सौंदर्य समस्या

* समस्यांचे निराकरण, आल्प्स ब्युटी क्लिनिकच्या संस्थापक, संचालक      डॉ. भारती तनेजा द्वारे

कोरोना महामारीच्या या शतकात हात नियमितपणे धुणे आणि त्यांना सतत सॅनिटियझि करणे खूप महत्वाचे आहे परंतु प्रत्येक तासाला हात धुणे किंवा सॅनिटाय केल्याने माझी त्वचा कोरडी आणि निर्जीव होत आहे. मी माझ्या हातांची काळजी कशी घेऊ?

हाताच्या काळजीसाठी आपण आपले हात मॉइश्चरायझिंग साबणाने धुवा किंवा जेल असलेले सॅनिटायझर वापरा. प्रत्येक वेळी हात धुतल्यानंतर हातांवर नॉर्मल मॉइश्चरायझर किंवा व्हॅसलीन वापरा, जर हातांची त्वचा कोरडी आणि भेगा पडलेली असेल तर ती ठीक करण्यासाठी खोबरेल तेलाचा वारंवार हातांवर वापर करा.

झाड-लोट करताना, भांडी धुताना व कपडे साफ करताना जेव्हा तुम्ही डिटर्जंट किंवा जंतुनाशक वापरता तेव्हा हातमोजे घाला. जर तुमच्या त्वचेवर कट किंवा हातावर कोरडे ठिपके असतील, जे मॉइश्चरायझर वापरूनही बरे होत नसतील तर त्यावर त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार करा.

माझ्या पापण्यांचे केस दाट नाहीत तसेच ते तुटण्याची प्रवृत्तीदेखील आहे. माझ्या समस्या दूर होण्यासाठी मी काय करावे?

दाट पापण्यांसाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर मानले जाते. त्यात रिसिनोलिक अॅसिड आढळते. हे केसांच्या मुळांमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि पापण्यांच्या वाढीस उत्तेजन देते. एरंडेल तेल तुमच्या पापण्यांना दाट तर बनवतेच शिवाय पापण्यांचे केस तुटण्यापासून ही वाचवते.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कायमस्वरूपी आयलॅशेसचा पर्यायदेखील निवडू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडी आणि गरजेनुसार कोणताही रंग, लांबी आणि हवे तेवढे आयलॅशेस निवडू शकता, परंतु आम्ही शिफारस करतो की तुम्ही कमीत कमी आयलॅशेस निवडा जेणेकरून तुम्हाला एक नैसर्गिक लुक मिळू शकेल.

या प्रक्रियेपूर्वी त्वचेचा प्रकारदेखील तपासला जातो आणि नंतर संगणकाद्वारे वेगवेगळया आकाराच्या आयलॅश सेट करून चेहरे पाहिले जातात. नंतर सूट करणारी आयलॅश बसवली जाते.

आयलॅशच्या विस्तारामध्ये कोणतीही हानी नसते आणि ते खूप सुरक्षितदेखील आहे. या आयलॅशेस जलरोधक, घामरोधक आणि तेलरोधक असतात, तथापि हे एक्स्टेंशन कायमस्वरूपी मानले जाते, परंतु नेल एक्स्टेंशनप्रमाणे यालादेखील दरमहा रिफिलिंग करणे आवश्यक असते. यामध्ये पुन्हा पापण्यांवर आयलॅश सेट केली जाते. एक्स्टेंशन वारंवार सुधारणे आवश्यक असते.

माझे उपचार चालू असल्याने मी काही औषधे घेत आहे, त्यामुळे माझे ओठ कोरडे होऊ लागले आहेत. कृपया मला काही उपाय सांगा ज्याने ओठ बरे करता येतील?

जर औषधामुळे तुमचे ओठ फुटत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीरात आर्द्रतेची कमतरता आहे. तुमच्या शरीरात आर्द्रतेची कमतरता टाळण्यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या आहाराची पूर्ण काळजी घ्या जेणेकरून शरीरात कोणत्याही घटकाची कमतरता भासू नये. याशिवाय बोटात थोडे कोमट देशी तूप घेऊन ओठांवर हलके मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येत आराम मिळेल.

ओठांचा ओलावा परत येण्यासाठी डाळिंबाचे दाणे बारीक करून त्यात थोडे दूध आणि गुलाबजल मिसळा. ही पेस्ट हलक्या हातांनी ओठांवर लावल्यानेही लवकर फायदा होतो.

माझ्या चेहऱ्यावर अचानक पांढरा डाग दिसू लागल्याने मी खूप अस्वस्थ आहे. कृपया सांगा मी यासाठी काय करावे?

सर्वप्रथम याबद्दल एखाद्या चांगल्या त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या कारण हा ल्युकोडर्माचा पॅच असू शकतो. त्यांच्या तपासणीत असे निदान आढळल्यास योग्य औषध घ्यावे. यानंतर काही दिवस घेतलेल्या उपचारांमुळे जर तुमचा पॅच वाढत नसेल तर पर्मनंट मेकअपद्वारे तुम्हाला उपचार देऊन तो पांढरा डाग सामान्य केला जाऊ शकतो.

या उपचारात पांढरा डाग त्वचेसारख्या रंगाने भरला जातो, ज्यामुळे तो आसपासच्या त्वचेच्या रंगाचा बनतो.

जर तुमचा पांढरा डाग ल्युकोडर्माचा पॅच नसेल तर तुम्ही घरगुती उपाय अवलंबू शकता. यासाठी पाणी आणि सफरचंद व्हिनेगर २:१ च्या प्रमाणात मिसळा. थोडया-थोडया वेळाने ते डागांवर लावत राहा. असे केल्याने डाग लवकर साफ होतील.

खूप दिवसांपासून मी घरीच केस सरळ करते पण त्याचा परिणाम पार्लरसारखा मिळत नाही. मला केस सरळ करण्याची योग्य पद्धत सांगा?

जेव्हा तुम्ही पार्लर किंवा क्लिनिकमध्ये केस स्ट्रेटनिंग करून घेता तेव्हा ते करणारे लोक हे नॉर्मली तज्ज्ञ असतात, केसांचे पातळ-पातळ थर सरळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्ट्रेटनिंग सोल्यूशनची गुणवत्तादेखील खूप चांगली असते, ज्याचा तुम्ही घरी तेवढया चांगल्या प्रकारे वापर करू शकत नाही.

त्यामुळे रोज-रोज घरीच स्ट्रेटनिंग करण्यापेक्षा कायमस्वरूपी स्ट्रेटनिंग करून घेणे चांगले आहे ज्याने तुम्हाला पार्लरप्रमाणे कायमचे केस सरळ मिळतील. केस सरळ ठेवण्यासाठी तुम्ही केसांमध्ये कायमस्वरूपी हेअर एक्स्टेंशनही करून घेऊ शकता.

जर तुम्हाला कायमस्वरूपी हेअर एक्स्टेंशन करायचे नसेल तर तुम्ही जेव्हाही बाहेर जाल तेव्हा तात्पुरते हेअर एक्स्टेंशन लावूनदेखील केस सेट करू शकता.

सौंदर्य समस्या

* प्रतिनिधी

  • मी २१ वर्षांची आहे. माझ्या ओठांच्या बाजूला लहान-लहान मुरुमे आहेत. ते दिसायला अतिशय विचित्र आणि कुरूप वाटतात. कृपया मला उपाय सांगा?

ओठांभोवती मुरुमे येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे उष्णता, मेकअप व्यवस्थित साफ न करणे इ. लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळेही संक्रमण होऊ शकते.

याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा लाभ घेऊ शकता. उदा :

बर्फाने शेक द्या : बर्फ सूज कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेतील घाण काढून टाकण्यासही मदत होते. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा पिंपल्स असतील तरीही तुम्ही बर्फ वापरू शकता. बर्फाने शेक देण्यासाठी बर्फ एखाद्या कापडाने गुंडाळा आणि नंतर तो प्रभावित जागेवर लावा.

हळद : हळद त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आढळतात, जे चेहऱ्यावरील मुरुमे काढून टाकण्याचे काम करतात.

हळद वापरण्यासाठी तुम्हाला हळदीची पेस्ट बनवावी लागेल.

यासाठी तुम्ही १ टीस्पून हळद घ्या आणि त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा.

आता ही पेस्ट ओठांवर लावा आणि १० मिनिटे सोडा.

मध : मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि विरोधी दाहक गुणधर्म आढळतात, जे मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारण्याचे काम करतात.

मध सूज कमी करण्यासाठीदेखील कार्य करते. जर तुम्हाला फोडे येण्याची समस्या असेल तरी तुम्ही मध वापरू शकता. संसर्गापासून मुक्त होण्यासाठी ओठांच्याभोवती मध चांगल्या प्रकारे लावा. ही प्रक्रिया २-३ वेळा पुन्हा करा.

  • मी १९ वर्षांची आहे. पूर्वी माझे दात पांढरे दिसायचे, पण आता ते हळूहळू पिवळे होत आहेत. मी सकाळी दातदेखील चांगले स्वच्छ करते. माझे दात पूर्वीप्रमाणे पांढरे दिसण्यासाठी मी काय करावे?

दातांची योग्य काळजी न घेतल्याने दात पिवळे होऊ लागतात. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण या उपायांचे पालन केले पाहिजे :

तुळस : तुळशी हा दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. तुळशी अनेक रोगांपासून दातांचे रक्षणदेखील करते. तसेच तोंड आणि दातांच्या आजारांपासून सुटकाही मिळते.  हिचा वापर करण्यासाठी तुळशीची पाने उन्हात वाळवा. यांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्याने दात चमकू लागतात.

मीठ : मीठ ही दात स्वच्छ करण्याची खूप जुनी कृती आहे. मीठात थोडा कोळसा घातल्याने दात चमकू लागतात.

व्हिनेगर : सफरचंद व्हिनेगर १ चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. तुमचा टूथब्रश या मिश्रणात बुडवा आणि हळूवारपणे आपल्या दातांवर ब्रश करा. ही प्रक्रिया सकाळी आणि रात्री पुन्हा करा. हे मिश्रण वापरल्याने दातांचा पिवळसरपणा दूर होतो. तसेच श्वासातील दुर्गंधीची समस्यादेखील राहत नाही.

  • मी २२ वर्षांची आहे. जेव्हाही मी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करते, माझे केस पूर्णपणे निघत नाहीत. हे केस खूप लहान असतात, जे त्वचेतून बाहेर पडताना दिसतात. कृपया मला सांगा की ते पूर्णपणे कसे काढायचे?

या केसांना इनग्रोथ हेअर म्हणतात. आपण त्यांना एक्सफोलीएट करून काढू शकता. यामुळे त्वचेच्या आत अडकलेले केस मऊ होतील आणि बाहेर येतील. यासाठी तुम्ही घरी उपलब्ध साहित्य वापरू शकता.

एवोकॅडो आणि मध : एवोकॅडो मॅश करा, आता त्यात २ टेबलस्पून मध आणि १ टेबलस्पून साखर घाला. साखर एक सौम्य एक्सफोलिएशन देईल आणि मध व एवोकॅडो आपल्या त्वचेला पोषण देईल.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही १-२ चमचे ताज्या लिंबाचा रस घालू शकता. लिंबाच्या रसाने त्वचा घट्ट होईल आणि यामुळे छिद्रदेखील बंद होतील.

हा मास्क १५-२० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर तो पूर्णपणे धुऊन काढा.

टीट्री ऑइल : टीट्री ऑइलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे, जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या संसर्गाचा धोका टाळतात आणि इनग्रोथ केसांची समस्यादेखील दूर करतात. टीट्री ऑइलमध्ये डिस्टिल्ड वॉटर मिसळून ते त्वचेवर लावा आणि काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. वॅक्सिंगनंतर १ दिवसांनी हे उपाय अवलंबा.

  • मी २८ वर्षांची महिला आहे. मला पायाच्या नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग झाला आहे. याचे निराकरण करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगा?

नखांमध्ये बुरशीची समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपले पाय शूजमध्ये बराच काळ बंद असतात, ते व्यवस्थित साफ केले जात नाहीत. बुरशीपासून मुक्त होण्यासाठी लसूण आणि लवंग तेल मोहरीच्या तेलात मिसळा आणि चांगले गरम करा. आता रात्री झोपण्यापूर्वी ते पाय आणि नखांवर लावा.

तेल लावल्यानंतर मोजे घाला आणि झोपा. असे केल्याने, बुरशीजन्य संसर्गामध्ये सुधारणा दिसून येईल.

त्यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अँटीस्पिरंट पावडरदेखील वापरू शकता. जर समस्या अजूनही कायम राहिली तर निश्चिंतपणे संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सौंदर्य समस्या

* एअरब्रश मेकअप एक्सपर्ट,इशिका तनेजा

  • मला घरात नियमितपणे स्क्रबिंग करायचे आहे, पण मी असे ऐकलेय की ते योग्य पध्दतीने केले नाही, तर त्वचेवर विपरित परिणामही होऊ शकतो. स्क्रबिंगची योग्य क्रिया काय आहे?

तुम्ही बरोबरच ऐकलेय. स्क्रब करण्याची योग्य पध्दत ही आहे की आपल्या त्वचेवर हलका दाब देत स्क्रबिंग करावे. खास करून फेशियल त्वचेवर हे खूप आवश्यक आहे. कारण ती जास्त संवेदशील असते. म्हणून याला स्क्रब करताना जास्त काळजी घ्यावी लागते. स्किन ड्राय झाल्यावर तिला स्पेशल केअरसोबतच एक्सफॉलिएटेड करण्याची गरज असते.

कधीही आपल्या चेहऱ्यावर सरळ स्क्रबचा वापर करू नका. आधी आपली त्वचा ओली करा. मग थोड्याशा प्रमाणात स्क्रब घेऊन चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्यात थोडे पाणी मिसळा. त्यामुळे स्क्रब सौम्य होतो आणि तो चेहऱ्यावर सहजपणे लावता येऊ शकतो.

  • मी नोकरदार महिला आहे आणि मला कामासाठी जास्त करून उन्हात राहावे लागते. त्यामुळे मला पिग्मेंटेशनची समस्या निर्माण झाली आहे. मी या पिग्मेंटेशनला कसे रोखू कृपा करून मला सल्ला द्या?

स्किन पिग्मेंटशनच्या कारणांमध्ये सन डॅमेज, हार्मोनल डिसऑर्डरपासून ते आनुवंशिक कारणे कारणीभूत असतात. बहुतेक प्रकरणांत सन एक्सपोजर त्वचेच्या पिग्मेंटेंशनचे कारण बनते. आपण पिक टाइमच्या वेळी सन एक्सपोजरपासून दूर राहा. आपला चेहरा आणि हाताला ३० ते ४० एसपीएफ असलेले सनस्क्रीन किमान अर्धा तास आधी लावून मगच उन्हात बाहेर पडावे.

जर आपली त्वचा रेडिएशनबाबत जास्त सेंसिटिव्ह असेल, तर आपल्ण बाहेर जाण्यापूर्वी लावता तेवढेच घरातही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. घरातील आर्टिफिशियल लाइटही त्वचेवर प्रभाव पाडते. कारण यातही काही प्रमाणात रेडिएशन असते. सामान्यपणे घरात असताना एसपीएफ १५ पर्यंतचे सनस्क्रीन लावणे उत्तम असते.

  • बहुतेकदा मेकअप करण्यापूर्वी फाउंडेशन लावण्याचा सल्ला दिला जातो. कृपया सांगा की फाउंडेशन लावण्याची योग्य पध्दत काय आहे?

मेकअपची सुरुवात फाउंडेशन लावून केली जाते आणि ते लावण्यापूर्वी चेहरा चांगल्याप्रकारे स्वच्छ व मॉइश्चराइज करणे आवश्यक असते. आपल्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांत फाउंडेशनचे ठिपके लावा. समस्या असलेल्या त्वचेला (असमान त्वचेचा टोन) चांगल्याप्रकारे लावा. नैसर्गिक लुकसाठी ब्लॅडिंग करणे आवश्यक आहे.

  • माझे हात खूप कोरडे आहेत. कोणाशी हात मिळवल्यानंतर मला खूप लाज वाटते. माझे हात मऊ होण्यासाठी मी काय करू?

हातांमध्ये ऑइल ग्लँड्स कमी असतात. म्हणून हात विशेषत: बदलत्या मोसमात रूक्ष होतात. घरातील कामे उदा. कपडे, भांडी इ. धूत राहिल्यामुळेही हातांची त्वचा खराब होते. अशा वेळी हातांना नियमितपणे एक्सफोलिएट आणि मॉइश्चराइज करत राहिले पाहिजे. त्याबरोबरच १ मोठा चमचा लिंबाचा रस, एक छोटा चमचा साखरेत थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा.

हे मिश्रण हातांना ५ मिनिटे लावून ठेवा. मग हात कोमट पाण्याने स्वच्छ करा. याबरोबरच १/३ कप ग्लिसरीन आणि २/३ कप गुलाबपाणी एकत्र मिसळून ते बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही जेव्हा एखादे काम कराल, त्यानंतर हात कोरडे वाटल्यास या मिश्रणाने त्यांना मसाज करा.

  • मी माझ्या केसांबाबत खूपच जागरूक आहे. त्यामुळे त्यांना नियमित तेलाने मालीश करण्याची इच्छा असते, पण वर्किंग असल्यामुळे नेहमी शक्य होत नाही. मला हे जाणून घ्यायचे आहे की, केस धुतल्यानंतर किती तासांनंतर ऑयलिंग केले पाहिजे?

जर आपल्याला आपले केस निरोगी व आकर्षक बनवायचे असतील, तर खरोखरच त्यांना ऑयलिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी तेल केस धुण्यापूर्वी लावा, केस धुतल्यानंतर नव्हे. तेल लावल्यामुळे धूळमातीचे कण केसाला चिकटतात. म्हणून केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना ऑयलिंग करत, हळूहळू हेडमसाज करणे, ही चांगली पध्दत आहे. आठवड्यातून २-३ दिवस तेलाने मालीश करा. त्यामुळे केसांना पोषण मिळते.

  • मी सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावते, पण ते लावल्यानंतर मला खूप घाम येतो आणि त्यामुळे सनस्क्रीन निघून जाते. मला सनस्क्रीन लावायची इच्छा असते, पण समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मला काय केले पाहिजे?

जर सनस्क्रीन लोशन लावल्यानंतरही आपल्याला घाम येत असेल, तर चिकटपणापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनसोबत कॅलमाइन लोशन मिक्स करा. पाण्याच्या संपर्कात येण्याने किंवा घामामुळे एसपीएफयुक्त सनस्क्रीनचा प्रभाव नष्ट होऊ लागतो. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेला सहजपणे नुकसान पोहोचवू शकतात.

म्हणून सनस्क्रीनचा मोठा थर त्वचेवर लावणे खूप आवश्यक आहे.

सौंदर्य समस्या

* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • मी २२ वर्षांची आहे. माझी समस्या अशी आहे की, जेव्हा मी आर्टिफिशियल दागिने घालते तेव्हा माझ्या त्वचेवर पुरळ उठते. यापासून वाचण्यासाठी काय करायला हवे?

आर्टिफिशियल दागिने घालण्यापूर्वी स्कीन क्रीमचा वापर करा. दागिने काढल्यानंतर दागिन्यांचा स्पर्श झालेली जागा डेटॉलने धुवा.

  • मी २५ वर्षांची आहे. काही दिवसांपासून भुवयांवरील केस गळत आहेत. कृपया असा एखादा उपाय सांगा ज्यामुळे हे केस गळणे थांबेल?

तुमच्या भुवयांचे केस गळण्याचे कारण तणाव हे असू शकते. जास्त तणावामुळे केस गळू लागतात. म्हणून तणावात राहणे बंद करा. जेवणातील झिंक, आयर्न, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळेही भुवयांचे केस गळू लागतात. यावर उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑईल बोटांवर घेऊन भुवयांची गोलाकार दिशेने मालीश करा. ३० मिनिटांपर्यंत तेल तसेच लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

  • मी १८ वर्षांची आहे. माझे केस खूपच तेलकट आहेत. शाम्पू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा तेलकट होतात. शाम्पू करण्यापूर्वी मी केसांना खोबरेल तेल लावते. खोबरेल तेल लावणे योग्य आहे का?

तुमच्या समस्येचे कारण हेदेखील असू शकते की, केसांना शाम्पू केल्यानंतरही तुमच्या केसांमधील तेल चांगल्या प्रकारे निघून जात नसेल. केसांना पोषण मिळावे यासाठी तेलाऐवजी हेअर टॉनिक लावा. यामुळे केस निरोगी होतील आणि तेलकटही होणार नाहीत. केस तेलकट दिसू नयेत यासाठी शाम्पूत लिंबाच्या रसाचे काही थेंब घातल्यानंतरच केसांना शाम्पू करा. केस धुतल्यानंतर केसांची २ ते ३ इंच त्वचा सोडून कंडीशनर लावा.

  • मी १९ वर्षांची आहे. माझा रंग सावळा आणि केस काळे आहेत. एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार मी केसांना बरगंडी कलर लावला. पण यामुळे माझा रंग अधिकच सावळा दिसू लागला. मला वाटते की, बरगंडी कलर मला शोभत नाही. कृपया सांगा की, केसांचा हा रंग कसा आणि किती लवकर काढता येईल? शिवाय माझा चेहरा आणि केसांवर कोणता रंग शोभून दिसेल, हेदेखील सांगा?

केसांना लावलेल्या रंगामुळे तुम्ही घाबरुन जाऊ नका. सर्वप्रथम चांगल्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केसांना नैसर्गिक रंगाची डाय लावा आणि केसांना चांगले कंडिशनिंग करा. नेहमी चांगल्या क्लॉलिटीचाच शाम्पू वापरा, जेणेकरुन केसांचे नुकसान होणार नाही. तुमच्या सावळया रंगावर वाईन आणि वॉलनट कलर चांगला दिसेल. सर्व केसच कलर करणे मुळीच गरजेचे नाही. वाटल्यास तुम्ही हेअर कलरने केसांच्या काही बटा रंगवू शकता.

  • मी १८ वर्षांची आहे. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी मी मसुर डाळीचा लेप लावते तेव्हा माझ्या चेहऱ्यावर पुळया येतात. पुळया आणि चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी काही उपाय सांगा?

तुमच्या समस्येवरुन हे लक्षात येते की, तुमची त्वचा खूपच संवेदनशील आहे. यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा पुळया येतात. तुम्ही त्वचेवर लेप लावू नका. कारण लेप सुकल्यावर तो घासून काढताना त्वचेच्या ज्या भागाला तेलाची गरज असते तेथून ते निघून जाते. त्यामुळे अशा भागावर कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचा लेप लावा. तुम्ही ताजी पाने कुटून त्याचाही फेसपॅक बनवू शकता. अॅलोवेरायुक्त क्रीमचा वापरही फायदेशीर ठरू शकतो. यामुळे पुळया कमी होतील आणि हळूहळू तेथील डागही निघून जातील.

  • मी २५ वर्षांची आहे. मी जेव्हा कधी चेहऱ्यावर क्रीम लावते तेव्हा चेहऱ्यावर व्हाईटहेड्स येतात. कृपया ते काढून टाकण्याचा उपाय सांगा?

व्हाईटहेड्सची समस्या चेहऱ्याची रंध्रे, तेलकटपणा तसेच अस्वच्छतेमुळे उद्भवते. व्हाईटहेड्स त्वचेच्या आतील रंध्रांमध्ये तयार होतात, ज्याला पुरेसा प्रकाश मिळत नाही आणि त्याचा रंग सफेद असतो. आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या तेलकटपणा असतो, जो त्वचेचा मुलायमपणा आणि त्वचेचे मॉईश्चर कायम ठेवतो. त्वचेवर जास्त तेलकटपणा असेल तर त्यामुळे त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही क्रीम्स अशा असतात ज्या त्वचेला आणखी तेलकट करतात. ज्यामुळे त्वचेवर पुळया येऊ लागतात. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ऑईल फ्री क्रीमचाच वापर करा. व्हाईटहेड्स घालवण्यासाठी मेथीच्या पानांत पाणी घालून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर चोळा. विशेष करुन जिथे व्हाईटहेड्स असतील तिथे ही पेस्ट लावा. यामुळे व्हाईटहेड्स दूर होतील. पेस्ट सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

  • पेन्सिल आयलायनर आणि लिक्विड आयलायनर यापैकी जास्त परिणामकारक काय आहे?

लिक्विड आयलायनरमुळे डोळे जितके मोठे आणि आकर्षक दिसतात तितके पेन्सिल आयलायनरने दिसत नाहीत. लिक्विड आयलायनर खूप काळ टिकूनही राहतो. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्यासाठी लिक्विड आयलायनर जॅकपॉटसारखा आहे. ते बराच काळ त्याच शेपमध्ये राहते, सोबतच त्यामुळे काळपटपणा दिसत नाही. याउलट पेन्सिल किंवा पावडर लायनरमुळे डोळयांच्या आजूबाजूला तेलकटपणा निर्माण झाल्याने दिवसभरात दिलेला शेप खराब होऊ शकतो किंवा निघूनही जाऊ शकतो. लिक्विड आयलायनरचा हादेखील मोठा फायदा आहे की, तुम्ही याच्या मदतीने काहीही क्रिएटिव्ह करु शकता.

सौंदर्य समस्या

* समस्यांचे निराकरण ब्यूटी एक्सपर्ट, इशिका तनेजा

  • केस मुलायम आणि रेशमी ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?

केसांची देखभाल करण्यासाठी तुम्ही क्रिमी शॅम्पूचा वापर केला पाहिजे. तसेच क्रिमी कंडीशनर नक्की लावा. याच्यासाठी केस शॅम्पूने व्यवस्थित धुवून घ्या. यानंतर लेंथवर कंडीशनर लावून काही मिनिटे तसेच ठेवा. मग केस पाण्याने धुवा. केस कॅराटीन नावाच्या प्रोटीनने बनतात. यांच्या वाढीसाठी आपल्या रोजच्या आहारात प्रोटीनचा समावेश करा जसे की दूध, दही, मोड आलेली कडधान्ये, अंड, मासे इत्यादी. यामुळे केसांना पोषण मिळते. आठवडयातून एकदा हेअर पॅक लावा. यासाठी पिकलेले केळे, २ चमचे दूधासह मिक्सरमध्ये स्मॅश करून पेस्टमध्ये आवाकाडो, मध आणि वाटलेली पुदीन्याची पाने एकत्र करा. हे मिश्रण लेपप्रमाणे केसांवर लावा आणि काही तासांनी केस पाण्याने धुवा.

  • माझे डोळे थोडे मोठे आहेत. जेव्हा कधी मी आय मेकअप करते, तेव्हा माझे डोळे बाहेर आल्यासारखे वाटतात. मला जाणून घ्यायचे आहे की, डोळयांचा मेकअप कसा असावा जेणेकरून माझी समस्या सोडवता येईल?

डोळे मोठे असल्याने चेहरा आकर्षक दिसतो, पण असे वाटते की तुमचे डोळे थोडे जास्त मोठे आहेत. तुम्हाला तुमच्या डोळयांना सुंदर आकार द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पापण्यांवर गडद रंगांच्या आयशॅडोचा वापर केला पाहिजे किंवा ब्राऊन शेडचा आयशॅडो चांगला आणि नैसर्गिक दिसेल. डोळयांच्या अगदी जवळून एक पातळ आयलायनरची रेघ बाहेरपर्यंत ओढा. ही रेघ शेवटी बाहेरच्या बाजूने जाड दिसली पाहिजे. तुम्हाला तुमची समस्या कायमस्वरुपी सोडवायची असेल तर परमनंट आयलायनर लावा. परमनंट आयलायनरमुळे तुमच्या डोळयांना योग्य आकार मिळेल. मग तुमचे डोळे प्रत्येकक्षणी सुंदर आणि आकर्षक दिसतील.

  • जास्त स्टीम घेतल्यामुळे माझी त्वचा सैल झाली आहे आणि तेज कमी झाले आहे. मला काय केले पाहिजे जेणेकरून त्वचा पूर्ववत होईल आणि सतेज दिसेल?

जास्त वेळा सातत्याने स्टीम घेतल्याने असे होणे स्वाभाविक आहे. आता त्वचा पूर्ववत करण्यासाठी ए.एच.ए क्रिमने चेहऱ्यावर मसाज करा. तसेच अंडयाचा पांढरा बलक चेहऱ्यावर ६-७ मिनिटे लावून मग चेहरा पाण्याने धुवून घ्या. यासह अॅलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा. उत्तम आणि चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला एका चांगल्या कॉस्मॅटीक क्लिनिकने लेझर आणि यंग स्किन मास्कच्या काही सिटिंग्स केल्या पाहिजेत.

  • मला कानातले घालायला खूप आवडतात. ते माझ्या चेहऱ्यावर खुलुन दिसतात. पण जेव्हा कधी मी कानातले घालते, तेव्हा माझ्या कानाजवळ पुरळ ऊठू लागले. यामुळे सूजही येते. कृपया माझ्या या समस्येवर उपाय सांगा.

अशाप्रकारची समस्या तेव्हा येते जेव्हा स्किन सेंसेटीव्ह किंवा अॅलर्जिक असेल. तुम्ही नेहमी सोने किंवा चांदीचे कानातले घालणे अधिक योग्य ठरेल. कारण इतर धातूंच्या तुलनेत यापासून अॅलर्जी होण्याची शक्यता कमी असते.

  • माझ्या चेहऱ्यावरचा रंग २ प्रकारचा आहे. काही ठिकाणी काळपट झालेला आहे तर काही ठिकाणी उजळलेला. सनस्क्रिनचा काहीच उपयोग झाला नाही. कृपया काही उपाय सांगा ज्यामुळे रंग एकसमान होईल?

तात्पुरता रंग एक समान करण्यासाठी तुम्ही मेकअप म्हणून कंन्सिलरचा वापर करा. याव्यतिरिक्त कच्च्या पपईचे तुकडे काळपट झालेल्या जागेवर लावा. कच्च्या पपईत पॅपिन नामक एंजाइम आढळते, जे रंग उजळवण्यास मदत करते.

  • मी जेव्हा कधी लिपस्टीक लावते, तेव्हा माझ्या ओठांवर पापुद्रे येतात. कृपया मला लिपस्टीक लावण्याची योग्य पद्धत सांगा?

कधी-कधी काही लिपस्टीक सूट करत नसातील तर अशी समस्या उद्भवू शकते. अशावेळी तुम्ही ब्रँड बदलून पाहू शकता. तसेच चांगल्या गुणवत्तेच्या मॉइश्चरायझिंग लिपस्टीकचा वापरून पाहू शकता. ओठांवरील मृत त्वचा काढण्यासाठी स्क्रबिंग गरजेचे आहे. यासाठी बदाम तेलाचे काही थेंब, साखर एकत्र करून टूथब्रशने ओठांवर हळूवारपणे स्क्रब करा. घरगुती उपाय म्हणून ओठांना हायड्रेट आणि नरीश करण्यासाठी बीटाच्या रसात मध मिसळून ओठांवर लावा. असे केल्यास ओठांवर रंग येईल आणि ते सॉफ्ट होतील.

  • मी २२ वर्षांची नोकरी करणारी मुलगी आहे. स्लिव्हलेस कपडे घालत असल्यामुळे अंडरआर्मचे केस लवकर लवकर रिमूव्ह करावे लागतात. त्यासाठी फिमेल रेारचा वापर करते. यामुळे अंडरआर्म काळपट होत आहे. यासाठी काय करू?

रेझरच्या नियमित वापरामुळे केसांची वाढ कठीण होते म्हणून त्वचा काळी पडते. सर्वप्रथम तुम्ही रेझरचा वापर बंद करा. या केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही वॅक्सिंगचा वापर करू शकता किंवा पल्सड लाइट तंत्राद्वारे कायमस्वरुपी केस कमी करण्याचा उपचार करून घेऊ शकता. हे एक इटालियन तंत्र आहे. हा नको असलेले केस काढण्याचा सर्वात वेगवान, वेदनाहिन आणि सुरक्षित पर्याय आहे. लेझर अंडरआर्मवर परिणामकारक ठरते. यामुळे २ ते ३ सिटींग्जमध्ये केस निघून जातील. डार्क अंडरआर्मचा तुम्ही ब्लीचद्वारे लाइट करू शकता, पण ब्लीच नेहमी वॅक्सिंग पूर्वी करावे.

 

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • मी १८ वर्षीय तरूणी आहे. उन्हात फिरल्याने माझा चेहरा खूप टॅन झाला आहे. मला ब्लीच वापरून पाहायचे आहे. पण याबाबत मला फार माहिती नाहीए. कृपया माझ्या त्वचेनुसार मी ब्लीचचा वापर कसा करू ते सांगा?

जर तुमची त्वचा सेंसिटिव्ह असेल तर लॅक्टो ब्लीचचा वापर करायला हवा. लॅक्टो ब्लीचने त्वचेवर अॅलर्जी येण्याची शक्यता कमी असते. ऑक्सि ब्लीच सगळया प्रकारच्या त्वचेला चांगले ठेवते, तर गोऱ्या रंगासाठी केशरयुक्त ब्लीच चांगले असते. सावळया रंगासाठी पर्ल ब्लीचचा वापर कारायला हवा. जर तुम्ही लग्न, अथवा पार्टीसाठी ब्लीच करू इच्छिता तर इन्स्टंट ग्लोकरीता गोल्ड ब्लीचचा वापर करा.

  • माझे वय २५ वर्षं आहे. चेहऱ्यावर पिंपल्ससोबत टॅनिंगसुद्धा आहे. कृपया सांगा की मी काय करू, जेणेकरून माझे पिंपल्स आणि टॅनिंगचा त्रास नाहीसा होईल?

पपई अथवा केळ कुस्करून टॅनिंग आहे तिथे लावा. पपई आणि केळ यांच्या पल्पमध्ये बटाटा आणि टोमॅटोचा रस मिसळून ते पिंपल्स असलेल्या जागी लावा. १० मिनिट लावून ठेवा. नंतर चेहरा धुवा.

  • चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो आणण्यासाठी एखादा घरगुती उपाय सांगा?

२ चमचे चंदन पावडमध्ये थोडे गुळाबजल मिसळून पेस्ट बनवा. आता हे चेहऱ्यावर लावा आणि १०-१५ मिनिटं तसेच लावून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर सौम्य मॉइश्चरायझर लावा.

  • माझे वय १७ वर्षं आहे. माझे केस अजिबातच वाढत नाहीत. कृपया ते लांबसडक आणि दाट होण्यासाठी काही घरगुती उपाय सांगा.

व्हिटॅमिन ई केसांसाठी आवश्यक पोषकतत्त्व आहे. लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल याचे मिश्रणसुद्धा व्हिटॅमिन ईचा सर्वात चांगला पयार्य आहे. केसांसाठी मास्क करायचा असेल तर एका वाटीत १० मिमी. लिबांचा रस घ्या आणि यात १० मिमी. ऑलिव्ह तेल घ्या. हे मिश्रण छान मिसळा व आपल्या केसांना लावा आणि २० मिनिटे ठेवल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा. हे तुम्ही आपल्या घरीसुद्धा करुन पाहू शकता. हे तुमच्या केसांसाठी खुपच लाभदायक आहे. या मिश्रणातील पोषक घटक तुमच्या केसांचे होणारे नुकसान टाळते आणि त्यांना नैसर्गिक चमक देते.

  • माझे वय ३० वर्षं आहे. काही दिवसांपासून माझी त्वचा सैल पडते आहे. त्वचा टाईट करायला एखादा प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय आहे का?

सैल त्वचेला टाईट करण्याकरिता तुम्ही एका वाटीत केळं व्यवस्थित बारीक कुस्करून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घ्या जेणेकरून छान पेस्ट तयार होईल. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावा. फेस पॅक चांगला वाळल्यावर गरम पाण्याने धुवा.

केळ्यात असलेले व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ अॅन्टीएजिंगचे कार्य करतात. नियमित या फेस मास्कचा उपयोग केल्यास उत्तम आणि टाईट त्वचा मिळवण्यात मदत होऊ शकते.

तुम्ही नियमित त्वचेला खोबरेल तेल लावा. यासाठी झोपण्याआधी १ चमचा खोबरेल तेलाने तुमच्या चेहऱ्याला साधारण ५ मिनिटं मालिश करा. खोबरेल तेल त्वचेसंबंधीच्या तक्रारी दूर करण्यात सहाय्यक असते.

  • माझी त्वचा खूप ऑईली आहे. ऑईली त्वचेसाठी मुलतानी मातीचा फेस पॅक फायदेशीर ठरेल का?

मुलतानी मातीचा फेस पॅक तेल शोषून घेणारा मास्क आहे, जो ऑयली त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी खूपच फायदेशीर असतो. मुलतानी मातीचा फेस पॅक अतिरिक्त तेल, मळ आणि मृत त्वचा पेशी नाहीशी करतो. थोडया वेळातच चेहऱ्याला स्वच्छ आणि गोरा बनवतो. तुमच्या चेहऱ्यावरून तेल नाहीसे कारण्याकरिता तुम्ही २ मोठे चमचे मुलतानी माती, १ टोमॅटो आणि १ लिंबाचा रस घ्या. टोमॅटोमधील बिया काढून त्याचा रस काढा. आता एका वाटीत हे सगळे साहित्य चांगले मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. ३०-४० मिनिटं तसेच राहू द्या. आता बोटे गोल फिरवून हा पॅक काढा आणि पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही हा पॅक आठवडयातून १-२ वेळा लावू शकता.

  • माझे केस लांबसडक आणि दाट आहेत. अशावेळी केस रोज धुणे आणि मग सुकवणे त्रासदायक काम आहे. आठवडयातून किती वेळा केस धुवायला हवेत?

केस रोज धुवावे अथवा नाही हे तुमच्या केसांच्या टेक्सचरवर अवलंबून आहे कारण यामुळे हे निश्चित होते की केसांच्या मुळातून सीबम कसे तुमच्या केसात पसरते. जाड आणि कुरळया केसात सीबम हळुवार पसरते. म्हणून असे केस आठवडयातून केवळ एकदाच धुवायची गरज असते. तुमचे केस जाड आणि कुरळे आहेत आणि खूप दिवस धुतले नाहीत तरीही ते निर्जीव वाटणार नाहीत, म्हणून हे रोजरोज धुवायची गरज नाही. आठवडयातून एकदा जरी केस धुतले तरी त्यांत फार फरक पडणार नाही. जर तुमचे केस ऑयली असतील, तर मात्र तुम्ही केस आठवडयातून दोनदा धुवू शकता.

ऑईली केसांसाठी ड्राय शाम्पू वापरणे योग्य ठरेल. जर तुमचे केस पातळ आणि लांबसडक असतील तर तुम्ही एक दिवसा आड केस धुवू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें