वेडिंग फोटोग्राफीचा नवा ट्रेंड

– गृहशोभिका टी

खरंच काळानुरुप सर्व बदलत जाते. आता लग्न आणि लग्नातील फोटोग्राफीचेच पहा ना, कालौघात यातही बरेच बदल झाले. तुम्ही कधी तुमच्या आईवडिलांच्या लग्नाचे फोटो पाहिले असतील तर त्यात तुम्हाला क्वचितच एखादा फोटो असा पहायला मिळाला असेल ज्यात ते कॅमेऱ्याकडे बघत असतील. बऱ्याच फोटोंमध्ये ते एकतर खाली किंवा इकडेतिकडे बघत असल्याचे पहायला मिळाले असेल. तो काळ वेगळा होता. मात्र काळ बदलला तशी वेडिंग म्हणजे लग्नातील फोटोग्राफीची पद्धत बदलली. आता लग्नाच्या बंधनात बांधले जाणारे जोडपे कॅमेऱ्यात पहायला लाजत नाहीत. उलट एकापेक्षा एक सरस पोझ देऊन फोटो काढायला लावतात.

आजच्या जोडप्यांना काहीतरी वेगळे हवे आहे. काही असे जे इतरांपेक्षा खास असेल. ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर खूप सारे लाईक्स मिळतील. त्यांना हे चांगलेच माहीत आहे की, लग्नाचे फोटो कायमच आठवण म्हणून त्यांच्या सोबत राहणार आहेत, शिवाय हे फोटो त्यांना सोशल मीडियावरही कौतुक आणि खूप सारे लाईक्स मिळवून देतील.

शेवटी या आठवणी आहेत

नवरा-नवरीसह त्यांच्या कुटुंबीयांनाही असे वाटत असते की सर्वांचे फोटो काढून घ्यावेत जेणेकरुन नंतर या फोटांच्या रुपात आठवणी जपून ठेवता येतील. तरीही या सर्वांमध्ये लग्नात जास्त महत्त्वाचे असतात ते नवरा-नवरी. यामागचे कारण अगदी सोपे आहे. लग्नाचा दिवस हा प्रत्येकच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. हा असा दिवस असतो ज्या दिवसासाठी तुम्ही न जाणो केव्हापासून आणि किती स्वप्नं पाहिलेली असता. लग्नाच्या दिवशी कितीतरी विधी आणि धामधुमीत हा अविस्मरणीय दिवस कधी संपतो ते कळतदेखील नाही.

आजच्या मॉडर्न जोडप्यांना लेटेस्ट ट्रेंड चांगल्याप्रकारे माहीत असतात, शिवाय आपल्या लग्नासाठी ते सोशल मीडियावर स्वत:च तयार केलेले हॅशटॅग टाकतात, जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या लग्नाबद्दल समजेल. तंत्रज्ञान आणि त्याद्वारे शोधून काढलेल्या अशा नव्या पद्धती सुंदर फोटोंची इच्छा असणाऱ्यांची चांगल्या प्रकारे मदत करत आहेत.

ही तंत्रज्ञानाचीच देण आहे ज्यामुळे आज लग्न आणि आऊटडोअर सेलिब्रेशमध्ये ड्रोनही पहायला मिळत आहेत, जे एकापेक्षा एक सुंदर फोटो आणि व्हिडीओ कैद करत असतात. अशा नवनवीन तंत्रज्ञानामुळे आणि सोशल मीडियामुळे सध्या खरंच खूप बदल झाले आहेत.

कँडिड फोटोग्राफी

प्रकरण फक्त येथेच थांबत नाही. जोडपे आपला लग्नाचा दिवस कशाप्रकारे कायमचा लक्षात ठेवू इच्छितात, याची माहिती करुन घेऊन त्यानुसार कशी फोटोग्राफी करायची याचा पर्याय निवडतात. काही जोडपी कँडिड फोटोग्राफी, तर काही पोज फोटोग्राफ्स निवडतात. पहायला गेल्यास पोज फोटोग्राफ्स दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असतात, पण कोणत्याही जोडप्याला लग्नाचे सर्वच फोटो हे पोज फोटो असावेत असे वाटत नाही कारण, अशा फोटोंमध्ये एकसारखेच स्मितहास्य, हावभाव पहायला मिळतात. म्हणूनच नव्या फोटोग्राफीत जास्तीत जास्त नैसर्गिक क्षण कॅमऱ्यात कैद करायला महत्त्व दिले जात आहे.

याची तयारी म्हणून जास्तीत जास्त फोटोग्राफर्स आता डिजिटल फोटोग्राफीचा वापर करीत आहेत. फोटोग्राफीसाठी एचडी म्हणजेच हाय डेफिनेशन डीएसएलआर आणि एसडी मार्कसारख्या कॅमेऱ्याची निवड केली जाते. अशा हाय क्वॉलिटी कॅमेऱ्यातून केलेल्या फोटोग्राफीचा फायदा असा होता की, फोटो आणि व्हिडीओज खूप उच्च आणि चांगल्या प्रतीचे येतात.

आजच्या युगात वेडिंग फोटोग्राफीचेही तीन प्रकार आहेत. पहिला आहे लग्नाआधीची फोटोग्राफी, ज्याला प्री वेडिंग फोटोग्राफी म्हणतात. दुसरा म्हणजे लग्नाच्या दिवशीची फोटोग्राफी आणि तिसरा प्रकार लग्नाच्या नंतरची फोटोग्राफी म्हणजे पोस्ट वेडिंग फोटोग्राफी. आता एवढे सर्व प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, प्रत्येक फोटो काहीतरी सांगत असतो.

प्रत्येक जण लग्नाच्या सुंदर आठवणी जतन करुन ठेवू इच्छितो, पण आता केवळ लग्नातीलच नव्हे तर प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग क्षणांनाही कैद करून ठेवले जात आहे. आता ती वेळ गेली जेव्हा लग्नाच्या दिवशी आणि त्याआधी साखरपुडा, हळद, मेहंदी याचदिवशी फोटो काढले जायचे.

प्री वेडिंग फोटोग्राफी

प्री वेडिंग फोटोग्राफीची क्रेझ २-३ वर्षांपूर्वी खूपच कमी होती. पण आजकाल प्रत्येकालाच प्री वेडिंग फोटोचे वेड लागले आहे. याचे खास वैशिष्टय म्हणजे नवरा-नवरी अगदी सहजपणे एकमेकांना समजून घेऊ शकतात.

प्री वेडिंग शूटचे ठिकाण जोडप्याच्या आवडीनुसार ठरवले जाते. कोणाला डोंगरदऱ्या आवडतात, कुणाला समद्र किनारा, तर कोणाला किल्ला किंवा राजवाडा आवडतो. जिम कॉर्बेट, नीमराणा, उदयपूर, जयपूर, गोवा, केरळ, दुबई, मलेशिया, थायलंडला जाऊन केलेला प्री वेडिंग शूटचा खर्च १ लाखापासून ५ लाखांपर्यंत येतो.

काही जण असेही असतात जे इतका खर्च करु शकत नाहीत. अशा कमी बजेट असणाऱ्यांसाठी फोटोग्राफर्स आऊटडोअर लोकेशन म्हणून दिल्लीतील लोदी गार्डन, हूमायूचा मकबरा, निसर्ग उद्यान अशा ठिकाणी शूट करायचे. पण अलिकडे पोलिसांचे निर्बंध वाढू लागले आहेत आणि आता या ठिकाणी शूटिंगची परवागनी नाही.

यावर उपाय म्हणून एनसीआर येथे काही असे स्टुडिओ सुरू करण्यात आले आहेत जिथे चित्रपटांप्रमाणेच सेट लावून प्री वेडिंग शूट केले जाते. आजकाल असे सेट जोडप्यांना जास्त आवडू लागले आहेत, कारण तिथे शूट करणे फारच सोपे झाले आहे. तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नसते कारण, तिथे शूटिंगपासून ते पेहरावापर्यंत सर्व मिळते.

पोस्ट वेडिंग फोटोग्राफी

वेडिंग शूट हे लग्न ठरल्यानंतर लग्न होईपर्यंत केले जाते. तर पोस्ट वेडिंगचे फोटो शूट लग्नानंतर लगेचच केले जाऊ लागले आहे. आता प्री वेडिंगप्रमाणेच पोस्ट वेडिंग शूटिंगकडेही जोडप्यांचा कल वाढला आहे. हनिमूनदरम्यान हे फोटो शूट केले जाते. जे जोडपे लग्नानंतर लगेच हनिमूनला जाऊ शकत नाहीत ते शहरातील जवळपासच्या चांगल्या ठिकाणी फोटो शूट करुन घेतात. खासकरुन हातावरची मेहंदी उतरत नाही तोपर्यंतच हे फोटो शूट केले जाते.

आता नॉर्मल फोटो शूटऐवजी हाय टेक्नॉलॉजीच्या मदतीने केले जाणारे फोटो शूट अधिक पसंत केले जात आहे. यात जास्त करुन ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग केला जात आहे.

पोस्ट वेडिंग शूट हे वेडिंग शूटमधील शेवटचे शूट असते, जिथे जोडपे जास्त रोमँटिक पोज देऊन फोटो शूट करताना पहायला मिळतात. अनेक जोडपी थीमनुसार शूट करणे पसंत करतात.

प्री वेडिंग शूट बनवा संस्मरणीय

* इंजी आशा शर्मा

आजकाल प्रत्येक कपलला आपले प्री वेडिंग शूट इतरांपेक्षा चांगले करायचे असते. त्यांची इच्छा असते की हा थाटमाट सोहळयाला आलेल्यांच्या आठवणीत कायमचा राहावा. लग्नानंतरही त्याचीच चर्चा व्हावी आणि फोटोग्राफरनेही त्यांचेच शूट उदाहरणादाखल इतरांना दाखवावे. चला, जाणून घेऊया की याला शानदार आणि संस्मरणीय कसे बनवायचे ते.

लग्नानंतर जवळीक वाढविण्यासाठी जसा हनीमून गरजेचा आहे, तसेच एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेण्याच्या प्रक्रियेत प्री वेडिंग शूट उपयोगी ठरू शकते. कारण सोबत राहिल्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या बऱ्याच गोष्टी समजतात. त्याच्या सवयी लक्षात येतात.

यासोबतच सामान्यत: प्री वेडिंग शूट करणारा फोटोग्राफरच लग्नाचे शूटिंग करतो. साहजिकच त्या जोडप्याशी त्याचे चांगले टयूनिंग जुळते. त्यामुळे शूट करणे त्याच्यासाठी सहज सोपे होते. आणि याच सहजतेमुळे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शानदार आणि संस्मरणीय ठरतात.

कोठे कराल

प्री वेडिंग शूटसाठी सर्वप्रथम योग्य ठिकाणाची निवड करणे खूपच गरजेचे आहे. प्रत्येकाची स्वत:ची अशी आवड असते. कुणाला नदी, पर्वत आवडतात, तर कुणाला समुद्र किंवा किल्ले, महाल. काहींना थीम शूटिंग आवडते.

वरवधूने एकमेकांची आवड आणि सोय लक्षात घेऊन ठिकाण निवडले पाहिजे. देशात आणि देशाबाहेर अशी बरीच ठिकाणे आहेत, जी आजकाल प्री वेडिंग शूटसाठी तरुणांची पहिली पसंती आहेत. जसे महाल, किल्ल्यांसाठी राजस्थानातील जयपूर आणि उदयपूर, समुद्र किनाऱ्यांसाठी गोवा, केरळ आणि पाँडेचेरी व उद्याने, वनांसाठी नॅशनल पार्क इत्यादी.

आपल्या बजेटचा विचार करून तुम्ही आसपासच्या एखाद्या रमणीय ठिकाणाचीही निवड करू शकता.

अजून बरेच पर्याय आहेत

वेडिंग फोटोग्राफर नरेश गांधी सांगतात की छोटया शहरांतील तरुण-तरुणी जे डेस्टिनेशन शूट करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी सेट्सचा एक नवा ट्रेंड आला आहे. होय, चित्रपट आणि मालिकांप्रमाणेच आजकाल प्री वेडिंग शूटसाठीही खास सेट बनवले जात आहेत. याचा फायदा असा होतो की तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व लोकेशनचे बॅकग्राउंड मिळते. एकटयाने बाहेर जावे लागेल, हा संकोच दूर होतो आणि खिशावर बजेटचा भारही पडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आउट डोअर शूटिंगवेळी कपडे बदलताना येणाऱ्या अडचणीतूनही सुटका होते.

शूट कसे असावे

स्टिल फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूट बहुतांश कपल्सची इच्छा असते की एखाद्या चित्रपटाच्या जोडप्याप्रमाणे त्यांची गोष्टही सर्वांसमोर यावी. जसे की एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्यांचे भेटणे किंवा फिल्मी स्टाईल एकमेकांना धडकणे. मग थोडे लटके, भांडण. त्यानंतर प्रपोज आणि होकार इत्यादी आणि हे सर्व केवळ व्हिडिओ शूटद्वारे शक्य आहे, पण हे प्रत्यक्ष त्याच लोकेशनवर शूट करणे कठीणच नाही तर बजेटच्या बाहेरचेही होऊ शकते.

व्हिडिओ शूटसाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कम्फर्टेबल असणे खूपच गरजेचे आहे, कारण एका व्हिडिओ शूटमध्ये १०-१५ सेकंदांपर्यंत कम्फर्टेबल राहावे लागते.

काय खास असावे

प्री वेडिंग शूटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांमधील केमिस्ट्री. तुम्ही दोघे मेड फॉर इच अदर वाटायला हवात. यासाठी गरजेचे आहे की तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत काही वेळ एकांतात घालवायला हवा. तुम्ही फोनवर गप्पा मारल्या असाल किंवा व्हिडिओ चॅटद्वारे एकमेकांची आवडनिवड समजून घेतली असेल, ते भाव तुमच्या देहबोलीतून जाणवायला हवेत.

अशा प्रकारच्या शूटमध्ये मित्रमैत्रिणींनाही सोबत घेता येईल. तुम्ही सर्व डान्स करत किंवा सहलीत मौजमजा करत असताना दिसलात तर ते क्षण निश्चितच अतिरिक्त ऊर्जेने भरलेले दिसतील.

पावसात भिजतानाच्या तुमच्या शूटमध्ये नॅचरल रोमान्स दिसेल. विविध प्रकारचे प्रॉप्स वापरुनही तुम्ही तुमच्या शूटला युनिक बनवू शकता.

थोडेसे रोमँटिक व्हा

नेहमीच्या आणि पारंपरिक शूटपेक्षा वेगळे असे काही व्हिडिओ जे थोडे रोमँटिक आणि सेक्सी असतील तर सोन्याहून पिवळे होईल. गरजेचे नाही की हे फोटो किंवा व्हिडिओ सर्वांसमोर पाहिले जावेत. यांना भविष्यातील त्या क्षणांसाठी सांभाळून ठेवता येईल, जेव्हा लग्नाच्या काही वर्षांनंतर आपसात मतभेद किंवा पती-पत्नीत वाद होतील. आपल्या फोटोग्राफरशी बोलून असे खासगी सेक्सी व्हिडिओ शूट करून घेता येईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें