१७ स्थळं जी पाहाताच मन वेधून घेतात

* शिखा जैन

जगभरात अशा काही रोमॅण्टिक जागा आहेत जिथल्या वातावरणात प्रेम बसतं आणि जर या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जाल तर प्रेमाच्या नव्या रंगात तुम्ही न्हाऊन जाल. चला तर, आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगतो जिथे जाऊन तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांमध्ये असे काही हरवून जाल की तुम्हाला परत यावंसंच वाटणार नाही.

गोवा : इथली स्वच्छंदी व उन्मुक्त जीवनशैली पर्यटकांना इथे खेचून आणते. तुम्हालादेखील तुमच्या जोडीदारासोबत काही अनमोल क्षण घालवायचे असतील तर गोवा यासाठी खूपच चांगलं पर्यटनस्थळ आहे. वॉटर स्पोर्ट्साठीदेखील गोवा खूपच प्रसिद्ध आहे. समुद्रांच्या लाटेवर तुम्ही वॉटर सर्फिंग, पॅरासेलिंग, वॉटर स्कीइंग, स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्कूटर इत्यादींचा आनंद घेऊ शकता.

रोमांचकारक गोष्टींची आवड असणाऱ्यांना समुद्राची छाती चिरून चालणाऱ्या वॉटर स्कूटरची सवारी खूपच आकर्षित करते.

गोव्यातील काही प्रसिद्ध बीच डोना पावला, कोलबा, कलंगूट, मीरामार, अंजुना, बागातोर इत्यादी आहेत. पणजी, म्हापसा, मडगाव गोव्यातील काही प्रमुख शहरं आहेत.

पॅरिस : जगभरातील पर्यटकांचं हे स्वप्नातील शहर आहे. दरवर्षी जवळजवळ दीड कोटीपेक्षा अधिक लोक प्रेमाची नगरी पॅरिसला पाहायला येतात. इथल्या सीन नदीवर बनलेला सर्वात जुना पूल पोंट न्यूफ प्रेमी जोडप्यांमधे खास लोकप्रिय आहे. यामुळे याला प्रेमाची नगरीदेखील म्हटलं जातं. इथे प्रेमी जोडप्यांकडून लव्हलॉक लावलं जातं. तसेही इथले म्यूझियमदेखील जगभरात प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, वॅक्स म्यूझियम इत्यादी.

तसंच पॅरिसच्या उत्तरेला १३० मीटर उंच मोंटमा डोंगरावर प्रेमाची भिंत आहे. ४० चौरस मीटरच्या या भिंतीवर कलाकारांनी ६१२ टाइल्सवर ३०० भाषांमध्ये ‘आय लव्ह यू’ लिहिलंय. हे पाहाण्यासाठीदेखील पर्यटकांची खूप गर्दी असते.

सिडनी : सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं आणि सर्वात जुनं शहर आहे. सिडनी शहराचं नाव येताच पर्यटकांच्या डोक्यात शंखाची आकृती असणारी ऑपेरा हाउसची बिल्डिंग नक्की येते. सिडनीच्या बेनिलॉग पॉईंटवर असलेल्या या सुंदर इमारतीचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सूचीतदेखील सामील आहे.

ऑपेरा हाउसच्या बाजूला सिडनी हार्बर ब्रिज आहे. यावरच न्यू ईयरचं सेलिब्रेशन सोहळा पाहाण्यासारखा असतो. प्रेमाने याला लोक कोट हँगर नावाने बोलतात. जगभरात हा एक अनोखा असा पूल आहे.

थायलंड : थायलंडचं नाव घेताच पार्टी आणि बीचेसची आठवण येऊ लागते. लाखों पर्यटक दरवर्षी थायलंडच्या रंगतदार रात्रींची मजा घेण्यासाठी इथे पोहोचतात.

थायलंडची सर्वात एक गोष्ट खूपच खास आहे ती म्हणजे इथली लोक कपाळाला सर्वात महत्त्वाचा भाग मानतात; हृदयापेक्षादेखील अधिक. त्यांचं म्हणणं आहे की व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख फक्त कपाळानेच मिळते. म्हणूनच इथे अजून एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते ती म्हणजे इथे येणाऱ्या भारतीय पत्नी ज्या अनेकदा आपल्या पतीला एकदा तरी कपाळावर किस करण्याची विनंती करतात. असं करणं त्यांच्यासाठी एक रोमांचक क्षण असतो. त्याचबरोबर सन्मानाचीदेखील गोष्ट असते. याव्यतिरिक्त इथलं फीफी आयर्लण्ड मंत्रमुग्ध करणारी जागा आहे. इथल्या नैसर्गिक सौंदर्यात आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवणं खास आठवणीतले क्षण आहेत.

मॉरीशस : सन अॅण्ड सॅण्डमध्ये रोमान्स करायचा असेल तर या बेटापेक्षा अन्य कोणतंही सुंदर पर्यटनस्थळ नाहीए. हनीमूनर्स पॅराडाइज म्हटलं जाणाऱ्या मॉरीशसमध्ये पावलापावलांवर निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळतं. यामुळेच मॉरीशसला ड्रीमलॅण्ड या नावानेदेखील ओळखलं जातं. मॉरीशस एक असं बेट आहे की तिथले सुंदर वाळूचे बीचेस पर्यटकांना सन्मोहित करतात. इथे होणारी मौजमजा पर्यटकांना वारंवार येण्यासाठी उत्साहित करते. मॉरीशसमध्ये पेरीबेरी, ग्रॅड वाई, ब्लू बेसारखे अनेक मनमोहक बीचेस आहेत. इथे समुद्राच्यामध्ये लपलेल्या जगाचा आनंद घेण्यासाठी ब्लू सफारी पाणबुडीदेखील आहे.

पोर्टलुई मॉरीशसची राजधानी आहे, जी देशाच्या कलासंस्कृतीचं जीवंत उदाहरण आहे. इथल्या गजबजलेल्या बाजारात खरेदीसाठी बरंच काही आहे. इथे सुक्या माशांपासून बनविलेले दागिने, टी शर्ट, शोपीस इत्यादी अनेक वस्तू मिळतात. इथे पॅपलमूज बोटॅनिकल गार्डन खास प्रकारच्या वॉटर लिली फुलांसाठी प्रसिद्ध आहे.

सिंगापूर : साउथ ईस्ट आशियातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक सिंगापूर आहे. परंतु हे हनीमून वा मग सुट्टी घालविणाऱ्या पर्यटकांची पहिली आवड राहिलीय. सिंगापूरचं बसकर्स फेस्टिवल, सिंगापूर आर्ट फेस्टिवल, मोजिएक म्यूझिक फेस्टिवल, लूनर न्यू ईयर खूपच खास असतात. इथे तुम्ही म्युझिक आर्ट इंस्टालेशन्स आणि लाइट शोजचा मोफतदेखील आनंद घेऊ शकता. परंतु या फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमची ट्रिप सिंगापूरच्या कॅलेंडरनुसार प्लान करावी लागेल.

स्वित्झर्लण्ड : इथल्या पांढऱ्या बर्फाने झाकलेले आल्प्सचे डोंगर, चहूबाजूंची हिरवळ, नजर खिळणाऱ्या नद्या आणि सरोवरं, सुंदर फुलं, रंगीत पानं असलेली झाडं प्रत्येकालाच आकर्षित करतात. इथे मैलोन्मैल लांब बोगदे, नैसर्गिक दृश्यंदेखील आहेत. टिटलिस पर्वतावर केवल कारच्या माध्यमातून पूर्ण ग्लेशियरचं सौंदर्य पाहाता येतं. हे जगातील एकमात्र असं स्थान आहे जिथे फिरणाऱ्या केबल कार आहेत. जगप्रसिद्ध कॉफी नेसकॉफीचं मुख्यालयदेखील इथे आहे. इथे प्रेमीयुगुलं कॉफीचा आनंद घेतात आणि फुरसतीचे काही क्षण घालवितात. युरोपातील सर्वात उंच रेल्वेस्टेशन जंगफ्रादेखील पाहाण्यालायक स्थळ आहे. इथे रेल्वेचे २ नाही, तर ३ रूळ आहेत. मधला रूळ सायकलच्या चेनसारखा आहे ज्यावर ट्रेनच्या खाली असलेल्या गरारीचे दाते चालतात. यामुळे ट्रेन सरळ उंच जातानादेखील मागे सरकत नाही.

टोकियो : ‘ले गई दिल गुडि़या जापान की…’ हे गाणं खूपच जुनं आहे, परंतु जपानवर खूपच सटीकपणे बसतंय. जपानमधील मुली खरोखरंच एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसतात आणि तिथली राजधानी टोकियो अशी जागा आहे जी तुम्ही एकदा तिथे जाताच तिथल्या प्रेमात पडतात. जपानमध्ये अशी काही हॉटेल्स आहेत जी खास कपल्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन बनविली गेली आहेत. या हॉटेल्सना लव्ह हॉटेल्सच्या नावाने ओळखलं जातं. इथे थांबणारी लोक एका तासासाठीदेखील रूम बुक करू शकतात.

टोकियोमध्ये जगातील सर्वात उंच असा स्काइटी मनोरा आहे. या मनोऱ्यात ३१२ मीटरपर्यंत शॉपिंग, रेस्तरां, ऑफिस, अॅक्वेरियम आणि प्लानेटोरियम आहे. ३५० मीटर उंचीवर ऑब्जर्व्हेशन टॉवर आहे, जिथून राजधानी टोकियो आणि आजूबाजूची दृश्यं पाहू शकता.

दुबई : जगातील सर्वात उंच इमारत बुर्जखलीफा दुबईत आहे. दुबईतील जुमेराह बीच जगातील सर्वात सुंदर बीचेसपैकी एक आहे. इथलं सौंदर्य सर्वांना आपलंसं करून टाकतं. दुबई क्रीकदेखील खूपच सुंदर आहे. इथे बोटिंग करण्याची मजा काही वेगळीच आहे.

हाँगकाँग : चीनच्या दक्षिण तटावर बसलेला हा देश कधी झोपतच नाही. इथल्या झगमगत्या इमारती व रस्ते दिवसरात्रीचं अंतर जणू मिटवून टाकतात. इथलं डिस्नेलॅण्ड, क्लॉक टॉवर, डे्रगन्स बॅक टेल व हाँगकाँग म्यूझियम खूपच प्रसिद्ध आहे.

हाँगकाँगची सैर करण्यासाठी क्रूझदेखील घेऊ शकता. हे क्रूझ लायनर एका बाजूने फिरताना फाइव्ह स्टार हॉटेलसारखं दिसून येतं, ज्यामध्ये पर्यटकांच्या गरजेचं सर्व सामान असतं.

मालदीव : इथल्या समुद्रातील खोल निळ्या पाण्यात अंगठ्यांप्रमाणे विखुरलेल्या छोट्या छोट्या बेटांना पाहून मन उल्हासित होतं. ही धरती सौंदर्याच्या बाबतीत निसर्गाच्या अनोख्या जादुईसारखी आहे. कोट्यवधी वर्षांपासून प्रवाळ एकत्रित झाल्याने या बेटांना जेव्हा आपण वरून पाहातो तेव्हा ते हलक्या निळ्या रंगाचे दिसतात आणि पांढऱ्या वाळूचे यांचे किनारे समुद्रात मिसळलेले असे वाटतात.

केरळ : पाण्यात रोमॅण्टिक क्षण घालवायचे असतील तर तुमच्यासाठी केरळचं बॅकवॉटर बेस्ट ऑप्शन आहे. इथे तुम्ही अलपुज्जा, कोल्लम, तिरूवेल्लमसारख्या डेस्टिनेशनची सैर हाउसबोटने करू शकता. केरळच्या बॅकवॉटर्समध्ये ९०० किलोमीटरपेक्षादेखील जास्त क्षेत्राची सैर करू शकता. नदी आणि समुद्राचं पाणी मिळून बॅकवॉटरचा एरिया बनतो. यामुळेच इथे विविध प्रकारची झाडं, हिरव्यागार शेतांबरोबरच मरीन लाइफदेखील जवळून पाहू शकता.

काश्मीर : इथे देवदार आणि पाइनच्या झाडांवरून पडणारे बर्फाचे तुकडे एका नव्या दुनियेत आल्याचा आभास करून देतात. काश्मीरमध्ये फिरण्यासाठी तशाही अनेक जागा आहेत. परंतु गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम, श्रीनगरला फिरल्याशिवाय काश्मीर फिरणं तसं अधुरं आहे. गुलमर्गमध्ये स्कीइंग, गोल्फ कोर्स, जगातील सर्वात उंच केबल कार आणि ट्रेकिंगची सुविधा आहे. पहलगामजवळ अरू व्हॅली, चंदनवाडी आणि बेताबव्हॅली आहे, जिथे अनेक चित्रपटांचं चित्रीकरण करण्यात आलंय.

डलहौजी : ५ डोंगर कठलाँग, पोटेन, तेहरा, बकरोटा आणि बलूनवर स्थित हे पर्वतीय स्थळ हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आहे. तसंही डलहौजी शहर हे वर्षभर बर्फाचे नवनवीन थर ओढणाऱ्या धौलाधार पर्वताच्या समोरच वसलंय. चहूबाजूंनी विखुरलेल्या नैसर्गिक सौंदर्यात दूरदूरपर्यंत शांत वातावरणात फिरू शकता. मोठ्या सुट्टीवर जाणारे तसंच एकांतप्रिय लोक इथे मोठ्या संख्येने येतात.

अंदमाननिकोबार द्वीप : तुम्हाला जर तुमच्या जोडीदारासोबत गडबड-गोंगाटापासून दूर एकांतात शांतपणे वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी खूपच छान आहे. तुमच्यासाठी या ठिकाणापेक्षा दुसरं कोणतंही रोमॅण्टिक ठिकाण असूच शकत नाही.

अंदमान आणि निकोबार समुद्रकिनारें आणि स्कूबा डायव्हिंगबरोबरच इथल्या घनदाट जंगलात आढळणारे विविध पक्षी आणि सुंदर फुलांसाठीदेखील हे स्थळ प्रसिद्ध आहे. हे पाहाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

कौसानी : कौसानीला भारताचं स्वित्झर्लंडदेखील म्हटलं जातं. महात्मा गांधी म्हणाले होते की कौसानी धरतीचा स्वर्ग आहे. बर्फाने झाकलेल्या कळसांनी झाकलेलं कौसानी सूर्योदय व सूर्यास्तासाठीच्या अद्भूत दृश्यांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. इथून चौखंभा, त्रिशूल, नंदादेवी, पंचचूली व नंदाकोटसहित इतर पर्वतांचे कळसदेखील सहज दिसतात.

दार्जिलिंग : दार्जिलिंग हे एक सुंदर रोमॅण्टिक स्थळ म्हणून ओळखलं जातं. इथल्या मनोहारी घाटी तुमच्या हनीमूनला अधिक द्विगुणित करतात.

दार्जिलिंगला पहाडांची राणीदेखील म्हटलं जातं. इथे बर्फांनी झालेल्या दऱ्या आहेत. झुळुझुळू वाहाणाऱ्या नद्या, देवदारची झाडं आणि सोबतच नैसर्गिक दृश्यं मन मोहून टाकतात. येथील सौंदर्य पाहून वाटतं की निसर्गाने जणू आपलं सर्व सौंदर्य इथेच विखुरलंय..

दार्जिलिंगमध्ये सर्वात मनोवेधक दृश्य म्हणजे व्हिटोरिया झरा जो सर्वांचं मन मोहून टाकतो. याव्यतिरिक्त सँथल सरोवर, रॉक गार्डनचं सौंदर्य पाहून लोक अक्षरश: थक्क होऊन जातात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें