धर्म फूट पाडा राज्य करा

* हरिदत्त शर्मा

जर लोकांमध्ये भय आणि घृणेच विष भरलं तर त्यांना सहजपणे संघटित करता येतं. याचा नमुना आपण ३० वर्षांपासून पाहत आहोत. घृणा पसरविण्यासारख्या कार्यासाठी धर्मच सर्वाधिक सुलभ आणि स्वस्त विष आहे. ज्याचा वापर वर्षानुवर्षे शासक वर्ग आणि धार्मिक गुरु करत आले आहेत.

मतांच्या राजकारणासाठी धर्मरूपी विषाचा वापर जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष कोणत्या ना कोणत्या रूपात करत आहेत. भारतीय जनता पार्टीचं पाहून काँग्रेस, समाजवादी, तृणमूल काँग्रेस इत्यादी भयभीत लोकांप्रती सहानुभूती दाखवून त्यांची मतं आपल्या पक्षासाठी पक्की करून घेण्याच्या मागे जुटलेली आहेत. आता मुसलमानांना देशद्रोही सिद्ध करून हिंदूंची मतं स्वत:च्या बाजूने करून घेऊ इच्छितात. लोकांचा विकास आणि त्यांच्या समस्या सोडविण्याची चिंता कोणालाही नाही आहे. सर्व पक्ष ‘फूट टाका आणि राज्य करा’च्या सिद्धांताचा पुरेपूर फायदा घेण्यात जुंपलेले आहेत.

लोकसभेमध्ये चालणारे वादविवाद सामान्य जनतेला असा संकेत देत आहेत की धर्माच्या आड सत्तेला कसं बनवता येईल वा सत्तेला कसं मिळवता येईल. आता तर कोणत्याही पक्षाला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधुत्व व्हावं असं वाटतच नाही.

धर्माच्या नावावर विभागले जातात

नेते वा धर्मगुरूंची रोजीरोटी याच गोष्टीवर निर्भर करते की लोक धर्माच्या नावावर विभागत आहेत. खरंतर वर्षानुवर्षे असंच होत आहे. फोडा आणि राज्य करा. धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर लोकांना अगदी सरळपणे विभागलं जाऊ शकतं. पूर्ण जातीला संघटित ठेवण्यात देखील या धर्मरूपी विषाचाच उपयोग केला जातो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या धर्म विषयाच्या आधारे स्वत:च अस्तित्व राखून आहेत. पश्चिमी आशियातील सर्व हुकूमशाहा अशा युक्तीचा वापर करूनच स्वत:ची सत्ता राखण्यात यशस्वी झाले आहेत.

धर्माच्या आड लाखो निरपराध लोकांना तुरुंगात  टाकणं आणि निरपराध लोकांवरती बॉम्ब वर्षाव करण्याला पुण्याचं कार्य म्हटलं जातं. सामाजिक वाईट गोष्टींना उचित मान देऊन त्यांचा सन्मान केला जाऊ लागला आहे.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात मास्कोच्या ऑर्थोडॉक्स चर्चचा खूप मोठा हात आहे. जे रशियाच्या आक्रमणाला होली म्हणतात. आपल्या पूर्वग्रहांना सोडून एकदा मोकळेपणे आणि शांतपणे विचार कराल तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होईल की धर्म हा जगतातील सर्वात मोठा रोग आहे.

हजारो वर्षापासून लोकं धर्माच्या नावावर मारझोड करत आले आहेत. असं मानलं जातं की गेल्या ३ हजार वर्षांपासून जीदेखील १५,००० पेक्षा अधिक मोठी युद्ध लढली गेली ती प्रामुख्याने धर्माच्या नावावरतीच होती. धर्म रक्षेच्या नावावर, धर्म वाचविण्याच्या नावावर वा धर्म पसरविण्याच्या नावावरदेखील होती.

घटनांमागे कोण

ईसाई पूर्व फैलावाच्या दरम्यान धर्मगुरूंच्या मनात देखील हाच विचार निर्माण झाला होता की धर्माच्या नावावरदेखील युद्ध लढली जाऊ शकतात व युद्धदेखील धार्मिक होऊ शकतात. मग इस्लाम व इतर धर्मांनीदेखील त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. ज्यामुळे जगात अशी युद्ध होऊ लागली. ज्यांना धर्मयुद्ध म्हटलं गेलं.

धर्मगुरूंनी लोकांच्या मनात ही गोष्ट ठसवली की मातृभूमीचं रक्षण करताना जी माणसं स्वत:चे प्राण गमावतात त्यांना सरळ स्वर्गवास मिळतो. रामायण आणि महाभारताच्या युद्धांना या धर्मग्रंथांच्या कल्पित कथांमध्ये धर्मयुद्धच म्हटलं गेलं होतं. जवळजवळ सर्व घटनांमागे कोणता ना कोणता धर्मगुरु उभा राहिला आहे.

शासक वर्गाने स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी धर्मगुरूंच्या मदतीने धर्माचा सर्वात जास्त दुरुपयोग केला आहे. धर्मगुरूंनीदेखील आपली आजीविका व शक्ती कायम राखण्यासाठी शासक वर्गाला पूर्णपणे साथ दिली आणि धर्माच्या आड सामान्य जनतेला मूर्ख बनवलं.

सत्य तर हे आहे की कोणतीही व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध फक्त यासाठी आहेत कारण त्यांचे आई-वडील तो धर्म मानत आहेत. हिंदुत्व काय आहे हे अनेक हिंदूंनाच माहीत नाही. माणुसकी काय आहे हे कोणाला माहित नाही. ख्रिश्चन काय आहे हे ख्रिश्चनांनादेखील माहित नाही. इस्लाम काय आहे हे तर कितीतरी मुसलमानांना माहिती नाही. जसे धार्मिक संस्कार त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळाले आहेत तेच ते पुढे चालवत आहेत.

तसं तर संसारातील सर्व धर्म सत्य, अहिंसा, प्रेम, सहनशीलता व बंधुत्वाचा संदेश देताना दिसतात. परंतु संपूर्ण जगतात धर्माच्या नावावरती हिंसा, आतंकवाद व युद्ध चालली आहेत. एक धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायींना आपल्या शत्रू मानत आहेत आणि त्यांच्या हत्या करण्याला देखील धर्माचं कार्य मानत आहेत.

दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळांना पाडणं व जाळणं केवळ हीच लोकं करत आहे जी स्वत:चं स्वत:च अस्तित्व व धर्माचे सच्चे अनुयायी मानत आहेत. नास्तीक लोक अशा कार्यांपासून दूर राहतात. आस्तिक लोकं धर्मयुद्ध, जिहाद वा उग्रवादसारख्या घृणीत कार्यांमध्ये सहभागी होतात. जो अस्तिक एखाद्या कारणाने दुसऱ्या धर्माच्या स्थानाला नष्ट करू शकत नाही त्याला दोष देत राहतात.

परंतु मजेची बाब ही आहे की ज्या गोष्टींना लोकं धर्म मानत आहेत ते मनुष्यांना मनुष्यापासून तोडण्याचं काम करत आहेत, जोडण्याचं नाही. जो धर्म माणसाला माणसाशी जोडू शकत नाही, तो माणूस ईश्वराला कसा काय जोडू शकतो?

काल्पनिक कथा

सर्वधर्म आस्था, अंधश्रद्धा व खोटया चमत्कारांच्या आधारे चालत आहे. सर्वधर्मांनी आपल्या धर्मातील देवीदेवतांसोबत अनेक प्रकारच्या चमत्कारांच्या कथा जोडलेल्या आहेत. सर्वधर्म हे आश्वासनदेखील देतात की जो देखील त्यांच्या धर्माला मानेल त्याच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतील आणि मृत्यूनंतर देखील सरळ स्वर्गात स्थान मिळेल. या जन्माच्या चक्रामधून त्यांना मुक्ती मिळेल.

हे देखील सत्य आहे की सामान्य जनतादेखील सर्वधर्मांच्या चमत्कारांची अपेक्षा करते आणि त्या चमत्कारांना पाहण्याच्या इच्छेमुळे अंधश्रद्धामध्ये बदलते. प्रत्येक धर्माच्या चमत्कारांच्या कथा आहेत. ज्यांचा कोणताही तार्कीक आधार नाही. ते फक्त धर्माच्या पुस्तकांमध्येच आहे.

धर्मगुरु लोकांना कायमच शिकवण देतात की जोपर्यंत तुम्ही धर्माच्या गोष्टीवर श्रद्धा ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वर कधीच मिळू शकत नाही. अशा धार्मिक विचार शून्यतेमुळेच धार्मिक व्यक्ती अनेकदा अंधश्रद्धाळू बनते आणि धर्माच्या नावावर आपल्या जीवनाचं बलिदान करायला देखील तयार होते. अशा ईश्वराला मिळवून तुम्ही काय करणार हे समजण्याची चिंता धर्मगुरू करत नाहीत. कारण त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं आहे की ईश्वर भेटल्यावर त्याच्याजवळ पैसा, सोनं, भरपूर खाणं, आरोग्य आपोआप मिळेल.

एक मोठा व्यापार आहे धर्म

धर्म जगातील सर्वात मोठा व्यापार आहे, ज्यामध्ये लोकांना नरकाचं भय व स्वर्गाचा लोभ दाखवून तसंच मोक्षाच्या नावावर भटब्राह्मण अनेक प्रकारे लोकांना फसवत असतात. धर्म फक्त तिथेच असतो जो एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी जोडला जावा, ना ही तोडला जावा. जेव्हादेखील एखादी व्यक्ती आपल्यावर विशेष धर्माचा लेबल लावू लागते तेव्हा ती दुसऱ्या धर्माच्या लोकांना आपला शत्रू मानू लागते. आणि त्यांच्या धर्मस्थळांच नुकसान करून एक विशेष सुख अनुभवू लागते. आपल्या पूर्वग्रहांनुसार त्याला एक पुण्याचा कार्य मानू लागते.

हे काम आज देशाचे संविधान करत आहे. ते सामान्य लोकांच्या अधिकारांचे रक्षण करत आहे. धर्म आणि सरकारच्या आतंकवादी लोकांना वाचविण्याचा प्रयास करत आहे. धर्मगुरू आता प्रत्येक संविधानाच्या मागे पडले आहेत. भारताचे संविधानाचे रक्षक राम मंदिरसारख्या अतार्कीक निर्णय संविधानाच्या नावावर धर्माच्या रक्षणासाठी देतात आणि अमेरिकेत स्त्रियांना गुलामीत ढकलण्याचा निर्णय देतात.

सक्षम, चतुर धर्माच्या आधारे स्वत:चं जीवन सुखी बनविण्यासाठी सर्व धर्म स्त्रिया आणि गरीबांना गुलामीच्या सीमेपर्यंत ठेवतात. कारण धर्मगुरूंचा फायदा यामध्येच तर आहे.

धर्म असो किंवा सत्ता निशाण्यावर महिला का?

* नसीम अंसारी कोचर

अफगाणिस्तानमध्ये धार्मिक आणि राजकीय लढाई सुरू आहे. मुळात त्याचा धर्म इस्लाम आहे. कट्टरतावादी तालिबान हे शरिया कायद्याचे खंदे समर्थक आहेत. ते माणसाच्या कपडयांपासून ते त्याच्या वर्तनापर्यंत सर्वांवर स्वत:च्या कायद्याचे वर्चस्व गाजवू पाहातात. ते पुरुषाला दाढी, टोपी आणि स्त्रीला हिजाब घालायला भाग पाडतात. महिलांबद्दलचे त्यांचे विचार अत्यंत बुरसटलेले असतात.

तालिबान महिलांकडे फक्त सेक्सचे खेळणे म्हणून पाहातात. त्यामुळेच सुशिक्षित, नोकरदार आणि प्रगतीची ओढ असलेल्या अफगाण महिलांमध्ये निजाम बदलल्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांना माहीत आहे की, तालिबान भलेही असे सांगत असले की, ते महिलांचे शिक्षण आणि नोकरीवर गदा येऊ देणार नाहीत, तरीही जेव्हा संपूर्ण अफगाणिस्तान त्यांच्या ताब्यात येईल आणि तालिबानची सत्ता स्थापन होईल तेव्हा सर्वप्रथम महिलांची स्थिती बिकट होणार आहे. त्यांना पुन्हा एकदा आपली नोकरी आणि अभ्यास सोडून आपल्या घरात कैद व्हावे लागेल. स्वत:ला हिजाबमध्ये लपेटून शरिया कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

यावेळी अफगाण गायक, चित्रपट निर्माते, अभिनेत्री, नृत्यांगना, खेळाडू हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. तालिबानचा ताबा घेतल्यापासून मोठया संख्येने कलाकार अफगाणिस्तान सोडून गेले आहेत. त्याचे कारण म्हणजे तालिबानने त्यांना शरिया कायद्यानुसार त्यांच्या व्यवसायाचे मूल्यमापन करून व्यवसाय बदलण्याचे फर्मान सोडले आहे.

त्यांनी आज्ञा न पाळल्यास ते गोळयांचे लक्ष्य होतील, कारण तालिबान त्यांचा औदार्याचा मुखवटा त्यांच्या चेहऱ्यावर फार काळ ठेवू शकत नाहीत. अमेरिकन सैन्य पूर्णपणे माघारी फिरल्यानंतर ते त्यांचा खरे रंग दाखवतील.

आता फक्त आठवणी

ज्या अफगाणी महिला ६०च्या दशकात किशोरावस्थेत होत्या किंवा तारुण्याच्या उंबरठयावर पाय ठेवणार होत्या त्या आता वृद्ध झाल्या आहेत, मात्र त्यावेळच्या अफगाणिस्तानची आठवण येताच त्यांच्या डोळयात चमक येते. सुरुवातीला ब्रिटनची संस्कृती आणि नंतर रुसी संस्कृतीच्या प्रभावामुळे ६०व्या दशकात अफगाणी महिलांचे आयुष्य खूपच ग्लॅमरस होते.

आज जिथे त्या बुरख्याशिवय बाहेर पडू शकत नाहीत त्या अफगाणच्या जमिनीवर एकेकाळी फॅशन शोचे आयोजन होत असे. महिला शॉर्ट स्कर्ट, बेलबॉटम, मिडी, लाँग स्कर्ट, शॉर्ट पॅन्टसारख्या कपडयांवर रंगीत स्कार्फ आणि मफलर घालत. उंच टाचांच्या चपला घालत. स्टाईलमध्ये केस कापत. बिनधास्तपणे पुरुषांसोबत सर्वत्र फिरत. क्लब, खेळ, सहलीचा आनंद घेत.

काबूलच्या रस्त्यांवर दिसणारी अफगाणी महिलांची फॅशनेबल स्टाईल हॉलिवूडच्या अभिनेत्रींनपेक्षा कमी नव्हती. उच्च शिक्षण घेऊन त्या मोठया हुद्द्यावर काम करत. १९६० पासून १९८०च्या दरम्यानचे फोटो पाहिल्यास अफगाणिस्तानमध्ये महिला किती स्वच्छंद आणि स्वतंत्र होत्या, हे लक्षात येईल. फॅशनसह सर्वच क्षेत्रात त्या अग्रेसर होत्या. तेव्हाच्या काबूलचे फोटो पाहून असा आभास होतो की, तुम्ही लंडन किंवा पॅरिसचे जुने फोटो पाहात आहात.

फोटोग्राफर मोहम्मद कय्यूमींचे फोटो त्या काळच्या वास्तवाची झलक दाखवतात. वैद्यकीय असो किंवा हवाई क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात अफगाणी महिलांनी स्वत:चा ठसा उमटवला होता. १९५०च्या आसपास अफगाणी मुले-मुली विद्यापीठ आणि चित्रपटगृहातही एकत्र फिरायची, मौजमस्ती करायची. अफगाणी महिलांचे आयुष्यही खूपच आनंदी होते.

प्रत्येक क्षेत्रात होत्या अग्रेसर

त्याकाळी अफगाण समाजात महिलांची भूमिका महत्वपूर्ण होती. शिक्षण, नोकरी, अशा प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत होत्या. १९७०च्या दशकाच्या मधल्या काळात अफगाणिस्तानच्या तंत्रज्ञानाच्या संस्थांमध्ये महिला असणे, ही सर्वसामान्य बाब होती. काबूलच्या पॉलिटेक्निक विद्यापीठात सर्व अफगाणी मुली पुरुषांसोबत शिक्षण घेऊ शकत होत्या. १९७९ पासून १९८९ पर्यंत अफगाणिस्तानातील सोव्हिएतच्या हस्तक्षेपादरम्यान अनेक सोव्हिएत शिक्षक अफगाणच्या विद्यापीठात शिकवायचे. तेव्हा महिलांवर तोंड झाकण्याची बंधने लादलेली नव्हती. त्या त्यांच्या पुरुष मित्रांसोबत काबूलच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरायच्या.

मात्र १९९० च्या दशकात तालिबानी प्रभाव वाढल्यानंतर महिलांना बुरखा घालण्याची ताकीद देण्यात आली. त्यांच्या घराबाहेर पडण्यावरही निर्बंध आले.

अफगाणिस्तान असो किंवा भारत, धर्माने सर्वात जास्त नुकसान महिलांचेच केले. सर्वात जास्त अन्याय महिलांवर केला. गुलामगिरीच्या शृंखलेत सर्वात जास्त महिलाच जखडल्या गेल्या. जर एखादा पुरुष धर्माच्या हातून मारला गेला तर त्याचे परिणाम भोगायची वेळही महिलांवर आली. एक पुरुष मेल्यावर कमीत कमी ४ महिलांना त्रास सहन करावा लागतो आणि तो आयुष्यभर सहन करतच कसेबसे जगावे लागते. ती त्या पुरुषाची आई, बहीण, पत्नी आणि मुलगी असते. धर्म हा महिलांचा सर्वात मोठा शत्रू आहे. धर्माच्या शृंखला तोडून टाकण्याचा निर्णय महिलांनाच घ्यावा लागणार आहे. ती हिंमत त्यांच्यात कधी निर्माण होईल, हे सध्या तरी सांगणे अवघड आहे.

धर्म हा एक बहाणा आहे

आता अफगाणिस्तानमध्ये इस्लाम आणि भारतात हिंदुत्व आपली पकड मजबूत करत आहे. दोघांमध्ये फारसा फरक नाही. ते इस्लामच्या नावावर तर हे हिंदुत्वाच्या नावावर मारहाण करतात. धर्माचे ठेकेदार अफगाणिस्तानमध्ये असोत किंवा हिंदुस्तानात, ते सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या मर्जीनुसार वागवतात आणि त्यांच्या हातून हा गुन्हा घडवून आणतात. सत्तेची भाषा वापरून महिलांना अपमानित केले जाते.

इतके निराश का?

प्रियंका गांधी निवडणूक काळात प्रचारासाठी मैदानात उतरतात तेव्हा त्यांच्या कपडयांपासून ते दिसण्यापर्यंत राजकारणी टिकाटिप्पणी करतात. प्रियंकाला पाहून असे अनेकदा बोलले गेले की, सुंदर महिला राजकारणात काय करू शकणार? अशाच प्रकारे शरद यादव यांनी वसुंधरा राजेंवर केलेली टिका लक्षात असेलच. ते त्यांच्या लठ्ठपणावर खोचकपणे बोलले होते की, वसुंधरा राजे लठ्ठ झाल्या आहेत. त्यांना आरामाची गरज आहे.

महिलांसंबंधी असे बेताल बोलणाऱ्यांना धर्माचे फळ कधीच मिळत नाही. धर्माचे ठेकेदार अशा बोलण्यावर हसतात आणि सत्तेवर बसलेले अशा लोकांना प्रोत्साहन देतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सत्तेची ताकद प्राप्त करणाऱ्या महिलाही महिलांबद्दल असे हीन वक्तव्य करणाऱ्यांचा विरोध करण्याची किंवा त्यांना फटकारण्याची हिंमत दाखवत नाहीत.

धर्मावर होते पैशांची उधळपट्टी

* मोनिका अग्रवाल

राधेराधे… राधेराधे… राधेराधे… जय श्रीराम… जय श्रीराम… जय श्रीराम… रमाकांत पूर्ण श्रद्धेसह भक्तीत लीन झाले होते. सोबत घरातली मंडळी घंटा वाजवत होती. या आवाजामुळे मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. तो सतत जाऊन आईला सांगत होता, ‘‘आई, कृपा करून बाबांना सांग की, सर्वांना थोडया हळू आवाजात पूजा करायला लावा. उद्या माझा बोर्डाचा पेपर आहे आणि आवाजामुळे मी नीट अभ्यास करू शकत नाही.’’

त्याचे बोलणे रमाकांत यांनी ऐकले आणि रागाने म्हणाले, ‘‘ही काय अभ्यासाची वेळ आहे? उद्या परीक्षा असेल तर तुला आज देवासमोर नतमस्तक होऊन बसायला हवे.’’

बोला जय सीताराम… जय जय सीताराम… असे म्हणत ते बायकोवरच रागावले. अक्कल नाही का तुला? इथे महाराज पूजा करत आहेत आणि तू मुलामध्ये वेळ का घालवतेस? मूर्ख बाई… जा, सर्वांसाठी गरमागरम दूध आण. बिचारी, ‘हो’ असे म्हणत आत गेली.

प्रसाद तयार झाला का? महाराजांच्या सेवेत काही कमतरता नको. जितकी मनोभावे सेवा करशील तितकाच मेवा मिळेल… आपले अहोभाग्य म्हणून महाराज आपल्या घरी आलेत… किती जणांनी त्यांना आमंत्रण दिले असेल…  पण ते मात्र आपल्याकडेच आले. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्यांच्यामुळेच, असे अधूनमधून सासू मोठयाने बोलत होती.

महाराजांच्या सेवेत संपूर्ण दिवस आणि अर्धी रात्र निघून जायची. झोपायला कसेबसे २ तास मिळायचे, मात्र तितक्यातच ४ वाजायचे आणि सासू आवाज द्यायची की, महाराजांच्या अंघोळीची वेळ झाली… तयारी केलीस का…? ६ वाजता त्यांना फेरफटका मारायला जायचे असेल… लक्षात आहे ना तुझ्या? सर्वात आधी उठून अंघोळ कर.

असे दरवर्षी व्हायचे. या घरी आली आल्यापासून हेच बघत आली होती. एखाद्या गरीब, गरजूने विनवणी करूनही त्याला घरातले कोणी साधे १० रुपये देत नसत, पण महाराज, बाबा-बुवांवर लाखो रुपये खर्च केले जात, याचे तिला दु:ख व्हायचे. ती लग्न करून आली तेव्हा सुरुवातीला फक्त एकच महाराज येत असत. तेही फक्त २ किंवा ३ तासांसाठी, पण हळूहळू नवऱ्याचा बाबा-बुवा, महाराजांवरील विश्वास वाढला. त्यातच उत्पन्नही वाढले आणि एका महाराजासोबत आणखी दोघे येऊ लागले. आता तर महाराज त्यांची पत्नी आणि सोबत ११ माणसांना घेऊन येतात. एकाचा पाहुणचार करणे सोपे होते, आता एवढ्या सर्वांची उठबस करावी लागते. त्यातच शेजारी, नातेवाईक महाराजांना भेटायला येतात आणि काम करणारी ती फक्त एकटीच असते.

नुकतीच घडलेली गोष्ट आहे जेव्हा शेजाऱ्यांकडे साक्षी गोपाळ महाराज आले होते. कितीतरी दिवस सकाळ-संध्याकाळी त्यांचे प्रवचन आणि पहाटेच्या प्रभात फेरीमुळे शेजाऱ्यांकडे वेळच उरला नव्हता. त्यांना व्यवसाय वाढवायचा होता आणि त्यासाठीच महाराजांची सेवा करायची होती.

ही कसली अंधश्रद्धा?

विश्वास किंवा श्रद्धा त्यांच्या स्थानी असते, पण अंधविश्वास हा आकलनापलीकडचा विषय आहे. हा कसला अंधविश्वास जो तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे दु:ख समजू देत नाही? लहानसहान गोष्टींसाठी बाबाबुवा, महाराजांकडे धाव घेणारे लोक पाहून माझे रक्त उसळते.

जसजशी आपण जागतिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, तशी लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढत आहे. संपूर्ण जगात अंधश्रद्धेच्या बाबतीत भारतीय आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ज्या देशाने उपग्रहासारखे वैज्ञानिक शोध लावले तोच आधुनिक भारत अंधश्रद्धेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

दान कशासाठी?

अनेकदा, नुकसानाच्या भीतीने, पुण्य कमावण्यासाठी किंवा नवस करताना अथवा तो पूर्ण झाल्याच्या मोबदल्यात दान दिले जाते. काही वेळा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वायफळ उपाय सांगितले जातात. दानाचे विविध प्रकार असतात. धर्मगुरू, धार्मिक संस्था अशाच प्रकारचे दान गोळा करतात. राजकीय पक्ष निधीसाठी ज्या प्रकारे देणग्या गोळा करतात अगदी त्याच पद्धतीने हे दान गोळा केले जाते.

प्रत्यक्षात भक्त किंवा श्रद्धाळू भलेही गरीब किंवा कफल्लक असतील, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्मकांडाच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले जातातच. प्रायश्चित्त करणे, ग्रहदशा सुधारणे, दुर्भाग्य दूर करणे, अशा अनेक समस्या सोडवण्याच्या नावाखाली मोठी दक्षिणा उकळली जाते, पण ज्या धर्माला पुढे करून देवाच्या नावाखाली लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात त्याच देवाला किंवा धर्माला पुजारी, महाराज का घाबरत नाहीत, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

दिखाऊपणाचा फायदा कोणाला?

उदाहरण : एक निर्यातदार आहेत ज्यांना सर्व प्रकारचे छंद आहेत. तरीही वर्षातून दोनदा ते श्रीकृष्णाच्या वृंदावनात जाऊन भंडारा घालतात. कमाईतील एक भाग देवाला दिल्यामुळे जीवनात कुठलीच अडचण येणार नाही आणि दान केल्यामुळे नावलौकिकही होईल, असे त्यांना वाटते. त्यांच्या घरातील महिलाही सतत पूजा करतात.

मंदिराशिवाय घरातही लोक देवाच्या बऱ्याच मूर्ती ठेवतात आणि त्यांची सकाळ-संध्याकाळ पूजा करतात. महाराजांना प्रवचनासाठी घरी बोलावणे ही अभिमानाची बाब मानली जाते.

गरिबांना संपत्तीची तर श्रीमंतांना प्रसिद्धीची हाव असते. त्यामुळे मंदिरात दगड ठेवले जातात किंवा घरात महाराजांना बोलावले जाते. आता दानधर्मही दिखाऊपणाचे झाले आहे. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी लोक दानधर्म करतात किंवा घरी महाराजांना बोलावले जाते. असेही लोक आहेत जे भरपूर काळा पैसा कमावतात, परंतु पापाला घाबरतात, म्हणून ते सढळ हस्ते दान करतात, जेणेकरून त्यांना भरपूर पुण्य मिळेल. खोटा अभिमान असो किंवा ढोंगीपणा, पण असे अंधश्रद्ध वागणे चुकीचेच आहे.

सुशिक्षितही जबाबदार

भोंदूबाबांची दुकाने सुरू असतील, तर त्यामागचे एक कारण म्हणजे सुशिक्षित लोकही या सापळयात अडकून भरपूर पैसा खर्च करतात. बॉलीवूडही यापासून दूर राहिलेले नाही. कोणतेही दुकान ग्राहक गेल्यावरच चालते. हे पुजाऱ्यांचे दुकान आहे. त्याची भरभराट होत असेल तर यात जितका हात गरिबांचा आहे, तितकाच श्रीमंतांचाही आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, ज्या धर्माच्या, देवाच्या नावाखाली लोक महाराज, पुजाऱ्यांकडे जातात त्याच देवाच्या घरी काम करणाऱ्यांच्या मनात चुकीचे काम करण्याची इच्छा का आणि कशी निर्माण होते?

चुकीच्या मागण्या

उदाहरण : एका जोडप्याला अनेक वर्षांपासून मूल होत नव्हते. यासाठी ते अनेकदा एका भोंदू बाबांकडे जात होते. एके दिवश त्या बाबाने संधीचा फायदा घेऊन सांगितले की, तुझ्या पत्नीला रात्री माझ्याकडे पाठव. नवऱ्याची या बाबावर एवढी आंधळी भक्ती होती की, त्याने स्वत:च पत्नीला बाबाच्या स्वाधीन केले. त्या बाबाने रात्रभर त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुशिक्षित लोक आणि नेत्यांसमोर धर्माचे गुणगान गाणारे हे बाबा, महाराज किंवा तांत्रिक जेव्हा एखादी आक्षेपार्ह मागणी करतात, तेव्हा ते त्यांच्या कानाखाली मारायचे सोडून त्यांची अवैध मागणी पूर्ण करतात.

उदाहरण

उत्तर प्रदेशातील एक बाबा असा दावा करायचा की, तो संधिवात बरा करू शकतो. त्यासाठी तो रुग्णाचे रक्त काढून तांब्याच्या भांडयात टाकायचा आणि नंतर रुग्णाला द्यायचा. एका डॉक्टरची सख्खी बहीण ही डॉक्टर भावाने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून या बाबाकडे उपचारासाठी गेली. त्यानंतर खूप आजारी पडली, कारण तिची हिमोग्लोबिन पातळी २ (सामान्य १५ किंवा १२) झाली. अशी उदाहरणे आपल्याला रोजच पाहायला मिळतात. अनेक डॉक्टर आणि परिचारिकांनी तिचा जीव वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिच्या उपचारांसाठी कुटुंबाला ५ लाख रुपये खर्च करावे लागले. प्रत्यक्षात या आजारावर नित्यनियमाने उपचार केल्यास महिन्याला केवळ एक हजार रुपये खर्च येतो.

तंत्रज्ञान आणि धर्म

* प्रतिनिधी

सध्या तंत्रज्ञानाच्या चालू असलेल्या शिक्षणात खूप पैसा गुंतवला जात आहे आणि याचाच अर्थ असा आहे की 40-50 वर्षांपूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये सिमेंट-विटांनी बनवलेल्या शिक्षणाचा अर्थ आता हरवत चालला आहे. ज्याप्रमाणे नवीन तंत्रज्ञान कारखान्यांतील कामगारांना वाईट पद्धतीने काढून टाकत आहे, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या तरुणांचे भविष्य अधिक अंधकारमय होत आहे.

संगणकावर बसून उच्च शिक्षण घेणारेच आता देश आणि जगावर अधिराज्य गाजवतील, पण हे शिक्षण खूप महागडे आहे आणि सर्वसामान्य घरांना ते शक्य होणार नाही, हे बैजूसारख्या कंपन्यांमध्ये ज्या प्रकारचा पैसा खर्च होत आहे, त्यावरून स्पष्ट होते. परवडते.

यूएसमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की $3000 (सुमारे 18,00,000 लाख रुपये) कमावणाऱ्या 64 कुटुंबांकडे एक स्मार्ट फोन, एकापेक्षा जास्त संगणक वायफाय, ब्रॉडबँड कनेक्शन स्मार्ट टीव्ही आहे. तर $3000 च्या आतील फक्त 16′ कुटुंबांकडे या सुविधा आहेत. याचा अर्थ गरीब पालकांची मुले गरिबीत राहण्यास भाग पडतील कारण ते महागड्या शाळा, महाविद्यालयात जाऊ शकणार नाहीत आणि महागड्या वस्तू विकत घेऊ शकणार नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की ज्यांना कमी तंत्रज्ञान माहित आहे त्यांच्या पगारात गेल्या काही वर्षात 2-3′ वाढ झाली आहे, तर उच्च तंत्रज्ञान जाणणार्‍यांच्या पगारात 20-25′ वाढ झाली आहे.

भारतात ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे कारण इथे भेदभाव हा जन्म आणि जात यांच्याशीही जोडला जातो. कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये ज्याप्रकारे पूर्ण दिवस जाहिराती घेतल्या जातात, त्यावरून तंत्रज्ञानाचे शिक्षण कुठे जाईल, हे कळत नसून अतांत्रिक शिक्षणालाही महत्त्व आल्याचे स्पष्ट होते.

तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचा मोठा परिणाम महिलांच्या शिक्षणावर होत आहे. त्यांना उच्च पदे मिळणे कठीण जात आहे. कारण शिक्षणाचा सगळा खर्च मुलांवर होत आहे, जो अधिक झाला आहे. परिस्थिती अशी आहे की भारतातील फक्त विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये, जिथे तंत्रज्ञानाचा नियम नाही, तिथे फक्त 7′ प्रमुख पदे महिलांकडे आहेत आणि यापैकी जास्त पदे अशा संस्थांमध्ये आहेत जिथे फक्त मुलीच शिकत आहेत.

तंत्रज्ञान केवळ गरीब आणि श्रीमंतांमधील भेदच वाढवत नाही, तर ते श्रीमंतांमधील लैंगिक अंतरदेखील वाढवत आहे. तंत्रज्ञानाने समाज आणि जगाला वाचवायचे आहे, परंतु ते सर्व शक्ती काही वाईट लोकांच्या हातात टाकत आहे. श्रीमंत घरातील मुलं महागडं शिक्षण करून उच्च कमावतील आणि त्यांना हव्या त्या मुलीशी लग्न करतील, पण त्या मुलीवरही ते त्यांच्या मनाप्रमाणे राज्य करतील. घर, कपडे, सुटी, गाडी या लोभापायी बायकांची अवस्था दागिन्यांनी लादलेल्या राजांच्या राण्यांसारखी होईल पण राजाच्या डोळ्यात फक्त सुखाच्या बाहुल्या असतील.

या समस्येचे निराकरण करणे सोपे नाही आणि धर्मामुळे, मुली त्यांच्या नशिबावर अवलंबून असलेल्या या परिस्थितीत भारतात किंवा जगात कोठेही लढू शकणार नाहीत. ती टेक्नो स्लेव्ह राहिल आणि टेक्नो स्लेव्ह्सना काम करायला मिळाल्याबद्दल तिला अभिमान वाटेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें