सेक्स फिलिंग्सचे ५ सिक्रेट्स

* अंजू जैन

बहुतेक महिलांची इच्छा असते की, त्यांचे काही सेक्स सीक्रेट्स त्यांच्या पतींनी स्वत:हून जाणून घेतले पाहिजेत. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी इलिनॉयसच्या सेक्शुअलिटी प्रोग्रामच्या थेरपिस्ट पामेला श्रॉक सांगतात की बहुतेक विवाहित पुरुष आपल्या पत्नीच्या सेक्शुअल प्राथमिकता आणि इच्छांबाबत जाणून घेत नाहीत. पामेलाने या विषयावर पत्नीच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना काही अशा सेक्स सीक्रेट्सबाबत कळले, ज्याबाबत महिलांना आपल्या पतीला सांगायचे असते, पण त्या सांगू शकत नाहीत.

महिलांसाठी चांगले सेक्स केवळ इंटरकोर्स नव्हे : महिलांना आनंददायी सेक्ससाठी केवळ इंटरकोर्सच नव्हे, तर पतीसोबत दिवसभरातील अन्य क्षणांमध्येही चांगल्या फीलिंग्स आणि अनुभवाची गरज असते. महिलांना या गोष्टी मुळीच आवडत नाहीत की पती दिवसभर केवळ कामात व्यस्त राहावा, रात्री घरी येऊन जेवल्यानंतर उशिरापर्यंत टीव्ही पाहिल्यानंतर मग बेडवर येताच पत्नीला पकडावे. त्यामुळे पत्नीला स्वत:ला एखादी वस्तू असल्यासारखी भावना निर्माण होते. ती आपल्या पतीला खूप स्वार्थी आणि स्वत:ला उपभोगाची वस्तू मानू लागते. प्रत्येक पत्नीची इच्छा असते की तिच्या पतीने केवळ बेडवरच नव्हे, तर बेडवर नसतानाही तिच्यावर तेवढेच प्रेम करावे, तिच्याकडे लक्ष द्यावे, तिच्यासोबत आपल्या गोष्टी शेअर कराव्यात, प्रेमाने बोलावे, तिच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा इ.

समाजशास्त्रज्ञ डालिया चक्रवर्तींचे म्हणणे आहे, ‘‘पत्नी आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू एकमेकांशी जोडून पाहते, याउलट पती समजतात की स्ट्रेस आणि भांडणे सेक्सच्या वेळी एका बाजूला ठेवले पाहिजे आणि या गोष्टी सेक्सशी जोडू नयेत. खरे तर सेक्सची खरी मजा अफेक्शनमुळे येते. मानसिकरीत्या आपलेपणा, प्रेम आणि जवळीक असते, तेव्हाच सेक्ससंबंध योग्यरीत्या व उत्तेजनापूर्ण होतात.

जेव्हा एखादा पती आपल्या पत्नीला वेळोवेळी लहान-मोठया भेटवस्तू देतो, बायको-मुलांना घराबाहेर फिरायला नेतो, कुटुंबाची काळजी घेतो आणि पत्नीला स्पेशल फील करवून घरातील वातावरण आनंदी ठेवतो, तेव्हा सेक्सचा आनंद अनेक पटीने वाढतो.’’

महिलांना टर्नऑन करण्यासाठी प्रेमपूर्वक बोलावे : रात्रीच्या भोजनाच्या वेळी प्रेमळ छेडछाड, रोमँटिक बोलणे आणि रोमांचित करणारे किस्से पत्नीला अंतर्मनातून सुखावून टाकतात. त्यामुळे त्यांचा मूड बनतो. त्याचप्रमाणे, सेक्सच्या वेळी पत्नीची प्रशंसा, तिच्यापुढे प्रेमाची कबुली आणि तिचे नाव घेणे पत्नीमध्ये उत्तेजना निर्माण करण्यास मदत करेल.

सेक्स थेरपिस्ट लिन एटवॉटर सांगते, ‘‘महिलांमध्ये शारीरिक संबंधात जास्त रुची मानसिक उत्तेजना आणि मानसिक संबंधांवर अवलंबून असते.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मेडिकल स्कूलच्या सायकॉलॉजिस्ट लोनी बारबच सांगतात की, खरे तर घरातील कामे, मुलांची देखभाल, पतीची हजार कामे आणि मग ऑफिस वर्कच्या दबावामुळे पत्नीची सर्वात मोठी गरज सहानुभूती व प्रेमपूर्वक बोलणे याची असते. तिच्या शरीरावर हात फिरविल्याने तिला बरे वाटते, त्यापेक्षा तिच्या मनावर हळुवार फुंकर घातल्याने तिला आनंद मिळतो. प्रत्येक पत्नीची इच्छा असते की तिच्या पतीने तिच्याशी रोमँटिक बोलावे.’’

महिलांमध्येही असते परफॉर्मन्स एंग्जाइटी : अनेक अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे की केवळ ६० टक्के अशा महिला आहेत, ज्यांनी जेवढया वेळाही संभोगसुख घेतले, त्यातून केवळ अर्ध्या वेळाच त्यांना अत्युच्च सुखाचा आनंद मिळाला. परंतु त्यांना पतीला खूश करण्यासाठी सेक्सच्या वेळी अत्युच्च सुखप्राप्तीचा दिखावा करावा लागला. काही वेळा तर त्यांना स्वत:लाच अपराधी झाल्यासारखे वाटते की त्यांच्यात तर काही कमी नाहीए ना…

पत्नीमध्येही आपल्या शरीराची बनावट, आकार आणि स्वच्छतेबाबत तुलनात्मक हीनतेची भावना असते. म्हणूनच त्यांना काळोखातच निर्वस्त्र व्हायची इच्छा असते. अशा वेळी त्यांना आपल्या पतीकडून प्रोत्साहन, आपल्या शारीरिक अवयवांबाबत स्तुती आणि सौंदर्याबाबत कौतुकाची अपेक्षा असते.

अनेक पतींना तर आपल्या पत्नीची प्रशंसा करणे माहीतच नसते आणि सेक्सच्या वेळी तिच्या अवयवांमधील कमतरता सांगायला सुरुवात करतात. पत्नीला जाडी, थुलथुलीत असे न जाणो काहीबाही बोलत राहतात. अशा वेळी पत्नी मनाने नीरस होणे, तणावग्रस्त होणे स्वाभाविक आहे. अशी पत्नी आपल्या पतीसोबत सेक्ससंबंध साधण्यास टाळाटाळ करते.

स्पष्टच आहे, त्यांचे लैंगिक जीवन नीरस आणि आनंदविहिन होते. खोटया बढाईची गरज नाही, परंतु समजदार पती तोच आहे, जो आपल्या पत्नीच्या त्वचेची कोमलता, डोळे किंवा तिचे जे काही आवडेल, त्याचे कौतुक करून पत्नीचा आत्मविश्वास वाढवेल आणि मस्ती-मस्करी करेल, जेणेकरून पत्नी ऐंग्जाइटीची शिकार होणार नाही.

सेक्सनंतरही अटेंशन द्यावे : अनेक पती-पत्नीसोबत अंतर्गत क्षणांचा भरपूर आनंद लुटतात आणि अत्युच्च आनंद प्राप्त होताच, स्खलित होताच असे तोंड फिरवून झोपी जातात, जणूकाही त्यांचे पत्नीशी काही देणे-घेणेच नाही. अशा वेळी पत्नी स्वत:ला एकटी, उपेक्षित समजू लागते. तिला वाटते की बस्स पतीचा हा एकमेवच उद्देश होता. पत्नीची इच्छा असते की सेक्स आणि स्खलनानंतरही पतीने तिला जवळ घ्यावे, चुंबन घ्यावे, तिच्या अवयवांना छेडावे. त्याचबरोबर तिचे आभार मानून तिच्यावरील प्रेम व्यक्त करावे. असे करता-करताच पत्नीला बाहुपाशात घेऊन नंतर झोपी जावे. त्यामुळे पत्नीला खूप संतुष्टी लाभते.

नॉनसेक्शुअल टच : दिवसभरात पतीने पत्नीला एकदाही स्पर्श केला नाही तर ते तिला आवडत नाही. केवळ बेडवर फोरप्लेसाठीच त्यांचे हात पुढे येतात. त्यांची इच्छा असते की दिवसभरातही पतीने तिला स्पर्श करावा. परंतु हा स्पर्श नॉनसेक्शुअल असावा. त्यांनी छेडछाड किंवा चेष्टामस्करी अथवा आपलेपणा दाखविण्यासाठी तिला स्पर्श करावा. कधी केसांवरून, पाठीवरून हात फिरवावा किंवा गालांना थोपटावे.

मानसशास्त्रज्ञ सांगतात की पती आणि पत्नीचे संबंध केवळ आणि केवळ सेक्ससाठीच असू नयेत. सेक्सशिवायही जगात आणखीही काही एन्जॉय करण्यासाठी असते. संबंधांमध्ये दृढता आणि केअरिंग असणेही आवश्यक आहे. पत्नीच्या कुकिंगचे कौतुक करणे, तिच्या हातांचे चुंबन घेणे, तिच्या ड्रेसिंग सेन्सची प्रशंसा करणे, बोलण्याच्या पद्धतीचे कौतुक करणे इ.गोष्टी तिच्या मनाला खोलवर स्पर्शुन जातात. नात्यांतील मजबुतीसाठी हे खूप आवश्यक आहे की पत्नीला याची जाणीव करून द्या की आपले तिच्यावर केवळ सेक्ससाठी प्रेम नाहीए.

मिलनाची रात्र ठरावी स्मरणीय

* प्रतिनिधी

तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतची पहिली रात्र अविस्मरणीय बनवायची असेल तर आपल्याला थोडी तयारी करावी लागेल, त्याचबरोबर काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागेल. तेव्हाच आपले पहिले मिलन जीवनातील एक अविस्मरणीय क्षण ठरेल.

खास तयारी करा : पहिल्या मिलनाला एकमेकांना पूर्णपणे खूश करण्याची खास तयारी करा, जेणेकरून एकमेकांना इम्प्रेस करता येईल.

डेकोरेशन असावे खास : जिथे आपण शारीरिक रूपाने एकरूप होणार आहात, तेथील वातावरण असे असले पाहिजे की आपण आपले संबंध पूर्णपणे एन्जॉय करू शकाल.

खोलीत विशेष प्रकारचे रंग आणि सुगंधाचा वापर करा. आपली इच्छा असल्यास आपण खोलीमध्ये अरोमॅटिक फ्लोरिंग कँडल्सने रोमांचक वातावरण बनवू शकता. याबरोबरच खोलीत दोघांच्या आवडीचे संगीत आणि मंद प्रकाशही वातावरण उत्साही बनविण्यात मदत करेल. तुमची खोली रेड हार्टशेप बलून्स आणि रेड हार्टशेप कुशन्सनी सजवा. हवं तर खोलीत सेक्सी पेंटिंग्सही लावू शकता.

फुलांनीही खोली सजवू शकता. या सर्व तयारीमुळे सेक्स हार्मोन्सचा स्राव वाढवण्यास मदत मिळेल आणि आपले पहिले मिलन कायमचे आपल्या मनावर कोरले जाईल.

सेल्फ ग्रूमिंग : पहिल्या मिलनाचा दिवस निश्चित झाल्यानंतर आपण आपल्या ग्रूमिंगवरही लक्ष द्या. स्वत:ला शारीरिक आणि मानसिक रूपाने तयार करा. त्यामुळे केवळ आत्मविश्वासच वाढणार नाही, तर आपण तणावमुक्त होऊन उत्तम प्रदर्शन करू शकाल. पहिल्या मिलनापूर्वी पर्सनल हायजीनलाही महत्त्व द्या, जेणेकरून आपल्याला संबंध ठेवताना संकोच वाटणार नाही आणि आपण पहिले मिलन पूर्णपणे एन्जॉय करू शकाल.

प्रेमपूर्ण भेटवस्तू : पहिले मिलन अविस्मरणीय बनवण्यासाठी आपण एकमेकांना गिफ्टही घेऊ शकता. यात आपल्या दोघांची पर्सनल फोटोफ्रेम किंवा अंगठी किंवा सेक्सी इनवेयरही असू शकतात. असे करून आपण वातावरण रोमँटिक आणि उत्तेजक बनवू शकता.

मोकळेपणाने बोला : पहिले मिलन रोमांचक आणि स्मरणीय बनवण्यासाठी स्वत:ला मानसिकरीत्या तयार करा. आपल्या जोडीदाराशी याबाबत मोकळेपणाने बोला. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर उपाय विचारा. एकमेकांच्या आवडीनिवडीबाबत विचारा. शक्य तेवढे पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा.

सेक्स सुरक्षा : संबंध ठेवण्यापूर्वी सेक्शुअल सुरक्षेची पूर्ण तयारी करा. सेक्शुअल प्लेजरला एन्जॉय करण्यापूर्वी सेक्स प्रीकॉशन्सवर लक्ष द्या. आपला जीवनसाथी कंडोमचा वापर करू शकतो. यामुळे नको असलेल्या प्रेग्नंसीची भीतीही राहणार नाही आणि आपले लैंगिक रोगांपासून संरक्षणही होऊ शकेल.

सेक्सच्या वेळी

* सेक्सी क्षणांची सुरुवात सेक्सी पदार्थ उदा. स्ट्रॉबेरी, द्राक्षे किंवा चॉकलेटने करा.

* जास्त वाट पाहायला लावू नका.

* मिलनाच्या वेळी अशी कोणतीही गोष्ट बोलू नका, ज्यामुळे एकमेकांचा मूड जाईल किंवा एकमेकांचे मन दुखावेल. या वेळी वर्जिनिटी किंवा जुन्या गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंडविषयी काहीही बोलू नका.

* संबंधांच्या वेळी कल्पना बाजूला ठेवा. पॉर्न मूव्हीची तुलना स्वत:शी किंवा पार्टनरशी करू नका आणि वास्तविकतेच्या आधारावर एकमेकांना खूश करण्याचा प्रयत्न करा.

* बेडरूममध्ये बेडवर जाण्यापूर्वी जर आपण घरात किंवा हॉटेलच्या खोलीत एकटया असाल तर थोडीसी मस्ती, थोडीशी छेडछाड करू शकता. अशा प्रकारच्या मस्तीने पहिल्या रोमांचक सहवासाची उत्सुकता आणखी वाढेल.

* सेक्ससंबंधांच्यावेळी बोटांनी छेडछाड करा. जोडीदाराच्या शरीराच्या उत्तेजित करणाऱ्या अवयवांना गोंजारा आणि मिलनाच्या सर्वोच्च सुखापर्यंत नेऊन पहिले मिलन अविस्मरणीय बनवा.

* मिलनापूर्वी फोरप्ले करा. जोडीदाराचे चुंबन घ्या. त्याच्या खास अवयवांना आपला प्रेमपूर्ण स्पर्श सेक्स प्लेजर वाढविण्यास मदत करेल.

* सेक्सच्या वेळी सेक्सी बोला. वाटल्यास सेक्सी फॅन्टसीजचा आधार घेऊ शकता. असे केल्यास आपण सेक्स अधिक एन्जॉय करू शकाल. पण लक्षात ठेवा सेक्शुअल फॅन्टसीज पूर्ण करण्यासाठी जोडीदारावर दबाव टाकू नका.

* संयम ठेवा. ही पहिल्या मिलनाच्या वेळी सर्वात जास्त लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण पहिल्या मिलनाच्या वेळी कोणत्याही प्रकारची घाई ना केवळ आपल्यासाठी नुकसानदायक ठरेल, तर आपली पहिली सेक्स नाइटही खराब होईल.

सेक्सच्या वेळी गप्पा मारत सहज राहून संबंध बनवा, तेव्हाच तुम्ही पहिले मिलन लक्षात राहण्याजोगे बनवू शकाल. संबंधांच्या वेळी एकमेकांच्या नजरेला नजर भिडवा. त्यामुळे जोडीदाराला जाणवेल की आपण सेक्स संबंध एन्जॉय करत आहात.

सेक्स लाइफ बनवा पूर्वीसारखं आनंदी

* शिखा जैन

विवेकला अनेक दिवसांपासून पत्नी आशूसोबत लैंगिक संबंध ठेवायचे होते, परंतु आशू कोणता ना कोणता बहाणा करून टाळत होती. दररोजच्या नकाराला कंटाळून शेवटी विवेक रागानेच आशूला म्हणाला की आशू, तुला काय झालंय? मी जेव्हा तुझ्यावर प्रेम करू लागतो, तेव्हा तू कोणता ना कोणता बहाणा करून टाळतेस. कमीत कमी मोकळेपणाने सांग तरी नेमकं काय झालंय?

हे ऐकून आशू रडतच म्हणाली हे सर्व करायला मनच लागत नाही आणि तसंही मूल तर झालं. मग या सर्वांची गरज काय?

हे ऐकून विवेक चकित झाला की त्याच्या पत्नीची कामसंबंधातील रूचि पूर्णपणे संपून गेलीय. असं का झालंय हे त्याला अजिबात समजत नव्हतं. याउलट त्याची पत्नी यापूर्वी या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच रूची घ्यायची.

ही समस्या फक्त विवेकचीच नाही, तर असे अनेक पती आहेत, जे मध्यमवयात वा मुलं झाल्यानंतर अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देत असतात.

स्वारस्य कमी का होतं

सेक्सॉलॉजिस्ट डॉ. बीर सिंहचं म्हणणं आहे की अनेकदा पतिपत्नीमध्ये प्रेमाची उणीव नसते, तरीदेखील त्यांच्यामध्ये सेक्सबाबत अडचणी निर्माण होतात. लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पतिपत्नीमध्ये सेक्सबाबत आकर्षण असतं, ते हळूहळू कमी होऊ लागतं. घरगुती जबाबदाऱ्या वाढल्यामुळे सेक्सबाबत उदासीनता वाढते. यामुळेच आपापसांत दुरावा वाढू लागतो. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी पतिपत्नींनी एकमेकांशी आपापले अनुभव शेअर करायला हवेत. स्वत:च्या लैंगिक अपेक्षांबद्दल मोकळेपणाने बोलायला हवं. ज्या कारणांमुळे जोडीदार रूची घेत नाही ती दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. ही कारणं प्रत्येक युगुलांची वेगवेगळी असू शकतात. तुम्ही फक्त ती दूर करायला हवीत. मग पाहा पुन्हा पहिल्यासारखे तुम्ही आनंदी व्हाल.

हेदेखील एक कारण

वय वाढण्याबरोबरच एक स्त्री कामक्रीडेत पूर्वीसारखे स्वारस्य का घेत नाही? अमेरिकेत वैज्ञानिक आणि संशोधकांची एक पूर्ण टीम या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात गुंग झाली. यामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली, जी निश्चितपणे एक स्त्रीच्या सेक्ससंबंधी स्वारस्याचा शोध घेते. खरंतर हा प्रश्न स्त्रीचं वय आणि सेक्ससंबंधित आहे. अनेकांना वाटतं की स्त्रीचं वय तिच्या सेक्ससंबंधी स्वारस्यावर अधिक परिणामकारक ठरतं. असं मानलं जातं की, वय वाढण्याबरोबरच एक स्त्री कामक्रीडेत पूर्वीसारखे स्वारस्य घेत नाही.

खरंतर संशोधनामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की मध्यम वयोगटातील स्त्रियांमध्ये संभोगाच्या बाबतीत रूची होणं वा न होणं केवळ वाढत्या वयावर अवलंबून नसतं, तर त्यांच्या जोडीदाराचं आरोग्य कसं आहे? तसंच सेक्समध्ये ते किती रूची घेतात? यावर अवलंबून असतं.

भावनात्मक कारण

सर्वमान्य असलेल्या समजुतीविपरीत हे आढळलं की मध्यमवयीन स्त्रिया सेक्शुअली सक्रिय होण्याबरोबरच अनेक गोष्टींमध्येदेखील त्यांची रूची वाढताना दिसलीए. शोधानुसार ज्या स्त्रिया सेक्समध्ये सक्रिय नसतात त्यामागे कोणतं कारण आहे हे जाणून घेतलं तेव्हा समजलं की अनेक भावनात्मक कारणांमुळे त्यांची सेक्स आणि जोडीदारामधील रूची संपलेली आहे. जोडीदारामधील रूची कमी होणं वा एखाद्या अक्षमतेचा सरळ परिणाम स्त्रियांच्या यौन सक्रियतेवर होतो. अशा स्त्रियादेखील आहेत, ज्यांची सेक्समधील रूची संपण्याची इतर कारणंदेखील आहेत. परंतु त्यांची संख्या कमी आहे.

वयाशी कोणताही संबंध नाही

या शोधात मध्यम वयोगटातील सेक्ससंबंधी प्रत्येक आवडीनिवडीचा समावेश करण्यात आला होता. संशोधनाच्या दरम्यान स्त्रियांचा एक मोठा वर्ग सेक्शुअल अॅक्टिव्हिटीजमध्ये वय वाढण्याबरोबर अधिक सक्रिय होताना आढळला.

संशोधनात हे स्पष्ट समोर आलं की, कोणत्याही स्त्रीची सेक्ससंबंधी सक्रियतेचा तिच्या वयाशी कोणताही संबंध नाहीए. या आधारे मानसोपचारतज्ज्ञ आणि सेक्स सल्लागारांनी याची कारणं आणि सूचनादेखील ठेवल्या आहेत.

* लक्षात ठेवा की तुमचा जोडीदार एखाद्या औषधांच्या साइड इफेक्टमुळेदेखील सेक्समधील रूची हरवू शकतो. जर असं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

* अनेक स्त्रिया मानसिक दबावामुळेदेखील सेक्समध्ये रस घेत नाहीत.

* मुलांमध्ये अधिक व्यस्त झाल्यामुळे आणि सामाजिक मान्यतांमुळेदेखील स्त्रियांना वाटतं की सेक्समध्ये अधिक रूची घेणं योग्य नाही.

* अनेकदा मुलं झाल्यानंतर स्त्रिया आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात आणि मग स्वत:ला कमी लेखू लागतात. यामुळेदेखील त्या सेक्सकडे दुर्लक्ष करू लागतात.

* वाढत्या वयात कुटुंब आणि कामाच्या वाढत्या जबाबदारीमुळे त्या थकू लागतात आणि सेक्ससाठी त्यांच्यामध्ये पर्याप्त एनर्जीदेखील उरत नाही.

* अनेक स्त्रियांना आपल्या पतीसोबत एकांत हवा असतो आणि असं जर झालं नाही, तर त्यांची सेक्सबद्दलची रूची संपते.

गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर अंजली वैशनुसार काही आजारदेखील असतात, ज्यामुळे त्यांची सेक्समधील रूची कमी होते. ड्रग्ज, दारू, धूम्रपान इत्यादींचं सेवन केल्यामुळेदेखील सेक्समधील रूची कमी होते. डायबिटीजचा आजारदेखील स्त्रियांमधील सेक्स ड्राइवला संपवितो. गर्भावस्थेच्या दरम्यान स्त्रियांमध्ये सेक्स ड्राइव कमी होतो, गर्भावस्थेच्या दरम्यान आणि त्यानंतर हार्मोन चेंजमुळे सेक्समध्ये महिला कमी रस घेऊ लागतात. जर डिप्रेशनची समस्या असेल तर त्या कायम त्याच्यामध्येच बुडून राहातात. त्या विचित्र गोष्टींमध्ये स्वत:ची सर्व एनर्जी लावतात, सेक्सबाबत विचार करण्यासाठी त्यांना वेळच मिळत नाही.

अनेक स्त्रिया खूप लठ्ठ होतात. लठ्ठपणामुळे सेक्स करताना त्यांना खूपच त्रास होतो. त्यामुळे त्या सेक्सपासून दूर राहू लागतात.

औषधंदेखील जबाबदार आहेत

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, अशी अनेक औषधं आहेत ज्यामुळे सेक्स लाइफवर त्याचा परिणाम होतो. सेक्ससाठीचे गरजेचं हार्मोन्स शरीराची गरज व संदेश मेंदूपर्यंत पोहोचविणारी तत्वं डोपामाइन व सॅरोटोनिन आणि सेक्सचे उत्तेजक भाग इत्यादींच्यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं असतं. डोपामाइन सेक्सक्रियेला वाढवतो आणि सॅरोपेनिन त्याला कमी करतो. जेव्हा औषधं हार्मोन्स स्तरात बदल आणतात तेव्हा कामेच्छा कमी होते. पेनकिलर, अस्थमा, ब्लडप्रेशर आणि हार्मोनसंबंधी औषधांनी कामेच्छामध्ये कमी होऊ शकते.

परंतु सेक्स लाइफमध्ये अरूची केवळ औषधांनीच येते असं नाहीए. त्यामुळे जर तुम्हाला सेक्सलाइफमध्ये बदल झाल्याचं जाणवत असेल, तर औषधं बंद करण्यापूर्वी चिकित्सकांचा सल्ला जरूर घ्या.

सेक्समध्ये रूची कशी निर्माण कराल

सेक्समध्ये गरजेचा आहे मसाज. जेव्हा जोडीदाराच्या कामुक भागांना हातांनी हळूहळू तेल लावून मसाज कराल तेव्हा तो त्याच्यासाठी अगदी नवीन अनुभव असेल. तेलाने तुमच्या आणि जोडीदाराच्यामध्ये जे घर्षण निर्माण होतं त्यामुळे प्रेम वाढतं आणि सेक्सची इच्छा जागते. मसाज एक अशी थेरेपी आहे, ज्यामुळे शरीराला आराम मिळण्याबरोबरच तुमचं स्वत:चं नीरसवाणं सेक्स लाइफदेखील पुन्हा पहिल्यासारखं बनू शकतं.

एक्सपेरिमेण्ट्स करू शकता : जर तुमचा जोडीदार सेक्शुअली एक्सपेरिमेण्ट करत नसेल तर फॅण्टसीच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही सेक्सबाबत उत्तम फॅण्टसी करू शकता तर तुमच्या बेडरूमच्या बाहेर न पडता तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जे करू इच्छिता ते फॅण्टसीच्या माध्यमातून अनुभूत करा. तुमची तुमच्या जोडीदाराबद्दलच्या सर्व तक्रारी त्वरित दूर होतील; कारण तुम्हाला तुमचा पार्टनर कल्पनेत सापडलाय.

वारंवार हनीमून साजरा करा : सेक्ससंबंधांत कंटाळा येऊ नये म्हणून पतिपत्नींनी दरवर्षी हनीमूनला जावं आणि याला फिरायला जाणं न म्हणता हनीमूनसाठी जातो म्हणावं. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक्साइटमेण्ट राहील. जेव्हा हनीमूनसाठी जाल तेव्हा एकमेकांना पूर्वीच्या आठवणींची जाणीव करून द्या. अशाप्रकारे फिरणं आणि हनीमूनबद्दल गप्पा मारल्याने सेक्ससंबंधीच्या आठवणी जाग्या होतील.

सेक्समध्ये नवेपणा आणा : तुमची सेक्स करण्याची पद्धत एकसारखीच आहे का? आणि तुमच्या या पद्धतीला तुमची पत्नी कंटाळलीय का? यासाठी या विषयावर बोला आणि सेक्स करण्याच्या नित्याच्याच पद्धती सोडून नवनवीन पद्धती अमलात आणा. यामुळे सेक्ससंबंधांत एक नवेपणा येईल.

तुमच्या जोडीदाराला वेळ द्या : लग्नाच्या काही वर्षांनंतर काही जोडप्यांना वाटतं की सहवासातील रूची कमी झालीय. सहवास त्यांना एक डेली रूटीनसारखं कंटाळवाणं काम वाटू लागतं. म्हणून सहवासाला डेली रूटीनप्रमाणे घेऊ नका. उलट ते पूर्णपणे एन्जॉय करा. दररोज करण्याऐवजी आठवड्यातून भलेही एकदा करा परंतु ते मोकळेपणाने जगा आणि तुमच्या जोडीदाराला जाणीव करून द्या की हे असं करणं आणि त्याच्यासोबत असणं तुमच्यासाठी किती खास आहे.

सेक्स असं जे दोघेही एन्जॉय करतील : तुम्ही फक्त तुमच्या मनातलंच तुमच्या जोडीदारावर थोपवू नका. उलट सेक्समध्ये त्याची इच्छादेखील जाणून घ्या आणि त्याचा सन्मान करा. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात आणि एन्जॉय करू शकाल, ती गोष्ट करा.

नियमित सेक्स करा : ही गोष्ट खरी आहे ती तणाव आणि थकवा यामुळे पतिपत्नीच्या लैंगिक आयुष्यावर वाईट परिणाम होतो. परंतु हेदेखील तेवढंच खरं आहे की सेक्स हेच तुमच्या आयुष्यात निर्माण होणारे दबाव आणि अडचणींवर मात करण्याचं टॉनिक बनतं. म्हणून आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा सहवास करा. यामुळे सेक्स लाइफमध्ये मधुरता येईल.

एकमेकांबद्दलच्या प्रेमाला पाठिंबा द्या : अनेकदा अनेक जोडप्यांच्या लग्नानंतरची काही वर्षं चांगली जातात; परंतु जसजसा काळ जातो तसतसा कामं व इतर कारणांनी त्यांच्यामध्ये दुरावा वाढतो, त्यांना एकमेकांवर प्रेम करण्याची संधी मिळत नाही. यामुळे त्यांच्यामधील सेक्ससंबंधांमध्ये दुरावा वाढू लागतो. वैवाहिक आयुष्यात उत्पन्न झालेल्या अशा प्रकारच्या समस्यांपासून वाचण्यासाठी आवश्यक आहे ते पतिपत्नींनी एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी थोडा वेळ काढावा. एकमेकांशी चांगल्या गोष्टी कराव्यात आणि एकमेकांच्या गोष्टी ऐकाव्यात, तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करावा. एकमेकांचा सन्मान करावा. यामुळे सेक्स लाइफदेखील अधिक चांगलं होईल.

पुढाकार घ्या : अनेकदा स्त्रिया सेक्सबाबत पुढाकार घ्यायला संकोचतात, त्यामुळे तुम्ही पुढाकार घेण्यात काहीही वाईटपणा नाहीए, उलट तुमचं पुढाकार घेणं एका स्त्रीला सुखद अनुभूती मिळते. जर मुलं लहान असतील तर सेक्स लाइफमध्ये अडचणी येत राहातात आणि स्त्रिया एवढ्या मोकळ्या आणि रिलॅक्सदेखील राहू शकत नाहीत. अशावेळी मुलं झोपण्याची वाट पाहाण्यापेक्षा उत्तम म्हणजे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रेमात हरवून जा.

फिटनेसचीदेखील काळजी घ्या : उत्तम सेक्स लाइफसाठी शारीरिक व मानसिकरित्या फिट राहाणंदेखील गरजेचं आहे. यासाठी समतोल आहार घ्या. थोडाफार व्यायाम करा. पुरेपूर झोप घ्या. सिगारेट, दारूचं सेवन करू नका.

कल्पना करा : सेक्स करतेवेळी तुम्हाला एखादा दुसरा पुरुष वा मग एखाद्या बॉलीवूड अॅक्टरची कल्पनादेखील उत्तेजित करत असेल आणि सेक्सचा आनंद वाढवत असेल तर असं करा. यासाठी मनात कोणत्याही प्रकारची अपराधी भावना आणू नका. असं करणं चुकीचं नाहीए. कारण सर्वांची सेक्स करण्याची आणि त्याबाबत विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते.

फ्रेश मूडमध्ये आनंद घ्या : पतिपत्नी जर दोघे वर्किंग असतील, व्यस्त असतील, रात्री उशिरा येत असतील, तर त्यांचं सेक्स लाइफ तसं डिस्टर्ब असतं. स्त्रियांना या गोष्टी एखाद्या ओझ्यासारख्या वाटतात. त्यामुळे त्या थकलेल्या असतील तर त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. सकाळी उठून फ्रेश मूडमध्ये सेक्सचा आनंद घ्या.

सेक्सी संवाद चांगले असतात : सेक्ससाठी मूड बनविण्यासाठी काहीही करू शकता. तुम्हाला वाटत असेल की तुमचं डर्टी टॉक्स आणि डार्क फॅण्टसी ऐकून तुमच्या पार्टनरला आवडणार नाही, त्यामुळे तुम्ही या गोष्टी जर शेअर करत नसाल तर असं अजिबात नाहीए. खरंतर प्रत्येक जण आपल्या पार्टनरकडून अशा गोष्टी ऐकण्यासाठी आतुर असतो. त्यामुळे न संकोचता आपल्य पार्टनरसोबत अशा गोष्टी शेअर करा.

आला मोसम रोमांस करण्याचा

– नसीम अंसारी कोचर  

थंडीचा मोसम रोमान्सचा मोसम असतो. या मोसमात कामुकता आणि उत्तेजनेचा स्तर वाढतो. बाहेरील तापमान घटताच अंतर्गत तापमान वाढते आणि आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची इच्छा तीव्र होते.

गुलाबी थंडीत प्रत्येक युगुल एकमेकांच्या बाहुपाशातील ऊबेची अपेक्षा करतो. सेक्स करणे एक वेगळीच जाणीव आहे. प्रत्येक प्रियकर-प्रेयसीचा प्रेमाचा एक वेगळा अंदाज असतो. काही लोकांना आपल्या बेडरूममध्ये जास्त आनंद मिळतो, तर काही लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात. काही हिल स्टेशनवर हिमवर्षावात प्रेमाचा आनंद घेतात, तर काही गरम पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये.

थंडीच्या काळात प्रेमी-प्रेमिकांमध्येच रंगेलपण वाढत नाही, तर या मोसमात निसर्गातील अन्य जीवही आपल्या जोडीदारासोबत सहवासाची इच्छा बाळगतात. एक्सपर्टही थंडीच्या मोसमाला सेक्ससाठी खूप उपयुक्त मानतात. या काळात सेक्स केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळण्याबरोबरच शारीरिक सौंदर्यही वाढते. तसेही या मोसमात पुरुष खूप मूडमध्ये असतात. थंड हवेतून परतल्यानंतर सेक्स करणे काही वाईट गोष्ट नाहीए. खरंच सांगतो, बाहेरील थंड हवेशी लढून घरात आल्यानंतर पुरुषांची सेक्सची इच्छा वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत पुरुष खूप रोमँटिक दिसतात. अशा वेळी आपणही या थंडीच्या मोसमाला स्मरणीय बनवण्यासाठी स्वत:मध्ये आणि आपल्या बेडरूममध्ये थोडासा चेंज आणण्याचा प्रयत्न करा व मग पाहा आपल्या नखऱ्यांनी आपला जोडीदार कसा फिदा होतो. थंडीच्या दिवसांत सेक्सला मजेदार बनवण्यासाठी काही खास टिप्स आम्ही आपल्याला देत आहोत :

कोमट पाण्यात बाथचा आनंद घ्या

अंथरुणावर जाण्यापूर्वी बाथ टबमध्ये कोमट पाण्यात यूडिकोलोन, चंदन किंवा मग गुलाबपाण्याचे काही थेंब टाकून जोडीदारासोबत स्नानाचा आनंद घ्या. वाटल्यास आपण बाथरूमला सुगंधित कॅन्डल्सनी सजवा. असं केल्याने आपल्या जोडीदाराची एक्साइटमेंट आणि उत्साह वाढेल. प्रेमाची ही नवीन पध्दत आपल्या संबंधांमध्ये ऊर्जा निर्माण करेल. गरम पाण्याने स्नान केल्यास शरीर ताजेतवाने होईल आणि रक्तप्रवाह वाढल्याने उत्तेजनाही वाढेल.

फरचा मऊपणा देईल गरमी

आपली जुनीपुराणी नाईटी सोडून या थंडीच्या मोसमात मऊ-ऊबदार फरवाली नाईटी किंवा गाऊन घाला. थंडीच्या मोसमात मऊ फरची ऊब केवळ आपली सेक्सची इच्छाच वाढवणार नाही, तर याचा स्पर्शही आपल्या पार्टनरला चांगल्याप्रकारे उत्तेजित करेल. आजकाल तर मऊ फरवाले ब्लँकेटही बाजारात उपलब्ध आहेत. थंडीच्या मोसमात जोडीदारासोबत फरवाल्या ब्लँकेटमध्ये रोमान्सची मजा द्विगुणित होईल.

कँप फायरचा आनंद घ्या

थंडीच्या मोसमात लोक तसं पाहिलं तर हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी हिल स्टेशनला जातात. अशा वेळी कँप फायरचा आनंद घेतला नाही, तर थंडीचा आनंद अर्धवट राहील. शेकोटी पेटवून आपल्या जोडीदारासोबत बसून शेक घेण्याची मजाच काही निराळी असते.

परफ्यूम करतो मदमस्त

थंडीच्या दिवसांत परफ्यूम आपले रोमान्सचे मार्ग सोपे बनवतो. गरमीत येणारी घामाची दुर्गंधी या दिवसांत गायब होते. अशा वेळी परफ्यूम आपला पूर्ण परफॉर्मन्स देतो आणि आपल्या जोडीदाराला सेक्ससाठी उत्तेजित करतो.

मंद प्रकाशाचा आनंद

एक्स्पर्ट मानतात की सेक्सच्या काळात खोलीतील मंद प्रकाश प्रेमी जोडप्याला उत्तेजित करतो. जर थंड रात्रींमध्ये आपल्या बेडरूममध्ये मंद प्रकाश पसरला असेल किंवा चारही बाजूला सुगंधित मेणबत्या झगमगत असतील, तर आपला प्रियकर प्रेमाने लिप्त होत आपल्याला बाहुपाशात ओढण्यास अधीर होईल.

मोजे घाला

एका रिसर्चनुसार, जर आपण मोजे घालून सेक्स करत असाल, तर आपण हे उत्तमप्रकारे एन्जॉय करू शकता. खरं तर मोजे घातल्याने आपले पाय गरम होतात. पायांत रक्तप्रवाह वाढल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वाढते. शरीरात गरमी आल्याने आपला सेक्स मूड अजून उत्तम होतो आणि आपल्याला जास्त उत्तेजना जाणवते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सेक्सचा आनंद घेण्यासाठी मऊ, रंगीत आणि गरम मोजे खरेदी करायला विसरू नका.

दारूपासून दूर राहा

काही लोकांचे म्हणणे आहे की, थंडीच्या मोसमात दारू प्यायल्याने शरीरात ऊब निर्माण होते आणि त्यामुळे सेक्स ड्राइव्ह चांगले होते. परंतु डॉक्टरांच्या मते, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. दारू प्यायल्याने तंत्रिकातंत्रावर परिणाम होतो आणि त्यामुळे ब्रेनमध्ये झोपेचा संदेश प्रवाहित होतो. अशा वेळी सेक्ससाठीची उत्तेजना गायब होते आणि शरीर झोपण्यासाठी तयार होते. दारूची दुर्गंधी आपल्या जोडीदाराचा मूड खराब करते. त्यामुळे सहवासाच्या काळात दारूचे सेवन करू नका.

डान्स आणि एक्सरसाइजची मजा घ्या

थंड मोसमात जोडीदारासोबत मोकळेपणाने डान्स किंवा एक्सरसाइज करणे, आपल्या सेक्स लाइफला उत्तम बनवेल. घराच्या टेरेस किंवा बेडरुमध्ये मंद म्युझिकवर एकमेकांच्या बाहुपाशात विसावून डान्स करणे दोघांनाही रोमान्सच्या सागरात डुबकी मारायला लावेल. जर आपण दोघांनीही सकाळच्या वेळी सोबत व्यायाम किंवा जॉगिंग केलात, तर त्यामुळे आपलं सेक्स लाइफ इंप्रूव्ह होईल.

निसर्गाच्या सान्निध्यात राहा

आजकाल फ्लॅट सिस्टिमच्या घरात बागेचा अनुभव खूप खटकतो. जुन्या बंगल्यांत सुंदर फुलांची बाग जरूर असे. जिथे एखाद्या झाडाच्या आडोशाला प्रियतमच्या बाहुपाशात विसावणे खूप रोमांचक अनुभव देत असे. परंतु आपण काळजी करू नका. घराच्या जवळच एखादा शांत-एकांत पार्कचा कोपरा शोधा आणि फुरसतीच्या काळात आपल्या जोडीदारासोबत तिथे बसून थंडी एन्जॉय करा.

थंडीत सेक्सचे फायदे

गरमीच्या दिवसांत सेक्स करणे एक कंटाळवाणी प्रक्रिया होऊ शकते. परंतु थंडीच्या दिवसांत असं होत नाही. थंडीच्या दिवसांत तर केवळ एकमेकांच्या मिठीत राहण्याची इच्छा होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की थंडीचा मोसम जिथे या पृथ्वीवरील प्रत्येक जिवाला रोमांचित आणि रोमँटिक बनवतो, तिथेच मानवजातीला अनेक फायदेही होतात.

सौंदर्य वाढते

थंडीच्या काळात सेक्स करणे तणावपूर्ण नसते. शरीरात रक्ताभिसरण वाढल्याने संपूर्ण शरीराला पुरेसे ऑक्सिजन प्राप्त होते. त्यामुळे डॅमेज झालेल्या कोशिकांचीही दुरुस्ती वेगाने होते. सेक्सच्या काळात शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोनचा स्त्राव पाझरतो, त्याला प्रेमाचा हार्मोनही म्हणतात. हे हार्मोन व्यक्तिमध्ये प्रेम आणि स्नेहाची भावना वाढवतो.

तणाव दूर होतो

रोजच्या कामकाजाच्या काळात निर्माण झालेला तणाव व थकवा सेक्सच्या काळात संपून जातो. गरमीमध्ये ही क्रिया तेवढी प्रभावीपणे होत नाही, परंतु थंडीत सेक्स केल्यास तणाव लगेचच छूमंतर होतो. तणाव अनेक आजारांचे मूळ आहे. मलावरोध, थकवा, अंगदु:खी, ब्लडप्रेशर, डायबिटससारखे आजार तणावातून निर्माण होतात. थंडीच्या काळात नियमित सेक्स केल्यास आपण या आजारापासून दूर राहता. डॉक्टरांच्या मतानुसार, सेक्स माणसाच्या तंत्रिकातंत्र आणि श्वसनतंत्राला आराम देतो, ज्यामुळे तणाव दूर होतो आणि आजार होत नाहीत.

गर्भधारणेची शक्यता वाढते

थंडीच्या दिवसांत महिलांची गर्भवती होण्याची शक्यता गरमीच्या तुलनेत वाढते. खरं तर याला जबाबदार पुरुष आहेत. शरीराचे तापमान कमी झाल्याने त्यांच्यामध्ये शुक्राणूंच्या संख्येत वाढ होते. थंडीच्या काळात शुक्राणू जास्त निरोगी आणि तीव्र गतीवाले असतात. त्यांच्या संख्ययेतही वृध्दी आढळून येते. त्यामुळे थंडीच्या काळात नियमित सेक्सने गर्भधारणा करणे सोपे होते.

शिथिल होऊ नयेत वैवाहिक संबंध

– दिपान्वीता राय बॅनर्जी

आज अदिती स्वत:चे लग्न वाचवण्यासाठी ज्या कौन्सिलरकडे चकरा मारत होती,  त्यामागे एक खूपच साधारण पण जटिल कारण आहे. अदिती आणि तिच्या पतिच्या सेक्स लाइफमध्ये खूप गुंतागुंत होती. कुठलाही मोकळेपणा नसल्यामुळे त्यांच्या संबंधात घुसमट व निराशा निर्माण झाली होती.

असे काय घडले की सेक्ससारखा मनोरंजक विषय घुसमटीचे कारण बनला? पतीपत्नीमधील शरीरसंबंध हे गहिऱ्या संबंधाचे लक्षण आहे. यात सुरक्षेची जाणीव, प्रेमळ अनुभूती, आपसातील सामंजस्य, प्रेमातील गहिरेपणा व ते सर्वकाही असायला हवे, जे स्थिर व आनंददायी संबंधांसाठी गरजेचे असते. पण यासाठी काही तडजोडीही कराव्या लागतात. उत्तम सेक्स जीवन व गहिऱ्या नात्याच्या अनुभूतीसाठी एकमेकांना स्पेस देण्याचे स्वातंत्र्य स्विकारावे लागते.

पतीपत्नी दोघांसाठी दैनंदिन कार्याप्रमाणे सेक्स करत राहणे ही सेक्स लाइफ कंटाळवाणी करणारी गोष्ट तर आहेच शिवाय यामुळे नातेबंध अयशस्वी होण्यातही काही कसर बाकी राहत नाही. शहर असो किंवा गाव भारतीय आणि मुस्लीम समाजात स्त्रियांनी सेक्सवर चर्चा करणं वा अन्य बाबतीत इच्छा व्यक्त करण्याला नीच मानसिकता ठरवून खच्चीकरण केलं जातं. ज्या स्त्रिया आपल्या जोडीदाराला सेक्सच्या बाबतीत आपल्या इच्छा मोकळेपणी सांगू इच्छितात, त्यांना सभ्य आणि सुसंस्कृत मानले जात नाही. मोठया शहरांतील बिनधास्त मुली सोडल्या तर अन्य मुली सेक्स म्हणजे पतीच्या सेवेचाच एक भाग मानतात, तसेच त्यांना आपली इच्छा अनिच्छा पतिला सांगण्याची गरज वाटत नाही.

भेदभाव का?

थोडया खोलात जाऊन विचार केलात की कळेल की सेक्सची इच्छा व क्षमतेला मानवी जीवनाचे प्रधान तत्त्व समजले जाऊ शकते. सेक्स जीवनाला नियंत्रित करण्यासाठी जीववैज्ञानिक, नैतिक, सांस्कृतिक, कायदेशीर, धार्मिक इ. विभिन्न दृष्टीकोनांचे योगदान असते, जेणेकरून सेक्स जीवन आणि याचे स्वातंत्र्य या बाबींचा खूप प्रभाव असतो.

जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्तिच्या लैंगिक आयुष्याच्या महत्वतेवर जोर देत याबद्दल सकारात्मक व स्विकारार्ह दृष्टीकोन बाळगावा असे म्हटले आहे. या संघटनेचे म्हणणे आहे की आपल्या जोडिदारासोबत लैंगिक संबंध कुठल्याही भेदभाव, हिंसा, शारीरिक, मानसिक शोषणाशिवाय व्हायला हवेत. पूर्ण उर्जा, इच्छा आणि भावनिक संतुलनासहित हे संबंध व्हायला हवेत.

प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की आपल्या देशात जिथे स्त्रियांवर सेक्स संबंधित बलात्कार, मानसिक शोषण, घरगुती हिंसा, राजरोजपणे सुरू आहे. स्त्रीचे लैंगिक अधिकार आणि सेक्सबद्दलचे उघड मत स्विकारार्ह आहे का?

जर थोडी सजगता आली आणि स्त्रियांनीही याबाबतीत स्वत:च्या भावनांना पूर्ण महत्त्व दिलं व जोडीदाराशी मोकळेपणे संवाद साधला तर खूप फायदे होऊ शकतील.

आपसात मैत्रीपूर्ण नाते
जर पतीपत्नी दोघांमध्ये मैत्रीची भावना निर्माण झाली तर त्यांच्यात उच्चनीच, लहान मोठे असे अहंकाराने भरलेले भेद आपोआप नाहीसे होतील. दोघांनीही एकमेकांशी सेक्स इच्छांबद्दल मोकळेपणाने मते व्यक्त केली तर ही बाब खूपच सोपी होईल.

व्यक्तिमत्त्वाचा विकास
स्त्री जर सेक्सच्या बाबतीत फक्त समर्पित न राहता  स्वत:ची आवडनावड व्यक्त करू लागली तर, ती जोडीदाराच्या हृदयात स्वत:प्रति आवड निर्माण करू शकते, जी व्यक्तिमत्त्व विकासासाठी सहाय्यक आहे.

आत्मविश्वासात वाढ
फक्त पुरूषाच्या इच्छेनुसार वागणे म्हणजे वैवाहिक व लैंगिकता आयुष्य यंत्रवत जगण्यासारखे आहे, पण जर स्त्रीनेही यात महत्वपूर्ण भमिका निभावली तर आयुष्यात पुन्हा एका नव्या उर्जेचा संचार होईल.

तसेही भारतीय संस्कृतीला अजून पारंपरिक बंधनांतून मुक्त होण्यास दिर्घकाळ लागेल, पण त्या त्या बाबींबद्दल बोलून मागासलेली मानसिकता काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.

लहानपणापासूनच कौटुंबिक वातावरणात मुलींना हेच शिक्षण मिळते की सेक्स हे निरूपयोगी आहे आणि मुलींनी यापासून दूर राहिले पाहिजे.

सेक्ससोबत चारित्र्यही जोडले जाते. सेक्सची आपली इच्छा मारून त्याबद्दल आपले मत लपवणे यालाच चांगले चरित्र म्हटले जाते.

चारित्र्याला कुटुंबाच्या अब्रूशी जोडले जाते. मुलगी म्हणजे कुटुंबाची अब्रू असे समजले जाते. अर्थात सेक्सबद्दल वैयक्तिक मुक्त विचार बाळगणे हे चारित्र्यहिन असण्याचे लक्षण आहे, ज्यामुळे कुटुंबाची अब्रू चव्हाट्यावर येऊ शकते.

लग्नानंतर हेच संस्कार स्त्रीमध्ये रूजलेले असतात आणि त्यामुळे सेक्सबद्दल आपली इच्छा पतीने व्यक्त करण्यात तिला संकोच वाटू लागतो.

याबाबतीत पुरूषांची मानसिकताही पारंपरिक वर्चस्ववादी विचारांचा पगडा असणारी असते. त्यांना आपल्या पत्नीने सेक्सबद्दल मोकळेपणाने इच्छा व्यक्त करणे असभ्यपणा वाटतो. यामुळेच पुरूष स्त्रियांची यावरून चेष्टा करतात व त्यांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यावेळी स्त्रीला आपल्या कोषात राहण्याशिवाय काहीही पर्याय उरत नाही. नंतर हेच पुरूष सेक्सच्यावेळी स्त्री कशी मृतवत पडून असते अशी तक्रारही करतात. यामुळेच सबंधांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते.

स्त्री जेव्हा या साऱ्या समस्यांना पार करून मूल्य आणि अधिकारांचा आनंद घेऊ शकेल तेव्हा ती एखाद्या भोगवस्तूप्रमाणे नाही तर एका खऱ्या जोडीदाराप्रमाणे आयुष्यातील या अमूल्य क्षणांचा उपभोग घेऊ शकेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें