त्या दिवसात काय खावं

– नमामी अग्रवाल, सीईओ, नमामी लाइफ

वयात येण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत महिलांनी दररोज सुमारे १८ मिलीग्रॅम लोहाचे सेवन करणे आवश्यक आहे. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्यास मीनोरहेजिया म्हणतात. यामुळे शरीरात लोहाची कमतरता उद्भवू शकते. एका अंदाजानुसार प्रजनन वयाच्या ५ टक्के स्त्रियामध्ये हेवी पिरियड्समुळे लोहाची कमतरता होते व त्यामुळे त्यांच्यात अशक्तपणा येतो. मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होत असल्यामुळे स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत या आहाराचे सेवन करून लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते.

हीम लोह : हीम लोह प्राणी उत्पादनांमध्ये आढळते. हीम लोह नॉनहीम लोहापेक्षा वेगाने शोषले जाते. या खाद्य पदार्थांमध्ये हीम लोह भरपूर प्रमाणात आढळते.

चिकन लिवर : कचिकन लिवर सर्व्ह करताना त्यांत १२.८ मिलीग्रॅम लोह असते, जे रोजच्या गरजेच्या ७० टक्के असते.

शेलफिश : १०० ग्रॅम शेलफिशमध्ये २८ मिलीग्रॅमपर्यंत लोह असते, जे रोजच्या गरजेच्या १५५ टक्के असते.

अंडी : १०० ग्रॅम उकडलेल्या अंडयात १.२ मिलीग्रॅम लोह असते.

नॉनहीम लोह : वनस्पतींमधील खाद्य स्त्रोतांमध्ये नॉनहीम लोह आढळते. हे हीम लोहसारखे शरीरात वेगाने शोषले जात नाही, परंतू शाकाहारी लोकांसाठी ते लोहाचे प्रभावी स्त्रोत आहे. खाली नॉनहीम लोहचे सर्वोत्तम स्त्रोत दिले आहेत –

हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्या-जसे की पालक, स्विस कार्ड, काळे आणि बीट ग्रीनच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये २.५, ६.५ मिलीग्रॅम लोह असते, जे रोजच्या गरजेच्या १४ ते ४० टक्के असते. कोबी आणि ब्रोकोलीदेखील लोहाचे चांगले स्रोत आहेत.

टोमॅटो : अर्धा कप टोमॅटो पुरी किंवा पेस्टमध्ये जवळपास ३.९ मिलीग्रॅम लोह असते. याशिवाय टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, ज्यामुळे लोहाचे चांगले शोषण होण्यास मदत होते.

राजगिरा : राजगिरा हा ग्लूटेनलेस धान्याचा एक प्रकार आहे. १ कप पिकलेल्या राजगिऱ्यामध्ये ५.२ मिलीग्रॅम लोह असते. हे रोजच्या गरजेच्या २९ टक्के आहे. याशिवाय हे प्रोटीनचे संपूर्ण स्त्रोतदेखील आहे.

ओट्स : ओट्सदेखील ग्लूटेनलेस सुपर ग्रेन आहे. हा आहार अनेक प्रकारे फायदेशीर आहे. १ कप पिकलेल्या ओट्समध्ये रोजच्या गरजेच्या १९ टक्के लोह असते. हा आहार पचनयंत्रणेसाठीही फायदेशीर आहे.

किडनी बीन्स/राजमा : उकडलेल्या राजमाचा १ कप ४ मिलीग्रॅम लोह देतो. राजमा प्रथिने व फायबरचा चांगला स्रोत आहे आणि रक्तातील साखरेची सामान्य पातळी राखण्यास मदत करतो.

खजूर : खजूर हा नैसर्गिक साखरेचा एक उत्तम स्रोत आहे. याशिवाय १०० ग्रॅम खजूरमध्ये रोजच्या गरजेपैकी ५ टक्के लोह असते.

चणे/छोले : १०० ग्रॅम हरभऱ्यांमध्ये ६.६ मिलीग्रॅम लोह असते. त्यात प्रथिने आणि फायबरही मुबलक प्रमाणात आढळतात.

सोयाबीन : १ कप सोयाबीनमध्ये ८.८ ग्रॅम लोह असते.

लोह शोषणाशी संबंधित पैलू

लोहयुक्त आहाराचे व्हिटॅमिन सी सोबत सेवन केले पाहिजे. कारण लोह शोषण्याचे प्रमाण व्हिटॅमिन सीमुळे ३०० टक्क्यांनी वाढते. म्हणून आपल्या आहारात संत्री, किवी, लिंबू, द्राक्षे आणि टोमॅटोचा समावेश करा.

खाण्याबारोबर चहा-कॉफी पिऊ नका, कारण यामुळे लोह शोषण्याचे प्रमाण ५० ते ९० टक्क्यांपर्यंत कमी होते. चहामध्ये असलेले टॅनिन आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन लोह शोषण्यास प्रतिबंध करते. कॅल्शियमचे मोठया प्रमाणात सेवन केल्यामुळे लोह शोषण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून लोह समृध्द आहारासह दूध, चीज, लस्सी इत्यादींचे सेवन करू नका.

शिजवलेल्या पालकामध्ये अधिक लोह असते, कारण कच्च्या पालकात ऑक्द्ब्रॉलिक अॅसिड किंवा ऑक्सलेट असते, जे लोहाचे शोषण रोखू शकते.

तृणधान्ये, शेंग, सोयाबीनमध्ये फायटेट्स असतात, ज्यामुळे लोह शोषण्याचे प्रमाण कमी होते.

जेव्हा सणात पीरियड्स सुरू होतात

* पूजा भारद्वाज

सणांच्या आनंदाच्या वातावरणात प्रत्येक जण आनंदाच्या मूडमध्ये असतो, परंतु स्त्रियांचा सणांचा आनंद तेव्हा खराब होतो, जेव्हा त्यांना अशावेळी पीरियड्स सुरू होतात. तेव्हा यादरम्यान येणारा थकवा, कंबर व पोटाच्या वेदना, जास्त ब्लीडिंग व डोकेदुखीसारख्या समस्या त्यांचा सर्व उत्साह कमी करतात व त्या इच्छा असूनही काही करू शकत नाहीत. त्यांची प्रत्येक इच्छा तशीच्या तशीच राहून जाते. घरातल्या इतरांना आनंद साजरा करताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरते. अशात जर त्यांनी या गोष्टींची काळजी घेतली, तर त्यांचा सणांचा आनंददेखील कमी होणार नाही :

रहा टेन्शन फ्री

अशा वेळी स्त्रिया स्वत:ला एका मर्यादित व्याप्तीने बांधून घेतात व आजारपणासारखे वाटून घेतात, परंतु हे कोणतेच आजारपण नाही, तर ही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे दबून नाही, खुलेपणाने जगा. पीरियडसंबंधी जास्त तणाव घेऊ नका, कारण जास्त तणाव घेणे त्यांच्या तब्येतीसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे विचार सकारात्मक ठेवले, तर जास्त चांगले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट आहे की, परिस्थिती कशीही असू द्या, आनंदी राहा. कारण जेव्हा तुम्ही आतून आनंदी रहाल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील तेजाची गोष्टच वेगळी असेल.

हॉट वॉटर बॉटलने शेक

पीरियड्सच्या दरम्यान पोटात जर जास्त वेदना असेल, तर तुम्ही गरम पाण्याच्या बाटलीने शेक घेऊ शकता. कारण पीरियड्समध्ये पोटाच्या खालच्या भागात गरम पाण्याच्या बाटलीने शेक घेण्याने गर्भाशयाच्या मांसपेशींना आराम मिळतो व वेदनेपासून आराम होतो.

घ्या स्वच्छतेची विशेष काळजी

पीरियड्सच्या दरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घ्या जेणेकरून तब्येतीवर याचा वाईट परिणाम होऊ नये. यादरम्यान वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याने तुम्ही कित्येक प्रकारच्या आजारांपासून, जसे की यूटीआय व इन्फेक्शनपासून वाचू शकता व यात सगळयात महत्त्वाची भूमिका त्या पॅड वा सॅनिटरी नॅपकिन्सची असते, जे तुम्ही पीरियड्स दरम्यान वापरता. याशिवाय पीरियड्स दरम्यान अँटिबायोटिक साबण वा क्लिंजरने प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करा. अंघोळ जरूर करा. कारण यामुळे तुम्ही स्वत:ला फ्रेश वाटेल.

कंफर्ट गरजेचा

आजदेखील अशा कित्येक स्त्रिया आहेत, ज्या पीरियड्सदरम्यान सॅनिटरी पॅड्सच्या जागी अस्वच्छ कपडे, वर्तमानपत्रे, पाने किंवा चुकीच्या पॅडचा वापर करतात, ज्यात त्या स्वत:ला अनकम्फर्टेबल वाटतात व कपडे घाण होण्याच्या भीतीने कुठे जात नाहीत व उत्सवांचा पुष्कळ आनंद घेऊ शकत नाहीत. त्यामुळे या काळात फक्त पॅड्सचाच वापर करा, जेणेकरून तुम्ही मोकळेपणाने जगू शकाल.

योग्य पॅड्स निवडा

पीरियड्सच्या दरम्यान पुष्कळ काळासाठी एकाच पॅडचा वापर तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे पॅड कितीही चांगल्या क्लालिटीचे का असेना, कमीतकमी दिवसातून तीन वेळा जरूर बदला. सोबतच पॅडच्या क्वालिटीवरदेखील लक्ष द्या, कारण पुष्कळ स्त्रिया स्वस्तपणाला बळी पडून प्रॉडक्टच्या गुणवत्तेसोबत तडजोड करतात व कमी पैशांमध्ये हीन ब्रँडचे नॅपकिन्स वापरू लागतात, ज्यामुळे त्यांना रॅशेस येतात.

तसे तर बाजारात निरनिराळया कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहेत, परंतु यांची गोष्टच वेगळी आहे, कारण हे तुम्हाला मोकळेपणाने जगण्याचे स्वातंत्र्य देते. याशिवाय हे हेवी फ्लोसाठी उपयुक्त आहे व लीकदेखील होत नाही. याला डिस्पोज करणेदेखील खूप सोपे आहे. शिवाय हे पॉकेट फ्रेंडली आहे.

गरजेच्या गोष्टी

* सॅनिटरी नॅपकिन तीन-चार तासांनी बदलत राहा.

* पाळीमध्ये स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही.

* पाळीमध्ये प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

* सुती अंडरवेअर वापरा.

* पाळीमध्ये डीहायड्रेशनची समस्यादेखील होऊ शकते. त्यामुळे जास्त पाणी प्या.

* या काळात तंग कपडे शक्यतो वापरू नका. सैल कपडे घाला.

मासिकपाळी आजार नाही

* प्रतिनिधी

पिरिएड्स म्हणजेच मासिकपाळीबाबत आपला समाज आजदेखील मोकळेपणाने बोलायला घाबरतो. याबाबत आजदेखील सर्वांच्या समोर न बोलण्याची गोष्ट समजली जाते. पॅड्स लपवून आण, मुलांना याबाबत सांगू नकोस आणि घरात यादरम्यान सर्वांपासून दूर रहायचं यासारख्या गोष्टी मुलीला शिकविल्या जातात.

पिरिएड्स तसं लपविण्यासारखी गोष्ट नाहीये. ही एक नैसर्गिक क्रिया आहे जी प्रत्येक स्त्रीला मासिकपाळीच्या रुपात येते. परंतु पिरिएड्सच नाव ऐकताच अनेकजणं ऐकून न ऐकल्यासारखं करतात जणू एखाद्या वाईट शब्दाचा वापर केलाय.

अनेक स्त्रियांच्या मनात पिरिएड्सबाबत अनेक समस्या, अडचणी, अनेक प्रश्न असतात, ज्याबाबत त्या मोकळेपणी बोलत नाहीत. आज आपला समाज आधुनिकतेकडे वेगाने चालला आहे, परंतु समाजाची मानसिकता अजूनदेखील जुन्या खुंटीला बांधलेली आहे. आजदेखील स्त्रियांना मासिकपाळीच्या काळात देवळात जाऊ दिलं जात नाही, लोणच्याला हात लावू दिलं जात नाही, वेगळी वागणूक दिली जाते. हे विचार बदलण्यासाठी आणि समाजाला जागरूक करण्यासाठी दरवर्षी २८ मेला वर्ल्ड मस्त्रुयल हायजीन डे साजरा केला जातो जो यावर्षी देखील अलीकडेच साजरा करण्यात आला.

मासिकपाळी कोणता आजार वा घाण नाही

वर्तमानपत्र, टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला विविध स्वरूपाची माहिती मिळू लागलीय ज्यामुळे समाजाच्या विचारसरणीत सुधारणा पहायला मिळतेय. पूर्वी जेव्हा टीव्हीवर सॅनेटरी पॅडची जाहिरात यायची तेव्हा चॅनेल बदललं जायचं. परंतु आता हे असं होत नाही. मात्र अजूनही लोक याबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत. अगदी स्त्रियांदेखील याबाबत खाजगीत बोलताना दिसतात.

एकाच घरात राहत असूनदेखील पिरिएड्सला अनेक सांकेतिक नावानी संबोधलं जातं कारण एकच कोणाला समजू नये. पॅडला काळया प्लास्टिक वा पेपरमध्ये कव्हर केलं जातं. जणू काही एखादं प्राणघातक हत्यार लपवलं जातंय. लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की मासिकपाळी कोणता गुन्हा नाहीये याउलट निसर्गाकडून स्त्रियांना मिळालेली एक अनमोल भेट आहे. अशावेळी त्यांच्याशी वेगळं वागण्यापेक्षा स्त्रियांची खास काळजी घेण्याची गरज आहे.

सॅनेटरी पॅडचा वापर किती सुरक्षित

पिरिएड्सच्या दरम्यान स्त्रियांच्या शरीरात विविध प्रकारचे बदल होतात, ज्याबाबत त्यांना माहीतच नसतं. जेव्हा पहिल्यांदा मुलींना पिरिएड्स येतात तेव्हा आईचं पाहिलं कर्तव्य म्हणजे याबाबत मोकळेपणाने बोलायला हवं. परंतु असं काही होत नाही. पिरिएड्सला फक्त लाजेत गुंडाळलं जातं. आजदेखील खेडेगावात स्त्रिया मासिकपाळीत फडकं वापरतात. काही स्त्रिया सॅनेटरी पॅड्सचा वापर करतात खऱ्या परंतु त्यांना योग्यप्रकारे वापर करता येत नाही.

सॅनेटरी पॅड्सचा वापर करणं खूप सहजसोपं आहे परंतु हे आजारालादेखील निमंत्रण देतं. खरंतर, सॅनेटरी पॅड्मध्ये डायोक्सीन नावाच्या पदार्थाचा वापर केला जातो. डायोक्सीनचा वापर नॅपकिन पांढरा ठेवण्यासाठी केला जातो. याचं प्रमाण जरी कमी असलं तरी हे तसं नुकसानदायकच आहे. ज्यामुळे अनेक आजार होण्याची भीती असते. जसं ओवेरियन कॅन्सर, हार्मोनल डिसफंकशन, म्हणून स्त्रियांनी यादिवसात ऑरगॅनिक क्लॉथच्या पॅड्सचा वापर करायला हवा, हे पॅड्स रुई आणि जूटने बनलेले असतात. वापर करण्यातदेखील आरामदायक असतात आणि पुन्हा स्वच्छ धुवून वापरता येतात. यासोबतच हे पर्यवारणाचं नुकसान करत नाहीत.

दीर्घकाल पॅडचा वापर धोकादायक

सॅनेटरी पॅडचा वापर केल्याने स्त्रियांमध्ये इन्फेक्शन आणि जळजळच्या तक्रारी साधारणत: आढळतात. या सर्व समस्या अनेकदा पिरिएड्स संपल्यानंतर आढळतात. जेव्हा अधिककाळ पॅड्सचा वापर केला जातो, तेव्हा यामुळे एयर सर्क्यूलेशन खूप कमी होतं आणि वेजाईनामध्ये स्टेफिलोंकोकास ओरियस बॅक्टेरियाची वाढ होते. हेच बॅक्टेरिया पिरिएड्सच्या काही दिवसानंतर एलर्जी वा इन्फेक्शनला कारणीभूत ठरतात.

पिरिएड्सच्या काळात स्वछता गरजेची

* पिरिएड्सच्या काळात दर चार तासानंतर पॅड बदलायला हवं.

* कॉटन पॅडचा वापर करावा.

* जर तुम्ही टेम्पोनचा वापर करणार असाल तर ते दर दोन तासांनी बदला.

* वेळोवेळी तुमच्या योनीची स्वच्छता करत रहा, यामुळे पिरिएड्सच्या काळात येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

* पिरिएड्सच्या काळात अनेकदा खूप वेदना होतात, म्हणून याकाळात कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे वेदनेपासून दिलासा मिळेल.

* पिरिएड्सच्या काळात टाईट वा लोवेस्ट पॅन्ट घालू नका.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें