का गरजेचं आहे करिअर काऊन्सलिंग

* सोमा घोष

मिनूच्या पालकांना तिला डॉक्टर बनवायचं होतं. पालकांच्या सांगण्यावरून तिने मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली, परंतु तिचा स्कोर चांगला नसल्यामुळे कुठेच अॅडमिशन मिळालं नाही. तिच्या पालकांनी तिला पुन्हा मेडिकल प्रवेशाची तयारी करायला सांगितलं. परंतु मिनूने त्यावेळी नकार दिला आणि आता ती बीएससी फायनलमध्ये आहे आणि चांगले गुण मिळवत आहे. तिला संशोधक बनण्याची इच्छा आहे.

अनेकदा पालकांना काही वेगळं वाटत असतं, तर मुलांची इच्छा काही वेगळी असते. खरंतर मनात नसेल तर कोणत्याही विषयात यश मिळत नाही म्हणून बारावीनंतर करिअर काऊन्सलिंग करायला हवं म्हणजे मुलांची इच्छा समजते. परंतु काही हट्टी पालकांचं उत्तर खूपच वेगळं असतं. उदाहरणार्थ, करिअर काऊन्सलिंग काय आहे? ते करणं का गरजेचं आहे? अगोदर तर आपण कधी केलेलं नाही मग आमची मुलगी अभ्यासात मागे आहे का? आम्ही जाणतो की तिला काय शिकायला हवं. अशा हट्टी पालकांना समजावणं खूपच कठीण जातं.

अर्ली करिअर काऊन्सलिंग गरजेचं

याबाबत गेल्या ३० वर्षांपासून विद्यार्थ्यांचं काऊन्सलिंग करणारे करिअर काऊन्सलर तसेच डायरेक्टर डॉक्टर अजित वरवंडकर, ज्यांना या कामासाठी राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला आहे. ते सांगतात, ‘‘मी मुलांचं काऊन्सलिंग इयत्ता दहावी पासूनच सुरू करतो कारण करिअर प्लॅनिंगची योग्य वेळ इयत्ता दहावी हीच असते.

‘‘दहावीनंतर विद्यार्थी विषयाची निवड करतात, ज्यामध्ये ह्युमिनिटीज, कॉमर्स, सायन्स इत्यादी असतात. जर एखाद्या मुलाला मेडिकल वा इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा असेल आणि त्याने कोणता दुसरा विषय घेतला असेल तर त्याला पुढे जाऊन कठीण होतं म्हणून याचं प्लॅनिंग अगोदर पासूनच केल्यास मुलांना योग्य गायडन्स मिळतं.’’

मुलं बारावीत गेल्यावर हे समजायला हवं की त्यांनी आपल्या स्ट्रीमची निवड केली आहे. मोठमोठे करिअर ऑप्शन्स सहा ते सातच असतात. ज्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंट, मेडिसिन, लॉ इत्यादी आहे. परंतु आज भारतात ५ हजार पेक्षा अधिक करिअर ऑप्शन आहेत जे त्यांना माहीत नाहीत, म्हणून मग मुलांनी काळजी करण्याचं कारण नाही.

त्यांना फक्त हे माहीत असायला हवं की त्यांच्यासाठी कोणते करिअर ऑप्शन आहेत, ज्यामध्ये ते अधिक आनंदी राहू शकतात. मुलांना वैज्ञानिकरित्या तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात करिअर ऑप्शनचे निवड करणं योग्य आहे-व्यक्तिमत्व, कार्य कुशलता, व्यवसायिक रुची.

भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत

व्यावसायिक आवडीबद्दल १९५८ साली जॉन हॉलिडे सोशल सायकॉलॉजीस्टने सर्वप्रथम याची ओळख करून दिली होती. त्यांच्या मते व्यक्ती त्या कामाची निवड करतो ज्याबद्दल त्याचं जसं वातावरण आणि काम करणारा असेल, तेव्हा त्याची योग्यता आणि क्षमतेचा विकास लवकर होईल आणि ते आपली कोणतीही समस्या मोकळेपणाने कॉलिंगला सांगण्यास समर्थ होतात.

डॉक्टर अजित वरवंडकर यांच म्हणणं आहे की या तीन गोष्टी मिळून करिअरची निवड सर्वात छान असते. याव्यतिरिक्त १२ वी च्या नंतर तुमचं कौशल्य ओळखणं आणि त्यानुसार अभ्यास वा वोकेशनल ट्रेनिंगदेखील घेतली जाऊ शकते.

प्रत्येकाला इंजीनियरिंग बनण्याची गरज नसते, कारण दरवर्षी आपल्या देशात १७ टक्के पेक्षा देखील अधिक इंजिनियर बनत आहेत, तर केवळ दीड लाख मुलांना जॉब मिळतो. बाकी एकतर पोस्ट ग्रॅज्युएट करत असतात वा मग लाईन बदलून कोणतं दुसरं काम करत आहेत. म्हणून मुलांनी आपली हुशारी अगोदरपासूनच ओळखून पायलट, अॅनिमेशन एक्सपर्ट, रिसर्च इत्यादीमध्येदेखील आपल्या इच्छेनुसार काम करू शकतात, परंतु याची माहिती खूपच कमी मुलांना आणि त्यांच्या पालकांना असते, जे करिअर काऊन्सलिंगला सहजपणे मिळू शकते.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बदल

डॉक्टर अजित सांगतात की, कोविड नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जेवढा बदल गेल्या दोन वर्षांमध्ये आला आहे तेवढाच कोविड नसताना दहा वर्षातदेखील आला नाही. आयटी इंडस्ट्रीमध्ये मुलांना खूप रोजगार मिळाले आहेत. पुढील सर्व नोकऱ्या डिजिटल टेक्नॉलॉजी सोबतच वेगाने प्रयोग करतील. यामध्ये जॉब डिजिटल टेक्नॉलॉजी डेटा अॅनालिसिस आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट अनेबल्ड होतील.

आता डॉक्टर्सनादेखील डिजिटल टेक्नॉलॉजीवरच काम करावं लागणार. आता ६० ते ७० सर्जरी रोबोट्स करत आहेत, म्हणून बारावी पास झाल्यानंतर मुलांसाठी माझा सल्ला आहे की त्यांनी आपल्या दोन-तीन पद्धतीने स्किल्सची तयारी करावी. ज्यामध्ये सर्वात गरजेचं आहे डेटा अॅनालिटिक्स आणि बेसिक कोडींग स्किल्सदेखील असणं. उदाहरणार्थ, कार चालविणाऱ्याला टायर बदलायला यायलाच हवेत.

याव्यतिरिक्त कोणत्याही क्षेत्रात गेल्यावर प्रोग्रामिंग यायला हवं, कारण तिथेच आपलं भविष्य असणार आहे. कम्युनिकेशनदेखील चांगलं असायला हवं म्हणजे तुमचं बोलणं समजायला कोणालाही अडचण होणार नाही. सोबतच मुलांना आपल्या विषयावर कमांड असणं देखील गरजेचं आहे.

स्किल डेव्हलपमेंट गरजेचं आहे

अजित सांगतात की अशी अनेक मुलं आपल्या देशात आहेत ज्यांच्याजवळ आर्थिक क्षमता खूप कमी आहे. त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून स्किल डेव्हलपमेंटच्या अनेक सुविधा मिळतात. त्यामध्ये अनेक कोर्सेस चालतात आणि कोर्सेसमुळेच स्टायपेंडदेखील मिळतो, म्हणून थोडं जागरूक होऊन सरकारच्या रोजगार विभागात जा आणि माहिती करून घ्या, की काय होत आहे. यामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे की काही न करता तुम्ही पुढे जाऊ शकत नाही स्किल डेव्हलपमेंट करावंच लागणार.

क्षेत्राच्या हिशेबाने निवड स्किल्स निवडा

अनेकदा असंदेखील पाहण्यात आलंय की वेगवेगळया शहरांमध्ये वेगवेगळया पद्धतीचे जॉब पॅटर्न असतात. अशावेळी मुलांना आपल्या आजूबाजूचं वातावरण पहात स्किल डेव्हलपमेंट करणं योग्य राहतं. गाव कृषी प्रधान आहे म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांनी शेतीशी संबंधित माहिती, शेतामध्ये काम करण्यासाठी त्याच्याशी संबंधित माहिती होण्याची अधिक गरज आहे. छोटया शहरांमध्ये रिटेल नेटवर्किंग डिस्ट्रीब्यूशन इत्यादी असतात.

याव्यतिरिक्त हे पाहणंदेखील गरजेचं आहे की कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या उद्योगाचा विकास होत आहे. उदाहरणार्थ, खनिज, वीज, मनोरंजन इंडस्ट्री इत्यादीमध्ये नियुक्ती पाहता आपल्या योग्यता वाढवायला हव्यात म्हणजेच नोकरी मिळण्यात सहजसोपं होईल. यासाठी मुलांनी आपल्या क्षेत्राची माहिती घेणं गरजेचं आहे यासाठी त्यांनी चांगली वर्तमानपत्रं, मासिकं वाचत रहायला हवं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें