खूप कामाची खेळणी

* शैलेंद्र सिंह

मुलांच्या विकासात खेळणी महत्त्वाची भूमिका बजावतात, फक्त योग्य वयातच मुलांना योग्य खेळणी देणे गरजेचे आहे. खेळणी अशी असावीत की, त्यांच्यासोबत खेळताना मुलं पूर्णपणे खेळात मग्न होतील आणि खेळता खेळता त्यांचा व्यक्तिमत्व विकासही शिकतील.

रिमोट आणि बॅटरीसह खेळण्यांऐवजी, ती खेळणी शिकण्यास मदत करतात ज्यांच्यासोबत मुले स्वत: खेळतात. अशी अनेक खेळणी आहेत जी स्वस्त असूनही मुलांसाठी खूप उपयक्त आहेत. खेळण्यांच्या किंमतीला पालकांनी स्टेटस सिम्बॉल बनवू नये. ती मुलांसाठी किती उपयुक्त आहेत आणि मुलांना किती आवडतात, हे पाहावे.

जेव्हा आपण मुलांना समजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांचे न बोललेले शब्द आणि मनही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपला प्रयत्न कसेबसे त्यांच्या जगात पोहोचण्याचा असतो. ते जग जिथे त्यांना माचिसची पेटी विमानासारखी दिसते, जिथे अनेक मोठी स्वप्ने छोटया छोटया खेळण्यांनी सजलेली असतात आणि मूलं तासनतास स्वत:शीच बोलत असतात. कधी वाहनांच्या चाकांनी तर कधी माचिसच्या काठीने राजवाडा बांधतात. खेळणी तुटल्यावर तासनतास अश्रू ढाळणे किंवा नवीन खेळणी मिळाल्यावर खजिना सापडल्यासारखा आनंद व्यक्त करणे, असे ते निरागस जग असते.

भविष्यातील विकासाचा पाया

खेळण्यांच्या आठवणीशिवाय बालपण काय आहे? पण तुम्हाला माहीत आहे का, की खेळण्यांसोबत खेळणे हे केवळ एक मनोरंजन नसून तो उज्ज्वल भविष्याच्या विकासाचा पाया असतो. क्रीडाविषयक खेळण्यांमधून आपण आत्म-जागरूकता, इतरांशी आत्म-संबंध, आत्म-विकास आणि स्वत:ची अभिव्यक्ती अशा अनेक गोष्टी शिकतो, जे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप महत्वाचे आहे.

बाल, किशोर आणि पालक हाताळणी तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ डॉ. सोनल गुप्ता सांगतात की, अनेकदा मुले खेळण्यांद्वारे अशा गोष्टी सांगू शकतात, ज्या ते त्यांच्या पालकांना सांगू शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत खेळण्यात थोडा वेळ घालवणे आणि त्यांच्या जगाचा एक भाग बनणे महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेतून मानसशास्त्रज्ञ ‘प्ले थेरपी’द्वारे मुलांच्या जगात प्रवेश करतात आणि त्यांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

महाग खेळणी आवश्यक नाहीत

सर्वसाधारणपणे पालकांना वाटते की, मुलांना महागडी खेळणी जास्त आवडतील. हे पूर्ण सत्य नाही. अनेकदा असे दिसून येते की, मुले स्वस्त खेळण्यांकडे जास्त आकर्षित होतात. मुलांची खेळणी खरेदी करताना त्यांच्या प्राधान्यांकडे लक्ष द्या. वयानुसार त्यांना काय शिकवले पाहिजे हे लक्षात घेऊन खेळणी खरेदी करा.

खेळणी हा मुलांच्या आयुष्यातील सर्वात गोड अनुभव असतो, पण ती खेळणी महागडीच असतील असे नाही. खेळण्यांमुळे विकासाऐवजी मुलांच्या हट्टीपणाची आणि अहंकाराची दारं उघडणार नाहीत याची काळजी घ्या. खेळणी ही मुलांच्या कल्पनाशक्तीचे प्रतीक असतात, मग ती कागदाची बोट असो किंवा कोरड्या लाकडापासून बनवलेले तसेच आधुनिक विज्ञानाने परिपक्व झालेले आकाशात उडणारे जहाज असो. गरजेचे हे असते की, त्यांच्या या कल्पनेच्या शहरात तुम्हाला जागा आहे का?

खेळणी मुलांची आवड प्रकट करतात

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नेहा आनंद सांगतात की, लहान मूल जेव्हा खेळण्यांसोबत खेळते तेव्हा आपल्याला त्याच्या स्वभावाची माहिती होते. बऱ्याचदा याचवेळी हे स्पष्ट होते की, मुलाचा कल कोणत्या दिशेने आहे. क्रिकेट खेळण्याची आवड असणारा मुलगा क्रिकेटपटू कसा बनतो, हे लक्षात घ्यायला हवे. खेळण्यांशी खेळण्याच्या पद्धतीवरून मुलाचे वागणे दिसून येते. अनेक मुलं खेळताना अशी रागीट कृत्ये करतात, ज्यातून त्यांचा रागीट स्वभाव समजून घेऊन तो दूर करता येतो.

मुले जेव्हा चेंडू पकडण्याचा खेळ खेळतात तेव्हा हा खेळ सोपा दिसतो. वास्तविक, चेंडू पकडण्याच्या खेळात केवळ शारीरिक व्यायामच नाही तर मानसिक व्यायामाचाही समावेश होतो. मुलांमध्ये एकाग्रता वाढते. यासोबतच त्यांना चेंडूच्या वेगाचा अंदाज येतो. मुलांकडून कागद फाडणे, पेन्सिलने भिंतीवर लिहिणे, याला पालक मुलांची वाईट वागणूक समजतात. खरंतर, हा देखील मुलांसाठी एक खेळ आहे, ज्याद्वारे ती अनेक गोष्टी शिकतात. पालकांनीही लहान मुलांसोबत खेळण्यासाठी वेळ दिला तर त्याचा मुलांच्या विकासात खूप उपयोग होईल.

खेळणी ही मुलांना रमवून ठेवण्याचे साधन नाही

बहुतेक पालकांना असे वाटते की, खेळणी ही मुलांना रमवून किंवा कशात तरी गुंतवून ठेवण्याचे साधन आहे. त्यामुळे मुलांसाठी सर्वात महाग आणि सर्वोत्तम खेळणी खरेदी करतात, परंतु ती त्याच्या विकासात मदत करत नाहीत. पालकांच्या या वागण्यामुळे मुलाला हट्टपणा करण्याची सवय लागते. तो स्वत:साठी खेळणी खरेदी करण्याचा आग्रह धरतो.

एखादे मूल रिमोट-नियंत्रित हेलिकॉप्टरशी खेळत असेल तर त्याला रिमोटची बटणेच दाबावी लागतील. त्याला असे वाटेल की, बटण दाबल्याने विमान उडते. जर एखाद्याने सामान्य विमान उडवले तर त्याला त्याच्या चाकांच्या आणि पंखांच्या गरजांची जाणीव असेल. विमान उड्डाण करण्यासाठी सपाट रस्ताही आवश्यक आहे हे त्याला माहीत असेल. यामुळेच मुलांना रिमोटच्या खेळण्यांऐवजी सामान्य खेळण्यांनी जास्त शिकवता येते.

आजच्या काळात मूल जेव्हा कधी रडते तेव्हा आई तिचा मोबाईल किंवा घरात ठेवलेला कोणताही मोबाईल त्याच्या हातात देते. मूल त्याच्याशी खेळू लागते. हळूहळू त्याला त्याची सवय होते. या निळ्या पडद्याच्या व्यसनाचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नेहा आनंद सांगतात. केवळ दिखाव्यासाठी पालक मुलांना महागडे फोन देतात. जसजशी स्क्रीन मोठी होते तसतसा त्याचा प्रभाव वाढत जातो. पालकांनी मुलांना खेळण्यांऐवजी मोबाईल देऊ नये. त्याचा वाईट प्रभाव मुलांच्या मनावर दीर्घकाळ राहातो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें