गर्भधारणेपूर्वी या बाबी जरूर लक्षात घ्या

* अनुभा सिंग, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयव्हीएफ एक्सपर्ट

आजकाल वाढत्या स्वातंत्र्यामुळे आणि सेक्सबाबतच्या एकपेक्षा जास्त साथीदारामुळे लैंगिक संबंधी अनेक आजार होण्याची भीती असते. लैंगिक समस्या शक्य तितक्या लवकर ओळखणे आणि डॉक्टरकडे जाणे आवश्यक होऊन जाते. असे न केल्यास वंध्यत्वासारखी मोठी समस्यादेखील उद्भवू शकते.

पेल्विक इनफ्लेमेटरी डिसीज

हा मुख्यत: असुरक्षित संबंधांमुळे पसरणारा एक रोग आहे. मेट्रो शहरांमध्ये गुप्तपणे महिलांच्या वंध्यत्वाचे हे एक मोठे कारण बनत आहे. १५ ते २४ वयोगटातील मुलींना या गोष्टीचा धोका जास्त असतो. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात अजून याचे प्रमाण कमी असले तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर यावर नियंत्रण ठेवले नाही तर येणाऱ्या काळात ही मोठी समस्या बनू शकते. याचा परिणाम नवीन पिढीतील आई बनण्यावर होऊ शकतो.

डॉ. अनुभा सिंह म्हणतात की हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. याची सर्वात मोठी ओळख अशी आहे की यामुळे अचानक वजन वाढते. मासिक पाळी अनियमित होते. मुरुमे आणि टक्कल पडण्याची समस्यादेखील उद्भवू शकते. मुले जन्मास घालण्याच्या वयात सुमारे १ ते १० महिलांमध्ये ही समस्या पाहावयास मिळते. फॅलोपियन नलिका आणि प्रजननाशी संबंधित इतर अवयवांमध्येदेखील यामुळे सूज येऊ शकते. वेळेवर उपचार न केल्यास याचा परिणाम वंध्यत्वाच्या रूपात समोर येतो.

हा रोग क्लॅमायडिया ट्रेकोमायटीस नावाच्या जिवाणूमुळे होतो. मोठया शहरांमध्ये सेक्सच्या बाबतीत वाढते स्वातंत्र्य आणि एकाहून अधिक साथीदार याच्या प्रसाराचे सर्वात मोठे कारण आहे. या व्यतिरिक्त स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे, मद्यपान किंवा धूम्रपान केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ति कमकुवत होते आणि त्यामुळेदेखील याचे जीवाणू महिलांना आपले लक्ष्य करू शकतात.

मेट्रो शहरांत याच्या विळख्यात सापडणाऱ्या महिलांची टक्केवारी ३ ते १० दरम्यान आहे. हे स्त्रियांच्या सामाजिक स्थितीवर आणि लैंगिक वर्तनावर खूप अवलंबून आहे, २५ वर्षांखालील मुली याच्या विळख्यात सहजतेने येण्याचे कारण हे आहे की त्यांच्या गर्भाशयाचे तोंड या वयापर्यंत लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारास तोंड देण्यास सक्षम नसते. यामुळे त्या अशा आजारांना बळी पडतात.

लक्षणांवर लक्ष ठेवा

पीआयडीच्या विळख्यात सापडल्यावर योनीमार्गत जळजळ होऊ शकते. पांढऱ्या स्रावाची तक्रार उद्भवी शकते. ओटीपोटाच्या खालच्या भागात वेदना होऊ शकते, ताप येऊ शकतो आणि उलटयादेखील होऊ शकतात. तसेच मासिक पाळीच्या आधी आणि नंतर शारीरिक संबंध ठेवताना रक्तस्त्राव होऊ शकतो. यामुळे लघवी करताना जळजळ देखील होऊ शकते.

मुक्तता कशी होईल

डॉ. अनुभा सिंह म्हणतात की पीआयडीची जास्त प्रकरणे मेट्रो शहरांमध्ये होतात. या रोगाचे एक प्रमुख कारण असुरक्षित लैंगिक संबंध आहे. नव्या पिढीला याची जाणीव करून देण्याची गरज आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने आपण आई होण्याच्या आनंदापासून वंचित राऊ शकता.

पीआयडीशी संबंधित लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. औषधाबरोबरच नियमित तपासणी करून त्यावर उपचार करणे शक्य आहे. निष्काळजीपणा केल्यास हा रोग संपूर्ण प्रजनन प्रणालीला व्यापू शकतो.

इतरही काही लैंगिक आजार आहेत, जे तितकेच घातक आहेत जसे :

ट्रायकोमोनिएसिस

जर सतत ६ महिन्यांपासून एखाद्या महिलेच्या योनीतून स्त्राव होण्याबरोबरच खाज सुटत असेल, पतिशी संबंध ठेवताना वेदना होत असेल, लघवी करताना त्रास होतो, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. हा ट्रायकोमोनिएसिस रोग असू शकतो.

अनेक वेळा स्त्रियांमध्ये प्रसूती, मासिक पाळी आणि गर्भपात होण्याच्यावेळीदेखील संसर्गाची भीती असते.

निरक्षरता, दारिद्रय, संकोच यांमुळे अनेकदा स्त्रिया प्रजनन अवयवांच्या रोगांवर उपचार करून घेण्यास संकोच करतात. प्रजनन अवयवांच्या संसर्गामुळे एड्ससारखा धोकादायक आजारदेखील उद्भवू शकतो.

कॉपर टी लावूनदेखील प्रजनन अवयवांमध्ये रोग वाढण्याची शक्यता असते. क्लॅमायडिया रोग ट्रॅकोमायटीस नावाच्या जिवाणूमुळे होतो. तोंडावाटे आणि गुद्द्वारामार्गे समागम केल्याने हा रोग लवकर पसरतो. बऱ्याच वेळा या आजारामुळे संसर्ग गर्भाशयाच्या माध्यमातून फॅलोपियन नलिकांपर्यंत पसरतो.

गोनोरिया

स्त्रियांमध्ये हा रोग सुजाक, निसेरिया नावांच्या जिवाणूपासून होतो. महिलांच्या प्रजनन मार्गाच्या ओल्या क्षेत्रात हा तीव्रपणे अगदी सहज वाढतो. याचे जिवाणू तोंडात, घशात, डोळयांतही पसरतात. या रोगात लैंगिक स्रावामध्ये बदल होतो. पिवळया रंगाचा दुर्गंधीयुक्त स्त्राव निघतो. कधी-कधी योनीतून रक्तदेखील बाहेर पडते.

गर्भवती महिलेसाठी हा अत्यंत जीवघेणा रोग आहे. प्रसूती दरम्यान मूल जन्म नलिकेमधून जाते. अशा परिस्थितीत जर आईला हा आजार झाला असेल तर मूल अंधदेखील होऊ शकते.

हर्पीज

हर्पीज सिम्प्लेक्स ग्रस्त व्यक्तिशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे हा रोग होतो. यामध्ये २ प्रकारचे विषाणू असतात. बऱ्याचवेळा या आजाराने ग्रस्त स्त्री-पुरुषांना हा आजार आपल्याला झाल्याचे माहीत नसते. लैंगिक अवयव आणि गुद्द्वार क्षेत्रात खाज सुटणे, लहान-लहान पाणीदार पुरळ, डोकेदुखी, पाठदुखी, वारंवार फ्लू होणे इ. याची लक्षणे आहेत.

सॉप्सिस

हा रोग ट्रेपोनमा पल्लिडम नावाच्या जिवाणूमुळे होतो. योनीमुख, योनी, गुद्द्वाराजवळ खाज न सुटता ओरखडे येतात. महिलांना तर याविषयी कळतही नाही. पुरुषांमध्ये लघवी करताना जळजळ, खाज सुटणे, जननेंद्रियावर फोड येणे इत्यादी समस्या उद्भवतात.

हनिमून सिस्टायटिस

नवविवाहित जोडप्यांमध्ये यूटीआय खूप सामान्य आहे. त्याला हनिमून सिस्टायटिसदेखील म्हणतात. हे स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग, योनीमुख आणि गुद्द्वाराजवळ असते. येथून जीवाणू मूत्रमार्गापर्यंत सहज पोहोचू शकतात आणि संसर्ग करू शकतात. या व्यतिरिक्त इतर अनेक प्रजातींचे जिवाणूदेखील यूटीआय तयार करू शकतात.

सुमारे ४० टक्के स्त्रियांना याची आयुष्यात कधी न कधी लागण होते. लक्षणांषियी बोलायचं झाल्यास, यूटीआय झाल्यावर वारंवार लघवी होते, परंतु लघवी फक्त काही थेंबच होते. लघवीतून वास येतो, लघवीचा रंग अस्पष्ट असू शकतो. कधीकधी रक्त मिश्रित झाल्यामुळे लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा भुरकट असू शकतो.

पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणालाही संसर्ग झाल्यावर लैंगिक संबंध ठेवल्यास लैंगिक समस्या वाढू शकते. उपचार न केल्यास शरीराच्या अवयवांमध्ये वेदना होऊ शकते, ताप येऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये संक्रमण मूत्राशयाच्या वरती पोहोचू शकते आणि संसर्गास कारणीभूत ठरू शकते.

प्रजनन अवयव स्वच्छ आणि सुरक्षित राहावेत यासाठी महत्वाचे आहे की आपल्याला आपल्या प्रजनन अवयवांबद्दल जागरूक असले पाहिजे. जर त्यांच्यात काहीही समस्या असेल तर कृपया तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें