सोशल मीडिया अर्धे किस्से अर्ध वास्तव

* पूनम अहमद

अंजू जेव्हा सांगते की मला घरच्या कामांमधून सोशल मीडियावर राहायला फुर्सतच मिळत नाही, मला याची अजिबात आवड नाही आहे, तेव्हा तिच्या मैत्रिणी रेणू आणि दीपा मनातल्या मनात हसत होत्या. त्यावेळी दोघी गप्प बसल्या, परंतु नंतर दोघी या गोष्टीवर अंजूची खेचत राहिल्या, अंजूने जर ऐकलं असतं तर या दोघींसमोर कधीच भोळी बनण्याचं नाटक केलं नसतं.

यावेळी हेच होतंय अंजूच्या बोलण्यावर दोघी मागून हसत आहेत. दीपा म्हणतेय, ‘‘यार ही काय आपल्याला मूर्ख समजते, प्रत्येक वेळी फेसबुकवर ऑनलाइन दिसते. ना कधी कोणाच्या पोस्टवरती लाईकचं बटन दाबते ना कमेंट करते, नोकरी तर करत नाही, मुलं मोठी झाली आहेत, वाचनाची तर काही आवड नाही, दिवसभर हिच्या नावासमोर ग्रीन लाईट सुरू असते. विचार करते की एक दिवस एक स्क्रीन शॉट घेऊन तिलाच दाखवायचं. तेव्हाच या खोटयातून आपला पिच्छा सुटेल. यार, हिला माहित नाही की आता कोणाचंही आयुष्य खाजगी राहिलं नाहीए.’’

रेणू हसली, ‘‘सोशल मीडिया कमालीची गोष्ट आहे. लोकं स्वत:ला हुशार समजतात. त्यांना हे माहीत नाही की त्यांच्यावरती कोण कोण नजर ठेवतंय. आता सपनावासूचंच बघा ना,’’ एवढं बोलून दोघी पुन्हा खो-खो हसू लागल्या.

रहस्य उघड होण्याची भीती

रेणू आणि दीपा दोघी एका शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्या शाळेमध्ये ग्रंथपाल दीपक आणि ड्रॉइंग टीचर आहे सपना. दोघांचं वय ५५ च्या आसपास आहे. दीपक जरासा दिलफेक आशिक आहे. स्त्रियांशी गप्पा मारायला त्याला खूप आवडतं, कोणत्याही वयाची स्त्री असो त्याला काहीच फरक नाही. फक्त बाई असायला हवी. सपनाची दोन्ही मुलं परदेशात आहेत. तिथे तिच्या निवृत्त पतींसोबत राहतात. वय ५५ झाले आहे परंतु अजूनही मन अजून विशी वरतीच अडकलं  आहे.

एके दिवशी सपना ग्रंथालयात एक पुस्तक घ्यायला गेली तेव्हा दीपकला पाहिलं आणि प्रेमातच पडली की, आज रेणू आणि दीपासारख्या सैतान आणि मस्तीखोर शिक्षकांनी त्यांचं नाव सपनावासू ठेवलंय. त्यांची चोरी सर्वानी फेसबुक आणि इंस्टाग्राम वरतीच पकडली. आता तर लोकं फेसबुकवरती एकमेकांचे फ्रेंड्स आहेत.

सपना असो वा दीपक जेव्हा एखादी पोस्ट टाकतात तेव्हा असं मनोरंजन होतं की दिवसभर लोकं शाळेत दोघांकडे इशारे करताना दिसतात. दोघे एकमेकांच्या पोस्टवरती एवढी स्तुती करून मोठ मोठे कमेंट करतात की काही दिवस लोकांनी तसं हलक्यात घेतलं, परंतु हे काही लपलं नाही, सर्वांना समजलं की काहीतरी आहे की जे लपवलं जातंय. आता तर अशी परिस्थिती आहे की वासू ओह सॉरी दीपकची जर एखादी पोस्ट आली तर सर्वजण वाट पाहत असतात की आता पाहूया. आज सपनाजी काय लिहिणार आहे. असं वाटतं की दीर्घ कमेंट लिहून एकमेकांच्या गळ्यातच लटकतील एके दिवशी.

आता तर वासूसपना हेच नाव झालंय. कोणी एखादा जुना फोटो टाकतं तेव्हा उफ, एक एडल्ट लव्ह स्टोरी… वासू दीपकच्या कमेंटवर दिवसभर या शैतान ज्युनिअर टीचर्स एकमेकांना फोन करून हसत राहतात. आता बिचाऱ्या या वयस्कर प्रेमिकांनी स्वप्नातदेखील आशा केली नसेल की तिथे किती बदनाम झाले आहेत.

मूर्ख बनणारी लोकं

आता सीमाबद्दल बोलूया, जी एक उभरती गायिका आहे. आतापर्यंत सोसायटी आणि महाविद्यालयाच्या कार्यक्रमात गाणी घेऊन स्वत:चा छंद पूर्ण करत होती. परंतु तिची मैत्रीण नेहा तिच्यापेक्षा थोडी जरा जास्त आहे. नेहालादेखील सिंगिंगमध्ये पुढे जायचं आहे. दोघींना एकच मुलगा आहे जे अजून लहान आहेत. दोघींचे पती त्यांना खूपच पाठिंबा देतात. अचानक नेहाने सीमाला सांगितलं की प्रसिद्ध गायक सुधीर वर्माने भेटण्यासाठी बोलावलं आहे. सीमाच डोकं चाललं की तिला कसं काय बोलावलं?

ही पण तर माझ्यासारखीच आहे. हिला संधी कशी मिळाली? तिने विचारलंच,

‘‘अरे पण हे तुला कुठे भेटले?’’

‘‘इंस्टाग्रामवर फॉलो करते.’’

‘‘मग काय झालं? ते तर मी पण करते.’’

‘‘बस आमची हळूहळू ओळख झाली.’’

सीमाला समजलं नाही की फॉलो केल्याने काय होतं. आता दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत परंतु दोघींमध्ये तशी छुपी स्पर्धादेखील आहे. पुढे तर जायचं आहे. आता नेहाने सर्वांना कशाला सांगेल. सीमाने घरी जाऊन सुधीर वर्माच्या पोस्ट बघितल्या. तिच्या प्रत्येक पोस्टवरती नेहाचे कमेंट्स दिसले. तर असं आहे मॅडम प्रत्येक जागी मोठमोठया कमेंट्स लिहून स्वत:बद्दल सांगत असते. ओह, मी किती मूर्ख आहे. त्यांचा पेज फक्त लाईक करत सोडून देत राहिली. चला अजूनही काय बिघडलं आहे.

आतापासूनच सुरुवात करते. मग काय जिथे सुधीर वर्मा तिथे सीमा. रियाज एका बाजूला, लाईक्स आणि कमेंट्स एका बाजूला. सुधीर वर्माच काय सीमाने अजूनदेखील इतर सिंगर्सना फॉलो करायला सुरुवात केली. सर्व ताकद त्यांच्या नजरेत येण्यासाठी लावली. गाणं काय आहे, ते तर गातेच.

नकली लोकं नकली कमेंट्स

कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सुजाता निराशपणे बसली होती. तिची मैत्रीण रीनीने विचारलं, ‘‘काय झालं, बॉयफ्रेंड पळाला का?’’

‘‘मूर्खपणा करू नकोस.’’

‘‘मग काय झालं?’’

‘‘यार, मी किती चांगली कविता फेसबुकवर पोस्ट केली तरी माझ्या पोस्टला लाईक का मिळत नाहीत? माझी कझिन रोमा किती वाईट लिहिते, तरीदेखील तिला वाहवाही मिळते.’’

‘‘तुला नाही माहित?’’

‘‘काय?’’

‘‘तिच्या कवितेसोबत ती तिचे कितीतरी फोटो टाकते तेदेखील फिल्टर वाले. शिकून घे काही. मूर्ख मुली असेच मिळत नाही सर्व काही. अदा दाखव काही जलवे दाखव. काहीही कर, पण स्वत:ला दाखव. तिला तिच्या कवितेवरती नाही तर तिच्या नकली फोटोवर लाईक्स मिळतात.’’

तर सुजाताला हे समजलं तिने रीनाच म्हणणं मानलं, आता ती आनंदी आहे.

प्रेम प्रकरण

सोशल मीडियावरती तुम्ही स्वत:ला किती बुद्धिमान समजत असाल तरी तुमच्यावर नजर ठेवणारे तुमच्यापेक्षा अधिक हुशार आहेत. तुम्हाला जर कधी कंटाळा आला असेल, तुमच्याजवळ खूप वेळ असेल तर आरामात सोशल मीडियावरती वेळ घालू शकता. पहा, लोकं काय काय करत आहेत, कुठेही जायचं नाही, ओमी क्रॉनचा वेळ आहे, सर्वात सेफ आहे सोशल मीडियावर मनोरंजन करणं. बस दुसऱ्यांना बसताना पहा, परंतु अंजूप्रमाणे हे सांगण्याची चूक कधीच करू नका की तुम्ही सोशल मीडियावर नसता. सर्वांना तुमचा प्रेझेन्स माहित असतो.

घरात बंद होऊन थोडसं मनोरंजन करणं तुमचा हक्क आहे. आरामात दुसऱ्या प्रकरणांमध्ये डोकं खुपसायचं. सोशल मीडिया खूपच कामाची गोष्ट आहे, ज्याबद्दल समजून घ्यायचं असेल तर शोधून काढा तिच्या लाईफला आणि नंतर भोळे बनून आशिकीच्या गोष्टींचा आनंद घ्या ज्यामध्ये वासू सपनासारखी लोकं एकमेकात बुडाली आहेत. मैत्रिणींसोबत हसा, मस्ती नक्की करा. फक्त तुमच्या या मनोरंजनाने कोणाचं नुकसान करू नका, ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें