गरोदर महिलांचा आहार कसा असावा

* दीपिका विरेंद्र

आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद अनुभव असतो. गर्भात वाढणारं मूल आईला बऱ्याच गोष्टी शिकवत असतं. संवदेनशील बनवतं, प्रेम करायला शिकवतं. त्यामुळे गरोदर महिला स्वत:ची विशेष काळजी घेतात. कारण अशावेळी महिला फक्त स्वत:साठीच नाही तर बाळासाठीही अन्न ग्रहण करत असतात.

नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांना सतत थकवा जाणवतो. ८-९ तास ऑफिसमध्ये काम केल्याने त्या जास्त थकतात. याशिवाय महिलांना घरातली कामं करावी लागतात. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस श्रमाचा असतो. चला तर मग जाणून घेऊया नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांचा आहार कसा असावा.

असा असावा नाश्ता

तुम्ही सकाळी उठल्या उठल्याच स्वयंपाक आणि घरातली इतर कामं सुरू करत असाल तर हे योग्य नाही. सकाळी उठताच सर्वात आधी ग्रीन टी प्या. दिवसाची सुरूवात ग्रीन टी ने झाली तर तुम्हाला दिवसभर ऊर्जेची कमतरता जाणवणार नाही. त्यानंतर अंघोळ करून फ्रेश व्हा. दुपारचं जेवण तुम्ही स्वत: करत असाल तर त्याची तयारी रात्रीच करून ठेवा. सकाळी सगळं तयार मिळालं तर जेवण करणं डोकेदुखी ठरणार नाही. जेवण करून झाल्यावर सर्वात आधी नाश्ता करा. नाश्त्याला उकडलेली अंडी, चपाती आणि भाजी खा. त्यानंतर आपला डबा तयार करा. डब्यात फळं, सुका मेवा आणि जेवण भरा. दही किंवा ताक घ्यायला विसरू नका.

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर

ऑफिसला पोहोचल्यावर सर्वात आधी पाणी प्या. शरीराला पाण्याची कमतरता भासू देऊ नका. त्यानंतर थोडा आराम करा. काम सुरू करण्याआधी डाळिंब किंवा सफरचंद खा. हे तुमच्यासह बाळाच्याही आरोग्यासाठी चांगलं आहे. शक्य असेल तर केळं खा. त्यानंतर आपलं काम सुरू करा.

दुपारचं जेवण चांगलं घ्या

डाळ-भात, भाजी-चपाती, दही किंवा ताक जे तुम्ही आणलं असेल ते व्यवस्थित चावून खा. घाईघाईत खाऊ नका. जेवणासोबत काकडी खा. सलाड तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

संध्याकाळचा नाश्ता

बऱ्याचदा असं दिसून येतं की गरोदर महिला संध्याकाळच्या नाश्त्याला समोसा, जिलेबी इत्यादी पदार्थ खातात. हे पदार्थ चविष्ट तर असतात, पण आरोग्यदायी नसतात. त्यामुळे घरून सुकामेवा घेऊन या आणि तोच खा. चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटत असेल तर पिऊ शकता. हे दोघांसाठीही फायदेशीर असेल. संध्याकाळी नाश्त्याच्या नावाखाली पूर्ण पोट भरू नका. कारण रात्रीचं जेवणही जेवायचं आहे.

घरी पोहोचण्यासाठी घाई करू नका. ऑफिसची कॅब असेल तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर संध्याकाळी रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे आरामात निघा. थोडा उशिर झाला तरी चालेल. पण घरी आरामात सुरक्षित पोहोचा. घरी पोहोचल्यावर थोडा आराम करा, पाणी प्या. त्यानंतर घरातली कामं करा.

रात्री पौष्टिक जेवण करा

रात्रीच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. एकवेळ डाळ नक्की खा. सोबत चपाती, सलाड आणि बेबीकॉर्न, ब्रोकोली, पनीर इत्यादी भाज्या खा.

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका. थोडं फिरा. दिवसभरात एक ग्लास दूध नक्की प्या. बाळंतपणादरम्यान दूध अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या.

ऑफिससोबत घरातलं काम मॅनेज करायला जमत नसेल तर मेड ठेवा. सगळं काम स्वत:वर घेऊ नका. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

१० उपाय गर्भावस्थेत अशी घ्या आपली काळजी

* गरिमा पंकज

गर्भावस्थेदरम्यान महिलांना अनेक शारीरिक आणि भावनिक बदलांचा सामना करावा लागतो. अशावेळेस आई आणि जन्म घेणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे की गर्भधारण करण्यापूर्वीच प्लानिंग केली जावी. गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेच्या दरम्यान, प्रसूतीच्या कालखंडात आणि प्रसूतीनंतर.

चला जाणून घेऊया चारही अवस्थांदरम्यान आवश्यक दक्षतांविषयी :

गर्भधारणेपूवी

जर आपण माता बनण्याची योजना बनवत असाल तर सगळयात अगोदर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञास भेटावे. यामुळे आपणास निरोगी प्रेगनन्सी प्लॅन करण्यास मदत होईल. गर्भधारण करण्याच्या ३ महिने आधीपासून जो प्री प्रेगनन्सी पिरियड म्हटला जातो, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत बदल आणल्याने ना केवळ प्रजनन क्षमता सुधारते तर त्याचबरोबर गर्भावस्थेच्या दरम्यान होणाऱ्या समस्याही कमी होतात आणि प्रसूतीनंतर रिकव्हर होण्यास मदत मिळते.

प्रेगनन्ट होण्याआधी आपल्या मेडिकल हिस्ट्रीविषयी डॉक्टरांशी अवश्य चर्चा करा. खालील गोष्टींवर लक्ष्य द्या :

* आपणास डायबिटीज, थायरॉईड, दमा, किडनी, हार्ट डिसीज इत्यादी तर नाही ना. जर असेल तर प्रेगनन्सीच्या अगोदर त्याला नियंत्रित अवश्य करा.

* गर्भधारणेपूर्वी एचआयव्ही, हेपिटायटिस बी सिफिलिस इत्यादी टेस्ट अवश्य करून घेतल्या पाहिजे, ज्यामुळे प्रेगनन्सी किंवा प्रसूतीच्या वेळेस हे इन्फेकशन बाळात येणार नाही.

* आपण ब्लड टेस्ट करून हे लक्षात घ्या की चिकनपॉक्ससारख्या आजारापासून वाचवणारी लस घेतली आहे किंवा नाही. आपणास या आजारापासून धोका तर नाही ना, कारण असे इन्फेक्शन गर्भात वाढणाऱ्या अर्भकाला नुकसान पोहोचवू शकते.

* आपणास युटरीनं फाइब्रायड्स आणि एंडोमिट्रिओसिसच्या शक्यतेसाठीही तपासणी करून घेतली पाहिजे.

* जर आपल्या कुटुंबात डाउन सिंड्रोम, थैलेसिमियाचा इतिहास राहिला असेल तर याविषयीही डॉक्टरांना सांगावे.

सर्व्हायकल स्मीयर : आठवून पाहा की आपण मागच्या वेळेस सर्व्हायकल स्मीयर टेस्ट कधी करून घेतली होती. जर पुढची टेस्ट येणाऱ्या १ वर्षात करणे बाकी आहे तर ती आत्ताच करून घ्या. स्मीयर तपासणी साधारणपणे गर्भावस्थेत केली जात नाही, कारण गर्भावस्थेमुळे गर्भाशयमुखामध्ये बदल होऊ शकतात आणि योग्य रिपोर्ट येण्यात अडचणी येऊ शकतात.

वजन : जर आपले वजन जास्त असेल आणि बॉडी मास इंडेक्स (बीएमआई) २३ किंवा यापेक्षा जास्त असेल तर डॉक्टर आपल्याला वजन कमी करण्याचा सल्ला देतील. वजन घटवल्याने आपली गर्भधारण करण्याची शक्यता वाढते आणि आपण आपल्या गर्भावस्थेची निरोगी सुरुवात करू शकता.

जर आपले वजन कमी असेल तर डॉक्टरांशी बीएमआई वाढवायच्या सुरक्षित उपायांविषयी चर्चा करा. जर आपले वजन कमी असेल तर मासिक पाळी अनियमित राहण्याची शक्यता अधिक असते. यामुळे गर्भधारणेत अडचणी येतात. आपला बीएमआई १८.५ आणि २२.९ च्या मध्ये असायला हवा.

गर्भावस्थेच्या दरम्यान : द इंस्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या गाईडलाईन्सच्या अनुसार प्रेगनन्सीदरम्यान महिलेने आपल्या बीएमआईच्या हिशोबाने वजन वाढवायला हवे. अंडरवेट वुमन अर्थात बीएमआई १८.५ पेक्षा कमी असेल तर तिने १२ ते १८ किलो वजन वाढवायला हवे. नॉर्मल वेट वुमन अर्थात बीएमआई १८.५ ते २५ असेल तर ११ ते १५ किलोपर्यंत वजन वाढवा. महिला ओवर वेट असेल अर्थात २५ ते ३० पर्यंत बीएमआई असेल तर तिने ७ ते ११ किलोपर्यंत वजन वाढवायला हवे. ३० पेक्षा जास्त बीएमआई असल्यास ५ ते ९ किलोपर्यंत वजन वाढवायला हवे.

व्यायाम : व्यायाम हेल्दी लाइफस्टाइलचा महत्वाचा भाग आहे. कुठले कॉम्प्लिकेशन नसतील तर प्रेगनन्सी वुमनला हेल्दी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करत राहिले पाहिजे. कमीतकमी ३० मिनिटांचा साधा व्यायाम अवश्य करावा. आईस हॉकी, किक बॉक्सिंग, रायडींग इत्यादी करू नये.

समतोल आणि पौष्टिक आहार घ्यावा : मॅक्स हॉस्पिटल, शालिमार बाग, दिल्लीचे डॉक्टर एसएन बसू म्हणतात की गर्भावस्थेच्या दरम्यान समतोल आणि पौष्टिक आहाराचे सेवन करावे. ज्यामुळे बाळाचा विकास आणि आपल्या शरीरामध्ये होत असलेल्या बदलांसाठी आपले शरीर तयार होऊ शकेल. एक माता बनणाऱ्या महिलेला सामान्यपणे दररोज ३०० अतिरिक्त कॅलरीजची आवश्यकता असते.

सप्लिमेंट्स : गर्भावस्थेच्या दरम्यान दररोज कॅल्शियम, फौलेट आणि आयरनच्या निश्चित प्रमाणाची सतत आवश्यकता असते. यांच्या पूर्ततेसाठी सप्लिमेंट्सचे सेवन करणे आवश्यक असते. कॅल्शियम-१२०० एमएल, फौलेट-६०० ते ८०० एमएल, आयरन-२७ एमएल.

प्रत्येक गर्भवती महिलेने गर्भावस्थेच्या दरम्यान १०० एमजीच्या आयर्नच्या १०० गोळयांचे सेवन अवश्य करायला हवे. हे माता आणि बाळ दोघांसाठी आवश्यक आहे.

प्रेगनन्ट महिलेने नेहमी फळे आणि भाज्या चांगल्या प्रकारे धुऊन खायला पाहिजे.

पुरेशी झोप घ्या : प्रेगनन्ट महिलांना भरपूर आराम आणि झोपेची आवश्यकता असते. त्यांनी रात्री कमीतकमी ८ तास आणि दिवसा २ तास झोपायला हवे. झोपेच्या कमतरतेमुळे शरीराची लय बिघडून जाते.

शारीरिक रूपाने सक्रिय राहा : गर्भावस्थेच्या दरम्यानही आपली सामान्य दिनचर्या चालू ठेवा. घरातले काम करा. जर नोकरी करत असाल तर ऑफिसला जा. रोज अर्धा तास फिरा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपले वर्कआऊट चालू ठेवा. लक्षात घ्या की यादरम्यान दोरीवरून उडी मारू नये आणि कोणतेच असे कार्य करू नये ज्यामुळे शरीराला झटका लागेल.

भावनिक आरोग्याची काळजी घ्या : गर्भावस्थेत भावनिक आरोग्याची काळजी घ्या. मूड स्विंग जास्त होत असेल तर औदासिन्याची शिकार होऊ शकता. जर २ आठवडयापर्यंत ही स्थिती राहिली तर डॉक्टरांशी संपर्क करावा.

प्रसूती : साधारण प्रसूतीमध्ये रिकव्हरी लवकर होते. ७ ते १० दिवसात शरीरामध्ये ऊर्जेची लेव्हल सामान्य होऊन जाते. याउलट साधारणपणे सिझेरियन प्रसूतीनंतर ४ ते ६ आठवड्यांपर्यंत कुठलेही काम न करण्याचा सल्ला दिला जातो. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर अधिक शारीरिक मेहनत करू नये.

स्वस्थ गर्भावस्थेसाठी जरूरी नियमित तपासण्या

– डॉ. सुनीता यादव

गर्भधारणा होणे कोणत्याही स्त्रीसाठी सर्वात आनंददायी बाब आणि अप्रतिम अनुभव असतो. जेव्हा तुम्ही गर्भार राहता, त्या दरम्यान करण्यात येणाऱ्या प्रिनेटल चाचण्या तुम्हाला, तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याबाबत माहिती देतात. यामुळे अशा कोणत्याही समस्येची माहिती मिळण्यास मदत होते, ज्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो जसे की संक्रमण, जन्मजात व्यंग किंवा एखादा जेनेटिक आजार. याचे निदान बाळाच्या जन्माआधीच काही निर्णय घेण्यास मदत करतात.

तसे पाहता प्रीनेटल चाचण्या खुपच उपयोगी असतात, परंतू हे जाणणे खुप अवश्यक आहे की त्यांच्या परिणामांची व्याख्या कशी करायला हवी. पॉझिटिव्ह टेस्टचा नेहमी हाच अर्थ नसतो की आपल्या बाळाला एखादा जन्मजात दोष असेल. तुम्ही आपल्या डॉक्टरांशी चाचणीच्या रिपोर्टबाबत चर्चा करा.

डॉक्टर सगळयाच गर्भवती महिलांना प्रीनेटल टेस्टस् करण्याचा सल्ला देतात. काही स्त्रियांच्या बाबतीतच जेनेटिक तक्रारींची टेस्ट व इतर स्क्रिनिंग टेस्टस् करायची गरज भासते.

५ नियमित टेस्ट्स

गर्भावस्थेत काही नियमित चाचण्या हे निश्चित करण्यासाठी असतात की तुम्ही स्वस्थ आहात की नाही. तुमचे डॉक्टर तुमच्या रक्ताची आणि लघवीची चाचणी करून काही गोष्टी माहीत करून घेतात. यात खालील चाचण्यांचा समावेश आहे :

1 हिमोग्लोबिन (एचबी)

2 ब्लड शुगर एफ आणि पीपी

3 ब्लड ग्रुप चाचणी

4 व्हायरल मार्कर चाचणी

5 ब्लड प्रेशर

जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल तर डॉक्टर तुम्हाला फॉलिक असिड (सप्लिमेंट्स) टॅबलेट्स घेण्याचा सल्ला देऊ शकतात. या गोळया घेण्याचा सल्ला तुम्हाला तेव्हासुद्धा दिला जाऊ शकतो, जेव्हा तुम्ही अगदी ठीक आहात आणि उत्तम आहारसुद्धा घेत आहात. व्हिटॅमिन बी सप्लिमेंट्स आणि कॅल्शियम घेण्याचा सल्ला सर्वच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना देण्यात येतो. हे सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

इतर चाचण्या

स्कॅनिंग टेस्ट : अल्ट्रासाउंड तुमच्या बाळाच्या आणि आपल्या जननेंद्रियांच्या प्रतिमा घेण्यासाठी ध्वनितरंगांचा वापर करते. जर तुमची गर्भावस्था सामान्य असेल, तर तुम्हाला हे २-३ वेळा करावे लागेल. पहिल्यांदा अगदी सुरूवातीला काय परिस्थिती आहे हे पाहायला दुसऱ्यांदा बाळाची वाढ पाहायला साधारण १८-२० आठवडयाचा गर्भ झाल्यावर, ज्याने हे निश्चित होऊ शकेल की बाळाच्या शरीराचे सगळे अवयव योग्य प्रकारे विकसित होत आहेत अथवा नाहीत.

जेनेटिक टेस्ट्स : प्रीनेटल जेनेटिक टेस्ट् विशेषत: त्या स्त्रियांसाठी महत्त्वाची असतात, ज्यांच्या बाळाला जन्मजात व्यंग अथवा जेनेटिक समस्या असण्याची शक्यता असते. असे खालील परिस्थितीत होऊ शकते :

* तुमचे वय ३५ वर्षांहून अधिक असेल.

* तुम्हाला एखादा जेनेटिक आजार असेल किंवा तुम्ही किंवा तुमच्या नवऱ्याच्या कुटुंबात एखाद्या जेनेटिक आजाराचा इतिहास असेल.

* तुमचा आधी एखादा गर्भपात होऊन मृत शिशु जन्मले असल्यास.

डॉ. मोनिका गुप्ता, एम.डी.,डीजीओ गायनॉकोलॉजीस्टच्या मते निरोगी गर्भावस्थेसाठी चाचण्यांबाबत माहिती असणे अवश्यक आहे. प्रीनेटल टेस्टसमध्ये ब्लड टेस्ट्स सामिल आहेत, ज्यामुळे तुमचा ब्लड ग्रुप, तुम्हाला अॅनिमिया आहे अथवा नाही यासाठी तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी, डायबेटीसच्या चाचणीसाठी ब्लड ग्लुकोजची पातळी, तुमचा आरएच फॅक्टर (जर तुमचा ब्लड ग्रुप आरएच निगेटिव्ह असेल आणि बाळाच्या वडिलांचा ब्लड ग्रुप आरएच पॉझिटिव्ह असेल तर शिशुमध्येही वडिलांचे आरएच प्रॉझिटिव्ह ब्लड असू शकते, ज्यामुळे तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होणे सुरु होते आणि त्यामुळे तुमच्या गर्भाला धोका उत्पन्न होऊ शकतो.) तपासला जातो. एचआयव्ही, हेपेटाईटीस सी आणि बीसारख्या आजारांसाठी तुमची व्हायरल मार्कर चाचणीसुद्धा होऊ शकते, कारण गर्भावस्थेत हे आजार होऊ शकतात.

जर तुम्हाला आधीच कळले असेल की तुमच्या जोडीदाराला एखादा विशिष्ट आजार आहे, तर तुम्ही सुरूवातीपासुनच भावनिक पातळीवर तयार राहु शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें