सन मराठी वाहिनीवरील तिकळी या थरारक मालिकेत ‘वेद’ ची एन्ट्री!

‘तिकळी’ या मालिकेत आतापर्यंत आपल्याला कळलेच आहे की तिकळीच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर दिसणार असून, तिच्या जोडीला पूजा ठोंबरे देखील या मालिकेत रहस्यमय भूमिकेत असणार आहे.

सन मराठीने रिव्हील केलेल्या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये आपण पाहिलेच की तिकळी या मालिकेत पूजा ठोंबरे व वैष्णवी कल्याणकर मुख्य पात्र साकारणार आहे. परंतु आता इथे  एक ट्विस्ट आलाय तो म्हणजे असा की , तिकळीच्या जोडीदाराचा चेहरा आता रीव्हील झाला आहे. टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा अनेक मालिकांमध्ये आपण त्याला पाहिलेच असेल, तो अभिनेता म्हणजेच सर्वांचा लाडका ‘पार्थ घाटगे’ या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक वर्षे मालिकांमध्ये काम केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा पार्थला रुपेरी पडद्यावर पाहता येणार असून प्रेक्षकांना नक्कीच आनंद होणार आहे. अभिनेता पार्थ घाटगे ‘वेद’ चे मुख्य पात्र साकारणार आहे.

तिकळीच्या आयुष्यातील तिला समजून घेणारा मुलगा वेद आहे परंतु, वेद तिकळीला नवं आयुष्य देऊ शकेल का? ‘वेद’ तिकळीला लागलेला डाग कसा पुसणार? तिकळीला वेद तिच्या अस्तित्वा सकट कसं स्वीकारणार आणि वेद तिकळी व ती तिसरी व्यक्ती म्हणजेच अभिनेत्री पूजा ठोंबरे यांचा एकमेकांशी काय संबंध असेल हे सगळे रहस्याने दडलेले प्रश्न प्रेक्षकांच्या मनात दडलेले आहेत. या सगळ्यात वेद आणि तिकळी यांच्या प्रेमाची अनोखी कथा कशी बहरणार हे आपल्याला लवकरच कळणार आहे.

येत्या 1 जुलै पासून सोम ते शनि रात्री 10 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.

पाहायला विसरू नका सन मराठी वाहिनीवरील नवी मालिका ‘तिकळी’ येत्या 1 जुलै पासून सोम ते शनि रात्री 10 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें