सेक्स फिलिंग्सचे ५ सिक्रेट्स

* अंजू जैन

बहुतेक महिलांची इच्छा असते की, त्यांचे काही सेक्स सीक्रेट्स त्यांच्या पतींनी स्वत:हून जाणून घेतले पाहिजेत. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी इलिनॉयसच्या सेक्शुअलिटी प्रोग्रामच्या थेरपिस्ट पामेला श्रॉक सांगतात की बहुतेक विवाहित पुरुष आपल्या पत्नीच्या सेक्शुअल प्राथमिकता आणि इच्छांबाबत जाणून घेत नाहीत. पामेलाने या विषयावर पत्नीच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना काही अशा सेक्स सीक्रेट्सबाबत कळले, ज्याबाबत महिलांना आपल्या पतीला सांगायचे असते, पण त्या सांगू शकत नाहीत.

महिलांसाठी चांगले सेक्स केवळ इंटरकोर्स नव्हे : महिलांना आनंददायी सेक्ससाठी केवळ इंटरकोर्सच नव्हे, तर पतीसोबत दिवसभरातील अन्य क्षणांमध्येही चांगल्या फीलिंग्स आणि अनुभवाची गरज असते. महिलांना या गोष्टी मुळीच आवडत नाहीत की पती दिवसभर केवळ कामात व्यस्त राहावा, रात्री घरी येऊन जेवल्यानंतर उशिरापर्यंत टीव्ही पाहिल्यानंतर मग बेडवर येताच पत्नीला पकडावे. त्यामुळे पत्नीला स्वत:ला एखादी वस्तू असल्यासारखी भावना निर्माण होते. ती आपल्या पतीला खूप स्वार्थी आणि स्वत:ला उपभोगाची वस्तू मानू लागते. प्रत्येक पत्नीची इच्छा असते की तिच्या पतीने केवळ बेडवरच नव्हे, तर बेडवर नसतानाही तिच्यावर तेवढेच प्रेम करावे, तिच्याकडे लक्ष द्यावे, तिच्यासोबत आपल्या गोष्टी शेअर कराव्यात, प्रेमाने बोलावे, तिच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा इ.

समाजशास्त्रज्ञ डालिया चक्रवर्तींचे म्हणणे आहे, ‘‘पत्नी आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू एकमेकांशी जोडून पाहते, याउलट पती समजतात की स्ट्रेस आणि भांडणे सेक्सच्या वेळी एका बाजूला ठेवले पाहिजे आणि या गोष्टी सेक्सशी जोडू नयेत. खरे तर सेक्सची खरी मजा अफेक्शनमुळे येते. मानसिकरीत्या आपलेपणा, प्रेम आणि जवळीक असते, तेव्हाच सेक्ससंबंध योग्यरीत्या व उत्तेजनापूर्ण होतात.

जेव्हा एखादा पती आपल्या पत्नीला वेळोवेळी लहान-मोठया भेटवस्तू देतो, बायको-मुलांना घराबाहेर फिरायला नेतो, कुटुंबाची काळजी घेतो आणि पत्नीला स्पेशल फील करवून घरातील वातावरण आनंदी ठेवतो, तेव्हा सेक्सचा आनंद अनेक पटीने वाढतो.’’

महिलांना टर्नऑन करण्यासाठी प्रेमपूर्वक बोलावे : रात्रीच्या भोजनाच्या वेळी प्रेमळ छेडछाड, रोमँटिक बोलणे आणि रोमांचित करणारे किस्से पत्नीला अंतर्मनातून सुखावून टाकतात. त्यामुळे त्यांचा मूड बनतो. त्याचप्रमाणे, सेक्सच्या वेळी पत्नीची प्रशंसा, तिच्यापुढे प्रेमाची कबुली आणि तिचे नाव घेणे पत्नीमध्ये उत्तेजना निर्माण करण्यास मदत करेल.

सेक्स थेरपिस्ट लिन एटवॉटर सांगते, ‘‘महिलांमध्ये शारीरिक संबंधात जास्त रुची मानसिक उत्तेजना आणि मानसिक संबंधांवर अवलंबून असते.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मेडिकल स्कूलच्या सायकॉलॉजिस्ट लोनी बारबच सांगतात की, खरे तर घरातील कामे, मुलांची देखभाल, पतीची हजार कामे आणि मग ऑफिस वर्कच्या दबावामुळे पत्नीची सर्वात मोठी गरज सहानुभूती व प्रेमपूर्वक बोलणे याची असते. तिच्या शरीरावर हात फिरविल्याने तिला बरे वाटते, त्यापेक्षा तिच्या मनावर हळुवार फुंकर घातल्याने तिला आनंद मिळतो. प्रत्येक पत्नीची इच्छा असते की तिच्या पतीने तिच्याशी रोमँटिक बोलावे.’’

महिलांमध्येही असते परफॉर्मन्स एंग्जाइटी : अनेक अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे की केवळ ६० टक्के अशा महिला आहेत, ज्यांनी जेवढया वेळाही संभोगसुख घेतले, त्यातून केवळ अर्ध्या वेळाच त्यांना अत्युच्च सुखाचा आनंद मिळाला. परंतु त्यांना पतीला खूश करण्यासाठी सेक्सच्या वेळी अत्युच्च सुखप्राप्तीचा दिखावा करावा लागला. काही वेळा तर त्यांना स्वत:लाच अपराधी झाल्यासारखे वाटते की त्यांच्यात तर काही कमी नाहीए ना…

पत्नीमध्येही आपल्या शरीराची बनावट, आकार आणि स्वच्छतेबाबत तुलनात्मक हीनतेची भावना असते. म्हणूनच त्यांना काळोखातच निर्वस्त्र व्हायची इच्छा असते. अशा वेळी त्यांना आपल्या पतीकडून प्रोत्साहन, आपल्या शारीरिक अवयवांबाबत स्तुती आणि सौंदर्याबाबत कौतुकाची अपेक्षा असते.

अनेक पतींना तर आपल्या पत्नीची प्रशंसा करणे माहीतच नसते आणि सेक्सच्या वेळी तिच्या अवयवांमधील कमतरता सांगायला सुरुवात करतात. पत्नीला जाडी, थुलथुलीत असे न जाणो काहीबाही बोलत राहतात. अशा वेळी पत्नी मनाने नीरस होणे, तणावग्रस्त होणे स्वाभाविक आहे. अशी पत्नी आपल्या पतीसोबत सेक्ससंबंध साधण्यास टाळाटाळ करते.

स्पष्टच आहे, त्यांचे लैंगिक जीवन नीरस आणि आनंदविहिन होते. खोटया बढाईची गरज नाही, परंतु समजदार पती तोच आहे, जो आपल्या पत्नीच्या त्वचेची कोमलता, डोळे किंवा तिचे जे काही आवडेल, त्याचे कौतुक करून पत्नीचा आत्मविश्वास वाढवेल आणि मस्ती-मस्करी करेल, जेणेकरून पत्नी ऐंग्जाइटीची शिकार होणार नाही.

सेक्सनंतरही अटेंशन द्यावे : अनेक पती-पत्नीसोबत अंतर्गत क्षणांचा भरपूर आनंद लुटतात आणि अत्युच्च आनंद प्राप्त होताच, स्खलित होताच असे तोंड फिरवून झोपी जातात, जणूकाही त्यांचे पत्नीशी काही देणे-घेणेच नाही. अशा वेळी पत्नी स्वत:ला एकटी, उपेक्षित समजू लागते. तिला वाटते की बस्स पतीचा हा एकमेवच उद्देश होता. पत्नीची इच्छा असते की सेक्स आणि स्खलनानंतरही पतीने तिला जवळ घ्यावे, चुंबन घ्यावे, तिच्या अवयवांना छेडावे. त्याचबरोबर तिचे आभार मानून तिच्यावरील प्रेम व्यक्त करावे. असे करता-करताच पत्नीला बाहुपाशात घेऊन नंतर झोपी जावे. त्यामुळे पत्नीला खूप संतुष्टी लाभते.

नॉनसेक्शुअल टच : दिवसभरात पतीने पत्नीला एकदाही स्पर्श केला नाही तर ते तिला आवडत नाही. केवळ बेडवर फोरप्लेसाठीच त्यांचे हात पुढे येतात. त्यांची इच्छा असते की दिवसभरातही पतीने तिला स्पर्श करावा. परंतु हा स्पर्श नॉनसेक्शुअल असावा. त्यांनी छेडछाड किंवा चेष्टामस्करी अथवा आपलेपणा दाखविण्यासाठी तिला स्पर्श करावा. कधी केसांवरून, पाठीवरून हात फिरवावा किंवा गालांना थोपटावे.

मानसशास्त्रज्ञ सांगतात की पती आणि पत्नीचे संबंध केवळ आणि केवळ सेक्ससाठीच असू नयेत. सेक्सशिवायही जगात आणखीही काही एन्जॉय करण्यासाठी असते. संबंधांमध्ये दृढता आणि केअरिंग असणेही आवश्यक आहे. पत्नीच्या कुकिंगचे कौतुक करणे, तिच्या हातांचे चुंबन घेणे, तिच्या ड्रेसिंग सेन्सची प्रशंसा करणे, बोलण्याच्या पद्धतीचे कौतुक करणे इ.गोष्टी तिच्या मनाला खोलवर स्पर्शुन जातात. नात्यांतील मजबुतीसाठी हे खूप आवश्यक आहे की पत्नीला याची जाणीव करून द्या की आपले तिच्यावर केवळ सेक्ससाठी प्रेम नाहीए.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें