश जी पर्मनंट मेकअपचा भाग आहे, त्याचा वापर करून कोणत्याही प्रकारच्या नखांना कृत्रिम स्वरूपात सुंदर बनवू शकता. जेल नेलपॉलिश नखांवर १० दिवसांपासून ते ३ आठवडयांपर्यंत टिकून राहते.

  • माझे वय ३३ वर्ष आहे. माझ्या हाताच्या एका बोटामध्ये रेड पॅच झाला आहे. हा काढण्यासाठी काही उपाय सांगा?

त्वचेवर रेड स्पॉट येण्याची बरीच कारणे असू शकतात. जसे इन्फेक्शन,अॅलर्जी आणि सुजेमुळे असे होऊ शकते. लाल डाग शरीराच्या कुठल्याही भागावर दिसू शकतात. कधी-कधी तर ते अचानक उमटणारे लाल डाग चिंताजनक नसतील, पण हे ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सरचे लक्षणसुद्धा असू शकतात. हे डाग कधीकधी अचानक उमटतात आणि नाहीसे होतात. कधी-कधी दीर्घकाळपर्यंत राहतात. म्हणून सावधानी म्हणून अगोदर कुठल्या तरी डर्मेटोलॉजिस्टला दाखवावे. जर अॅलर्जी, ड्राय स्किन किंवा मग अॅक्नेमुळे लाल डाग झालेच तर मधाचा लेप फायदेशीर ठरू शकतो. मधाला नैसर्गिक औषध म्हटले जाते. जर सूर्याच्या उष्ण हवेमुळे किंवा सनबर्नमुळे त्वचेवर लाल डाग आले असतील तर मधाचा लेप लावू नये.

  • माझे वय २१ वर्षं आहे. मी सध्या लाईट मेकअप करू इच्छिते. कृपया मला यासाठी उपयुक्त उपाय सांगावा?

मेकअप करण्याअगोदर तुमचा चेहरा पूर्णपणे साफ आहे ना हे बघा. टोनरचा उपयोग केल्यास मेकअप पसरत नाही. लाईट मेकअप करताना काजळाचा उपयोग जरूर करावा. लाईट मेकअप करत असताना गडद रंगाची शॅडो वापरण्याचे टाळावे आणि जर लावायचीच असेल तर न्यूट्रल कलर वापरावा. लाईट कलरची लिपस्टिक ग्लॉसबरोबर लावणे अधिक चांगले. ग्लिटरचा वापर टाळावा. दिवसा ऊन आणि गरमीमुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. म्हणून नेहमी वाटरप्रूप ब्युटी प्रॉडक्ट्सचाच उपयोग करावा. मेकअप करण्याच्या २० मिनिटे अगोदर सनस्क्रीन लावायला विसरू नये.

  • एएचए क्रीम लावल्याने काळी वर्तुळे आणि डाग नाहीसे होऊ शकतात का? याच्या नियमित वापरामुळे त्वचा चमकदार बनू शकते का?

एएचए म्हणजे अल्फा हाईड्रोक्सी अॅसिड क्रीम, ज्याच्यात फळातून काढलेले असे उपयुक्त अॅसिड असतात आणि जे त्वरित कोलोजनची पातळी वेगाने वाढवून त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाहीत. ते डोळयांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासही सहाय्यक ठरते. या क्रीमच्या उपयोगामुळे एक्सफॉलिएशन आणि नवीन पेशी बनण्याची प्रक्रिया वाढते. ज्यामुळे त्वचेत नाविन्य दिसून येते. रोज रात्री चेहरा साफ केल्यानंतर आपल्या रिंग फिंगरमध्ये थोडीशी एएचए क्रीम घेऊन डोळयांच्या चारी बाजूला हळू-हळू गोलाकार मसाज करावा. अशाप्रकारे रोज ही क्रीम लावल्याने डाग कमी होतात आणि त्याचबरोबर त्वचासुद्धा उजळलेली दिसते. फक्त लक्ष असू द्या की क्रीम डोळयात जाता कामा नये.

  • माझे वय ३४ वर्षं आहे. मी एक वर्ष अगोदर हेअर रिबॉण्डिंग केलं होतं. परंतु आता माझे केस पुन्हा कोरडे होऊ लागलेत. कृपया सांगा की हेअर -रिबॉण्डिंग किती वेळा करून घेऊ शकतो?

आजकाल जपानी थर्मल प्रक्रिया स्ट्रेटनिंग केसांना करण्याचा सगळयात लोकप्रिय उपाय बनला आहे, ज्याला रिबॉण्डिंगही म्हटले जाते. पुर्ण रिबॉण्डिंग प्रक्रियेचा प्रभाव १ वर्षापर्यंत राहतो. याचा प्रभाव नवीन उगवलेल्या केसांवरही अनुभवता येतो. हे सांगणे आवश्यक आहे की केसांचं रिबॉण्डिंग केसांनां सरळ करण्याचा महाग परंतु प्रभावशाली उपाय आहे.

  • माझे वय ३२ वर्षं आहे. मी कधी अप्पर लिप्स केले नाहीत, करण्याचा सगळयात सोपा आणि योग्य उपाय काय आहे?

लिप हेयर हटवणं थोडं वेदनादायी आहे, परंतु हे हटवणंही आवश्यक आहे. जर तुम्हालाही अप्पर लिप्स करून घेताना खूप वेदना होत असतील तर आपण घरगुती उपायसुद्धा करू शकता. २ लिंबांचा रस काढून त्यात थोडे पाणी आणि थोडी साखर मिसळून घ्या. ही पेस्ट तोपर्यंत मिसळा जोपर्यंत पेस्ट पातळ होत नाही. आता तयार केलेली पेस्ट आपल्या ओठांच्या वरच्या भागावर लावा. १५ मिनिंटानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.

  • माझे वय २६ वर्षं आहे. मी रंगाने सावळी आहे. माझ्या चेहऱ्यावर मुरुमांचे काळे डाग आहेत. कृपया हे नाहीसे करण्याचा घरगुती उपाय सांगा.

जर डाग जुने, गंभीर गहिरे असतील तर तुम्ही हे हटवण्यासाठी एखाद्या विशेषज्ज्ञाचा सल्ला घेणे जरुरी आहे. चेहऱ्यावरचे डाग हटवण्यासाठी १ मोठा चमचा सफरचंदाचा रस (साइड व्हिनेगर), २ छोटे चमचे मध, आवश्कतेनुसार पाण्यात मिळवून पेस्ट तयार करून घ्या आणि याचा उपयोग करा. अँटी साइडर व्हिनगरमध्ये मायक्रोबियल गुण असतात.

हे मिश्रण कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर आणि पिंपल्सवर लावावे. १५ मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्यावा. तुम्ही हे मिश्रण रोज किंवा एक दिवसाआड लावू शकता.

सौंदर्य समस्या

* इशिका तनेजा एअर ब्रश मेकअप एक्सपर्ट

  • मागील कित्येक वर्षांपासून सतत नेलपेण्ट लावल्यामुळे माझ्या नखांवर पिवळेपणा आला आहे. नखं कमकुवत व तुटल्यासारखे दिसतात. कृपया यासाठी काय करावे लागेल ते सांगा?

नखे पिवळी दिसणं हे फक्त आरोग्यासाठी वाईट नाही तर ते दिसायलाही वाईट दिसते. ही समस्या सोडवण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, १ चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवून नखांवर लावा व टूथब्रशने सॉफ्ट स्क्रब करा. नखांना अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये भिजवणे हासुद्धा उत्तम पर्याय आहे.

केसांसाठी योग्य शाम्पू कसा निवडावा?

हल्ली कंपन्या तऱ्हेतऱ्हेचे शाम्पू बनवत आहेत. शाम्पू निवडण्यासाठी तुमचे केस कशाप्रकारचे आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. केस धुतल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात दुसऱ्याच दिवशी व थंडीच्या मोसमात दोन दिवसांनंतर चिकट होऊ लागले आणि धुण्याची गरज वाटत असेल तर तुमचे केस ऑयली आहेत.

जर उन्हाळी दिवसांत २ दिवसांनंतर आणि थंडीच्या दिवसांत ३ दिवसांनंतर धुण्याची गरज वाटली तर तुमचे केस सामान्य आहेत. जर उन्हाळी दिवसांत ३ दिवसांपर्यंत आणि थंडीच्या दिवसांत ४ दिवसांपर्यंत केस धुण्याची गरज पडली नाही तर तुमचे केस कोरडे आहेत.

शुष्क केसांसाठी नेहमी मिल्की म्हणजे कंडीशनर युक्त शॉम्पू वापरा. खूप शुष्क व द्विमुखी केसांना क्रिमी शाम्पूबरोबर एक्स्ट्रा कंडिशनरचा पण वापर करा. ऑयली केसांना जास्त करून डीप क्लीन शाम्पूचा वापर योग्य असतो.

  • मी वॉर्म आणि कूल टोनबद्दल खूप वाचले आहे. कसे समजून घेऊ की माझा टोन वॉर्म आहे की कूल? घरी स्वत:च हे जाणून घेणे शक्य आहे का? त्याची काही पद्धत आहे का?

आपली नॅचुरल स्कीनटोन ४ रंगांमध्ये असते. यलो, पिंक, ऑलिव्ह किंवा पीच कलर. यामध्ये २ टोन वॉर्म व २ टोन कूल असतात. भारतीय त्वचा साधारणत: वॉर्म टोनमध्ये असते.

आपली स्कीनटोन वॉर्म आहे की कूल हे आपण घरीसुद्धा माहीत करून घेऊ शकतो. यासाठी उन्हात जाऊन आपले केस वर बांधावेत. मग स्वत:वर गोल्डन किंवा सिल्व्हर कापड ठेवून पाहा. असे केल्याने जर तुम्हाला गोल्ड कलर शोभून दिसत असेल तर तुमची स्कीन टोन वॉर्म आहे. सिल्व्हर कलर सूट होत असेल तर स्कीनटोन कूल आहे.

हिना डाय बनवण्याची चांगली पद्धत सांगा?

हिना एक नैसर्गिक डाय आहे. जिच्या योग्य आणि सततच्या वापराने केसांना उत्तम रंग मिळतो. रात्री २ चमचे चहा पावडर, २ ग्लास पाण्यात घालून उकळून घ्या.

पाणी अर्धे राहील तेव्हा गाळून घ्या. लोखंडी कढईत २ कप मेंदी, अर्धा कर आवळा पावडर, अर्धा कप शिकेकाई पावडर, २ चमचे कॉफी पावडर व अर्धा चमचा कात घालून चहा पावडरच्या पाण्याने पेस्ट बनवून घ्या. सकाळी यात अंडे व मध घालून व्यवस्थित मिसळून घ्या व केसांना लावा. २-३ तासानंतर केस धुऊन घ्या. मग सुकल्यावर केसांना तेल लावा. दुसऱ्यादिवशी शाम्पू लावा. केसांना सुंदर रंग येईल व केस चमकदार होतील.

  • मी १८ वर्षांची आहे. माझ्या शरीरावर अनेत ठिकाणी पांढरे डाग आहेत. मला कायमस्वरूपी पद्धतींबद्दल माहिती हवी आहे व हे कुठे करता येऊ शकते? खर्च किती येईल याबद्दलही सांगा?

सफेद डाग लपवण्यासाठी परमनंट कलरिंग पद्धती उपलब्ध आहे. ही फायदेशीर आहे. यामध्ये सर्वात आधी एखादा पांढरा डाग निवडून त्यावर टेस्ट केली जाते. जर त्वचेच्या रंगाने तो रंग स्विकारला तर २-३ महिन्यांनी त्वचेशी मिळता जुळता रंग त्वचेच्या डर्मिस लेयरपर्यंत पोहोचवला जातो. ज्यामुळे डाग दिसत नाहीत.

परमनंट कलरिंगचा परिणाम २ चे १५ वर्षांपर्यंत राहू शकतो. ही सुविधा तुम्हाला प्रसिद्ध कॉस्मेटिक क्लीनिकमध्ये मिळू शकते. याचा खर्च ५ हजार रुपयांपासून सुरू होतो. जो प्रत्येकी इंच स्वेअरच्या हिशेबाने असतो.

  • माझी त्वचा खूपच काळवंडली आहे. मुलतानी मातीनेही फायदा होत नाही. काय करू?

तुम्ही एखाद्या कॉस्मेटिक क्लीनिकमधून प्रूट बायोपील करवून घेऊ शकता. या फेशिअलमध्ये इतर फळांव्यतिरिक्त पपईच्या एंजाइम्सचा पण वापर केला जातो. जो स्कीन कलर लाईट करतो. या फेशिअलमुळे टॅनिंग तर दूर होतेच. पण त्वचेची खोलवर स्वच्छता होते. बरोबरीनेच उन्हात बाहेर पडताना चेहरा, हात, पाय, पाठ व इतर उघड्या भागांवर सनस्क्रीन जरूर लावा.

घरी टॅन रिमूव्ह करण्यासाठी चोकरमध्ये दही, थोडा अननसाचा रस आणि थोडी साखर मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर स्क्रब करा. यामुळे त्वचा स्वच्छ, मुलायम आणि उजळ राहते.

सौंदर्य समस्या

*प्रतिनिधी

  • मी 35 वर्षांची महिला आहे. गेल्या काही दिवसांपासून माझे केस निर्जीव आणि फाटत चालले आहेत. मी केसांना रंग देण्यासाठी मेंदी लावतो. मेंदी लावल्यानंतर जेव्हा मी शॅम्पू करतो तेव्हा माझे केस अधिक कोरडे आणि निर्जीव होतात. केस मऊ आणि चमकदार करण्याचा कोणताही प्रभावी मार्ग आहे?

मेहंदी हे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होण्याचे कारण आहे. खरं तर, मेंदीमध्ये लोह असते, जे केसांना लेप करते, ज्यामुळे ते कोरडे आणि निर्जीव होतात. जर तुम्हाला फक्त केसांना रंग देण्यासाठी मेंदी लावायची असेल तर सर्वप्रथम सर्व केसांवर मेंदी लावण्याऐवजी फक्त रूट टचिंग करा. दुसरे म्हणजे, मेंदीच्या द्रावणात थोडे तेल मिसळा, तसेच मेंदी लावल्यानंतर केसांना शॅम्पू करू नका, फक्त मेंदी पाण्याने काढून टाका. मग केस कोरडे झाल्यावर टाळूला तेल लावून शॅम्पू करा. याशिवाय केसांमध्ये मेथीचे पॅक आणि दही वगैरे लावा. यामुळे केसांचा उग्रपणा दूर होईल आणि ते चमकदार आणि मऊ होतील.

  • मी 29 वर्षांची मुलगी आहे. माझ्या केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे मी खूप काळजीत आहे. डोके खाजत राहते आणि संध्याकाळपर्यंत मान, खांदे आणि शर्ट ब्लाउज कोंड्याने भरलेले असतात. ही समस्या गेल्या 1 वर्षापासून कायम आहे. मी अनेक प्रकारचे शॅम्पू वापरून पाहिले पण मला आराम मिळत नाही. काही काळासाठी, केसदेखील जास्त प्रमाणात पडू लागले आहेत. डँड्रफ, डँड्रफ, डँड्रफ हे सर्व समान विलीन आहेत की त्यांच्यामध्ये काही फरक आहे? मला काही घरगुती उपाय सांगा जेणेकरून मी या समस्येपासून मुक्त होऊ शकेन?

डोक्यातील कोंडा, डोक्यातील कोंडा, डँड्रफ हे तिन्ही एकाच विलीनीकरणाची नावे आहेत, ज्यात डोक्याच्या त्वचेची लहान साले उतरतात आणि कोंड्याच्या स्वरूपात पडतात. ही समस्या नेमकी कशामुळे होते हे सांगणे कठीण आहे. परंतु वैयक्तिकरित्या, अनुवांशिक कारणे आणि हवामानाचा कोंड्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. काही कुटुंबांमध्ये तो प्रत्येकाला त्रास देतो. हिवाळ्यात ही समस्या वाढते. असे मानले जाते की टाळूच्या तेलकट ग्रंथींमध्ये तयार होणाऱ्या सेबममध्ये काही जिवाणू आणि बुरशीजन्य प्रजातींच्या स्थायिकतेमुळे ही समस्या उद्भवते. काहींमध्ये, समस्या सोरायसिसशी संबंधित असताना थोडी अधिक गंभीर असते.कोंड्यापासून मुक्त होण्यासाठी, आपण आठवड्यातून दोनदा प्रोटार शैम्पूने टाळू धुवावे. रोज केसांच्या मुळांवर डिप्रोवेट लोशन लावा. यामुळे डोक्यातील कोंडा दूर होईल आणि डोके खाजणेही थांबेल. परंतु जर हे उपाय कार्य करत नाहीत, तर त्वचारोगतज्ज्ञांसह उपचार सुरू करणे चांगले.

  • मला माझ्या चेहऱ्यावर २-३ ठिकाणी warts आले आहेत का? जे त्यांच्या आकारातही हळूहळू वाढत आहेत? मला काळजी वाटते की ते वाढू शकते आणि चेहऱ्यावर पसरू शकते? कृपया कोणताही उपाय सुचवा जेणेकरून हे मस्सेदेखील निघून जातील आणि पुढे होणार नाहीत?

वॉर्ट्सला इंग्रजीमध्ये वॉर्ट्स म्हणतात. हे बर्याचदा जास्त सूर्यप्रकाशाच्या प्रदर्शनामुळे किंवा मानवी पॅपिलोमा विषाणू नावाच्या विषाणूमुळे होते. जरी या मस्सा दुखत नाही. पण दोघेही चांगले दिसत नाहीत आणि त्याच वेळी आपले सौंदर्य कमी करण्याचे काम करतात. अशा स्थितीत, जर तुमच्या डोक्यावर, मानेऐवजी तुमच्या चेहऱ्यावर हे मस्से वाढतात, तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला काही प्रगत उपचारांबद्दल जागरूक करतो, ज्यामुळे तुम्ही चामखीळांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता तसेच तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवू शकता.

तर या संदर्भात एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, फरिदाबादचे त्वचारोग तज्ञ डॉ. अमित बांगिया यांच्याकडून जाणून घेऊया.

उपचार काय आहे

आम्ही तुम्हाला सांगू की मोठ्या प्रमाणावर, मस्सा स्वतःच बरा होतो. याचे कारण असे की जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मस्सा निर्माण करणाऱ्यांशी लढण्यास सक्षम असते. पण किती वेळ लागेल, त्याबद्दल कुठे जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, या मस्सा वाढण्याची समस्या लक्षात घेऊन बरेच लोक वैद्यकीय उपचारांचा अवलंब करतात.

सौंदर्य समस्या

*प्रतिनिधी

  • मसाजसाठी कोणते तेल योग्य आहेत आणि मालिश कशी करावी, कृपया सांगा?

चांगल्या टाळूच्या आरोग्यासाठी जोजोबा तेल, रोझमेरी तेल, ऑलिव्ह तेल, नारळ, मोहरी किंवा बदाम तेलाने मालिश करा. आठवड्यातून दोनदा कोरड्या केसांवर, आठवड्यातून एकदा सामान्य केसांवर मालिश करा. टाळूचे पोषण करण्यासाठी मालिश करण्याची पद्धतदेखील विशेष असावी. दोन्ही हातांचे अंगठे मानेच्या मागच्या खड्ड्यात ठेवा, बोट कपाळावर समोर पसरून ठेवा. मग कपाळावर बोटं ठेवून, अंगठा गोलाकार हालचालीत फिरवून आणा. मग बोटे सरळ डोक्याच्या मध्यभागी हलवा आणि हलवा. अशा प्रकारे, मानेपासून खाली डोक्याच्या वरपर्यंत दाब देताना मालिश करा.

दिवसभर काम केल्यानंतर थकवा आपल्या संपूर्ण शरीरावर अधिराज्य गाजवतो. अशा स्थितीत थकव्यामुळे मेंदू काहीही विचार करण्याच्या स्थितीत नसतो. थोडी विश्रांती आणि मालिश शरीरात ऊर्जा परत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मालिश तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू की डोक्याची मालिश केल्याने रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे ऑक्सिजनची पुरेशी मात्रा मेंदूपर्यंत पोहोचते आणि झोपेची गुणवत्ताही सुधारते.

जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना चांगल्या प्रतीच्या तेलाने मसाज करता तेव्हा ते तुम्हाला मानसिक शांती तर देतेच पण तुमचे केस सुंदर आणि निरोगी बनवते. याशिवाय डोक्याला मसाज करण्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फायद्यांविषयी सांगणार आहोत.

मायग्रेन आणि डोकेदुखी मध्ये कधीकधी तणाव किंवा चिंतामुळे पाठ आणि डोकेदुखीची समस्या असते. यामुळे, तुमच्या दैनंदिन जीवनातील कामांवर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत जर तुम्ही डोक्यावर मसाज केला तर ते संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह वाढवते. हे तुमचे मन शांत करते आणि तणाव दूर करते. याशिवाय जर डोक्याची नियमितपणे मालिश केली गेली तर मायग्रेनची समस्या देखील कायमची दूर होऊ शकते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें